Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 27, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता » Archive through September 27, 2006 « Previous Next »

Sarang23
Monday, September 25, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवण

तुझी आठवण
माश्याची सावली
आग की लावली
जळामध्ये | १ |

दूर दूर पडे
प्राजक्ताचा सडा
मनातला तडा
उजळला | २ |

चिरेबंदी वाडे
वितळून गेले
उंबराला आले
फूल कसे? | ३ |

मनामधे असा
पडला पाऊस
पापण्यांची हौस
फिटलीसे | ४ |

सारंग


Ankushsjoshi
Monday, September 25, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्ण

मी अमर्त्य आहे,मी अजिंक्य आहे.
मी एकटा समर्थ आहे.
परी मी जाणतो माझा,
मी माझ्यातला एक उपेक्षित "कर्ण " आहे.

रणधुमाळी उठलि पुन्हा,उन्माद शंखनादाचे.
परी झुगारुन बंध,
तुडवित रुढि असलेला तो ख:डग रक्तवर्ण आहे.

"काढु दे हे चाक,हे ! अर्जुना रुतलेले"
हे बोलणारा एक आत्मा जिर्ण आहे.
रोज़ असा माझ्यातल्या अर्जुना हाती मरणारा,
मी.... एक केविलवाणा,उपेक्षित.... कर्ण आहे.


Lopamudraa
Monday, September 25, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा मस्तय...!!!!
अंकुश जोशी कर्ण फ़ार आवडली छान...!!!!


Ankushsjoshi
Monday, September 25, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद
लोपमुद्रा आभरि आहे


Sumedhap
Monday, September 25, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक क्षणी डोळ्यासमोर फक्त त्याचे चित्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे

मनातली चल्-बिचल कितीतरी विचीत्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे

कामात मन गुंतवावे हा अपयशी कानमंत्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे

वागणं-बोलणं, खाणं-पिणं सगळंच फार आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे

कुणी सांगावे मनी वसलेला तोच हा राजपुत्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे

स्विकारायला तयारच नाही, मन किती भित्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे

फसवु नको स्वतला मनाची दशा जगासमोर सचीत्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे


Daad
Monday, September 25, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, thanks heaps !
सारंग, सुन्दरच....
अंकुश, 'कर्ण' आवडली..... छान आहे!

शलाका


Krishnag
Monday, September 25, 2006 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुन्य!!!!!!!!!!

शुन्य झालो जगताना………..
कुणी डावी कडे घेतात आपली किम्मत वाढवायला
कुणी उजवी कडे टाकतात लोकोपवाद टाळायला
कुणी गुणू देत नाहीत स्वतःचे वजन सांभाळायला
कुणी भागू देत नाहीत स्वतःचे अस्तीत्व सांभाळायला
बेरजेत गेलो तरी फरक नाही पाडू शकत
वजा झालो तरी फरक नाही पडत
सगळेच का असे शुन्य मला समजतात
असा विचार करीत शुन्यात पहातो मी माझा मलाच
पण वेड्या
शुन्य आहेस तू जेवढा छोटा आहेस
तेवढाच भव्य आहेस्…
ह्या अवकाशाच्या पोकळी एवढा
तुझी नाही वाढली म्हणून काय झाले
कुणाची तरी किम्मत वाढवतोस ना…
आणि सामावून घेतोयेस ना स्वतःत
सार्‍या सुखांना दु:खाना भुत भविष्य आणि वर्तमानाला
त्या अवकाशा सारखा………….
विषाद नको वाटून घेऊस.
कळेल शुन्याचीही किंमत केंव्हा तरी सार्‍यांना

किशोर


Kandapohe
Tuesday, September 26, 2006 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा किसना सहीच अहे शुन्य.. अचानक का असा शुन्यात गेला आहेस? :-)

Dhund_ravi
Tuesday, September 26, 2006 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उधळु नको मोहरंग
मज अजुनही जगायचे
पेटले बेभान रान
मज भानावर यायचे

लाजली कळी कळी
ख़ळी गालावर उमलली
उमलत्या खळीत जळून
पाकळी बहरली
बहरत्या फ़ुलात मिटुन मज पाखरु बनायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

मन सैरभैर पाखरु
श्वासवरी तरंगले
पेटले श्वासात गंध
गंधात भास रंगले
रंगात अंग भिजवुनी मज तरंगात गायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

उन्मत्त रात्र रेशमी
विखरुन पाश न्हायली
पाशात दंश लपवुनी
दरवळली सायली
मोहात मात असुनही मज पराभुत व्हायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

धुंद रवी


Daad
Tuesday, September 26, 2006 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृष्णा,
'बेरजेत गेलो तरी फरक नाही पाडू शकत
वजा झालो तरी फरक नाही पडत '.... सुंदर!

रवी..... मस्तं आहे. दादर्‍याच्या मिटरमध्ये आहे. अरे कविता कसली...... गीतंच आहे हे. छानच!

शलाका


Dhund_ravi
Tuesday, September 26, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Shalaka...

एक कविता, कथा किंवा ललित..
...... असं काहीही म्हणता येईल असं एक Article post केलय, कथा कदंबरी मध्ये

" ति... तो... त्याची कविता आणि तिची खिडकी " आवर्जुन वाच...

धुंद रवी


Kandapohe
Tuesday, September 26, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी छानच. एक विनंती करायची आहे. ललीत मधे तेच तेच पोष्ट का टाकता तुम्ही? बायको मला डुक्कर म्हणते मी याआधी पण वाचले आहे. :-)

Dhund_ravi
Tuesday, September 26, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चुकुन टाकली गेली...
काढली!

Thanks dude...

धुंद रवि


Sarang23
Tuesday, September 26, 2006 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

     वेडा

आला दिवस सरतो आहे
नवेच गाणे म्हणतो आहे!

कुणी टाकतो जुनेच फासे;
कुण्या घराचे फिरती वासे
तरी जरासे कण्हून कोणी उठतो आहे!
आला दिवस सरतो आहे...

कुणा नाठवे झाले गेले;
खेळ अधूरा सोडुन आले
अन कोणी भरल्या डोळ्यांनी गातो आहे!
आला दिवस सरतो आहे...

भेट क्षणिक जी झाली होती;
त्यात जन्मली नातीगोती
उगी आठवुन कोणी आतुन झुरतो आहे!
आला दिवस सरतो आहे...

युगामागुनी युगे लोटली;
नयनांमधली दरी आटली
फेकुन पत्थर कोण अता ओरडतो आहे?
रस्त्यामधुनी कोणी वेडा फ़िरतो आहे!
आला दिवस सरतो आहे...


सारंग


Ramachandrac
Tuesday, September 26, 2006 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृश्णाजी शुन्य खरच छान..
रवी, कवीता खुप सुरेख आहे विषेशता शेवटच्या दोन ओळी...
सारंगा मित्रा बर्‍याच दीवसानी तुझी कवीता वाचायला मिळाली मस्तच रे...( आता एखादी धुंद गझल येउदे)...


Sarang23
Tuesday, September 26, 2006 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रा, कसा आहेस?
गझल नक्की टाकतो आज...


Vaibhav_joshi
Wednesday, September 27, 2006 - 12:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे सारंग !!!
कृष्णा शून्य आवडली रे .. छान
राम ... आज इकडे कुठे ?
:-)


Sumedhap
Wednesday, September 27, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक क्षणी डोळ्यांसमोर फक्त त्याचे चित्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे..

मनातली चल-बिचल कितीतरी विचीत्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे..

कामात मन गुंतवावे हा अपयशी कानमंत्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे..

वागणं-बोलणं, खाणं-पिणं सगळंच फार विचीत्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे..

कुणी सांगावे मनी वसलेला तोच हा राजपुत्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे..

स्विकारायला तयारच नाही, मन किती भित्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे..

फसवु नकोस स्वतला, मनाची दशा जगासमोर सचित्र आहे
आणी म्हणे तो फक्त एक चांगला मित्र आहे..


Lopamudraa
Wednesday, September 27, 2006 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छाने.. .. .. .. ... ... ... .. काहिच्या काही च्या bb वर पण चालली.. असती.

Swaatee_ambole
Wednesday, September 27, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, ' वेडा' छान आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators