|
Niru_kul
| |
| Wednesday, September 27, 2006 - 10:26 am: |
| 
|
मी तुझा जाहलो.... भावना उरीच्या, सदैव जागवत आलो; वेदनांना माझ्या मी, मित्रांसारखे वागवत आलो.... झालो प्रसन्न मी, तुझ्या एकाच आठवणीने; पुन्हा त्या जुन्या क्षणांना, ह्रदयी माझ्या सजवत आलो.... झाली अपेक्षापूर्ती, तुला एकदा पाहण्याची; वेड्या माझ्या मनाला, नजरेत तुझ्या भिजवत आलो.... जाहलो मी सर्वस्वी तुझा, पळभराच्या द्रुष्टीभेटित; काळजात माझ्या मी, प्रेम तुझ्यासाठीचे रुजवत आलो....
|
Daad
| |
| Wednesday, September 27, 2006 - 7:20 pm: |
| 
|
रवी, अरे...... नुसतीच नजर टाकली त्या "ती, तो, ...." वरून.... व्यवस्थीत मांडी ठोकुन बसून वाचायला हवंय. .... सवड मिळाल्याबरोबर, लगेचच करेन. सारंग, 'वेडा' छानच आहे सुमेधा, मस्तं! कवितेचं नाव?....... 'आणि म्हणे'? निरु, मस्तंय!
|
Sumedhap
| |
| Thursday, September 28, 2006 - 1:00 am: |
| 
|
हो ..'आणी म्हणे' हेच नाव आहे.. Thanks...
|
Dhund_ravi
| |
| Thursday, September 28, 2006 - 1:09 am: |
| 
|
पानझड... जर असणारंच असेल तर सखे तुझ्या ओल्या केसात ………… सुरांचा उन्माद असु दे तुझ्या केसातुन बरसावं माझ्या शब्दांच वादळ ………… त्याला कवितांचा नाद असु दे तुझ्या रातराणी मेहेफ़िलीनं छेडावी जीवघेणी गझल माझ्या उध्वस्त जीवाची ………… त्याला उन्मुक्त दाद असु दे तो मोहाचा घोट प्यायला मी कधी पासुन आतुर तुझ्या अनावर पशाची ………… त्याला मनसोक्त साद असु दे सखे तुझ्या ओल्या श्वसात ………… माझा गुलमोहरी श्वास असु दे तुझ्या देहावर फ़ुलावा माझ्या स्पर्शाचा सडा, तुझ्या मस्तवाल कळ्यांना ………… माझ्या मिठीचा वास असु दे.. तुझी कातरवेळ असावी मझ्या रात्रीला बिलगायला व्याकुळ तुझ्या संधिप्रकाशाला सुद्धा ………… माझ्या विरहाचा भास असु दे तुझ्या पारीजातकानं झुरावं माझ्या उन्मत्त बहव्यासठी तुझ्या वसंतातल्या बहरण्याला ………… माझ्या पानझडीचा ध्यास असु दे…. धुंद रवी.
|
Sumedhap
| |
| Thursday, September 28, 2006 - 1:49 am: |
| 
|
व्वा रवी!!! फारच छान लिहीता तुम्ही....तुमची "ती,तो..." कविता पण छान आहे.. आनंद हिरवळीचा ओला आनंद तुलाही घेता येईल पावसात भिजुन तर बघ... रुक्ष मनातही कधी मोहर दरवळेल थोडं थांबुन तर बघ... सुरवंटाचे फुलपाख्ररु केव्हातरी होईल वाट पाहुन तर बघ... हरवलेले सुर पुन्हा गवसतील ताल देऊन तर बघ... सुखाची किमंत नक्की समजेल दुखाःला सामोरं जाऊन तर बघ... जे काही हवं आहे तुला, सर्व मिळेल प्रयत्न करुन तर बघ... प्रत्येक लहान गोष्टीत आनंद दिसेल जरा नजर बदलुन तर बघ... कुणीतरी जिव्हाळ्याचं तयार असेल तुझा हात धरायला विश्वास ठेऊन तर बघ... हसण्याची तुझ्या द्रुष्ट काढावी लागेल आनंदात जगुन तर बघ...
|
Sarang23
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:08 am: |
| 
|
वैभव, निनावी, दाद... धन्यवाद... रवी, सुमेधा छान!
|
हे असं ... हे असं डोळे मिटून बसताच काय होतं कोण जाणे ... कुणीतरी अलगद शेजारी येऊन बसतं अन ऐकवू लागतं , जगाच्या चौकटीत न बसणार्या गोष्टी कितीतरी वेळ ... कितीतरी वेळ मी नुसताच ऐकत असतो वास्तवाचा पडदा हळू हळू धूसर होत असतो मग कधीतरी मनाला काही काही सुचायला लागतं ... अन कुणीतरी निघता निघता एक कविता मागतं .... हे असं डोळे मिटून बसताच काय होतं कोण जाणे ...
|
Shyamli
| |
| Thursday, September 28, 2006 - 7:39 am: |
| 
|
वा!!!! क्या बात है
|
Sampadak
| |
| Thursday, September 28, 2006 - 7:57 am: |
| 
|
मंडळी, आपल्या छान छान कविता दिवाळी अंकात पाठवा बरे.
|
Meenu
| |
| Thursday, September 28, 2006 - 8:26 am: |
| 
|
त्याचं अन माझं भांडण नेहमीचच .... विषयही कसा ठरुन गेलेला प्रेम अन माया .... नसेल माझ्यावाट्याला हे दोन्ही मी म्हणते मनापासुन .... पण मग याची गरज तरी का बरं निर्माण करायची माझ्या मनात ....
|
Meenu
| |
| Thursday, September 28, 2006 - 8:30 am: |
| 
|
शब्दांची हल्ली मला भीतीच वाटते .... शांतता आपली तीच बरी वाटते .... मित्रांशीही आता मी शांतताच वाटते ....
|
वैभव, सुंदर. सुमेध, चांगले विचार आहेत. मीनू, काय झालं गं?
|
Chinnu
| |
| Thursday, September 28, 2006 - 10:21 am: |
| 
|
रवी, शब्दाशब्दात नशा आहे! वैभव, चिंतन आवडलं.
|
Niru_kul
| |
| Thursday, September 28, 2006 - 10:27 am: |
| 
|
तिनं मला एवढं दिलंय.......... तिनं मला एवढं दिलंय, मला परकं ठेवून; एकदा मी तिला माझं सर्वस्व देणार आहे, चुपचाप पणे मरुन..... माझ्या भावनांना कधी, जाणुनच घेतलं नाही तिने; त्या भावनांना मी न्याय देणार आहे, तिच्याचसाठी झुरुन..... माझ्या डोळ्यांतील आसवांना, बांध नाही आता; प्रत्येक रात्र माझी सरते आहे, तिच्याच आठवांना स्मरुन..... माझं मलाच आश्चर्य वाटतं, कसा मी जगतो आहे अजुन; वेदनाच बहुतेक वाहते आहे, नसांमध्ये रक्त बनून....
|
Paragkan
| |
| Thursday, September 28, 2006 - 10:33 am: |
| 
|
ravi, vaibhav: khaasach rew!!!
|
Sarang23
| |
| Thursday, September 28, 2006 - 11:44 pm: |
| 
|
वैभवा खास रे! राम, माफ कर मित्रा वेळ झाला नाही... जमल्यास आज टाकतो गझल
|
Sarang23
| |
| Friday, September 29, 2006 - 12:01 am: |
| 
|
प्राक्तन प्रत्येकाचे दुःख आहे गुर्हाळातल्या उसासारखं; एकदा चर्हाटात घातलं की पिळवणूक हेच अटळ प्राक्तन... रामराया काय काय पाहिलं असशील रे तू? नाहीतरी अनुभव म्हणजे सुद्धा - चर्हाटच नाही का!? सारंग
|
Daad
| |
| Friday, September 29, 2006 - 2:40 am: |
| 
|
सुमेधा, वैभव, मीनु छान! वैभव.... 'हे असं' सुंदर! निरु_कुल... वेदनाच बहुतेक वाहते आहे, नसांमध्ये रक्त बनून.... क्या बात है!
|
Devdattag
| |
| Friday, September 29, 2006 - 2:59 am: |
| 
|
सारंग कन्सेप्ट आहे रे.. वैभव, मीनु, नीरु_कुल, सुमेधा आवडल्या कविता..
|
Meenu
| |
| Friday, September 29, 2006 - 3:15 am: |
| 
|
मीनू, काय झालं गं? >>> काही नाही गं स्वाती .... उशीरा पर्यंत काम करायला लागलं की असं होतं बघ. प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद दोस्तहो
|
|
|