|
Kiru
| |
| Friday, September 01, 2006 - 9:51 am: |
| 
|
"सुखामागोमाग दु:ख यायलाच हवं का रे ?" "हं... स्वच्छ पौर्णिमेपाठोपाठ नाही का अमावास्या असते?" "पण पौर्णिमेचा चंद्र जेवढा सुखावतो तितकाच अमावास्येचा अंधार जीवघेणा वाटतो.." "थोडी चुकलीस... पौर्णिमेचा चंद्र सुखद असतोच पण.. अमावास्येच्या रात्री.. सहस्र तार्यांनी खळखळून भरलेलं आकाश पाहिलयस कधी? जीवघेण्या अंधाराचा आपोआप विसर पडतो. ... मी ही खूप प्रयत्न करतो... एक तारा होण्याचा.. कुणाच्यातरी अमावास्येच्या वेळेस त्याला अंधाराचा विसर पाडण्यासाठी..."
|
Asmaani
| |
| Friday, September 01, 2006 - 3:55 pm: |
| 
|
मस्त रे किरु! सही!
|
Niru_kul
| |
| Saturday, September 02, 2006 - 11:08 am: |
| 
|
फक्त तुझ्याच साठी.... माझी भावना, फक्त तुझ्याच साठी.... माझी प्रेरणा, फक्त तुझ्याच साठी.... प्रतिक्षा, फक्त तुझीच.... माझी प्रतिभा,फक्त तुझ्याच साठी.... मी वेडा, फक्त तुझ्याच साठी.... मी शहाणा, फक्त तुझ्याच साठी.... मी रुसतो, फक्त तुझ्यावरच गं.... माझा हा बहाणा, फक्त तुझ्याच साठी.... माझं विश्व, फक्त तुझ्याच साठी.... माझं स्वत्व, फक्त तुझ्याच साठी.... माझं ह्रदय, कधीच तुझं झालंय.... माझं मनही आता, फक्त तुझ्याच साठी.... माझी निर्मळता, फक्त तुझ्याच साठी.... माझी रसिकता, फक्त तुझ्याच साठी.... माझं दैवत, तुच तर आहेस.... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, फक्त तुझ्याच साठी.... माझा श्वास, फक्त तुझ्याच साठी.... मी मरतो, फक्त तुझ्यावरच गं.... माझा हळवेपणा, फक्त तुझ्याच साठी.... माझे शब्द, फक्त तुझ्याच साठी.... माझा अर्थ, फक्त तुझ्याच साठी.... माझी कविता, फक्त तुझ्याच साठी.... नाही आवडली ? फाडून टाकतो, फक्त तुझ्याच साठी....
|
Sameerdeo
| |
| Sunday, September 03, 2006 - 7:12 am: |
| 
|
माझी पहिली भेट मी असा कसा जसा तया नको तसा असा ते असे कसे जसे मला हवे तसे नव्हे तरिही रोज हासतो मित्र आम्ही भासतो आम्ही असे कसे?
|
Sameerdeo
| |
| Sunday, September 03, 2006 - 7:20 am: |
| 
|
Sare kavimitra, This is my first day with Maayboli, Give me your comments and join me to your group Thank You - SAMEER DEO
|
Shyamli
| |
| Monday, September 04, 2006 - 4:28 am: |
| 
|
देठ चैत्रपालवी किंवा श्रावणसरी नाहीच व्ह्यायचं मला शिशिरात होते ना पानझड पानझडीत गळणार पान आणि त्या पानाबरोबर गळून पडणार देठ तेवढंच व्ह्यायचय मला........ कारण जाता तरी येईल कमीत कमी त्याच पानाबरोबर मला.................... श्यामली
|
काय असते चैत्रपालवी अन काय असते पानझड भासांच्या हिन्दोळ्यावर नसते वास्तवाशी सांगड तुझ्या विरहात माझ्या श्रावणाला असतात तुझ्या बहरत्या पानझडीचे वेध श्रावणसरी पान होऊन गळुन पडतात जेंव्हा तु असतेस पानासोबतचा देठ धुंद रवी
|
वा !!! सहीच चाललंय इथे ...
|
ऊब ... कित्येक रात्री तळमळत काढल्यानंतर काल उठलो तिरीमिरीने ... अन शोधून काढली अडगळीत पडलेली लहानपणीची गोधडी . अगदीच दुर्दशा झाली होती , धागे उसवले होते अन दिसत होते सुरकुत्यांसारखे ... आता हिचा काय उपयोग म्हणून फेकून देणार इतक्यात जाणवलं गोधडी थंडीने कुडकुडत होती अन माजघरात कुणी स्त्री रडत होती ... आई असावी बहुतेक ...
|
समीर, फारच सुरेख. किती वेगळ्या शैलीत लिहिलं आहेस.
|
September 04, 2006 - 6:39 am: " परत कधी चुकुन सुध्दा 'माणुस ' म्हणु नकोस, अर्ज आहे समज विनंती आहे म्हण पण माणुस म्हणु नकोस." असं म्हणताच मी--- तो चक्क हसला. म्हणाला, "घाबरलास? का रे?" मी म्हटलं, "सगळ- सगळ होण सोप आहे इथे, पण माणुस? अ हं. अरे माणुस म्हटला की अंगात माणुसकी हवीच! ती कुठुन आणु? ती concept च out-dated झाल्ये हल्ली असलीच तर असते एखाद्याकडेच ती सुध्दा 'लिमिटेड माणुसकी'. नाही तर मग नाहीच मग उपयोग काय माणुस असण्याचा?" तो म्हणाला, "अरे कोणी सांगितलं तुला हे? जरा समोर बघ, डोळे उघडे ठेऊन बघ. आपल्या अंगावरच्या फाटक्या लक्तरात जखमींना लपेटणार्यांकडे काय होत दुसरं? माणुसकीच ना? पावसात अडकलेल्यांना बिस्किटं देणार्यांचा काय धर्म होता? माणुसकी हाच ना? खड्यात अडकलेल्या कोण कुठच्या प्रिंन्ससाठी प्रार्थना करणारे काय जपत होते माणुसकीच ना?" मी म्हटले, "पण.. पण आरे...पण" तो म्हणाला, "पण पण काय करतोस? जरा स्वत: वरती विश्वास ठेवुन बघ. समोरच्यावरही विश्वास ठेवायला शिक. बहरलेल्या बागेत थोडं तणं असणार म्हणुन काही बागेच सौदर्य कमी होत नाही साक्षात देवांनाही शाप आहेत माणसाच काय सांगतोस! स्वत: पासुन सुरवात कर्---- तू साद घालुन तर बघ, दशदिशांतुन येईल प्रतिसाद. अनुभुती घेऊन बघ." मग पतर कधी चुकुन सुध्दा असं म्हणणार नाहीस, कारण माणुस म्हणवुन घेण्यातच गौरव वाटेल तुला" मनिषा
|
Sameerdeo
| |
| Monday, September 04, 2006 - 8:28 am: |
| 
|
मनविहंग झेपावत उत्तरेस उडताना सागरापल्याड दिसे सुर्यबिंब बुडताना का कशी कुठून तिथे कविता ती येते अन तम जाळित आकाशी शुक्र दिसे चढ ताना
|
Devdattag
| |
| Tuesday, September 05, 2006 - 2:07 am: |
| 
|
ती पहा अहाहा रक्तिम पश्चिमा झाली का सांग धरा की लज्जेत चूर ही न्हाली नववधू उभी का त्या दाराशी सजलेल्या ती आतूर नजर अन त्या अनामिका जुळलेल्या पहा खेळ मनोहर करी पदर अन अधरांचा नाव घेई प्रियाचे मग हलके गुणगुणतांना ते पुन्हा बटांचे त्या गालावर ओघळणे तो पाय मुडपूनी धरेस जरा उलगडणे ती रम्य चारुता पण मनी वाटते हुरहुर रे कुणा शंकांचे सांग उठले असेल काहूर ये घरी लवकरी मी थोपवू कसा आवेग रे बरसून जातील ह्या नयनांचे दो मेघ -देवदत्त
|
Shyamli
| |
| Tuesday, September 05, 2006 - 3:21 am: |
| 
|
रवि..... हम्म..... छान लिहीताय ललीतपण छान आहे तुमचे समीर, अरे हे झुळकेत टाकायचस ना...मस्तय मनीषा...... छान गुरुजी रडवलत तुम्ही, अचुक शब्द कसे सापडतात रे तुला? देवा, येऊ दे अजुन, छान सुर पकडलायस
|
Sameerdeo
| |
| Tuesday, September 05, 2006 - 6:45 am: |
| 
|
वा वा किरु, निरु, शामली, धुंद रवी, वैभव, मनिषा, आणि देवदत्त फारच छान आता तुमच्यासाठी एकोळी माझी खात्री तुझी मैत्री
|
वा!!!! सगळेच अप्रतिम किरु, काय सुंदर तू खरच तार्यासारखा झगमगशील.. समीर, अप्रतिम!!!! श्यामली, नितांत सुंदर वैभव, नेहमीप्रमाणेच हुरहुर लावणारी रवी..खरच सुरेख देवदत्तजी, अगदी मस्त.. मनीषा, कविता दिसली नाही ग..फ़क्त चौकोन दिसले..पण छानच असेल..
|
निरु, तुझीही कविता दिसली नाही..
|
मृदगंघा sty वर जा तिथे माझी ही कविता आहे
|
Devdattag
| |
| Tuesday, September 05, 2006 - 9:20 am: |
| 
|
श्यामलि देठ मस्त आहे गं.. मनिषा.. छान रवी.. सुंदर आहे वैभव.. .. .. समीर चारोळी मस्त आहे.. खरंतर काल घरी जायला निघतांना तुमची चारोळी वाचली आणि जाता जाता ही वर लिहिलेली कविता सुचलि.. कशी ते माहित नाही..
|
देवा.. अलवार शेवट आवडला..!!! समिर लिहिलि फ़ार सुन्दर आहे..!!! धुन्द रवी.. आणि.. श्यामली best .... मनिषा.. छाने..एकदम.. गुरुजी आजकाल.. हळवे झालेत फ़ार..!!
|
|
|