Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 09, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » काव्यधारा » कविता » Archive through September 09, 2006 « Previous Next »

Kiru
Tuesday, September 05, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कास मंडळी.. खूप छान लिहिताय... !!

Kiru
Tuesday, September 05, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक चारोळी...

भूतकाळात रमता रमता
वर्तमानाचे भान हवे
वर्तमानात जगता जगता
भविष्याकडे ध्यान हवे...


Sameerdeo
Tuesday, September 05, 2006 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एक सहज



आकाशातील
वीज चमकुनी
स्वच्छ दिसावा
आसमंत हा
तशी मला ती
दिसली क्षणभर
वळणावरती
उभी कधीची
माझ्यासाठी
माझ्यासाठी

वीज संपली
पुन्हा दाटली
रात्र काजळी
पण आता..
निश्चिंत मनाने
पुढे चाललो
कारण आता
कळले आहे

वळणावरचे
स्वच्छ निळेपण

वळणावरचे
स्वच्छ निळेपण






Dhund_ravi
Wednesday, September 06, 2006 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उधळु नको मोहरंग
मज अजुनही जगायचे
पेटले बेभान रान
मज भानावर यायचे

लाजली कळी कळी
ख़ळी गालावर उमलली
उमलत्या खळीत जळून
पाकळी बहरली
बहरत्या फ़ुलात मिटुन मज पाखरु बनायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

मन सैरभैर पाखरु
श्वासवरी तरंगले
पेटले श्वासात गंध
गंधात भास रंगले
रंगात अंग भिजवुनी मज तरंगात गायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

उन्मत्त रात्र रेशमी
विखरुन पाश न्हायली
पाशात दंश लपवुनी
दरवळली सायली
मोहात मात असुनही मज पराभुत व्हायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

धुंद रवी




Shyamli
Wednesday, September 06, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है कीरु!

धन्यवाद लोक हो...


Shyamli
Wednesday, September 06, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॅच
दाट धुके
धूसर आकृत्या
त्यातच ओळखीची ओळखण्याची
आपली केविलवाणी धडपड
कुठली तरी एक मिळती जुळती
सापडते आणि मग
मॅच करत बसायचं
बळच
हं हं हेच ते.....

श्यामली!!!


Dhund_ravi
Wednesday, September 06, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतक्या सुंदर कवितांमध्ये
सगळ जगच विसरावं...
पण एखद्या 'कथेलाही' वाटतं की
तुमच्या रोमरोमात पसरावं...

"कुठलाच पुरुष कधी बाई होऊ शकत नाही "
नावाची एक छोटीशी कथा टाकली आहे कथा-कादंबरी मध्ये...

वाचा... आवर्जुन आग्रह...

धुंद रवी




Lopamudraa
Wednesday, September 06, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग.. बाई...श्यामली!!!अगदी हेच.... होत
धुन्द रवी चारोळी मस्तय तशी कथाही..ऽसेल..!!!


Manishalimaye
Thursday, September 07, 2006 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग शामली अगदी अगदी खरय
पण तरीही
तुझ्याशी बोलताना,
मला आरशात डोकावल्याचा भास होतो.
आणि केव्हाच साचलेलं,
बाहेर आल्याचाच आनंद खास होतो.
:-)





Manishalimaye
Thursday, September 07, 2006 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विसरु दे माझ्यातला मी,
केव्हा तरी, केव्हा तरी.
दिसशील का रे मजला,
आता तरी, आता तरी.

ओढ केव्हाची तुझी ही,
लागली मजला जरी.
अस्तित्व माझे विसरुनी,
भान हरलो मी जरी.
दिसलास ना तू मजला,
शोधतो अजुनी तरी.
दिसशील मजला असा रे,
केव्हा तरी, केव्हा तरी.|| ||

शोधिले मंदिरी,
शोधिले अंबरी.
पत्थराला पुजीले,
तस्विरीला अर्चिले.
असशील कोठे सांग ना,
स्वप्नात माझ्या येवुनी,
केव्हा तरी, केव्हा तरी.|| ||

दिसलास ना केव्हा जरी,पण
सहजीच मजला तारीशी,
तू जीवनाच्या संगरी.
केव्हा तरी हळव्या क्षणी,
अवचित कानी सांगशी.
'मी' पणाला सारुनी,
शोध घे रे अंतरी,
केव्हा तरी, केव्हा तरी.|| ||
मनिषा







Asmaani
Thursday, September 07, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आपली मृद्गंधा कुठे गेली? मृ, missing ur poems. लवकर टाक पुढची कविता.

Sanyojak
Thursday, September 07, 2006 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो गणेशोत्सवातील स्पर्धांचे मतदान सुरु केले आहे! कृपया
इथे जाऊन प्रत्येक स्पर्धे साठी मतदान करा!!

Shyamli
Friday, September 08, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा,लोपा
धन्यवाद.. .. .. ..

मनिषा.....


Meenu
Friday, September 08, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाणार तर जा ..

जाणार तर जा जाणार तर जा....
ह्रुदयात तुझ्या थोडी जागा मला देऊन जा
जाणार तर ....
श्वासात तुझ्या मिसळुन माझे श्वास दोन घेऊन जा
जाणार तर ....
नयनी माझ्या तुझी प्रतिमा तेवढी ठेऊन जा
जाणार तर ....
चाफ्याच्या गंधात मिसळुन गंध माझा घेऊन जा
जाणार तर ....
माझ्यातुन मला घेऊन तुला तेवढं ठेऊन जा
जाणार तर ....


Meenu
Friday, September 08, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही असं काही तसं...

काही प्रश्न पोटाचे काही तत्वाचे असतात
काही रस्ते सरळ काही वळणाचे असतात

काही मित्र क्षणभर काही कायमचे रुसतात
काही वण चेहऱ्यावर काही मनावर उमटतात

काही नाती रक्ताची काही वेदनांची असतात
काही अश्रु ढाळायचे काही गिळायचे असतात

काही गुन्हे माफीचे काही फाशीचे असतात
काही दिवस आपले काही कलीचे असतात

काही नाती कागदावर काही हृदयातुन तुटतात
काही सुर आळवायचे काही गाळायचे असतात


Kmayuresh2002
Saturday, September 09, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा,सही चालु आहे.. अजुन येऊ देत...:-)

Dhund_ravi
Saturday, September 09, 2006 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु...
जाणार तर जा... फ़क्त इतकं करुन जा...

तु माझ्या सुख़ासाठी
तुझं घरटं सोडलं नाहीस
पण मग तुझ्या सुख़ासाठी माझं घरटं का मोडलंस?

तु माझ्या सुख़ासाठी
तुला माझ्याशी जोडलं नाहीस
पण मग तुझ्या सुख़ासाठी मला तुझ्यात का ओढलंस?

घरटं माझं मोडायचंच होतं तर तुझ्या घरट्यात राहु द्यायचंस...
मला तुझ्यात ओढायचंच होतं तर डोळे भरुन पाहू द्यायचंस...

येताना तु एकटी आलीस
पण जाताना सगळं घेऊन गेलीस...
सगळ तरी नेलंस कुठे
तुझ्या आठवणी ठेऊन गेलीस...

घरटं माझं जोडायला
फ़क्त एकदा येऊन जा.....
घरटं जोडता नाही आलं
निदान आठवणी तरी घेऊन जा.....!

धुंद रवी




Psg
Saturday, September 09, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, कधी असं, कधी तसं सही जमलीये! :-)

काही दिवस आपले काही कलीचे असतात.......
पॉश आहे हे!


Niru_kul
Saturday, September 09, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमर आलिंगन...

रविवार सकाळची वेळ होती,
मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो;
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
"चहा घेणार का तुम्ही? " असं मला म्हणाली;
मी तिच्याकडे न बघताच "हो" म्हणालो,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो;
माझ्या जवळून जाताना तिने केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला;
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनंही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले;
मी हळूच उठलो खुर्चीवरुन आणि स्वयंपाकघरात आलो,
तिनं माझ्याकडे बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिनं मात्र मागे न बघताच चहाचं आधण ठेवलं,
आणि मग मला चिडवण्यासाठी आपलं नाक उडवलं;
तिच्या पाठमोर्‍या रुपाकडे बघत मी क्षणभर तसाच थांबलो,
उगाच तिला दुखावले म्हणुन स्वतःच्याच मनाशी भांडलो;
हळुच मग मागुन जाऊन मग मी तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडीत चहाच्या भांड्याला लागुन हात माझा भाजला;
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली;
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली "जाऊ द्या ना!"
मी म्हणालो तिला "तुला माझ्यात सामवू दे ना!"
ती लाजुन म्हणाली "अहो असं काय करता? चहा उकळतोय!"
मी म्हणालो "उकळू दे! इथं माझा जीव जळतोय!"
"अहो असं काय करता? दूध उतू जाईल ना!"
"कशाला काळजी करतेस मी परत आणुन देईन ना!"
ती उगाच कारणं देत होती, मी प्रत्येक कारण उडवत होतो,
तिला अजुनच जवळ घेत, माझ्या मनासारखं घडवत होतो;
शेवटी तिनं कारण दिलं "अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय"
मी म्हणालो "हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय"
तेवढ्यात दाराची कडी वाजली,
मी मनातल्या मनात बाहेरच्याला इरसाल शिवी घातली;
तिनं झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतलं,
आणि हळूच मला धक्का मारुन, स्वयंपाकघराबाहेर लोटलं;
मी वैतागानं दार उघडलं समोर कचरावाला दिसला,
माझा खांद्याशी ओला झालेला शर्ट पाहुन तो पण गालात हसला;
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं,
पण मागेवळताक्षणी काहितरी विचित्र घडणार आहे, असं मला वाटलं;
पहिले मला स्वयंपाकघरातुन, दूध जळण्याचा वास आला,
नंतर कान दणाणुन सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला;
मी धावत आत गेलो, माझं ह्रदय धडधडत होतं,
माझ्या डोळ्यांदेखत तिचं पातळ आगीवर फडफडत होतं;
मी तिला उचलून घेतलं, डोळे माझे झरत होते,
तिच्या करपलेल्या कायेवरून हात माझे फिरत होते;
मोठ्या कष्टानं तिने डोळे उघडले,
मला पाहुन तिच्या ओठांवर, हास्य मग विलसले;
ती म्हणाली मला "एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!"
"मरण्यापुर्वी मला, तुमच्यामध्ये सामावू द्या ना!"
मी कवटाळले तिला उराशी, अन देवाचे स्मरण करु लागलो,
ती वाचावी म्हणुन त्याची करुणा भाकू लागलो;
पण दूध उतू गेलं होतं, ओटा मात्र फेसाळला होता,
आम्हा दोघांचं अमर आलिंगन पाहुन, तिचा मृत्युही क्षणभर रेंगाळला होता....


Mrudgandha6
Saturday, September 09, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहलय सगळ्यांनी..

अस्मानी,मला miss केलेस खुप छान वाटले..

तुझ्यासाठी खास... माझ्या हिन्दी गझलेचा हा अनुवाद.. मराठीत कविताच.. कारण वृतात नाहीइ


घरटे मोडलय केव्हाच पण झाडाला माहितच नाही
इथे मी मरणासन्न आणि त्याला माहितच नाही

आयुष्याच्या काही वळणांवर समजून चुकले
काही स्वप्नांची इथे कधी सकाळ उगवतच नाही.

विरहाचे दु्ख रक्त बनून असे भिनलय नसानसात
विष जहाल यापेक्षा कुठले या जगातच नाही







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators