Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 22, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » काव्यधारा » कविता » Archive through September 22, 2006 « Previous Next »

Swaatee_ambole
Thursday, September 21, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा वैभव! सुंदर!!
ये हुई ना बात!!


Daad
Thursday, September 21, 2006 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई... आई.... आई....आई!! झिणझिण्या आल्याकी रे डोक्याला. कसलं जबरदस्त लिखाण (अगदीच भुक्कड शब्द्ग इथे चाललंय त्याला).... चाललंय!

श्यामली आणलेला शिंपला काय किंवा चिकटलेली वाळू काय थोडासा समुद्रंच येतो आपल्या बरोबर आपण परतताना, खरं कि नाही?..... कधी हातात, कधी कवेत, कधी डोळ्यात तर कधी नुसताच मनात.

वैभव, तुझी "आर्त" अगदी सार्थ आहे.....
परत एकदा ह्या कवितासुद्धा "उलटं-पालटं" करून गेल्या.

वनफुलटूहाफ, तुमची आकाश खास आहे! अमेय म्हणतात तशी पहिल्यांदा दुर्बोध..... पण वाचावी तशी उलगडत जाते.. छान!

अमेय, सम्पदा के? मला वाटलं होतं मीच एक लंपनच्या भाषेत म्याड आहे. मनापासून हसले मी!

अरे, मला कोणीतरी सांगिल काय ईंग्लिश शब्द लिहिण्यासाठी काय करायला हवं? (आता हा 'ईंग्लिश' किती वाईट्ट दिसतोय?)


Meenu
Friday, September 22, 2006 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव सुंदर अप्रतिम ....

Meenu
Friday, September 22, 2006 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किनार्‍यावर बसुन तु माझ्या
मर्यादांचा फक्त अंदाजच करत राहतेस
मी मात्र किनार्‍याच्या मर्यादा तोडुनही
उधाण घेऊन येतो केवळ तुलाच भेटायला
माझ्या लाटांत भिजुनही कोरडं राहणं तुझं
अन मग ओहोटीत ते मिटुन जाणं माझं
किनार्‍यावरच्या वाळुत तरीही रेंगाळतो थोडा मी ......
तुझ्याच सहवासासाठी ......

वैभवनी सुंदर मांडलच आहे. तरीही सुचलं म्हणुन हे लिहीते ...


Psg
Friday, September 22, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! मस्तच वैभव, मीनू

Milya
Friday, September 22, 2006 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!!
सर्वच कविता छान आहेत...

पुराव, थांग आर्त आणि श्यामलीची 'निनावी' पण छान आहे...

आज बरेच दिवसांनी इकडे आलो...

१फ़ुल्लहाफ़... आकाश ही आवडली


नाव "ठेवा" ना तुम्हीच मला नाही सुचल म्हणुन तर नाही लीहीलं ना!
>>>> श्यामले 'ठेवा' च ठेव की नाव :-)

Vaibhav_joshi
Friday, September 22, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा !!!
मजा येतेय इथे ...
स्वाती ... दाद ... मीनू ... पूनम .. मिल्या .. मनःपूर्वक आभार


Vaibhav_joshi
Friday, September 22, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश .. गोव्यात भेट झाली नाही पण एका तरल संध्याकाळी .. सुर्यास्ताच्यावेळी .. ऍग्वाडा फ़ोर्ट ने दिलेली ही कविता .. त्या संध्याकाळी समुद्रानेच आव्हान दिलं होतं
:-)


तटबंदी ...

मला जाणवतीय तुझ्या लाटांमधली खळबळ
ये .. येत रहा असा एक एक लाटेने जवळ
पण
इतक्या सहजी होणार नाही आपलं मीलन
तुझ्या माझ्यात उभं आहे
हे वालुकामय जीवन ...
पाय खोलखोलवर रुतलेले
अन असहाय्य उभा मी
थोडीशी मदत कर मला
मग कायमचा तुझा मी ...
यंदाच्या भरतीत .. इतकेच कर रे सागरा
लाटांमध्ये प्राण ओतून .. साद दे जरा
प्रतिसाद म्हणून उठू दे
ती आतली एकच लाट स्वच्छंदी
बाहेरच्या लाटांनी नाही फुटायची
ही देहाची तटबंदी




Shyamli
Friday, September 22, 2006 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आता मला लाटेच मनोगत लिहावस वाटतय बघा हं जमतय का?

प्राक्तन लाटेच

तुझ्यातल्या आवेगाप्रमाणे
माझं ठीकाण ठरलेलं
कधी जवळचच तर कधी
दुसरीकडेच कुठेतरी असलेलं
कधीतरी सापडतो मनाजोगता निवारा
पण काम झालं, आता जा परत म्हणतो तो किनारा
तू उसळायचस आणि कुठेही नेऊन टाकायचस
त्यानी दोन क्षण आपल म्हणायच आणि
पटकन झटकुन कोरडं व्हायचं.......

ह्या लाटेच्या नशीबी असच का फीरायच?
कोणाला तीने आपलं म्हणायचं?
क्षणभर सुखावणार्‍या किनार्‍याला
का ज्याच्यामुळे तीच अस्तित्व आहे
त्या समुद्राला......


श्यामली!!!



Shyamli
Friday, September 22, 2006 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मीनु...
मस्तच
देवा,दिनेशदा मिल्या,दाद धन्यवाद...
मिल्या छान नावे रे....


Vaibhav_joshi
Friday, September 22, 2006 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तळ ...

उठतील लाख लाटा , विरतील लाख लाटा
असणार मी परंतू आहे तुझ्या तळाशी

खार्‍या जळात जेव्हा कढतील लक्ष मोती
शोभेल श्वेतमाला लखलख तुझ्या गळ्याशी

उरणार ना किनारा तुज पाय ठेवण्याला
वाळूत आठवांच्या माझ्याच स्वप्नराशी

फ़िरशील तेथुनी तू उध्वस्त होवुनी गे
नेमस्त भेट फिरुनी माझ्याच वादळाशी

कित्येक चंद्र गेले भरतीत सावळोनी
प्रतिबिंब फक्त माझे उरले तुझ्या तळाशी


Giriraj
Friday, September 22, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा... !!!!!!!!!!!!!!!!!

क्या बात है भाई! :-)
.. .. ..

Lopamudraa
Friday, September 22, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग काय चाललय काय ईथे भरती आलीये कविताना...,
श्यामली,वैभव,मीनु... एक्फ़ुल हाफ़ सुंदर.. अजुन एवु द्या...
अशा कविता मिळणार असतील वाचायला तर मी रोज देइन आव्हान...!!!


Princess
Friday, September 22, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह.... वाह वैभव. तुला पुन्हा पुन्हा छान म्हणायला सुद्धा शब्द नसतात रे...

श्यामली सगळ्याच कविता छान...
मीनु, १फुल दोन हाफ... छान लिहिलय...

लोपा सहमत तुझ्याशी.
वैभव आव्हान आहे रे आज सुद्धा...:-)


Kmayuresh2002
Friday, September 22, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,आर्त जबरी आहे रे..


Aandee
Friday, September 22, 2006 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,मीनु, श्यामली आणि परत वैभव सगळ्याच्या कविता ओघवत्या आहेत पण आता किनार सोडुन बाहेर या कि अति झाल कि त्यातला रस कमी होतो आणि कोणालाच न्याय मिळत नाही..... अर्थात हे माझ मत झाल.
बाकी..... लगे रहो....


Devdattag
Friday, September 22, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, श्यामलि मीनु, निनावि सहिच..:-).. ग्रेट..
माझा एक प्रयत्न

किनार्‍यास आज आहे तो चंद्र लाजणारा
भरतितूनी माझिया बरसून जाई धारा

ह्या भरतिस माझिया ते आव्हान देई बिंब
उन्मेश मोकळा अन तो लाघवि किनारा

बहर मोगर्‍याचा उन्मुक्त माळला तु
मग रुप तुषारांचे ल्याला माझा शहारा

मी मोती माझ्या तळीचे लेवून साद देतो
गे वाटेत शिंपल्यांचा आहे खडा पहारा

इमले तिरावरीचे वार्‍यास भावले ना
माझिया लाटांवरी मी गे बांधला मनोरा
-देवदत्त


Sameerdeo
Friday, September 22, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप दिवसांनी भेटतोय मित्रांनो


तू कितीही नाही म्हणालीस्;
तरी मी माझ्या मनातले वादळ
तुझ्या डोळ्यात पाहिलं.....
समुद्र मध्यभागी कितीही शांत दिसला,
तरी किनार्‍यावर नकळत उसळणार्‍या लाटा थोपविणं
तेव्हा तुला तरी कुठे शक्य होतं?


-समीर


1full2half
Friday, September 22, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



आभार मित्रांनो,

तुमच्या सर्वांच्याही कविता सुरेख आहेत.. आवाडल्या जाम :-)

ही अजून एक.. आवडेल अशी अपेक्षा आहे...


मी अन ती

आताशी मला " त्या " भेटीची धास्ती वाटते.......
असे नाही कि मी कधी टाळले तिला भेटायला..
अगदी कडकडून भेटायचो..पण ती कधी पोचली नाही माझ्यापर्यंत !!!
का कुणास ठाऊक...
पण आठवत नाही मला आता...
कदाचित नजरानजर झालीही असेल आमची
त्याशिवाय का इतकी स्वप्न घेऊन फ़िरतोय मी अश्वत्थाम्यासारखा..

तिचे ते लडिवाळ हास्य..
तिचे ते गुलाबी ओठ..
काळेभोर डोळे....
तिची केसाच्या बटेबरोबर चाळा करण्याची रीत
" माझा येडुला " म्हणायची तर्‍हा
अगदी सगळे..सगळेच...
आत्ताच पडून गेलेल्या सरीसारखे माझ्या जमिनीवर उमटले आहे

सरींतले आभाळ मला कधीच लाभले नाही.. पण जमिनीवरचे थेम्ब मी आयुष्यभर जपले आहेत.. जपत राहीन..

तिचा सुगंध.. राहून राहून मनात येतो.. सैरभैर करतो..
पण मग ओली जमीन सांगू लागते.. तिच्या सरेची सर कुणालाच येणार नाही..
थोड्या वेळ होतोही खुश मी...
पण मग विचारत राहतो माझे मलाच.. कि त्या सरीसाठी
किती झेलायच्या सरी मी ??
आणि झेलल्या जरी सरी मी.. तरी माझी सर बरसेल माझ्याच आभाळातून ??
आणि कदाचित तो पर्यंत दुसरीच एखादी सर.. तिची सर घेऊन आली तर....
म्हणून मला " त्या " सरीची धास्ती वाटते



Princess
Friday, September 22, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी कुंतीप्रमाणे अखंड दु:ख भोगली,
कधी सावित्री बनुन यमामागे धावली,
सीतेसारखी अग्निपरिक्षाही दिली,
अनुभवली द्रौपदीची मानहानी पावलोपावली,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटल्या या चौघी पदोपदी
पण हक्कासाठी लढणारी राणी लक्ष्मीबाई फ़क्त एखादी...

पुनम





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators