|
Asmaani
| |
| Friday, September 22, 2006 - 9:46 am: |
| 
|
लोपा, पेनीचा अनुभव खरंच हेलावून टाकणारा आहे गं! छान लिहिते आहेस. carry on!
|
Lopamudraa
| |
| Saturday, September 23, 2006 - 2:32 pm: |
| 
|
थोडि डावीकडे घे.... " एव्हढा मोठा रस्ता सोडुन कुठे कोपर्यात घालतेस.. थोडी म्हणजे किती कळत नाही.., " " steering ला एव्हढे जोरात फ़िरवतात का? " केवढ्याने break लावला.. आत्ता घासली असतीस पलीकडच्या गाडीला... " ... " आपल काहीही झाल तरी चालेल पलिकडच्या गाडीला.. धक्का लागायला नको.. " " परत परत त्याच त्याच चुका कशा करतेस.. !!! " " आता निट तर चालवत होते.. ना..!!..मी याला निट नाही म्हणत.. अशा आमच्या प्रेमळ संवादाची इतिश्री माझ्या रडण्यात आणी नवर्याचे मी तुला परत गाडी शिकवणार नाही यात झाली..दुसर्या दिवशी दुपारी थेल्मा घरी आली.. (नवर्याची सेक्रेटरी) " तुझ्यासाठी driving istructor शोधायला सांगितला होता... एक माझ्या ओळखिचा आहे उद्या सकाळी तुला घ्यायला येइल..!!! " माझा गाडी चालवायचा किस्सा तीलाही माहीत होता.. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहुन म्हणाली.. " मला किथ(तीचा नवरा) ने गाडी चालवायला शिकवाय्चा प्रयत्न केला होता आणी त्या नंतर त्याने त्याचे smoking परत सुरु केले होते... tension ने... आणि अजुन काही तीचे गमतिशीर किस्से ऐकवुन ती निघुन गेली..!!! सकाळी दहा वाजता निळी driving school ची छोटी गाडी दारात उभी होति.. त्यासोबत सोनेरी दाढीचे गोल गोल जाड जुड रिचर्ड आजोबा उभे होते.. त्यादिवसापासुन माझी रिचर्ड आजोबाकडे शिकवणी सुरु झाली..
|
Lopamudraa
| |
| Saturday, September 23, 2006 - 2:56 pm: |
| 
|
रिचर्ड आजोबा.. सुरवातीला कमी बोलत पण नंतर मात्र छान गप्पा मारु लागले... रात्री बर्याचदा footbal match बघुन पहाटे घरी आलेले असायचे पण सकाळी वेळेवर गाडी घेउन यायचे. रस्त्याने बर्याचदा त्यांची बायको cross व्हायची ती air force मध्ये छोटे ट्रक चालवायला शिकवायची.. ते पाहुन रिचर्ड आजोबा मिस्कीलपणे हसुन म्हणायचे.. " बघ ती ट्रक चालवु शकते तर तु.. गाडी नाही चालवु शकत..,बर्याचदा समोरुन मोठ्टआ ट्रक आला तर मी घबरुन गाडी बाजुला वेगळीकडेच घालायची.. नको इतके त्याना प्रश्न विचारायची ते हसत हसत मोठ्ठ्या गमतीदार पद्धतीने उत्तर द्यायचे..!!! सारख हसवत ठेवायचे.. मी एकदा मुलाला त्यांच्या काही सुचना लिहुन ठेवायला सांगितल्यावर म्हणतात रोज आणत जा तुझ्या सेक्रेटरीला...!!! माझ्या वेळेप्रमाणे ते हवा तो बदल कराय्चे बर्याचदा मला बर नाही म्हणुन मी त्याना परत पाठवले.. फ़क्त weekend ला यायला ते नाखुश असत कारण त्यांची नातवंडे यायची त्यांच्याकडे रहायला... त्यांचा मुलगा सुन air force मध्ये होते.. एकदाच त्यांची वेळ चुकली, जेव्हा.. त्यांच्या नातवाचा हात गाडीच्या दारात अडकला होता.., त्यांचा नातु मुक बधिर, जेव्हा गाडीच्या दारात त्याचा हात अडकुन रक्त बंबाळ झाला तेव्हा.. तो रडला नाही कारण त्याला रडणे कसे ते माहीतच नव्हते, त्याने ते कधी ऐकलेच नाहिये.. आणि म्हणून त्या ४ वर्शाच्या जिवाला... रडताही आले नाही हे सांगतांना मात्र रिचर्ड आजोबांच्या डोळ्यात पाणी होते...!!! शिकवणी संपली मी गाडी चांगली चालवायला लागले.. , रस्त्याने रिचर्ड आजोबा cross होतात तेव्हा आशिर्वाद दिल्यासारखे प्रत्येक वेळी हसुन हात देतात.. मी पण हसत हसत गाडी पुढे पळवते. क्रमश्:
|
लोपा, छान लिहीत्येस गं 
|
Arch
| |
| Sunday, September 24, 2006 - 7:22 am: |
| 
|
लोपा, छानच लिहिते आहेस. बरीच लोकं भेटली तुला परक्या देशात आणि तू नाती जोडलीस. वाचत राहीन
|
लोपाताई, फ़ारच छान लिहितेस की, चालु ठेव........... 
|
|
|