Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 22, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » ललित » सुई आणि दोरा » Archive through September 22, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Wednesday, September 20, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" आई... रोज तु हे सुई आणि दोरा घेउन सारखी काय शिवत असते.. आणि कापत असते ती कात्री घेउन..? " ....
एक छोट पिल्लू आईला विचारते.....
आई... " अग चिमणे.. रोज रोज जे मी शिवते आणि कापते ना ती आयुष्यातली खुप मोठ्ठी गोष्ट आहे.. आपल्याला.. रोज नवी माणस भेटतात.. नवे अनुभव मिळतात काही त्रास दायक असत्तत तर काही मस्त अगदी,...!हो की नाःई.. जर त्यातली वाईट्ट माणसे आणि अनुभव जर आपण सतत सोबत ठेवले तर आपल्याला चांगल्या गोष्टी आणि आपल्या माणसांसाठी वेळच उरणार नाही..मानातली सगळी जागा त्यानीच व्यापली तर चालेल का? म्हणुन काय कराय्चे तर.. अशा नको झालेल्या माणसांना नाइलाजने का होइना कात्री लावायची.. आणि आपल्या आवडतत्या व्यक्तिंना आपल्या अयुअष्याशी घट्ट शिवुन घ्यायचे.. मग आपले.. आयुष्याचे वस्त्र कसे सुंदर दिसेल.. हो कि नाही...!!! " ..

अशी एक झेन कथा मी एकदा वाचली होती..त्या दिवसानंतर माझ्या वागण्यात.. जगण्यात मला प्रत्येक ठिकाणी ही कथा सोबत करु लागली.. अगदी मी uk रहायला आले तेव्हा तर.. मला या कथेची सगळ्यात आधी आठवण झाली.. जेव्हा आशा अनेक व्यक्ती मला भेटल्या त्यांची पहीली भेट मनाला स्पर्शुन गेली आणि त्या माझ्या आयुअष्याशी कायमच्या जोडल्या.. गेल्या..
रोजच्या जीवनात तुम्हालाही अनुभव आलाच असेल ना.. कात्रीचा कमी पण सुई दोर्‍याचा नक्किच.. कात्रीचाही वापर करावाच लागतो कारण कधी कधि काही जण आपल्याशि इतक विचित्र का वागतात हे आपल्याल काय ब्रम्ह देवाला ही कळनार नाही..,सुरवातीला थोड दचकायला होत कारण आपली सवय काय तर.. अरेच्चा माझ्याशी इतक वाईट वागायला काय कारण असेल बर.. नक्कि माझच काही तरी चुकल.. पण न.तर लक्षात येते.. नाही ह.. लोच्या तिकडेच आहे..मग त्या ठिकाणी आपोआप कात्री लगते... असो..
तर रोज शे दिडशे मानसांना भेटणारी मी अशी एकांतात येउन पडले.. की माणुस दिसायची मारामार,शांतताही इतकी की आपलेच ह्रुदयाचे ठोके. आपण ऐकुन घ्यावे.....पण इथे मग माझा सुई दोरा जोरात कामाला लागला आणि कामातही आला...
आम्ही भारतातुन शुक्रवारी आलो आणि सोमवारी मुलगा शाळेत,नवरा office ला.. मी आणि घर सोबतीलाफ़क्त निवांत सकाळ..घर सगळे आवरलेलेच होते.. काय करावे.. " ह्याला कोजेट म्हणत्तत गिलक्यासारखे असते चविला.. आणि इतर काही सामान दाखवुन नवरा निघुन गेला.. " .. तेवढ्यात दारावर नोक केले कुणीतरी..उघडुन बघते तर..एक मिचि मिची डोळ्यांची सुंदर मध्यम्वयीन बाई दारात हातात मोठ्ठा बुके... तोंड भरुन हसत हसत " तुझे England मध्ये स्वागत आहे.., म्हणाली.. मी डोक्याला ताण द्यायच्या आतच म्हणाली.. " मी तुझी शेजारिण.. माझ नाव फ़्रेड.. प्रवास कसा झाला?..आम्ही weekend ला इथे नव्हतो नाहीतर आपली काल्च भेट झाली असती.. " ती म्हणाली, माझ्या आत या ना ला तीने तीची डायरी कढली नी उद्या दुपारी मी दोन वाजता free आहेतेव्हा येते.. आणी आज चार वाजता.. तु आमच्याकडे कॉफ़ी प्यायला याय्चस.. म्हणुन ती निघुन गेली.... अशी माझी पहिली ओळख UK त मिळाली.. त्या दिवसांअत्र मला फ़्रेड मावशीने.. इतकी अपुलकी, प्रेम, मदत दिले अगदी आल्या आल्या ज्या तीन रंगाच्या dustbins ठेवाव्या लागत्तत त्या council कडुण आणायच्या असतात त्या मिळे पर्यन्त तीच्या बिन्स.. share कराअय्चे असही तीने सांगुन टाकले..मग आमची गट्टीच जमली... आम्ही तासन तास... वेगवेगळ्या विषयावर कपावर कप कॉफ़ी पित गप्पा मारायला लागलो.. त्यात कोणतेही विषय असत्तत अगदी indian marrages,insurance,raajakaaraN तीच्या मुली नातवंड, ते घरातली कामे...मी नसली आणि दुधवाला दुधाचे कंन ठेवुन गेला दारात तर ही उचलुन फ़्रिज मध्ये ठेवणार. भारत्तत जातांना निरोप घ्यायला गेली तर.. आता तुझ्या बागेला कोण पाणी घालणार.. मग.. लगेच मी आणि Rob ( तीचा नवरा) घेउ ह बागेची काळजी म्हणुन लगेच कोणत्या झाडांना रोज पाणि लागत सगळी चौकशी करुन व्यवस्थित निरोप दिला... तीच्या सुंदर ठेवणिच्या घरासारखीच ती पण माझ्या आयुश्यातला अमुल्या ठेवा आहे..... नाही म्हणायला आल्यावर आम्हीइ दोन family ना भेटायला गेलो होतो.. ज्याॅह्याशी माझ्या नवर्याची गेले काही वर्ष ओळख होती.. त्यातला एक Bob Huntor आणि दुसरा Paul .
क्रमश्:


Chinnu
Wednesday, September 20, 2006 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान सुरुवात केलीस लोपा.
मला मात्र सुईधाग्यापेक्षा कात्री फार वापरावी लागली ग!


Manuswini
Wednesday, September 20, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा सुरवात छान आहे.

आताच कडवट अनुभव लिहुन तुला discourage नाही करत पण मला सुद्धा का कुणास ठावूक कात्रीच लागली ज्यास्त
तु म्हणतेस तेव्हा स्वाभनुसार स्वःतालाच दोष दिले नी शोधत राहिले की काय बरे चुकले असेल पण तरीपण दरवेळेस तशीच पुढे जायचा प्रय्त्न केला आहे.

तुम्हा सर्वाच्या गोष्टी वाचुन मला ही माझे लिखाण करावेसे वाटते. आता तेव्ढे वाईट ही देवनागरी लिहित नाही(?) .. बघुया


Rupali_rahul
Thursday, September 21, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, सुरुवात छानच आहे गं

Princess
Thursday, September 21, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा.... लोपा.... पद्याइतकेच गद्य सुद्धा सुरेख लिहितेस तू. लवलर लवकर लिही. जास्त वाट पाहायला लावु नकोस.:-)

Proffspider
Thursday, September 21, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा सुरुवात छान केली आहेस.... फेड मावशी सारखे अजुन बरेच सुखद अनुभव नक्की लिही. :-)

Shyamli
Thursday, September 21, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच सुरवात......
मस्तच ग...लिही अजुन आम्ही वाट बघतोय.....



Lopamudraa
Thursday, September 21, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१० वर्षापुर्वी बॉब ची आणि माझ्या नवार्‍याची ओळख झाली एकाच कंपनीत. आत्त बॉब retire झालेला... रुबाब्दार देखणा.. रुपेरी दाढी आणि केस.. असलेला.. scotish माणुस आहे.. पुर्वी मिलिटरित होता की कायसे त्याच्याकडे पाहुन वाटावे.., मला आणि मुलाला बघायची त्याला आणि कॅरलाला..(त्याची बायको).. खुप उत्सुकता..गेल्यावर बघत राही ले डोळे भरुन.. आणि जुन्या आठवणी निघाल्या.. जातांना कॅरलने पटकन मिठी मारली.. गालाला गाल टेकुन.. मुका घेतला. ही इथली ग्रिट करायची पध्दत...!!!बॉब मुळचा.. scotland चा.. scotaland चा विषय निघाला की अगदी हळवा होणार... tv वर scotland चे rugby खेळडु त्यांचे राष्ट्र्गीत म्हणतात, ते बघता बघता याच्या डोळ्यातुन घळा घळा... पाणी, मुसमुसुन डोळे पुसत हा आम्हाला sorry म्हणनार.. अशा वेळी कॅरल त्याच्या भाबडे पणाच्या अजुन दोन चार गोष्टी सांगते.. आणि वेंधळेपणाच्याही.. कस याने.. एकदा lawn feeder ऐवजी weedkiller टाकले आणि आणि आख्हि lawn जाळुन ठेवली.. hotel चे बूकिन्ग वेगळिकडेच केले आणि गेलो वेगळ्याच ठिकाणी मग गाडितच रात्र काढल्याचा किस्सा.. आमची हसुन हसुन मुरकुंडी वळते.. निरागस पणे आमच्या हसण्याला दाद देत बॉब ऐकत राहतो..!!!
बॉब खुप गरीबितुन वर आल्लाय दोघांई कष्टाने संसार उभा केला.. हे सुद्धा दोघ मनापासुन आमच्याजवळ बोलतात...
त्याला बाग कामाचा आणी golf चा प्रचंड नाद.. कधी कधी मी पण त्याच्या बरोबर खेळायला जाते.. त्याचे golf च कसब वाखाख्ण्यासारख आहे माला १०० वेळा त्याने stick कशी पकडायची ते शिकवलेय पण मला काही जमत नाही माझ्यापेक्षा माझा मुलगा पटकन शिकला... माझा खेळ बघुन दोघ गालातल्या गालात हसतात..!!!
आसपासाच्या सुंदर ठिकाणी भटकायला मला आवडते म्हनुन बॉब.. मला वेगवेगळ्या gardens ची माहिति देत असतो.. सुंदर पब कोणते आणि तीथे छान काय मिळते ते तर त्याला तोंडपाठ मग friday l आ रात्री आम्ही सगळे अशा एखाद्या सुंदर पबमध्ये जातो.. तीथली architecture आणि तो किती वर्षा पुर्वीचा असेल ती सगळी माहीती देणार..!!!
scotaland आम्ही जाणार म्हटल्यावर तोच map घेउन बसला आणि दोन तास खपुन त्याने.. कुठल्या road ने जायचे काय पहाय्चे कुठली जागा सिनिक आहे कुठे थांबायचे सगळा plan काढुन दिला... शेवटी हळुवार पणे.. म्हणाला माझ सगळं scotaland च सुंदर आहे...!!!
बॉब ला जर विचारले जरा तुम्ही सणाना काय करता ते सांगा बर.. बॉब च्या मते ख़्रिसमस एक सुट्टिचा दिवस असतो.. जर वीचारले ester ला काय plan आहे तर म्हणतो.. another holiday ..तो चर्चमध्ये कधी जात नाही.. कुठल्याही अंधश्रध्दा नाही फ़क्त स्वताच्या कष्टावर विश्वास..!!! देवा धर्माच कॅरलला विचार म्हणतो..!!! कॅरल शुक्रवारी रात्री नातींआ आणयला जाते weekend दोघ मग नातींसोबत घलवातात.. रविवारी त्यांची आइ बाबा येउन त्याना घेउन जातात.. मग कॅरल जाते आपल्या नव्वदी पार केलेया वडिलांच्या घरी.. तीथे जाउन त्यन्च सगळ आवरुन ही रात्री परत येणार आणि सोमवारी सकाळी कामावर हजर..!!
नुकतीच आत्ता नको दगदग म्हणुन तीने मागच्या महिन्यात voluntary retirement . घेतली...
मुलगा सुन नोकरिच्या गावाला वडिल त्यांच्या गावाला हे यान्च्या गावाला... सणासुदीला एकत्र येणार..., तीथे एकत्र राहण्याची पध्दत नाही...
cultural diffrence .. थोडा समजुन घेतला आणि माणस समजण सोप गेलं...
क्रमश्:


Lopamudraa
Thursday, September 21, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सगळ्यां ना,
मनु लिहि ग अनुभव.. काही नाही
जागे परत्वे वेगवेगळी माणस असणारच..!!!


Mrinmayee
Thursday, September 21, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, छान लिहिते आहेस. डोळ्यापुढे उभ्या राहतात या व्यक्ती आणि तु वर्णन केलेलं सगळं! लिहीत रहा!

Savani
Thursday, September 21, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, बरेच दिवस तुझ्याकडून काहीतरी छान लिखाण यावं असे वाटत होतं. आणि तू अगदी पकड घेतलीस. छान लिहितीयेस.
सुई दोरा, कात्री, स्वतला दोष देत राहणं असं वाटलं माझ्याच मनातल लिहिलं आहेस.
पुढच्या भागाची वाट बघतेय.


Lopamudraa
Thursday, September 21, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डीलेन.. सुंदर निळीशार बस.. पहातक्षणीच जिच्याप्रेमात पडावे अशी.. रस्त्याने वळसे घेत माझ्या दारात येउन थांबते तेव्हा मी राजकुमारी सारखी बसमध्ये चढते... Driver हसुन हेल्लो म्हणतो जात्ताना सगळे जण.. त्याचे आभार मानतात.. अगदी सगळ काही sophisticated.. पण एके दिवशी बाजाराचा दिवस होता डेलेन लेट झाली रांग मोठ्ठि होति.. सगळ्या रुपेरी चंदेरी केसांच्या आज्ज्या आणि आजोबा... त्यात मी एकटी काळ्या केसांची गमतीदार प्रसंग होता तो फ़ार.. तेव्ह्ढ्यात एक छोटी पिवळी बस आली.. जादा गाडी... माझ्या घराकडे जाणार म्हटल्यावर मी पण चढले....एक एक आज्जि चढु लागली.. Driver. सगळ्यांची चेश्टा करत होता.. बहुतेक प्रत्येक बाजराच्या दिवशी सगळ्या जात असल्याने त्याच्या ओळखिच्या झाल्या होत्या... पठ्ठ्या च्या cmment s भारी होत्याप्रत्येक वाक्याला तो जोक करत होता आणी आया बाया... खु खु.... खु करुन हसत होत्या.. नव्वदीच्या बाईला तो म्हणायचा काय छान दिसतेस ग.. आज संध्याकाळी रिकामी आहेस का... ती पण... खु खु हसायची आणीपुन्हा सारी बस.. खु.. खु खु करुन हसायची.. एखादिला म्हणायचा काय आज किती गोस्सिपिन्ग केलस.. किती चुगल्या केल्या.. ? परत आख्खी बस खु खु ने भरुन जायची..!!!
एकदाचे त्याने विचारले आले का सगळे.. निघायचे.. मग.. का? मग अमकी आली का तमाकी आली का चौकशी होउन बस निघाली.. कोणाला कुठे उतराय्चे हेही त्याला माहीत होते.. जाताना... बाय sweety म्हणायचा.. आणि परत काहितरी comment pass कराय्चा... की परत सगळी बस खु... खु खु...!!!
एखादिला मुद्दम्हुन घराच्या थोड पुढे नेउन बस थांबावायचा.. तीने म्हणायचे मेल्या... you did it purposely की हा पठ्थ्या परत अग तुझ्या घरासमोर सोडल तर तुझ्या नवर्‍याला कळेन ना.. मी आलो होतो तुला सोडायला ते.. की सगळ्या बस मध्ये परत खस खस पिकायची.. हसुन हसुन आता सगळ्या अजिआजोबांच्या डोळ्यात्पणी यायला लागले होते...मला हा प्रकार नविन होता, सारा प्रकार गमतीशिर होता त्यान्चे हसणे बघुन मलाहि इहसु यायला लागले...
एकिला तीच्या घराजव्ळुन पिक अप कराय्चे होते.. हा शहाणा ५..६ घर आधीच थांबला.. बस बंद केली आणि बसुन राहिला सगळ्या आरडा ओरडा करायला लागल्याऽरे तीचे घर अजुन पुढे आहे... . तर म्हणतो नाही काही तीने घर बदलळे काल तर रात्री मला फोन आला होता... तीने नाही ना सांगितले तुम्हाला... पहा कशी मैत्रिण आहे... सगळ्याना एकिकडे हसु आवरत नाहि इत्या एकमेकीना म्हण्तात पहा कसा चावटपणा करतोय..मुद्दाम, एक दरडाउन म्हणली आता चल बर सुरु कर बस.. मग निघाला वळन गेल्यार ती उभीच होती ती बस मध्ये चढायला लागल्यावर परत एकदा हास्याचा कल्लोळ उडाला... तीला मग हा सांगायला लागला बघ तु म्हणते ना माझ्या चांगल्या मैत्रीनी मला म्हणाल्यात... उशिरा जाउ तीला वेळ लागतो मेक अप ला... आता गाडित सगळ्या ना हसु आनावर झालेले होते... तीला माहित असल्याने ती पण लक्ष न देता हसत हसत जागेवर जाउन बसली... अशी हसत हसत ती गाडी तब्बल एक तासाने माझ्या घराजवळ आली रोज फ़क्त ५ मिन दुसर्‍या बसला लागत होते..!!!
ती माझी पहिलि आणि शेवटची फ़ेरी ठरली आता मी बसने फ़ार जात नाही.. पण त्या अज्जि आजोबाचेहसणे आजही आठवते,, सगळे म्हतारा म्हातारी बाजराच्या दिवशी ढकलाय्च्या बास्केट घेउन बाजारला जातत मन्सोक्त फ़िरतात... traditional बाजार त्यान्चा आतीशय आवडता... गाठी भेटी.. गप्पा करत्तात... खाउन पिउन घरी परत एकएकटे... मग ९६ वर्शाची आजी आपल्या... घराची आवर सावर कपडे भांडी धुणे..,स्वयंपाक स्वताच करते... आजोबांच्या परिस्थिति पण काही फ़रक नाही हेच... तरीही सतत ही मंडळी आंनदी दिसतात...
आला क्षण आंअदात घलवतात... मनाची करमणुक करतात एकमेकांना मदत करतात... इथल हे हसर म्हातर्पण पण मी माझ्या आयुअश्याशी जोडुन घेतल...
क्रमश्:


Dineshvs
Thursday, September 21, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, सुरवात छान केली आहेस. साधारण असेच अनुभव सध्या वंदना सुधीर कुलकर्णी, साप्ताहिक सकाळ मधे लिहित आहेत. पण तुझे अनुभव वेगळे आहेत. लिहित रहा.

Lopamudraa
Thursday, September 21, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनु,पूनम,रुपाली,श्यामलि,स्पायडर,सावनी,मृ.... दिनेश्द.. ..तुम्हा सगळ्यानच्या प्रोत्साहनाने.. चालु देते.. थोडावेळ.. अजुन..
दिनेश इथे साप्ताहीक सकाळ नाही ना वाचता येत.. लोक्प्रभा येतो पण सकाळ नाही.


Lopamudraa
Thursday, September 21, 2006 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डीलेन च्या निळ्या परीने मला बरीच माणस भेटवली... तीचा stop म्हनजे आता आवडत ठिकाण झालेल होत माझं,.... अशीच बसची वाट बघत एकदा पावसाची बुर बुर सुरु झाली, छत्री नाही काय कराय्चे
" माझ्या छत्रित आपण तीघे मावु की " .. एक गोड मावशी...
तीच्या छत्रीत मी माझा मुलगा दोघेही पटकन सरकलो.. मग काय गप्पा सुरु.. अघळ पघळ गप्पात एक्मेकिन्चे फोन no .. घेउन झाले..!!! पहिल्याच दिवशी दुसर्‍या दिवशी तीचा फोन तुझ स्वागत म्हणुन मला तुला छान restaurant मध्ये न्यायचय.. येणार. का? दुसर्‍या दिवशी एका सुंदर ईटालीयन रेस्तौरन्त मध्ये मला ती घेउन गेली...
" जेव्हा २० वर्शापुर्वी मी येथे stamford मध्ये आले ना तेव्हा माझ्या मैत्रिनिने मला माझ या गावत स्वागत म्हणुन इथेच आणले होते.. कॉफ़ी प्यायला.. म्हणुन मी तुला आणलय.., तुझ्या साठी कोणी indian भेटले तर मी शोधेन ह... "
" कशाला? " . मी..
" अग खुप मन मोकळ करावस वाटल ना तर आपल्या भाषेतुनच बोलायला आवडते माणसाला...!!! " ती हात लांब करुन म्हणाली.. कित्ती खर होत.. पण न.तर माझ्याकडुन तीचा फोन NO हरवाला आणी माझ बसने जाण कमी झाल्याने.. तीची भेट झालीच नाही... मार्गारेट कायमची मनातच राहिली.. मी अजुनही तीला शोधत असते पण आता माझ्या लक्षातही नाही तीचा चेहरा... पण तीने आपुलकीने हातात हात घेतला होता तो स्पर्श परक्या देशात मला माझ्या आईच्या स्पर्शाची आठवण देउन गेला...
जेन ची ओळख तर.. फ़क्त ५ मिन टाची घरापासुन factary पर्यन्त च्या वेळात ओळख आणि घरि येण जाण सुरु झाले..!!!
एक अनुभव तर. गलबलुन टाकणारा.. . अशीच एक्दा बसची वाट बघुन कंटाळले.. सोबत बरच सामान होत..बसची वेळ उलटुन खुप वेळ झाला होता.. मध्ये एकदा.. मला एकटिला बस stop वर पाहुन.. , Paul अर्धा गाडिच्या बाहेर येउन काय करतेस या वेळी बस stop वर.. की english weather एन्जोय करतेय.. म्हणुन मिस्किल पणे विचारुन गेला.. मी " काही नाही येइलच बस आता " त्याच्या सोडुका घरी म्हणाले..
समोरुन माझ्याच एव्हढी माझ्या पेक्षा दुप्पट सामान घेउन आली.. stop वर आमच्या दोघिंशिवाय कोणी नाही ६ नंतर आमच गाव इतक सामसुम होत की... गावात माणस राहतात का अस विचारवे एखाद्याने...!!!
माझ्याकडे पाहुन..लहान मुलाला " जा आत नहि मिळणार तुला खाउ " अस खट्याळ पणे एखाद्या मोठ्याने चिडवावे तस पाहुन म्हणाली बसची अजुन एक तास वाट पहावी लागणार आहे... हे बघ.. time table शनीवारी वेगळ असत... " ती म्हणाली..
मी अजिबात गप्पा मारायच्या mooD मध्ये नव्हती म्हणुन मी काही तीला उत्तर दिल नाही..
" माझं नाव पेनी.. तुझ नाव काय.. ?
माझ नाव तीला दोनदा सांगुनही तीला उच्चार काही जमेना...
मी शाली म्हणते तुला चालेल.. ?
" हो ग बाइ काहीही म्हण पण डोक नको खाउ " मी
पेनी बोलायची थांबतच नव्हती.. " मी किनी इथे एकटीच राहते.. माझा भाउ जवळच्या गावाला राहतो.. मी समुद्राव्र खुप वर्शे नोकरी केली.. माझे आईबाबा पण जवळच्याच गावला राहत्तत.. ,आता मला नोकरी करायला आणि गाडी चालवायला परवानगी नाहिये.. कारण तीला कानात काही तरी वेगवेगळे आवाज ऐकु येतात असा काहिसा त्रास होतो"... अस सार मला तीच्या बोलण्यातुन कळले...


Lopamudraa
Thursday, September 21, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक beach वरच्या नोकरीने तीच्या कानाला काही तरी त्रास होत होता...
पेनी " अचानक गंभीर झाली आणि पण माझ्या पासुन कुणाला धोका नाहिये ह... शाली..
पण माझ्या वडिलाना वाटते माझ्यामुळे त्याना त्रास्स होइल... म्हणुन ज्या दिवशी माझ्या कानात आवाज यायाला लागले त्या दिवशी मला त्यानी कॉट ला बाधुन टाकले होते...माझ्या हाताला खुप लागले... !!!
आई ग त्या भयाण शांततेत रस्त्यावर आम्ही दोघिच.. माझ्या अंगावर काटाच आला... " मग वडिलानी मला इथल्या दवाखन्य्यत ठेवले... " पेनी पुढे सांगु लागली... मी बरी झाल्यावर dr म्हणाले आत्ता जायला हरकत नाही पण मी जाणार कुठे वडिल तर घरात घ्यायला तयार नाहीत... नोकरी सोडुन आलेले.. हा भाग नविन.. ह्या आजारामुळे नोकरी नाही मिळत. मग भावने मला इथे flat घेउन दिला... कधि तरी येतो भेटायला... माझा bank balance खुप आहे... , वाईट वाटते ते वडिलानी माझ्यावर विष्वास ठेवला नाही याचे...!! तुच सांग शाली मी काय त्याना त्रास दिला असता का ग... ?
मी गंभिर झाल्याचे पाहुन तीने पटकन विषय बदलाला... हसत हसत म्हणाली. " अजुन माझ वय तरी कय आहे.. मस्त पैकी लग्न करिन आणि पुढचे आयुष्या घालविन.. नाहि झाले तरी मजेत राहीन.. आयुष्य तरी काय असते.. आपण मानु तसे.. जगु जसे...!!! खुप कंटाळा आला तर प्रत्येक क्षण एकेका दिवसा सारखा वाटतो.. आयुष्य खुप मोठ्ठ वाटत.. आणि आपण आनन्दी असलो तर.. प्रत्येक क्षण कळायच्या आत भुरकन उडुन जातो.. अस वाटत आयुष्य किती छोट आहे... मग सांग बर कस जगाय्च एकेक नकोसा क्षण मोजत मोठ्ठ की भुरकन उडुन जाणारं आंनदी छोट्ट " .. ह.. सांग बर.. हस ना.. किती गंभिर झालीस... हस ना आपल्याला.. बस्ची वाट बघत आंन्दाने एक तास घालवायचा ना.. हस ना... मग.. मीही तीच्या सोबत हसु लागले... हा.. हा हा आम्ही दोघी मोठ्याने हसु लागलो.. संधीप्रकशात stamford चमकु लागले समोरच्या मोठ्ठ्या चर्चचे.. light लागले होते एव्हाना... बाकीरस्ता सामसुम होता आमचे हसणे ऐकत निवांत पडलेला...!!!
माझ्या दारात बस थांबली मी उतरले... बस दिसेनाशी होइपर्यन्त मी पहात राहिले.. करण खिडकीतुन पेनीचा हात अजुन हलत होता...
आणि माझ्या कानात फ़क्त तीचा आवाज घोळत होता... " कसे जगायचे नकोसे क्षण घालवत कंटाळवाणे की आनंदुन टाकणारे छोटेसे..!!!!!!!!!!!!!!
क्रमश:


Psg
Friday, September 22, 2006 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा सुंदर लिहत आहेस, वेगळे अनुभव, वाचायला मस्त वाटत आहे.. लिहत रहा

Sanash_in_spain
Friday, September 22, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा, किती सुंदर लिहीत आहेस गं! सुई-दोरा, कात्री तर अप्रतिम...
सगळे अनुभव सचित्र डोळ्यासमोर उभे राहिले. इथे स्पेन ला आल्यापासून 'शेजारी' ही संकल्पनाच विसरून गेलीये मी तर...
लिहीत रहा.


Shyamli
Friday, September 22, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय छान लिहीलयस ग वैशाली...

यातले एक दोन कीस्से तू सांगीतलेले आहेस मला
तरी पण वाचताना वेगळीच मजा आली

आने दो और


Mrdmahesh
Friday, September 22, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा सुई दोर्‍याने शिवून बांधून घ्यावीत अशीच माणसे तुला भेटली आहेत कात्रीची गरजच पडली नाहीये असंच दिसतंय. ते तसंच राहो ही शुभेच्छा!
एकूणच सुंदर लिखाण :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators