मीनू रवी वैभव अंकुश... छान...आज कितितरी दिवसान्नी इथे भेट दिली, खूप छान वाटल
|
Asmaani, Seemadhav, Manisha, Devdatta, Mrudgandha, Daad ani Vaibhavjee dhanyawad mitrano.. tumchya kaautukane hurup wadhla.. Mi evdhya diggaj kavinchya platformwar mazi kavita thevtana bichkat hoto.. Vaibhavjee tumcha salla SirAakhonpar.. sagaLejan itake sundar lihit ahet.. ki KavyadiwaaLich ahese waaTatay.. Thank you very much
|
Princess
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:52 am: |
| 
|
तुला जे कळत ते सारं मला कळते रे, पर पैशाचे शहाणपण लै न्यारं असत... दहा ठिकाणी उसवलेली आणि वीस ठिकाणी झिजलेली चप्पल घालाया मला बी नाही आवडत बा... पर रस्त्यावरच्या अनवाणी पायापरीस झिजलेल्या चपलेतला पाय बरा... हे माझे गरीबीतले शहाणपण... तुझं म्हणण खर आहे बाबा, रुपयातले चार आणे बाजुला टाकावे अन दोन रुपयातले आठ आणे वाचवावे तुझा हिशोब बरोबर आहे, पण खिशातला रुपया तीन दिसापासुन खिशातच आहे कारण, वडापाव बी आता दोन रुपयाला मिळतो सांग आता त्या रुपयाचे मी काय करू चार आणे बाजुला काढु की आठ आणे? की खिशातच ठेवुन खिसा गरम आहे म्हणुन गावु गाणे? माझ्या दोस्ता विमा म्या बी उतरवला असता जिवाचा पर दुसर्याच दिशी जीव गेला तर, मौतीच्या सामानाचे पैसे बी अडकवुन गेला म्हणुन पोरांनी मुन्सिपाल्टीच्या दवाखान्यात जमा केला असता... लाल पिवळ्या पांढर्या रेशन कार्डाच्या या देशात आता माणसांना पण रंगवुन टाका, अन, त्यांच्या लाल पिवळ्या पाठीवरती बचतीचे संदेश छापा प्रिन्सेस
|
Me_anand
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:16 am: |
| 
|
एक छोटासा प्रयत्न..... स्वर्ग!!! दूर एक तो स्वर्ग धुक्याचा दारावरती हिरवी नक्षी स्वागत करतो खुल्या दिलाने उधळीत मोती ओला पक्षी वाट वाकडी अल्लड अवख्ळ रत्नफुलांचा तीवर अंथर साथ द्यावया ओला वारा मनात ओली हळ्वी थरथर स्वर्गद्वारी उभी कधिची गोड अप्सरा माझ्या मनिची पाहून तिजला हरखून गेलो वाट विसरलो अन परतीची सोडून आलो घरटे माझे तोडून पाश मोह-मनाचे आता इथेच वस्ती अपुली नकोच दुखणे परताव्याचे
|
Me_anand
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:17 am: |
| 
|
मित्रन्नो हे कोणालाही उद्देशून नाही बर का ..... दूर् दूर् ढगामागे कोणीतरी दडून बसलाय कळसूत्री दोऱ्या सगळ्या आपल्या हाती धरून बसलाय मन मानेल तस सगळ्यान्ना तो नाचवतोय 'माझ माझ' म्हणून आपण आपली खाजवतोय
|
धन्यवाद आस्मानी तुझ्य सारख़्या मित्रांच्या केवळ एक शब्दाने सुद्धा पुढचे हजार शब्द लिहायला स्फ़ुर्ती येते… तुझ्या सुचनेवरुन इथे कवितंमध्ये हे लिखाण पोस्ट करतोय... धुंद रवी
|

|
Krishnag
| |
| Wednesday, August 30, 2006 - 2:37 am: |
| 
|
'गुज' गुज काय ते ऐकायला भेटायलाच हवे... अगदी जवळ बसायला हवे..... कानाशी ओठ आणायला हवे.. कानात हळूच सांगायला हवे.... मग ओठांनी ओठांशी बोलायला हवे... न बोलता सारे समजायला हवे... न ऐकता सारे अनुभवयाला हवे...... श्वास श्वासात मिळूनी जायला हवे... स्पर्श सांगतो खुप काही ऐकायला हवे.... धुंद होउनी धुंदीत बुडायला हवे.... द्वैत विसरूनी तादात्म्य पावायला हवे... दोन जीवांनी एकजीव व्हायला हवे.. दूर शरीरे मन एक व्हायला हवे... जणू गंध हवेत विरतो तसे व्हायला हवे..
|
चित्र दुःखांचे काही राखी काळे रंग अन सुखांचे काही सोनेरी रंग घेवून मी रेखाटले आहे एक चित्र आयुष्याच्या कोर्या कागदावर का कुणास ठाऊक पण, ते खुप सुंदर दिसतय..
|
छान...सगळ्यांनीच छान लिहलय.. रवी, तुम्ही हे जे सुंदर लिखाण करत आहात ते इथल्यापेक्षा "ललित" या सदरात जास्त शोभुन दिसेल.. खुप सुन्दर लिहताय
|
Asmaani
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:10 pm: |
| 
|
मृद्गंधा, मलाही आधी रवी च्या लिखाणाबद्द्ल असं(म्हणजे हे लिखाण "ललित" मधे असावं असं) वाटलं होतं. पण नाही ग! ते काव्यच आहे.
|
Asmaani
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:19 pm: |
| 
|
मुखवट्यांच्या दुनियेत, प्रत्येकाच्या हातात खंजीर असतो आपली पाठ वळण्याचीच वाट पाहतात मुखवटे मुखवट्यांच्या दुनियेत जिव्हाळ्याच्या शब्दाला अर्थ नसतो स्वार्थाचीच फक्त भाषा जाणतात मुखवटे मुखवट्यांच्या दुनियेत प्रत्येकाला छुपे दात असतात असत्याचं जहर सहज पसरवतात मुखवटे मुखवट्यांच्या दुनियेत विश्वासघात हाच धर्म असतो किळसवाणे चेहरे लपवत हसत राहतात मुखवटे.
|
काही कणिका.... वेचली फुले मी प्राजक्ताची कवळी रे अशा क्षणीच तू हवाहवासा जवळी बघ सुगंधातली पहाट माझी तुझी ह्या मुग्ध क्षणी मी उभी तुझ्या दाराशी. मी तुझीच होते, तुझीच आहे... अजूनही हा हलतो, डुलतो, झुलतो वारा... अजूनही का निसटून गेले ओंजळीतले तारे मी हळवे होऊन पुसते तुजला... अजूनही. ही वळणावरची वाट कुणाची सांग की फेडायाचे मजला कुठले पांग तू अवचित झाला शिंपला, मी मोती अन कसे घेतले वेढूनि मजला भवती.
|
वा.. क्या बत है प्रिन्सेस.. मस्त..!!! मृदगन्धा आवडली ग.. छान आहे!!!
|
पाउस...... पाउस कोसळतो दारी दुखा:ची झुळुक हळुच डोकावते खारी.., वादळी सरीत दाही दिशा कोसळतात. अशी जगबुडी.. अर्थहीन करते मनाचे गाव सलायलाही रहात नाही विखुरलेले एखादे नाव.. सारे सुर्य बुडुन.. उजेडाचे संदर्भ सोडुन दिवस काळवंडतो.. ओली शांतता झिरपत जाते.. नजरेतुन ठिबकत जाते.. श्वास होतो ओला ओला... आलेल्या क्षणाला जागलेला.. मी ही बध्द होते आर्ततेला बिलगुन.., पावसाने खचलेल्या... माझ्या जमिनीकडे दुर्लक्ष करत वादळ ओंजळीत साठवुन कोसळणार्या आभाळाला आव्हान देत उभी राहते..!!!
|
लोपामुद्रा,.. किती दिवसांनी..पण केवढे खास पुनरागमन केले आहेस.. किती सुंदर कविता लिहीली आहेस....केवळ अप्रतिम!!!! कुठल्या एका ओळीचा उल्लेख करावा... प्रत्येक ओळीनंतर कविता आणखीच हुरहुर लावत जातेय... अगदी एकापेक्षा एक वरचढ... मला जर अवडलेल्या ओळी लिहायच्या म्हंणल्या तर सगळी कविता पुन्हा पुन्हा लिहावी लागेल... शेवट कळस आहे... सुमतीतई, अतिशय सुंदर अस्मानी, मुखवटे खासच.. krishna , दूर शरीरे मन एक व्हायला हवे... जणू गंध हवेत विरतो तसे व्हायला हवे.. क्या बात है!!!
|
Meenu
| |
| Friday, September 01, 2006 - 1:09 am: |
| 
|
झिंग घेतले ईतुके मित्रा सांगते अनुभव कडु मज आता कडवटपणाची सवय व्हाया लागली सवय कसली, चव तीच मजला आवडाया लागली एवढ्यावरी थांबले ना सत्र ऐसे हे कडु कटुता ती वागण्यातुन उतरु लागली झिंग त्या कडवटपणाची मज चढाया लागली झिंग त्या कडवटपणाची मज चढाया लागली
|
अस्मानी, धुंद_रवी, मृदगंधा छानच लोपा छान आहे ग पुनरागमन... 
|
Princess
| |
| Friday, September 01, 2006 - 8:43 am: |
| 
|
लोपा धडाकेदार पुनरागमन... पण तुला एक विचारु का? ही कविता लिहिताना तू कोणाचा विचार केलाय? म्हणजे तू पुरग्रस्तांची व्यथा मांडतेय का? मी हे प्रश्न अगदी सहज विचारतेय. मला कविता खुप आवडली नेहमीप्रमाणेच. पण यावेळी मला तुझी भुमिका स्पष्टपणे नाही कळली. तू समजावुन सांगशीलच अशी आशा आहे. प्रिन्सेस
|
Princess
| |
| Friday, September 01, 2006 - 8:44 am: |
| 
|
मीनु झिंग खुप आवडली. अनुभवलीय ना... म्हणुन लवकर कळली.
|