|
Shyamli
| |
| Wednesday, September 20, 2006 - 4:34 am: |
| 
|
किनाऱ्यावर बसून कल्पनाच करायच्या तू किती दूरवर आणि कुठे कुठे पसरलेला असशील......? लडिवाळ लाटांमध्ये कधी भिजायचं कधी कोरडं राहायचं उधाणुन आलास की....... कवेत घ्यायचं... गेलास की सोडून द्यायचं डोळ्यात आठवणींना घेऊन बसायचं खाऱ्याच त्याही तुझ्यासारख्या..... किनारा सोडताना स्वच्छ हात पाय धुवावे आणि परतावं म्हणल तर..... जाणवतं थोडी वाळू चिकटलीये तळव्याला......... श्यामली!!!
|
Meenu
| |
| Wednesday, September 20, 2006 - 5:30 am: |
| 
|
वा श्यामले मस्त गं
|
Krishnag
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:03 am: |
| 
|
श्यामली, छानच!! .. .. ..
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:37 am: |
| 
|
ग्रेट ह.. श्यामली..!!! कवितेला नाव दे ना..!!!
|
Puru
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:51 am: |
| 
|
मस्त लिहिलयस हं श्यामली!!..
|
दोस्तांनो ... पुरावा ला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार aandee उभ्या कोरड्या आयुषात आलेले चार दोन हळुवार आठवणीचे ढग सावली देउन गेलेले तेच ढ्ग सरीसरीने कोसळले त्यात माझे अश्रु मिसळुन गेले......... खास एकदम !!!! श्यामली ... मस्त हां . मी तुझी आणि स्वातीची कविता परत एकत्र वाचली ... कविता म्हणजे त्या त्या व्यक्तीचं त्या क्षणांचं प्रतिबिंब हे किती खरंय असं वाटून गेलं .. बघ ना ... एकच थॉट किती वेगळ्या पध्दतीने मांडला जाऊ शकतो ... कुणी शिंपला म्हणेल कुणी तळव्याला चिकटलेली वाळू पण फक्त शब्द बदलत नाहीत तर अर्थही बदलून जातो . एकदम paradigm shift ... मज़ा आला ...
|
1full2half
| |
| Wednesday, September 20, 2006 - 7:43 am: |
| 
|
आकाश आकाशाकडे कधी डोळे भरून पाहिलेस ? काय दिसते सांगशील ? दिसतात का तुला ओथंबलेले क्षण किंवा भरकटलेले मोती ? नसतील कदाचित त्याच्यात ओघाची कवने, पण म्हणून त्याने ढगांची पातळी कधीच ओलांडली नाही.. पाहिलेस तू कधी डोळे भरून ? ते अक्षयतेचं दान घेऊन प्रचंड आसमंतात विहार करणारे ते रहाटगाडगे.. कधी आग तरी कधी पाण्याचा वर्षाव करून ह्या आस्तित्वालाच क्षती पोचवेल असे वाटले कधी तुला? बघ जरा नजर वर करून... दिसेल तुला सुर्यालाही न्युनत्व आणणारा प्रकाश... आकाश नुसते तुला पांघरण्यासाठी कधीच नव्हते.. आणि तुला तसे वाटलेच तर.. एवढेच समज.. तुझी शय्या एक मोहाची गोधडी अन आकाश म्हणजे.. त्याची कालपरत्वे रुंदावत जाणारी छिद्रे !!! तुझ्या स्वप्नांना ऊन वार्याचे कोंदण देणारी गात्रे.. बघ.. पहा पुन: एकदा डोळे भरून... डोळे भरून पहा अशासाठी म्हणतोय बाळा.. कधी तरी तुलाही समजेल.. नावडता बाप होणे काय असते.. हे सांगणे एवढ्यासाठीच कि त्या आधी तू आकाश होऊ नकोस.. म्हणजे झाले ....!!!
|
वैभव, पुरावा खासच... आर्काइव्ह मधुन काढुन आत्ता वाचली... श्यामली, छान लिहिली आहेस, नाव दे फ़क्त. 1full2half , तुमची एंट्री कविता दुर्बोध सुरूवात घेऊन आली तरी उलगडत जाते आणि अगदी आतपर्यंत पोचते वाचताना... अजून येऊदे.
|
Jayavi
| |
| Wednesday, September 20, 2006 - 9:39 am: |
| 
|
श्यामली....... मस्त! You are rocking baby लिहित रहा गं. खूप खूप गहिरं लिहिते आहेस. निनावी, तुला मनोगतावर दिलीये प्रतिक्रिया. खूप आवडली
|
Ashwini
| |
| Wednesday, September 20, 2006 - 9:46 am: |
| 
|
श्यामली, छान आहे ग. 1full2half , अमेयशी सहमत.
|
वैभव, पुरावा खासच! असच तुझ शब्दवैभव बरसु दे.
|
श्यामली, तुझी ' निनावी' कविता वाचली. आधी वाटलं माझ्या कवितेचं विडंबन आहे की काय. पण नाही, छान आहे.
|
Aandee
| |
| Wednesday, September 20, 2006 - 10:42 am: |
| 
|
लोपा,दाद,वैभव,किरु अभिप्राया बद्द्ल धन्यावद. किरु चारोळी छान श्यामली कविता छानच आहे किनार्यावर बसल कि आपापल्या मूड प्रमाणे सागराची किती निरनिराळी रुप आपल्याला दिसतात. अन्तरमन जाग असल की सृजन ही आपोआप होत....त्याची सुन्दर कविता होते
|
Shyamli
| |
| Wednesday, September 20, 2006 - 11:49 am: |
| 
|
धन्यवाद..... मीनु,क्रिष्णाजी,वैशाली,पुरु, बाप रे एवढी मोठी प्रतिक्रिया.......... खरय वैभव, ह्या स्वातीच्या थांगवरुनच सुचलेल्या ओळी आहेत अर्थात माझ्या view ने जया.... तुझ्यामुळेच लिहितेय ग.... अमेय,अश्वीनी, aandee धन्यवाद अमेय,वैशाली... नाव "ठेवा" ना तुम्हीच मला नाही सुचल म्हणुन तर नाही लीहीलं ना! स्वाती, तुझ्या कवितेच विडंबन... छे ग बाई आपली तेवढी उंची नाही... पण काल कुणीतरी ईथे म्हणाल होतं तसच झाल अगदी "थांग" वाचुन काहीच्या काहीच.... आणि... आपलि कृपा गुरु'ज आणि लोक्स...
|
Sampadak
| |
| Wednesday, September 20, 2006 - 5:16 pm: |
| 
|
मायबोलीवरच्या सिद्धहस्त लेखक आणि कवी मंडळी, आपल्या दिवाळी अंकासाठी काही लिहिताय की नाही! यावेळी मायबोलीला दहा वर्षे पूर्ण होतायत! तेव्हा यावर्षीच्या खास अंकासाठी आपल्या सर्वोत्तम कलाकृती राखून ठेवा.. अधिक माहितीसाठी 'इथे' पहा. अंकासाठी आपले साहित्य 'इथे' पोस्ट करा -- संपादक मंडळ
|
Devdattag
| |
| Wednesday, September 20, 2006 - 11:14 pm: |
| 
|
श्यामलि.. सहिच... जाम आवडलि..
|
हा sampadak id मी गेले कित्येक दिवस "संपदा k " असा वाचत होतो
|
Kedarjoshi
| |
| Thursday, September 21, 2006 - 12:05 pm: |
| 
|
"संपदा k" LOL. मला जाम हसायला आले
|
Dineshvs
| |
| Thursday, September 21, 2006 - 12:57 pm: |
| 
|
श्यामली छान आहे. किनार्यावरच्या अनुभवाना आणखीहि कंगोरे असतात. मला वाटले होते, कि यावर कुणीतरी सागराची बाजु पण लिहील. उगाच आडवळणाने का लिहु ? आव्हान वैभवलाच आहे.
|
अरे, दिनेश, हे उशीरा पाहिलं मी. नाहीतर लगेच परतवलं असतं तुझं आव्हान. खरंतर मी असं मागणीनुसार लिहीत नाही, पण आव्हान म्हणालास म्हणून.... आर्त माझ्या ह्रदयातली आर्त गाज ऐकू आली असेल ... नसेलही धमन्यांतून उठणारी प्रत्येक लाट स्पर्शून गेली असेल ... नसेलही पण तू नाकारूच शकत नाहीस तुला बिलगण्यासाठी एका समुद्राने शोधल्या होत्या लाखो वाटा अन परतला होता घेऊन उरी फुटलेल्या खिन्न लाटा... खरंतर तू गोव्याचा, तुला समुद्रावर ललित सुचायला हरकत नाही. पण मी ललित वाचतही नाही, त्यामुळे राहू दे.
|
|
|