Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 27, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » विनोदी लेखन » विडंबने » Archive through September 27, 2006 « Previous Next »

Milya
Tuesday, September 26, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ गाणे
ती : ही ऽ ऽ ऽ कशानं धुंदी आली ||

तो : काही समजनां

ती : काही उमजनां

तो : ह्यो चांद नभी, ही पुनव उभी रेशमी धुक्याने न्हाली

ती : ही ऽ ऽ ऽ कशानं धुंदी आली ||
------

ती : इरलाचा पिसारा फ़ुलतो रं
तो : जिव अंतराळी ह्यो झुलतो गं

ती : मन हुरहुरलं
तो : का बावरलं ही कशाची जादु झाली

ती : काही समजनां

तो : काही उमजनां

तो : ह्यो चांद नभी, ही पुनव उभी रेशमी धुक्याने न्हाली

ति : ही ऽ ऽ ऽ कशानं धुंदी आली ||
----------

तो : ही कुजबुज कुजबुज कसली
ती : ही पानं खुदुखुदु हसली

तो : लाडीगोडी बघुन
ती : चेडाछेडी करुन, चांद लबाड हसतो गाली

तो : काही समजनां

ती : काही उमजनां

तो : ह्यो चांद नभी, ही पुनव उभी रेशमी धुक्याने न्हाली

ति : ही ऽ ऽ ऽ कशानं धुंदी आली ||
----------

ती : लई टिपुर टिपुर ही रात अशी
तो : आली पिरतीच गानं गात जशी

ती : दोन्ही डोळं मिटुन
तो : आज आली कुठुन, मला गुल्लाबी गोड लाली

ति : काही समजनां

तो : काही उमजनां

तो : ह्यो चांद नभी, ही पुनव उभी, रेशमी धुक्याने न्हाली

ती : ही ऽ ऽ. ऽ कशानं धुंदी आली ||
---------


संदर्भ : मध्यंतरी पुण्यात वाहतुक शाखेच्या कंत्राटदारी कर्मचार्‍यांनी एका नागरिकाची गाडी parking zone मधुन उचलली आणि नंतर चक्क त्या माणसाच्या अंगावर फ़ेकली
-----


पहिला नागरीक : ही ऽ ऽ ऽ कशानं मस्ती आली ||

दुसरा नागरीक : थोडी खाकीची ऽ ऽ

प. ना : थोडी 'खादी'ची ऽ ऽ

दु. ना : ही गाडी नवी, शिस्तीत उभी, फ़ेकसी कशाला खाली

प. ना : ही ऽ ऽ ऽ कशानं मस्ती आली ||
------

प. ना : मस्ती ही जिव्हारी सलते रे
दु. ना : गाडी अंतराळी झुलते रे

प. ना : गाडी गडगडली
दु. ना : का आपटली, ही सत्तेची गुर्मी झाली

प. ना : थोडी खाकीची ऽ ऽ

दु. ना : थोडी 'खादी'ची ऽ ऽ

दु. ना : ही गाडी नवी, शिस्तीत उभी, फ़ेकसी कशाला खाली

प. ना. : ही ऽ ऽ ऽ कशानं मस्ती आली ||
------

दु. ना : ही भानगड आहे कसली
प. ना : सारी सिस्टीम की हो नासली

दु. ना : ठेकेदाराकडुन...
प. ना : गाड्या नेती ओढुन, करिती लोकांचे खिसे खाली

दु. ना. : थोडी खाकीची ऽ ऽ

प. ना : थोडी 'खादी'ची ऽ ऽ

दु. ना : ही गाडी नवी, शिस्तीत उभी, फ़ेकसी कशाला खाली

दु. ना : ही ऽ ऽ ऽ कशानं मस्ती आली ||
-----

प. ना : लई बेणी तयांची जात असे
दु. ना : कुंपणच शेत जर खात असे

प. ना. : डोळे उघडे ठेवुन
दु. ना : देऊ लढा मिळुन, नाही सामान्यांना कुणी वाली

प. ना : थोडी खाकीची ऽ ऽ

दु. ना : थोडी 'खादी'ची ऽ ऽ

दु. ना : ही गाडी नवी, शिस्तीत उभी, फ़ेकसी कशाला खाली

प. ना. : ही ऽ ऽ ऽ कशानं मस्ती आली ||

~मिलिंद छत्रे



Psg
Tuesday, September 26, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या!!!!! खरय. sad but true ! चांगलं विडंबन!

Shonoo
Tuesday, September 26, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी एकमेकांशी न बोलण्याचं व्रत आहे का नवरात्राचं?

Swaatee_ambole
Tuesday, September 26, 2006 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, मस्त रे! पूनम म्हणाली तसं sad but true.

Manuswini
Tuesday, September 26, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शूनू,

मी लिहितो,तु तारीफ़ कर
तु लिही, मी तारीफ़ करेन असे खेळ आहेत का?
नवरा बायकोने एकमेकांची तारीफ़ ही केलीच पाहिजे.
तशी बांधीलकी ठेवली नाहीतर मस्ती आली म्हणतील ना
का बायकोने चर चौघांमध्ये तारीफ़ करायचीच नाहे का ग शूनू?

PSG & Milyaa take it easy ,just kidding

मिल्या छान रे जमलं


Abhi_
Wednesday, September 27, 2006 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या!!!!! मस्त जमलंय :-)   

Smi_dod
Wednesday, September 27, 2006 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या... नेहमी प्रमाणेच झकास जमलय...पण पुनम म्हणते तसे कटू सत्य..

Kandapohe
Wednesday, September 27, 2006 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या सही जमले आहे.

Milya
Wednesday, September 27, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सर्वांना

शोनू : तसे नाही घरी मायबोलीविषयी बोलायचे नाही असे व्रत तेवढे घेतलेय :-)
jokes apart अगं मी सुचलो की लिहितो आणि वेळ मिळाला की त्याचे मराठीकरण करुन लगेच इथे टाकतो.. दर वेळी पूनमने ते आधी वाचलेले असतेच असे नाही

मनु मेरे विडंबन मेरे बायकोके तारिफ़ के मोहताज नही हैं :-) (मला जावाकसमची फ़ार आठवण येत आहे)...

पूनम : just kidding गं... :-)





Krishnag
Wednesday, September 27, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, झकासच जमलय!!
तुझे प्रत्येक विडंबन तुझ्या आधीच्या विडंबनाशी काट्याची स्पर्धा करीत असते!! आमच्या सारखे तर कुठले अत्युत्तम हे नाही ठरवू शकत!!



Vaibhav_joshi
Wednesday, September 27, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास रे मिल्या !!!!!

Proffspider
Wednesday, September 27, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमी प्रमाणे जबरी रे मिल्या

Meenu
Wednesday, September 27, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या पथनाट्य करावसं वाटलं हे घेऊन .... मस्त होईल ते ... चांगलं गाणं निवडलं आहेस आणी विडंबन छानच ..

Deepstambh
Wednesday, September 27, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या सही..

मिनू.. पथनाट्य करताना त्यांनी मिल्याला श्रेय दिले म्हणजे झालं.. मागे ऑर्कुटवर कोणीतरी मिल्याचे 'रेशमिया' टाकले होते.. ते नाट्य करणार्‍या मंडळापासुन कृणाल म्युजीक कंपनी (??) पर्यंत सार्‍यांचा उल्लेख होता.. विडंबनकाराचे नामोनिशाण नव्हते..


Vaibhav_joshi
Wednesday, September 27, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी रंगकाम काढायची दुर्बुध्दी झाली ... त्यावेळी पेंटरशी " रंगलेल्या " गप्पा

मूळ गाणे :- मालवून टाक दीप

विडंबन :-

कालवून लाव नीट एक एक रंग रंग
ह्या घरास लाभणार एकवार रूपरंग

त्या तिथेच कोपर्‍यात मार रे अजून हात
ओल राहता तशीच भिंत भिंत होय भंग

फार फार पोपडेच , घर नव्हेच,खोपटेच
पेंट दे असा सुरेख, मोहरेल अंग अंग

दूर दूर त्या छतात, बैसलीय पाल गात
घाव घाल रे जपून, जिंकणार तूच जंग

हे तुला कधी कळेल ? एक हात ना फळेल
मोजणार मीच दाम, हात का तुझाच तंग ?

काय हा नवाच वास ? बंद होत जाय श्वास
रंगकाम एक त्रास, जा तुझा नकोच संग

वैभव जोशी



Himscool
Wednesday, September 27, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या.. एकदम सही...
वैभव.. रंगर्‍यानी फार त्रास दिला का रे??? :-)


Kandapohe
Wednesday, September 27, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, रंग बरसे सही.

Psg
Wednesday, September 27, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दूर दूर त्या छतात, बैसलीय पाल गात

मस्त लिहिलय! true story वाटतं! :-)

Krishnag
Wednesday, September 27, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. . .. .. ..

Abhi_
Wednesday, September 27, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव छान!!! :-)         




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators