|
Niru, आलिंगन खूप आवाडली. O'Henriच्या एखाद्या लघुकथेच्या वळणाने जाणारी. बापू.
|
Meenu, काही असं काही तसं सुरेखच आहे. -बापू.
|
Meenu
| |
| Sunday, September 10, 2006 - 12:57 pm: |
| 
|
आभार चेहर्यावर नाही उमटत वेदना, आभार! बधीर आज सार्या संवेदना, आभार! निवडणुकीपुर्वी दिली कीती आश्वासने, जिंकल्यावर देण्या उरले केवळ, आभार! प्रेम वाटण्या नाही समजलात लायक, परी निवडलेत देण्यास वेदना, आभार! दोन वेळा जेवण वगैरे सारं काही क्षुद्र, मान्य शिक्षण द्यायची व्यवस्था केलीत, आभार! नाही दिलात अपेक्षापुर्तीचा निर्मळ आनंद, अपेक्षाभंग सहन करायला ताकद दिलीत, आभार!
|
Daad
| |
| Sunday, September 10, 2006 - 9:31 pm: |
| 
|
मीनू 'माझ्यातुन मला घेऊन तुला तेव्हढं ठेऊन जा'! किती सुन्दर! 'काही नाती कागदावर काही हृदयातुन तुटतात काही सुर आळवायचे काही गाळायचे असतात' फारच छान! धुन्द्-रवी उत्तर छानच आहे....... मृद्गंधा, तुझी गज़ल वाचायला आवडेल, गं!
|
Krishnag
| |
| Monday, September 11, 2006 - 1:50 am: |
| 
|
तु ये तू ये धुंद होउन.... सुगंधीत श्वासाची बरसात होउन निळ्या नभाची निळाई होउन... निळ्या सागराची गहराइ होउन.. हिरव्या धरित्रीची हिरवळ होउन... भिजल्या पहाटेचे दवबिन्दु होउन... श्रावण रातीचा ओलावा होउन... शरदाच्या रातीचा चांदवा होउन ग्रीष्माच्या उन्हातला गुलमोहर होउन.. सावळ्या संध्येची झुळुक होउन.... रानच्या वार्याची किलबिल होउन.... तू ये सये मृगाच्या सरींचा मृदगंध लेउन... माझ्या स्वप्नीचा सोनचाफ़ा होउन..
|
Smi_dod
| |
| Monday, September 11, 2006 - 2:20 am: |
| 
|
नातं नातं तुझ माझ जगावेगळ पहिली भेट पण पहिली न वाटता पुनर्भेट वाटावी असं तासन तास मारलेल्या गप्पा कधी तु ऐकवलेली गाणी तर कधी कविता एखाद्या विषयावर घातलेले वाद लहान होउन तुला सांगीतलेल्या तक्रारी मनाचे सल, आठवणीचे घाव बोलता बोलता मुक झालेलो आपण न बोलताही खूप काही बोललेलो ते रुसणे,लटके रागावणे रडता रडता हसणे डोळे पुसता पुसता हळुच जवळ घेणे तुझ्या खांद्यावर विश्वासाने मान टेकवणे कसे आणि कधी एकरुप झालो वेगळे अस्तित्वच विसरलो माझा हुंदका, हुंकार दुरुनही तुला कळावा ती वाढती हुरहुर माझे न बोलता तुल उमगणे मी मिसकॉल देणे आणि तुझा नंबर माझ्या सेलवर झळकणे वाढतच गेले... सखा म्हणुन स्विकारलेले नाते कुठुन कुठवर आले जन्मभरच्या,युगानयुगाच्या नात्यासारखे घट्ट झाले.... स्मि
|
Kiru
| |
| Monday, September 11, 2006 - 5:29 am: |
| 
|
वाह..!! smi_dod , छान... Nirukul , 'अमर आलिंगन' आवडली. कृष्णा, 'तु ये' अलगद मोरपीस फिरवून गेल्यागत हळूवार झालीय. निसर्गाचे इतके मोहक रंग घेऊन आलेली 'ती'.. !!! ओ हो.. मीनू.. 'आभार' आवडलीच.. पण 'काही असं काही तसं' वाचताना मनातलं ओठावर आल्यासारखं वाटलं.. विशेषत: शेवटच्या दोन ओळी.. क्या बात है!!
|
मीनू,मस्तच आहे "आभार" त्यबद्दल तुझे आभार.. स्मि,"नातं" गोड आहे.. दाद, धन्यवाद..माझी गझल हिन्दी-उर्दू आहे..त्यामुळे इथे टाकली नाही.. पण त्यातला पहिला शेर टाकते.. "टूटे हुए घरौन्देसे वाकिफ़ खुद शजरही नही हम जा-ब-लब हुए और उनको खबरही नही"
|
Himscool
| |
| Monday, September 11, 2006 - 8:13 am: |
| 
|
मीनु बर्याच दिवसांची कसर भरून काढलीस की ह्या रविवारी
|
Meenu
| |
| Tuesday, September 12, 2006 - 12:05 am: |
| 
|
मयुर, पुनम, बापु, किरु, दाद, मृदगंधा, हिम .. सर्वांना प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद ..
|
Parakhad
| |
| Tuesday, September 12, 2006 - 8:24 am: |
| 
|
बक्कळ येळ झाला हितं येक बी ललित लिवलं न्हाय कुनी . मंडळी थकल्यात जनू
|
परखडराव वाचा .. एक कादंबरीच टाकतोय .. काय कळलं ते सांगा म्हणजे झालं
|
चांदणे ... तुला भेटून कळते काय असते चांदणे कसे कायम कुण्या देहात वसते चांदणे अवेळी उमलणे नाही बरे हे जाणते तरी नजरानजर होताच फसते चांदणे कधी ओठांवरी रेंगाळते , छळते मला कधी गालातल्या गालात हसते चांदणे पुरेसा चिंब भिजुनी टाकतो निःश्वास मी पुन्हा स्पर्शातुनी रिमझिम बरसते चांदणे मळभ दाटून येते विरहसमयी एवढे स्वत:ला पूर्णत: हरवून बसते चांदणे तसे रात्री नभी टिमटिम दिवे मी पाहतो तुझ्याइतके परंतू लख्ख नसते चांदणे
|
वा!! वैभव, "तसे रात्री नभी टिमटिम दिवे मी पाहतो तुझ्याइतके परंतू लख्ख नसते चांदणे " मस्तच..
|
Dhund_ravi
| |
| Wednesday, September 13, 2006 - 2:30 am: |
| 
|
ती असुसलेली रातराणी ती चांदण्यांची बेधुंद गाणी ती अपुर्ण कविता, अधुरी कहाणी ते काळजाचं पाणी पाणी ..............................तो तिच्या ओंजळीत गेला टाकुन… ती थरथरत राहिली त्याच्या वर्षावात ओंजळीमध्ये चेहरा झाकुन... धुंद रवी
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 13, 2006 - 4:58 am: |
| 
|
तुझ्या कवितेने परत आठवुन गेले ते चांदणे... काय सांगु किती... विझवुन गेले ते चांदणे... सुन्दर.. अप्रतिम.. वैभव... धुन्द रवी क्या बात है!!!.. मीनु अगदी ग.. मनाला..भिडली..!!! सुप्रिया.. हिन्दी भाषा किती सुंदर आहे ना... टाक ग तुझी गझल वाचु दे आम्हाला..!!!स्मिता..,क्रिष्नाग.. मस्तय.. बहार आलीये अगदी!!!
|
रवी, छान लिहिता.. का कुणास ठाऊक पण,तुमच्या पहिल्या post पासुन असे वाटतेय कि मी तुम्हाला जवळून ओलखते..तुमचे लिखाणही परिचित असल्यासारखे वाटते,तसा मझा sixth sense जरा powerful आहेच पण तरिही तुम्ही जे लिहिता ते आधिच मला कळते कि ते कुठल्या वळणाने जाणार. कहीही असो, तुमची शैलि मला मझ्यासारखीच वाटते. all d best
|
लोपा, सगळ्याच भाषा सुंदर असतात..कारण त्यातून भावनांचा संवाद होतो..तोच तर त्यांचा हेतू आहे.. जरुर गझल टाकेन पण नन्तर...तुझी एखादी कविता post कर लवकर
|
Krishnag
| |
| Wednesday, September 13, 2006 - 6:06 am: |
| 
|
वैभव!!! सुंदरच रे चांदणे!!!
|
Devdattag
| |
| Wednesday, September 13, 2006 - 6:49 am: |
| 
|
सही रे वैभव.. मृदगंधा मस्तच..
|
|
|