Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 03, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता » Archive through October 03, 2006 « Previous Next »

Giriraj
Friday, September 29, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,सुंदर... सारंग.. सही रे..



Shyamli
Friday, September 29, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सारंग!!!!
पण अजुन अगदी तुझा स्पेशल टच असलेली कविता नाही आली तुझ्याकडुन.....

होऊन जाउ दे


Dhund_ravi
Friday, September 29, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरवले आभाळ माझे
........ निशिगंधात न्हाणे टाळ तु...
आठवु दे मज,
स्वर माझ्या नभाचे
........ सुर केसातले सांभाळ तु...

धुंद रवी.


Sumedhap
Friday, September 29, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी...मस्त
निरु_कुल फार छान आहे कविता..

आणी सर्वांना प्रतिक्रीयां बद्दल
Thanks A Lot!

Meenu
Friday, September 29, 2006 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद रवी तुम्ही जी चारोळी की छोटी कविता लिहीली आहेत तीचा अर्थ नाही कळला मला ... जरा सांगाल का

Jo_s
Saturday, September 30, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो, खुप दिवसांनी आलो
तुम्हा सगळ्याना सुट्टी असेल , ही कविता टाकून ठेवतोय

धुसर …..

माघातली सांजवेळ
मखमली किरणांचा नाजूकसा खेळ
पश्चीम क्षितिजी ढगांची लोकर
हट्टी थंडीची अनामीक थरथर
शेतं मात्र, उदास
वृध्द, सुरकुतलेली
जवानिच्या आठवणींतच
खोल हरवलेली
बाभळीचे झुंबे, तृणपुष्पांची राने
सारं काही लुटून नेलं
त्या विरक्त शिशिराने
आकाशाकडे, सहजच पाहीलं
आणि मन लगेच तिकडेच धावलं
विश्वासच बसेना, पटेना मनी
पण खरच होत्या तिथे
पावसाळी ढगांच्या पलटणी
समोरचा डोंगर, धुक्यातून डोकावला
बाभळीच्या अंगावरही काटा आला
कपाशीची फुलं उगीचच थरथरली
अन् पाऊलवाट जागीच बावरली
वाऱ्यालाही चढला, जोम नवा
पिंपळही झपाटला, लागताच ती हवा
लखलखत्या किरणांचा पंखा, उघडताच पश्चीमेने
बाजुच्या ढगांची लोकर, भिजली सोन्याने
इतक्यात एक अवखळ सर, गिरकी घेत आली
वृध्द शेत, शुष्क मातीत, थरथरली, झिरपली
कौलांनीही लहानांसमं, थेंब फुले जमवली
सळसळत सळसळत
पिंपळ ओरडला “पाऊस पाऊस”
खालची देवबाभळ ओरडली
चल खोटारड्या मला थंडी वजत्ये
तुझी ही कसली हौस
पिंपळाने मग पानांच्या ओंजळीतले
कोवळे थेंब तिच्यावर ओघळवले
जणू तिला स्वप्नातून जागे केले
गिरक्या घेत, फेर धरत
थेंब येत होते अजून
पश्चीमही घेत होती आता
किरणांचा पंखा आवरुन
ढगां आड सारे, रंग आता दडले
काही क्षणात असे, नाट्य सारे घडले
अन् आषाढातले तारुण्य, मातीला परत मिळाले
एखाद्या आश्चर्या सारखा
पाऊस दाटून आला
अन भिजलेल्या मातिचा
सुगंध दरवळू लागला….

सुर्य, केव्हाच मावळला
अजूनही पाणी ठिबकतय
कौलावर ताशा वाजतोय
मातीचा सुगंध, सारं भारुन टाकतोय
आकाश मात्र निवळलय
एकिकडे शुक्राचा तेजस्वितारा
आणि बाकी आसमंत सारा
सुगंधी, स्वप्नमय, धुसर
धुसर धुसर धुसर् धुसर् धुसर्……

(मंगेश पाडगावकरांच्या “धुसर” या लेखावरुन स्वैर……)
सुधीर

Dhund_ravi
Saturday, September 30, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाच मिनाक्षी… उमजेल तुला...

हरवले आभाळ माझे
...... निशिगंधात न्हाणे टाळ तु
आठवु दे मज
स्वर माझ्या नभाचे
...... सुर केसातले सांभाळ तु
फ़ुलतो उरातुन सुर हा
...... झुलतो मनातुन मोगरा
हरवेन मी
हरपेन मी
......थांब तु आता जरा

हरवला तो रंग तरंग
...... गंधात पाखरु गुंगले
वेलावर रंग सोडुनी
...... जाळ्यात पखरु गुंतले
कर मोकळे
गर्द सवळे
...... सोड त्या फ़ुलपखरा
रंगेन मी
तरंगेन मी
...... थांब तु आता जरा

हरवला पाऊस माझा
...... वणव्यात अडकुन पेटला
भिजवुन तु प्राजक्त माझा
...... अंगणात भडका रेटला
दाहातली नशा पिलेला
...... हा गारवा नाही खरा
अडकेन मी
भडकेन मी
...... थांब तु आता जरा

धुंद रवी


Indradhanushya
Saturday, September 30, 2006 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकापेक्षा एक सुंदर प्रतीभा इथे एकवटल्या आहेत :-) Jo , रवि... सरस

Chinnu
Saturday, September 30, 2006 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी! शब्दच नाहीयेत माझ्याकडे!!
सुधीर, फ़ार्फ़ार छान. खुप आवडली!


Paragkan
Sunday, October 01, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sudhir, khaasach re !

Good one Ravi!

Swara
Sunday, October 01, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाश

क्षितिजापाशी पोचता पोचता
विरघळलेल्या सार्‍या वाटा
तरीही...
करतो आहे प्रवास

एकाकी ही माझी वाट
नाही सोबत नाही साथ
मग...
कुणाचा हा आभास

चन्र्द सूर्य गेले तारे
मालवलेले दीपक सारे
आता...
माझा मलाच प्रकाश

वर खाली नाही काही
पोकळी भरली दाही दिशांनी
तेव्हा...
झालो मीच आकाश.


Ashwini
Sunday, October 01, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, सुरेख.
रवी छान आहे.


Sameerdeo
Sunday, October 01, 2006 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यशाची नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी, यशस्वी सिमोल्लंघनासाठी, विजयादशमीच्या लाख लाख शुभेच्छा,समीर


Smi_dod
Monday, October 02, 2006 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळखायला लागलो तेंव्हा
भेटायचे नाही कधी
हा माझा पण...
आणि एकदा तरी भेटु हा तुझा हट्ट
चालेल..भेटुया एकदा
माझी माघार...
आत्ताच भेटायला काय हरकत आहे
भेटुया एकदाने
भेटत गेलो परत परत
कधीतरी भेटायचे ठरवता ठरवता
भेटायला लागलो रोजच
मग....
हळु हळु तु वेळ कमी करायला लागलास
तुझ्या जाण्याने मी पोरकी होते
अधांतरी होते हे माहीत असुनही
रोजच नको काही भेटायला
म्हणायला लागलास
कधीतरि भेटुया म्हणतोएस
पण आता कधीच नको भेटायला
यावर येशील....
कदाचित म्हणणार ही नाही तसे
पण कृतीतुन मात्र सतत जाणवुन देशील
का रे असे व्हावे
आपल्या मुग्ध कळ्याचे
टपोर्‍या फ़ुलां ऐवजी
निर्माल्य व्हावे...

स्मि


Daad
Monday, October 02, 2006 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी, छान आहे तुमच्या कविता, गज़ला almost गीत बनुनच येताहेत. फारच छान!
सुधीर - 'धूसर' सुंदर..!
स्वर, 'वर खाली नाही काही पोकळी भरली दाही दिशांनी
तेव्हा... झालो मीच आकाश.' - सुरेख कल्पना!
स्मि..... किती खरखुरं?

आज, सकाळी सकाळी खूप छान छान वाचयला मिळालं चालू दे!


Sarang23
Monday, October 02, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, गिरी, श्यामली, दाद धन्यवाद...
सुधीर, एकदम सही आहे...!
रवी, छान कविता...


Meenu
Tuesday, October 03, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी माफ करा. पण पद्यात उत्तर देण्याऐवजी गद्यात जरा तुमच्या कवितेचं रसग्रहण कराल का. मला खरच कळली नाहीये ती. धन्यवाद. अर्थात ईतर कुणीही रसग्रहण लिहीलं तरी चालेल.

Sumedhap
Tuesday, October 03, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी मैत्री...

तुझी मैत्री म्हणजे श्रावणमास, कधी पाऊस कधी ऊन
सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणात हात ठेवलास घट्ट धरुन

तुझी मैत्री म्हणजे हिंदोळा सतत आनंदात झुलवणारा
हळुवार फुंकर घालुन जख्मातही हसु खुलवणारा

तुझी मैत्री एक धागा वेळेबरोबर कसलेला
गुंफले किती क्षण सुखाचे तरीही अंत नसलेला

तुझी मैत्री एक सुगंध सारे आसमंत भरणारा
प्रत्येक क्षणात आनंद पसरवुन दुःख दूर करणारा

तुझी मैत्री एक छत्र, जसे जमिनीवरील आकाश
अंधारलेल्या वाटेत होता फक्त तिचा प्रकाश

तुझी मैत्री फुलासारखी मनाच्या पुस्तकात सारली आहे
गंध निघुन गेला तरी मैत्री अजुन उरली आहे.......



Jo_s
Tuesday, October 03, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Indradhanushya, Chinnu, Paragkan, Ashwini, Daad, Sarang
धन्यवाद

सारंग, वैभव, मिनू,स्मि. सर्वांच्याच कविता मस्त आहेत.

Zaad
Tuesday, October 03, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसांनी गुलमोहराच्या छायेत आलो. छानच बहरलाय.
वैभव, 'हे असं...' आवडली.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators