|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through August 28, 2006 | 20 | 08-28-06 1:58 am |
  | Archive through August 29, 2006 | 20 | 08-29-06 5:35 am |
  | Archive through September 01, 2006 | 20 | 09-01-06 8:44 am |
  | Archive through September 05, 2006 | 20 | 09-05-06 9:36 am |
  | Archive through September 09, 2006 | 20 | 09-09-06 10:29 am |
  | Archive through September 13, 2006 | 20 | 09-13-06 6:49 am |
  | Archive through September 18, 2006 | 20 | 09-18-06 7:59 am |
  | Archive through September 19, 2006 | 20 | 09-19-06 11:17 pm |
  | Archive through September 21, 2006 | 20 | 09-21-06 2:48 pm |
  | Archive through September 22, 2006 | 20 | 09-22-06 5:47 am |
क्या बात है पूनम.. great yaaar ...... मस्त... !!!
|
Meenu
| |
| Friday, September 22, 2006 - 6:55 am: |
| 
|
हक्कासाठी लढली असती कुंती, सावित्री, सीता अन द्रौपदीही शत्रुला पाजलं असतं पाणीही पण शत्रुला .... आप्तांशी का कधी लढायचं असतं ....? सावित्रीचा माझ्यामते लढाच होता ... शस्त्र न वापरता दिलेला लढा ...
|
एक फ़रक आहे मीनु.. राणी लक्ष्मीबाई आणि बाकिच्यात.... !!!
|
Chinnu
| |
| Friday, September 22, 2006 - 2:06 pm: |
| 
|
कित्येक चंद्र गेले भरतीत सावळोनी प्रतिबिंब फक्त माझे उरले तुझ्या तळाशी... वैभव सुर्रेख रे! पुनम, देवा मस्त अगदी. श्यामली छान आहे ठेवा! अहो दोन =1full2half , फार छान लिहीलीत कविता!
|
वैभव, ' तळ' छान आहे. शेवटची द्विपंक्ती अजिबात नसतीच तर कविता जास्त परिणामकारक झाली असती असं वाटतंय.
|
Shyamli
| |
| Friday, September 22, 2006 - 3:39 pm: |
| 
|
मी मोती माझ्या तळीचे........ आहे खडा पहारा इमले तिरावरीचे वार्यास भावले ना माझिया लाटांवरी मी गे बांधला मनोरा>>> वा देवा!!! आवडल..........
|
Asmaani
| |
| Friday, September 22, 2006 - 3:55 pm: |
| 
|
वैभव, "आर्त"खरोखर चटका लावून गेली. नकळत डोळे भरून आले.
|
Swara
| |
| Friday, September 22, 2006 - 4:25 pm: |
| 
|
काय मस्त कविता येतायत इथे. वैभव तुमच्या प्रतिभे पुढे माझे शब्द केव्हाच आटलेत... मस्त एकदम. स्वाती, मिनू, श्यामली, देवा, पुनम, १फ़ुलहाफ़ खूप आवडल्या कविता.
|
Mrinmayee
| |
| Friday, September 22, 2006 - 4:26 pm: |
| 
|
देवदत्त, श्यामली, वैभव आणि स्वाती... तुमच्या कवीतांना दाद द्यायला तेच तेच शब्द वापरणं सुध्दा नकोसं होतं, पण काय करु? 'अप्रतीम' शिवाय बाकी काही सुचत नाही.!! समुद्र आणि किनार्यांची माझी एक कवीता.. मला आवडलं असतं एक किनारा व्हायला खळाळत्या सागराचा... धडकणार्या लाटांना गंभीरपणे झेलणारा अगदी स्थितप्रज्ञासारखा... लाटांच्या प्रेमात चिंब भिजुनही त्यांच्या दुराव्यात कोरडा राहणारा.. त्यांच्या अवखळ हास्याकडे भिजवणार्या अश्रुंकडे सपशेल दुर्लक्ष करणारा.. असं संवेदनांपलीकडचं 'किनारापण' लाभायला फार बलवत्तर प्राक्तन लागतं.. एखाद्याचं नशीब वेड्या लाटेचच असतं!!!!
|
कौतुकाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार मित्रांनो .... श्यामली ... लाटेचं प्राक्तन छान उमटलंय ... देवा ... बहर मोगर्याचा उन्मुक्त माळला तू हे सर्वात जास्त आवडलं समीर ... समुद्र मध्यभागी शांत कन्सेप्ट खूप आवडली 1 full 2 half ( हा असा आयडी घ्यायचं कसं सुचलं असावं? आणि का? असो. ) मी आणि ती ... superb प्रिन्सेस .. छोटीच पण परिणामकारक मीनू .. प्रिन्सेस ला दिलेला प्रतिसाद पण छोटी कविताच होती का ? मृण्मयी ... ' किनारापण ' लाभायला .. वाह !!! मस्त वापरलंयस .. कविता सुरेख स्वाती .... असं वाटलं तुला ? मला तर शेवटच्या द्विपंक्तीतच ' तळ ' सापडला . तो असं म्हणतोय की तुझ्या तळाशी सुध्दा उरून उरून काय उरलं ? तर माझा भासच .. म्हणजे आपल्याला नुसतं वाटतं तळ सापडला असं ... असं म्हणाय्चं होतं मला ... असो पण खूप मोठ्ठी चर्चा वगैरे नको इथे ... शंका असेलच तर मेल कर पुन्हा एकदा सर्वांचेच मनःपूर्वक आभार
|
वा!! सर्वच अप्रतिम पौर्णिमेच्या उधाणलेल्या समुद्रासारखं.. वैभव,देवदत्त,स्वाती तुम्हाला काही लिहित नाही..सगळे अधिच म्हणुन झालेय.. श्यामली, अप्रतिम!!! लाटांचा प्रश्न खुप छान मांडला आहेस..लाटांनी फ़क्ट भिजवत रहावे..किनार्यावर किनार्याला आणि समुद्रात समुद्राला 1 full 2 half ,खुप सुंदर...दोन्हीही..आकाश आणि मि आणि ती सुद्धा.. समीर,सुरेख.. मीनू,छान... and my sweet princess , छान..पण,माझ्यामते प्रत्येकीनेच लढा दिला होता,कुणाचा दिसला,कुणाचा अव्यक्तच होता...सावित्रीने दिला,कुन्तीनेही दिला,द्रौपदीनेही आणि सीतेनेही..प्रत्येकीने स्वताचा स्वभिमान जपला लढा देवूनच जपला....म्हणुन तर आपण त्यांना पुजनिय मानतो.. मृण्मयी, नितांत सुंदर.. असं संवेदनांपलीकडचं 'किनारापण' लाभायला फार बलवत्तर प्राक्तन लागतं.. एखाद्याचं नशीब वेड्या लाटेचच असतं!!!! खरंच ग.. पण किनारा संवेदनाहिन असतो असे कुणी सांगितले तुला???.. " त्याच्या प्रत्येक खड्कावर दिसतील जखमा लाटांनी केलेल्या.. फ़क्त त्याचा मोठेपणा "त्या" दखवू देत नाही.. मुकपणे साहतो तो लाटांच्या आठवणी.. लाटा शेवटी समुद्राकडेच परततात.. आणि जे अबोल असतात त्यांच्या जखमा खरेतर खुप खोल असतात.. दोघांचेही प्राक्तन असते हे..सहन करणे आणि मिळतील त्या क्षणांत प्रेम करणे..."
|
वा दोस्त्स, मजा आली. वैभव, सगळ्या कविता एकाहून एक सुंदर. मृण, मृद्गंधा, मीनू, देवा, श्यामली, 1full2half , समीर .. ( कुणाचं नाव राहिलं तर नाही?) सगळ्यांनीच सुंदर लिहीलंय. समुद्र हा विषयच तसा आहे ना? कवीमनाला त्याची भुरळ नाही पडली तरच नवल. आणि इथे तर सगळेच सिद्धहस्त. प्रिन्सेस आणि मीनूचा सवाल जबाब पण छान.
|
Daad
| |
| Sunday, September 24, 2006 - 7:58 pm: |
| 
|
कठीण आहे... तुम्हा सगळ्यांचं कौतुक करायला शब्दही सापडू नयेत ना? वैभव, देवा, मृण्मयी, श्यामली, पूनम, १ फ़ुल्ल २ हल्फ़ (हा आयडी विंग्रजीत कसा लिवायचा हो भाऊ?), ..... सगळ्यानीच किती सुंदर, प्रगल्भ लिहिलंय? प्रत्येकाचा अविष्कार अप्रतीम! शलाका
|
शलाका, इंग्रजी शब्द angular brackets मधे लिहायचे.
|
Princess
| |
| Monday, September 25, 2006 - 1:46 am: |
| 
|
अरे इकडे पाहिलच नाही की मी... धन्यवाद लोपा,स्वरा,स्वाती,दाद आणि वैभव. मीनु प्रतिक्रिया आवडली. मृद्गंधा तु सुद्धा छान मत मान्डलस की... ही कविता लिहितांना माझ्या डोळ्यासमोर मुकाटपणे अन्याय सहन करणार्या स्त्रिया होत्या. आणि व्यक्त लढा अभिप्रेत होता आप्तांविरोधात किंवा मग परक्यांविरुद्ध. दरबारात मानहानी सहन करण्यापेक्षा, शस्त्रविद्येत पारंगत असणार्या द्रौपदीने दु:शासनाचे शिर का नाही उडवले, का पावित्र्य सिद्ध करण्यासाठी सीतेने अग्निपरिक्षा दिली, कुंतीने सुख का नाही मगितले??? मला वाटते जर त्यानी असे काही केले असते तर त्यांना इतिहासाने कधीही पूजनीय ठरवले नसते. अर्थात हे माझे मत...
|
Princess
| |
| Monday, September 25, 2006 - 1:46 am: |
| 
|
मृण्मयी, कविता खुप आवडली
|
|
|