Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 31, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » ललित » टिकाऊ चप्पल » Archive through August 31, 2006 « Previous Next »

Badbadi
Monday, August 28, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'टिकाऊ चप्पल' हा माझ्यासाठी तूफान विनोदी शद्ब आहे.. अहो खरंच.. जगतली कुठलीहि चप्पल ही टिकाऊ नसते यावर मझा अगदि गाढ विश्वास आहे. :-) आणि हा अंध विश्वास नसून तुम्ही म्हणाल तर मी पुराव्यानिशी ते सिद्ध करू शकते. नंतर तुमचाहि 'टिकाऊ' तल्या फोलपणावर विश्वास बसेल.

अगदी लहानपणि जर मला कोणी विचरलं असतं कि "चप्पल म्हणजे काय?" तर मी अगदी बिनधोक उत्तर दिले असते "जी १-२ महिन्याने तुटते आणि परत शिवून काही फार उपयोग होत नाहे ती म्हणजे चप्पल " :-) यात अतिशयोक्ती
वगैरे खरंच नाही... एखादी चप्पल घ्यावी आणि मला ती ६-८ महिने न तूटता टिकावी असं कधीच झालेलं नाही. आई तर वैतागून म्हणत असे "हिच्या पायात कात्र्या आहेत". पण रोज मरे त्याला कोण रडे, त्यामुळे हळूहळू आई च्या हि हे अंगवळणी पडलं. बरं, मी चालण्यात बदल करून बघितला.. म्हणजे हळू चालून झालं, पावले सावकाश टाकून झाली... पण काहि फरक नाही. चप्पल ५० रुपयची घ्या अथवा ५०० ची....माझ्या पायात आल्यवर तिचं भविष्य हे ठरलेलंच :-) त्यामुळेच पुण्यातल्या कुठल्या दुकानात काय
range मध्ये चप्पल मिळतील आणि त्या कमीत कमी किती दिवस टिकतील हे मी बर्‍यापैकि अचूक सांगू शकेन.
शाळेत असताना तर मी आई ला काहिहि करण देत असे. सायकल चालवते म्हणून किंवा शाळेत उशिर झाल्यवर पळत
पळत वर्ग गाठला म्हणून ई. मला एकूणच दर २ महिन्याने असले एखादे कारण तयार ठेवावे लागायचे. एरवीचे जाउदे एक वेळ, पण निदान पावसाळी चप्पल तरी पूर्ण पावसाळाभर टिकावी!!! पन छे!!! बाहेर धो धो पाऊस असावा आणि माझी चप्पल तूटावी हे अगदी ठरलेलं. काहिजण म्हणे पावसाळी चप्पल २-३ सीझन वापरतात... धन्य हो तयांची!!!

लहानपणी दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये चप्पल खरेदि अगदि ठरलेली... मग आधीची चप्पल अगदी १ महिन्या पूर्वी का घेतली असेना... तेव्हाचे ठीक आहे. पण अजूनहि कुठे गावी जायचं, जवळच्या मित्र-मैत्रीणीचं लग्न म्हणलं कि चप्पल खरेदि अटळ असते. या सगळ्या प्रकरामुळे मी कधी एकदम fashionable etc. चप्पल च्या भानगडीत च पडले नाही. न जाणो अगदी पहिल्याच दिवशी तुटून माझी वेगळीच fashion व्हायची :-) मी स्वत: नोकरी करायला लागल्यावर जरा international brand कडे वगैरे वळले... brand च्या नावाखाली अवाजवी किंमत देऊन एक चप्पल घेतली... म्हणलं ही तरी चांगली टिकू दे. पण आले देवाजीच्या मना त्यापुढे काहि चालेना. हि चप्पल इतरांपेक्षा फ़ार तर पंधरा एक दिवस जास्त टिकली असेल. आता हि branded घेण्याचा फायदा एकच ते म्हणजे हे लोक service free देतात. पण माझ्यासारखे अजून ४-५ गिर्‍हाईक मिळाले तर free service देणे ते नक्कि बंद करतील :-) माझ्या मुळे त्यांचा स्वत:च्या quality products बद्दल चा विश्वास नक्कि डळमळीत झाला असणार. एखादी unbreakable वस्तू एकदाच आपटून break व्हावी तसंच काहिसं या branded चप्पलांच्या बाबतीत घडलं. मग म्हणलं जाऊदे... निदान दर वेळी साधारण किंमतीची नवीन चप्पल तरी वापरावी.

मला कुठल्याहि नवीन गावी जावं आणि lodge च्या आधी चांभार शोधावा लागतो. मी फिरलेल्या जवळ जवळ सगळ्या गावतल्या चांभारांची दुकाने मला माहित आहेत. अगदी अलिबाग ते दिल्ली सगळीकडे चांभार शोधणे हा कार्यक्रम काहिशा फरकाने ठरलेलाच!!! त्यामुळे एखाद्याने अमूक अमूक गाव कसं आहे तर मी कधी कधी पटकन सांगते "छान च आहे. सगळ्या रस्त्यांवर चांभार असतात!!!" हिंजवडी मध्ये आल्यावर पण 'तमन्ना' (तमन्ना हे या भागामधलं एकमेव restaurant आहे) च्या आधी मी चांभार गाठला होता :-)

काहि पुर्वानुभवावरून तर हल्ली मी प्रवसात नवीन च चप्पल घेऊन जाते.. म्हणजे निदान लगेच तूटण्याची तरी भिती नसते :-) चप्पल तूटल्यावर चालण हि देखील एक कला आहे. चप्पल तूटली आहे हे न दाखवता चालण्यासाठी तर पाहिजेत जातीचे. अंगठा तूतला तर पायावर जोर देऊन चालवं लागत. इतकं कि अगदि पोटरी मध्ये गोळा येईल... चप्पल ची मधली पट्टी निघाली तर मात्र खरच कसरत असते. यावेळी पाय ओढत चालण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी लोक आपल्याकडे असे काहि विचित्र बघतात.. त्यांना बहुतेक वाटते कि
आपल्या पायालाच काहि दुखापत झाली आहे. कधी कधी चप्पल अचानक मगरी प्रमाणे आपला जबडा
उघडते... किती अवघड प्रसंग... एकतर आधीच तूटलेली चप्पल... नीट चाललं नाही तर अजून तूटू शकते. पण आता मला या सगळ्यावर काहिना काहि उपाय सापडतोच.. म्हणतात ना 'गरज ही शोधाची जननी आहे'. चप्पल कशी तूटली तर वेळप्रसंगी stapler , सेलो टेप, डिंक ए. गोष्टिंनी ती तात्पुरती कशी दुरूस्त करता येते हे आता बर्‍यापैकि जमायला लागलय. इतके वर्ष नित्यनेमाने चांभारला भेट दिल्यावर हे इतकं जमायल हवंच ना!!!

परवाच मला कोणीतरी सांगत होतं कि तिच्याकडे म्हणे एकावेळी ७-८ प्रकरच्या आणि रंगाच्या चपला
असतात. हे असं काहि म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत जगणंच आहे. असा shoe rack सजवायला त्या चपला
टिकल्या तर पाहिजेत न!!! माझ्या मते तर कुठलीहि चप्पल टिकाऊ नसून २ महिन्याने टाकाऊ च असते :-)

लग्नात मुली काहितरी ५-६ साड्या घेतात ना... मी तर विचार करतेय त्या सगळ्यावर १-१ चप्पल हवीच.. ऐनवेळी कुठे धावाधाव करायची!!! आणि होणार्या नवर्‍याला पण सांगून ठेवणार आहे कि दागिने, कपडे हे सगळं राहू दे..पण तेव्हढं per quarter १ चप्पल घेत जा मला :-)

सगळे चांभार हे मला एखाद्या देवाप्रमाणे वाटतात.. चप्पल तुटल्याने होणारी अब्रूची फरपट थांबवणे हे
महाभाग च जाणोत. बारा बलुतेदारांमध्ये चांभाराला स्थान देणार्या विद्वानाला माझा कोटीकोटी प्रणाम!!


Limbutimbu
Monday, August 28, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी परफेक्ट!
सेम हिअर! :-)
छान लिहिल हेस!


Proffspider
Monday, August 28, 2006 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी आगदी परफेक्ट लिहिला आहेस....... :-)

Abhiyadav
Monday, August 28, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे लय भारी. देव करो आणि तुझी नवी चप्पल लवकर न तुटो. देव म्हंजे खरा देव.

Mrinmayee
Monday, August 28, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडे, मस्तच लिहीलय! तसा आजपर्यंतचा चप्पल टिकण्याचा रेकॉर्ड किती दिवसांचा?:-)

Raina
Monday, August 28, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त. अगदी खरयं. चपला मेल्या नको तेव्हा तुटतात नेहमी..

Dineshvs
Monday, August 28, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिले आहेस बडबडी. माझ्या या बाबतीत उलटा रेकॉर्ड आहे. माझ्या चपलेचा तळवा सुद्धा कधी झिजत नाही.

Kedarjoshi
Monday, August 28, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्नात मुली काहितरी ५-६ साड्या घेतात ना... मी तर विचार करतेय त्या सगळ्यावर १-१ चप्पल हवीच.. LOL

बडे, सही लिहिले आहेस.

Rachana_barve
Monday, August 28, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ofcourse shoes चे 6-7 तरी जोड हवेतच :-O office मधे वेगळे, dresses वर वेगळे, eveningwear ला वेगळे, casual वेगळे, formal वेगळे, साडीवर वेगळे, पंजाबीवर वेगळे वगैरे वगैरे :-O नाही का?
मस्त लिहिल आहेस. तु US मधे आलीस तर तुझ कस होणार :-)? चप्पल तुटली की नविन स्वस्त मिळते शिवून मिळण्यापेक्षा. माझी आई मला सांगते तस हार कर आता त्या चपलांचा :-O तस काहीतरी कराव लागणार
~D

Swapna_nadkarni
Monday, August 28, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे पण असेच किस्से आहेत चपलांचे.. आई एकदम वैतागायची माझ्यावर आणि त्या चपलांवर

Badbadi
Monday, August 28, 2006 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, gr8 आहात. आता भेटलात कि अजून १ कारण मिळालं तुम्हाला साष्टांग घालण्यासाठी :-)
र, अगं US मध्ये होते कि.. पण त्यावेळी फ़क्त formal/ sports shooes वापरत होते... ते टिकतात.. वाकडं फक्त चप्पल शी आहे
मयी, अगं record कुठे ठेवू.. २-३ महिने ही काय record ठेवायची गोष्ट आहे का :-)


Meenu
Tuesday, August 29, 2006 - 12:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे अगं माझी चप्पल पण कंटाळा येईपर्यंत टिकते गं .. काही तुटत बिटत नाही .. चांभारा कडे गेल्याचं तर मला आठवावच लागेल कारण चप्पल वापरुन कंटाळा आला म्हणुन टाकुन द्यावी लागते मला ..

Raina
Tuesday, August 29, 2006 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू आणि दिनेश... तुमचे पाय कुठे आहेत. डोकं ठेवीन म्हणते...
चपलेचा तळवा झिजत नाही आणि चप्पल कंटाळा येईपर्यंत चालते???
माझी खेटरं तर देशातील खड्डायुक्त रस्त्यांवरच काय पण ईथे ही तुटतात.. बडबडे- तुझे shoes तरी टिकतात.. माझे तर जोडेही झिजतात.


Limbutimbu
Tuesday, August 29, 2006 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघा बघा, याच गोष्टीवरुन सिद्ध होत की नाही?
की व्यक्ती व्यक्ती नुसार जोडे टिकण्याच प्रमाण बदलत?
अर्थात, बदलणारच! अन जर ते बदलत तर त्या त्या व्यक्तीचे जोडे किती झिजलेत हे पाहुन त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे विशेष का नाही सान्गता येणार? यायलाच पाहीजेत!
म्हणुन तर म्हणतो ना मी, जोड्यान्चे झिजलेले तळवे बघुन व्यक्ती कशी हे ते सान्गता यील! :-) त्या त्या व्यक्तीच भविष्य ही सान्गता येइल!
जोक नाय मारीत! इट्स अ फॅक्ट!
अन असे जोडे झिजवणारी केवळ चाल पाहुनही व्यक्तीबद्दल सान्गता येत! पण त्याला लईच चाली बघायला हव्यात!


Deepanjali
Tuesday, August 29, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो .. प्रत्येक dress वर matching असा atleast एक जोड हवाच चपलेचा :-)
आणि सगळ्या प्रकारच्या हव्यात
कुठेही apartment घेताना आम्ही आधी shoes कसे accomodate होतील ते पहातो !
प्रवासात पण मी जितके dresses तितके जोड नेतेच मग अगदी दिवसाची trip असली तरीही !
देशात जाताना आणि येताना चपलांच्या जोड्यांचे विक्रमी जोड मी ने आण करते .
भारतातून परत येताना तर इतक्या चप्पल होतात कि इच्छा नसताना देखील काही जोड ठेवून जावेच लागतात !
आणि इतके जोड असतात कि ते distribute करण्या साठी जवळच्या सगळ्या नातेवाईकं कडे थोडे थोडे ठेवून जावेच लागतात !
सगळ्या प्रकारच्या चपलांची सुखरूप ने आण करण्या साठी आणि मी sari bags वापरते .
आणि नाजुक चप्पल clean करण्यासाठी म्हणून Makeup removal cleansing wipes मिळतात त्या झकास काम करतात .


Manuswini
Tuesday, August 29, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे
interesting
तुझ्या पायाची काही वेगळी चढण घडण आहे का? just kidding :-)

हो वेगळे वेगळे matching तर हवेतच पण.
माझा वेगळाच problem आहे पण कुठलीही चप्पल, shoes,sneakers, slip-ons, sandals असो, ते पायाला बाधतातच.
कितीही घालुन जुनी असो, वा कितीही वेळा आधी घातलेली असो पण ते मोठे मोठे फोड करंगळीला, मागच्या घोट्याला, पायाला side ला येतातच.
अगदी घालुन फारशी चालली नाही तरी. इथे म्हणा कुठे चालावे लागते US ला

आई तर नेहमी म्हणते तुझे पाय बाधरे आहेत. माझ्या friend चा हा चेष्टेचा विषय आहे झेपत नाही तर Style कशाला मारायची कारण ते फोड आले की मला दोन मिनीटे धड चालता येत नाही


Storvi
Tuesday, August 29, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>जोड्यान्चे झिजलेले तळवे बघुन व्यक्ती कशी हे ते सान्गता यील>> म्हणजे अगदी नवे कोरे न झिजलेले तळवे दिसले की समजावं ही व्यक्ती चपला टिकवू शकत नाही. अशी व्यक्ती on edge असण्याचा संभव जास्ती so जरा लांबच रहावे :-O

Kmayuresh2002
Wednesday, August 30, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे,चप्पल बनविणर्‍यांनी आधी तुला testing ला देऊन त्यात pass झालेली चप्पल बाजारात आणली तर ती नक्की टिकाऊ चप्पल असेल

छान लिहीले आहेस पण:-)


Krishnag
Thursday, August 31, 2006 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडी, झकासच लिहलयेस!!.. .. ..

Devdattag
Thursday, August 31, 2006 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे.. सहिच..:-)
दिनेशजी आणि मीनु खरंतर तुम्ही 'टाकाऊ चप्पल' या शिर्षकाचा लेख लिहू शकता..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators