|
Ekata
| |
| Friday, September 01, 2006 - 3:19 am: |
| 
|

|
काय म्हणावे या कर्माला धुळीस मिळवी अब्रुहो उरली लक्तरे वेशीस टान्गी हा तर घर बुडव्या हो राबराबलो याचे काजाकरीता रात्री जागविल्या शिक्षणाकरीता उम्बरे झिजवले याच्या नोकरी करता इच्छा डावलुनी, हा पळतो छोकरी करता बघा बघा किती नतद्रष्ट हा बरे झाले असते हा उपजलाच नस्ता खाली मुडी पाताळ धुन्डीतो हा मस्तीपाई बापाला विसरतो हा चल उभा नको राहू दारात असा चालता हो याक्षणी, नजरेपुढुनी फासलेस काळे तोन्डाला अमुच्या तर काळे कर आता झडकरी याक्षणी
|
Dhund_ravi
| |
| Saturday, September 02, 2006 - 5:03 am: |
| 
|
अडगळीत सापडला फ़ुटका आरसा जुनासा आठवेच ना काही केल्या हा चेहरा कुणाचा कुणीतरी बिचारा त्या आरशातुन कण्हतो, मी आवाज ओळख़त नाही विझल्या जख़मेतुन वाळल्या रक्ताचे, घाव ओघळत नाही ही जख़म बहरण्याआधि, हे घाव बरसण्याआधि प्रेतास चिकटवलेल्या बुरख़्यात फ़ाटलो मी गोष्टी सांगु नको कुणाला माझ्या जिवंतपणाच्या, जिवंत आहे म्हणताना केंव्हाच संपलो मी... धुंद रवी
|
va va.. dhund ravii Chan ..गोष्टी सांगु नको कुणाला माझ्या जिवंतपणाच्या, जिवंत आहे म्हणताना केंव्हाच संपलो मी... mast..!!!
|
धन्यवाद लोपमुद्रा.. जमलं तर 'कथा-कादंबरी' मधलं माझं एक आर्टीकल वाच.. आवडेल तुला.. धुंद रवी.
|
Charita
| |
| Tuesday, September 05, 2006 - 1:53 am: |
| 
|

|
Meghdhara
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:11 am: |
| 
|
ती... छत्रीच्या नसलेल्या मुठीसारखीच कंचुकीचं अवडंबर नसलेली तीची कुडी आहे.. पेहनावा मादक नसतो दोस्तांनो.. भुक कुठलीही असो तीची स्वतंत्र भाषा आहे. आयुष्याच्या छत्रीलां भोकं असली तरी.. कामासाठी सरसावलेले तीचे हात आहेत.. तीच्या उघड्या वक्षाचा वचक नी आपल्या नजतेर आदर आहे. चेहर्यावरील सुरकुत्या आणि अंधुकलेली नजर.. नेहमीच वय आणि सुख सांगत नाही दोस्तांनो गळ्यातल्या डोरल्याने नी ओघळ्ल्या कुंकवाने दिलेल्या तीच्या सौभाग्याला सलाम आहे. मेघा
|
Aaftaab
| |
| Wednesday, September 06, 2006 - 1:48 am: |
| 
|
मंडळी मला वाटतं की आधीचा फ़ोटो हा भीमसेन जोशींचा मैफ़लीतला होता.. कुणीतरी मैफ़लीवरती कविता करा ना त्या फोटोसाठी..
|
मला नेहेमीच येणारा हा एक अनुभव आहे कविता नाही दिवसभर बचैन असते का कोणास ठाउक? संध्याकाळी हुरहुर लागते का कोणास ठाउक? मग अशी अस्वस्थ मी, उठुन नेमका मारवाच का लावते माहीत नाही पण होत खर असंच ' ध नी रे_ नी ध' हळुहळु आपोआपच डोळे मिटुन घेते, आणखी आणखी व्याकुळ होते कधीतरी रेकॉर्ड संपुनही जाते. मी मात्र अजुन तशीच, डोळे मिटुनच. किती वेळ कोणास ठाउक? माझी ब्रह्मानंदी टाळी. हळुहळु डोळे उघडते, अंधार गडद झालेला, पण तरिही सारं कसं स्वच्छ शांत शांत. एक खोल श्वास घेते, आता खुप मोकळ वाटतं मला, सुटल्या सुटल्या सारखं.
|
Dhund_ravi
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:37 am: |
| 
|

|
Shyamli
| |
| Monday, September 11, 2006 - 8:15 am: |
| 
|
अबब पाऊश आला कशा मी पकलु त्याला दला दला,अन खला खला खुप खुप खुप पाउश आला अलेच्चा मिलाला मिलाला पाऊश माज्या हातात आला बाप ले मी जालो ओला मिलेल का आता धप्पा मला? श्यामली!!!
|
Krishnag
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:09 am: |
| 
|
तृप्ती.... एक थेंब पावसाचा जणू थेंब आमृताचा तप्त भेगाळल्या धरतीतून येई निश्वास तृप्तीचा धुंध मृद्गंधाने मन होतसे विभोर शितल त्या शिडकाव्याने काया होय पुलकीत ऊठे शहारा तनुवरी मन होतसे आतुर म्हणे मेघांना अवनी शमवा मनीचे काहूर करी वर्षाव सुधेचा नभ वसुधेच्या पदरी बाल्य मनाचे कुतुहले पाहे तृप्तीने अंबरी
|
Meenu
| |
| Tuesday, September 12, 2006 - 3:09 am: |
| 
|
श्यामली सहीच येकदम perfect बसलीये या चित्राला
|
किती ग शान छामली, मला खुप खुप आवल्ली, मत्त ए ग.
|
श्यामल माझ्या दिड वर्षाच्या मुलीचा फ़ोटो आहे हा... कविता आवडली आणि घरी जाऊन तिला म्हणुनही दाख़वली. ती बराच वेळ बडबडत बसली होती... धुंद रवी.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 12, 2006 - 12:33 pm: |
| 
|
श्यामली, छान आहे कविता. लहान मुलाना म्हणायला पण खुप सोपी आहे.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 13, 2006 - 4:50 am: |
| 
|
श्यामली.. गोडुली किती छान लिहीलीएस.. शुंदल आहे ह अगदी..
|
Shyamli
| |
| Thursday, September 14, 2006 - 1:18 am: |
| 
|
धन्यवाद.. मीनु,मनीषा,दिनेशदा,रवी..आणि वैशाली हा फोटो बघुन आपोआप सुचलेल्या ओळी आहेत या! 
|
एकटा यांनी पोस्ट केलेल्या या चित्रावरून सुचलेली कविता.. देणे.. ही मैफिल सजली, श्रोते आतुरलेले नादात सुरांच्या तानपुरे रमलेले कुणी हसून किंचित अभीष्टचिंतन करिती अर्पितात कोणी स्तुतीसुमांचे झेले मी बैठकीवरी चुकल्यागत बसलेला या सार्यामध्ये असूनही नसलेला बोलतो काहिसे, हसतोही थोडासा पाहून चेहरा दिसून ना दिसलेला ते वाढत जाते अंतर कणाकणाने मी जगापासुनी तुटतो क्षणाक्षणाने अंतर्मुख होतो, मिटून घेतो डोळे गलक्यात शोधतो तुजला प्राणपणाने मग क्षणात निःष्प्रभ होती वादळवारे विरघळून जाते भवतीचे जग सारे मी विरता विरता तृप्त होत जाताना श्वासांत माझिया सूर तुझा झंकारे भंगते समाधी टाळ्यांच्या गजराने अवतीर्ण होत मी पुन्हा नाईलाजाने सांगतो, विनवितो पुन्हा पुन्हा सार्यांना, " हे श्रेय न माझे, ' त्या'चे आहे देणे..."
|
Dineshvs
| |
| Monday, September 18, 2006 - 1:29 pm: |
| 
|
छान स्वाती, मला नीट आठवत असेल तर ते चित्र कुमार गंधर्वांचे आहे. आणि तुझी कविता त्यांच्या गायकीला बरोबर जुळतेय.
|
|
|