|
मंडळी इथे फ़क्त मराठी साहित्य अपेक्षीत आहे.
|
respected moderators, क्षमस्व.मला थोडी आशन्का होतीच.फ़क्त एकदाच टाकली.पहिली चुक सम्जून माफ़ करा.मी स्वतः ती post delete केली असती..तुम्हीच केली त्यबद्दल ध्न्यवाद.
|
वैभव, चांदणे अ प्र ती म. ' कधी ओठांवरी रेंगाळते, छळते मला.. कधी गालातल्या गालात हसते चांदणे.. व्वा!! सगळेच शेर सहजसुंदर. जियो!!
|
Daad
| |
| Wednesday, September 13, 2006 - 8:09 pm: |
| 
|
'अवेळी उमलणे नाही बरे हे जाणते तरी नजरानजर होताच फसते चांदणे' वैभव किती सुंदर! लख्ख दिवसा उजेडी आत्ता गज़लेचं चांदणं! ....... झकासच! रवी... मस्तच. मृदगंधा, माफ कर, गं. अगदी रहावलं नाही म्हणून तुझी पूर्ण उर्दू गज़ल टाक चा आग्रह केला. बघ माझ्यामुळे.......
|
Daad
| |
| Wednesday, September 13, 2006 - 11:03 pm: |
| 
|
पांढुरवाट माग घ्यावा कुणीतरी हिरवाळीच्या नादाने एकल्याच माळावरल्या खुरट्या पांढुरवाटेवर श्रावण यावा मग पागोळ्या, पागोळ्यांनी आटल्या, आसावल्या, भेंगाळल्या दिठीवर हिरवा सूर गाणार्या, कुलकुलणार्या पाखराचा इथे-तिथे वावर भिरभिरवाण्या मनावर फुलतेल्या कळ्यांना गोंदवण पानांचं पैंजण गंधाचं पांढुरल्या पायांवर
|
Smi_dod
| |
| Wednesday, September 13, 2006 - 11:26 pm: |
| 
|
व्वा वैभवा!!! चांदण सुंदर.... दाद....मस्त...काय छान लिहिताय सगळे...सही!!
|
वैभवा,चांदणे सुरेखच रे मित्रा
|
दाद.. छानच.. नाही तुझ्यामुळे काही नाही..उगाच काय...उलट तुझा आग्रह म्हणजे माझे कौतुकच होते.. असो.. पण इथे ती लिहायचा मोह माझा होता..त्यामूळे चुक माझीच so dont feel guilty
|
Lopamudraa
| |
| Thursday, September 14, 2006 - 4:43 am: |
| 
|
दाद मस्तय... काय दाद द्यावी बर... ..!!! फ़क्त शेवटची ओळ मला कळली नाही पण कविता खुपच आवडली..!!!सुप्रिया माझाही आग्रह होताच की... leave it ..!!!
|
Daad
| |
| Thursday, September 14, 2006 - 6:41 pm: |
| 
|
एक विडंबन कविता खरतर गीत आहे. "घन्:श्याम सुन्दरा..." च्या चालीवर. (म्हणून बघा..... आणि ए, मला स्वत्:ला ही भूपाळी खूप आवडते हं! ) घन उष्ण पिवळा पीवळा पडसोदय झाला धरी लवकरी रुमाला...... रुमाला धरी लवकरी रुमाल, नासिकातळी श्लेम आला|| आणुनद्या लॉजिंजिस अन बाटली व्हिक्सची सरली करी गार्गल मिठ-पाणी घेउनी रेकी घसा शेकी "गरम शेण लेपा" देती कुणी, अचरटसा सल्ला.......||१ सायंकाळी एकेवेळी खो-गो अवघे भक्षी अरुणोदय होताच जळाची गरम पिशवी कुक्षी प्रभातकाळी उठुनी लावली सुंठ निज वक्षी करुनी सडा युकलिप्टस, झोपी..... गुंडाळुन मफलरशी शिंका, ताप, पडसे, ..... बरा हा होईल कधी खोकला?.......||२ shalaka
|
दाद.. वा!!! दाद देण्याची गरज आहे का?? तू स्वतःच दाद आहेस.. लोपा, आजकाल फ़क्त वाचन चालू आहे का?? आम्हालाही सन्धी दे की तुझे लिखाण वाचायची लवकर post कर एखादी कविता
|
Dhund_ravi
| |
| Saturday, September 16, 2006 - 1:04 am: |
| 
|
मृद्गंधा तुझी प्रतिक्रिया वाचली... मलाही तुझ्या शब्दांचे सुर माझ्याच मेहेफ़िलीतले वाटतात... भरुन आलेले असतात श्वास अन ओठांवर कविता साठतात... मग बरसुन जातो मुसळधार मी हल्ली स्वप्न गळ्याशी दाटतात... तुमच्या सगळ्यांच्या कविता वाचतो.. आणि खुपसं लिहावंस वाटतं त्यावर... पण त्या रातराणी गंधात हरवण्याआधिच पुढचा मोगरा दरवळतो आणि... ... आणि मग मी कहीच लिहित नाही धुंद रवी
|
वा!!! वा!! वा!! रवी, वा!!!
|
दोस्तांनो .. चांदणेला दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आभार .. देवा ... दाद .. छान . मृद्गंधा तुझ्या मेलची वाट पाहतोय .. ती गज़ल मला पूर्ण वाचायची होती ... आजकाल इथे नेहेमी येणं होत नाही .. पोस्ट केली होतीस का ? वरच्या मेसेजेस वरून तसं दिसतंय .. वा ! रवी , छान आहे ... तुझाच थॉट जरा वेगळ्या पद्धतीने मांडतोय मैफ़लीस ठाऊक होते येणारे अन जाणारे गीतांना माझ्या अपुले म्हणणारे, ना म्हणणारे पण फुरसत कोठे आहे मोजदाद कराया त्यांची श्वासांत वाढली आहे वर्दळ पुढच्या कवितांची
|
पुरावा .... हे असं कधी बिलगत , कधी भांडत परकेपणाच्या सार्या सीमारेषा ओलांडत आपण एकरूप होत आलोय ... असं वाटत नाही तुला ? अजूनही खात्री नसेल तर ... एकदा माझ्या मनात डोकावून बघ , तिथे दुसरं कुणीच दिसणार नाही तुला ... तुझ्याशिवाय आणि तरीही पुरावा हवा असेल तर ... एकदा स्वतःकडे नीट बघ , तिथे तू उभी दिसशील तुला .... तुझ्याशिवाय
|
वैभव, पुरावा..खुपच सुंदर आहे. 'तिथे तू उभी दिसशील तुला .... तुझ्याशिवाय" खरच अप्रतिम!!! मी ती गझल mail केलीय तुला.. वरती मी आणखी एक दुसरी गझल टाकली होती..
|
वैभव खरच या शेवटच्या ओळी खुपच अप्रतिम आहेत यार 'तिथे तू उभी दिसशील तुला .... तुझ्याशिवाय" खरच अप्रतिम!!!
|
Daad
| |
| Sunday, September 17, 2006 - 9:38 pm: |
| 
|
हं...... एकदा माझ्या मनात डोकावून बघ , तिथे दुसरं कुणीच दिसणार नाही तुला ... तुझ्याशिवाय आणि तरीही पुरावा हवा असेल तर ... एकदा स्वतःकडे नीट बघ , तिथे तू उभी दिसशील तुला .... तुझ्याशिवाय ...... वैभव, त्यात तू कुठे उरलास? असं विरघळून जाणं बरं नाही, बाबा! खरच, सुन्दर!
|
Aandee
| |
| Monday, September 18, 2006 - 4:27 am: |
| 
|
वैभव, दाद,रवि,मृदगंधा तुम्ही सगळेच खुप छान लिहीताआज खुप दिवसानी येण झाल,मागच पण वाचुन काढल.व्वा...सही
|

|
|
|