
|
वैभव, पुरावा सुंदर आहे.
|
थांग या खार्या पाण्याचा थांग लागणं अशक्यच आहे.. कुणालाच.. केवळ माझ्या कवेत आहे म्हणून माझं म्हणता येईल का? कोण जाणे.. उमाळे खोटे नाहीत त्याचे.. पण.. लाटेलाटेने येऊन जितकं भिजवेल तितकेच आम्ही एकमेकांचे.. बाकी.. त्याच्या पोटातली खळबळ त्याच्याकडे आणि शिंपल्यांत जपलेल्या आठवणीच तेवढ्या माझ्याकडे..
|
Sampadak
| |
| Monday, September 18, 2006 - 9:58 am: |
| 
|
इथे प्रसिद्ध झालेले साहित्य दिवाळी अंकात घेतले जाणार नाही ह्याची नोंद घेण्यात यावी.
|
Ashwini
| |
| Monday, September 18, 2006 - 3:20 pm: |
| 
|
वा स्वाती, थांग मस्त. वैभव, पुरावा सुरेखच.
|
धन्यवाद मित्रांनो ... स्वाती ? ही तीच का ? तू स्वतःसाठी नवीन टायटल सॉंग लिहीलंस का ? थांग ही कविता अतिशय उच्च आहे
|
Smi_dod
| |
| Tuesday, September 19, 2006 - 12:40 am: |
| 
|
स्वाती अतिशय सुंदर कविता
|
Devdattag
| |
| Tuesday, September 19, 2006 - 12:55 am: |
| 
|
वैभव, पुरावा सुंदर.. स्वाती, थांग सही.. आणि उशीराने शुभेच्छा वैभव.. तीच ही हीच ती..
|
Shyamli
| |
| Tuesday, September 19, 2006 - 2:11 am: |
| 
|
गुरुजी.... पुरावा बेश्ट एकदम.... नीनावे,(हेच आपल वाटत बाई... ह्या स्वातीला आम्ही नाही ओळ्खत) एकेक ओळ म्हणजे कहर आहे या "थांग" ची
|
Daad
| |
| Tuesday, September 19, 2006 - 2:51 am: |
| 
|
स्वाती, किती छान गं? 'उमाळे खोटे नाहीत त्याचे.. पण.. लाटेलाटेने येऊन जितकं भिजवेल तितकेच आम्ही एकमेकांचे.. ' कधी कधी मला वाटतं आपण आपल्यालाच असं लाटेलाटेनं भेटत नाही का? आपण जपलेला शिंपला आपल्याच लाटेनं कधीतरी आपल्या सुपूर्द केलेला असतो..... छ्छे! काहीच्या काही... करुन टाकलं तुझ्या ह्या कवितेने. अतिशय "अथांग" आहे ही कविता! शलाका
|
निनावी तु १५ दिवसांसाठी गेलीस आणि आता चक्क नाव घेउन आलीस की!
|
Soultrip
| |
| Tuesday, September 19, 2006 - 3:19 am: |
| 
|
respected moderators, क्षमस्व.मला थोडी आशन्का होतीच>>> मृद्गंधा६, केवढी ही विनयशिलता? अगदीच शोभत नाही सध्याच्या जगात!
|
Aandee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 5:05 am: |
| 
|
आठवणीचे ढग दुःख उफ़ाळून येतय खवळलेल्या सागरा प्रमाणे अंथाग.. थेट क्षितीज्यापर्यन्त अंधूक आसमन्तात..... अनेक आठवणीचे ढग भरुन आलेत दुःखावर सावली धरण्या साठी माझ एक सोड, पण तुलाही कसं नाही आल ओळ्खू पागोळ्यातुन झरणार्या थेम्बाच... पाण्याशी असणार नात.. !!!! तुझ्या भास आभासा चाहुल अवती भोवती मान वळवून पाहव तर अश्रु कसे तुडूम्ब भरलेत डोहागत त्यात तुझीच बिम्ब, तरंगणारी उभ्या कोरड्या आयुषात आलेले चार दोन हळुवार आठवणीचे ढग सावली देउन गेलेले तेच ढ्ग सरीसरीने कोसळले त्यात माझे अश्रु मिसळुन गेले......... पुन्हा तुझी बिम्ब साठवायला डोळे मोकळे झाले
|
अनेक आठवणीचे ढग भरुन आलेत दुःखावर सावली धरण्या साठी >>>.andee मस्त अगदि.. निनावी.. सुंदर.. लवकर लवकर लिहित जा ग..!!!
|
स्वातीताई, आता कशी खरीखुरी "परतल्या" सारखी वाटते आहेस अगदी नेहमीसारखंच कवितेवर प्रेमच बसलं वाचताक्षणी!
|
धन्यवाद, दोस्त्स. वैभव, मीच ती. देवा, आभार. आणि तुलाही ( खूपच) उशीराने शुभेच्छा. दाद, You said it! श्यामले aandee , मलाही लोपाने उल्लेख केलेली कल्पना आवडली.
|
Kiru
| |
| Tuesday, September 19, 2006 - 11:10 am: |
| 
|
वैभव.. 'पुरावा' आवडली रे.. Aandee .. भावना मस्त उतरल्यात कवितेत.. आणखी येऊदेत काहीतरी छान स्वाती.. किनारा ही आनंदला असेल... त्यालाही आज शब्द मिळाले म्हणून.. एक चारोळी.. आठवणींवर मालकी फक्त भूतकाळाचीच असते.. आठवणी 'रम्य करण्याची ताकद' मात्र वर्तमानाचीच असते..
|
धन्यवाद, किरण. खरंतर हे आभार बरेच दिवस pending होते. ऑगस्टमधे मी भारतात असताना तू प्रतिक्रिया दिली होतीस माझ्या कवितांवर, ती मी खूप उशीराने वाचली, आणि मग आभार मानायचं राहूनच गेलं. सॉरी. हौस / विरंगुळा म्हणून आपलं लिहीते काहीबाही दोस्त्स. तुम्ही इतकं appreciate करता हा तुमचा मोठेपणा आहे. - स्वाती ( निनावी)
|
Daad
| |
| Tuesday, September 19, 2006 - 7:53 pm: |
| 
|
Aandee, 'अनेक आठवणीचे ढग भरुन आलेत दुःखावर सावली धरण्या साठी ' फारच छान
|
Ajjuka
| |
| Tuesday, September 19, 2006 - 11:17 pm: |
| 
|
पुरावा... वैभव मस्तच रे.. थांग.. स्वाती.. महान.
|