Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 29, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » काव्यधारा » कविता » Archive through August 29, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, August 28, 2006 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुरखा

मी कोण कसा आहे ते सार्‍यांस विचारुन आलो
चेहर्‍यावर घेउन बुरखा, बुरख्यांशी बोलुन आलो

तो गाव मुरब्बी होता, ती वेस कोरडी होती
मी दुःख कशाला असल्या वेशीवर टांगुन आलो

भेटाया जातानाही ओठांवर हासू होते
येताना लोभसवाणा तो नकार घेउन आलो

इतक्यात मळभ आले अन वर्षाव सुरू ठिणग्यांचा?
अद्याप कुठे मेघांना मी अश्रू देउन आलो?

श्वासांनी सांगितले की ती श्वास होवुनी आली
मृत्यूच्या निमंत्रणावर मी माती लोटुन आलो




Smi_dod
Monday, August 28, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स मृदगंधा..... वैभव मला कविता वाचता येत नाहीये सगळे चौकोन दिसताहेत

Kmayuresh2002
Monday, August 28, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्वासांनी सांगितले की ती श्वास होवुनी आली
मृत्यूच्या निमंत्रणावर मी माती लोटुन आलो .... वा उस्ताद वा... सहीच रे वैभवा... मस्त वाटले वाचुन:-)

Mrudgandha6
Monday, August 28, 2006 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव,
मस्तच.
"मी कोण कसा आहे ते सार् यांस विचारुन आलो
चेहर् यावर घेउन बुरखा, बुरख्यांशी बोलुन आलो "

क्या बात है!!! वाह वाह!"
तुझे वैभव नाव कुणी ठेवलेरे?..खरेच शब्दांच्या बाबतित सार्थ करत आहेस..

smi,
please,check ur unicode..



Harshu007
Monday, August 28, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय
रंगरंगात माझ्या रंगुन जा तु
अंग अंगात माझ्या मिसळुन जा तु
होऊन पाऊस, माझ्या मनाचा
या तप्त भुमिवर बरसून जा तु
मृदगंध या मनाला देऊन जा तु
होऊन वसंत या मनाची
बाग फ़ुलवुन जा तु
सुगंध या कळीला देऊन जा तु
होऊन श्वास माझा
अणूरेणुत माझ्या मिसळुन जा तु
स्पर्श तुझ्या प्रेमाचा
माझ्या आत्म्याला देऊन जा तु
स्पर्शून माझ्या आत्म्याला
ओळख जन्मांतरीची देऊन जा तु

प्राची


Niru_kul
Monday, August 28, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाखंरु......

भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं;
आपल्या एकाकीपणावर, मनातल्या मनात कुढत होतं;
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

एकटं होतं ते बिचारं, कोणाचीच साथ नव्हती;
डोळ्यात मात्र त्याच्या, एक वेगळीच आस होती;
खडतर परिस्थीतीशी, ते प्राणपणानं लढत होतं,
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

इतर पक्षी त्याला, तुच्छ लेखायचे;
पाखंरु जवळ येऊ लागताच, त्याला दूर रेटायचे;
त्यांच्या अशा वागण्यानं, ते स्वभावानं बुजरं घडत होतं;
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

एके दिवशी त्याच्या आयुष्यात, ती अवतीर्ण झाली,
त्याची निःशब्दता, अचानक दूर झाली;
तिच्याशिवाय त्याचं मन, इतर कुठंही जडत नव्हतं,
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

त्यांच्या दोघांचं आता, छान मेतकुट जमलं होतं,
आपलं घरटं त्यांनी, पळसाच्या झाडावर बांधलं होतं;
वसंतच्या आगमनाबरोबरच, त्यांचं आयुष्यही फुलत होतं,
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.

पण दैवाने पुन्हा एकदा, त्याचा घात केला,
पारध्याच्या रुपाने आलेल्या यमाने, त्याच्या पक्षिणीचा पात केला;
त्याच्या डोळ्यादेखत तिचं कलेवर, झाडावरुन पडत होतं,
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं,
आपल्या एकाकीपणावर, मनातल्या मनात कुढत होतं;
भर मध्यान्ही आकाशात, एक पाखंरु उडत होतं.......

Manishalimaye
Monday, August 28, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरुकुल ही कविता तुमची असेल तर फारच छान
पण खरच सांगते ही यापुर्वी कुठेतरी मी नक्की वाचलेली आहे तुम्ही ती कुठे प्रसिध्द केली होती का?


Mrudgandha6
Monday, August 28, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्राची..मस्तच गं
निरज..खरच कारूण्यापुर्ण कविता आहे.

ही माझी एक..

त्याच्या जखमा बघताना
मी हळहळले होते
तेव्हा तो मात्र मुग्ध हसला
त्याच्याही नकळत..
बघता बघता
त्याने डोळ्यांतला वळीव
माझ्याही डोळ्यांत उतराला




Niru_kul
Monday, August 28, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा...
ही कविता मी या आधी प्रसिद्ध केलेली आहे....


Vidyasawant
Monday, August 28, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेव्हा मन विचरात गढतं
स्वत्:ला हरवून बसत
शोधता शोधता जातो वेळ
पण कशाला कशाचा
लागतच नाही मेळ
स्वत्:ला हरवुन काय शोधत.. तर
त्याच त्या नको असलेल्या
जुन्या आठवणी....

त्यान काय होत
मन अधिकच हेलकावे खात
कुठतरी आसरा शोधत रहात
.. नाहीतर कुठतरी कुढत जाउन बसतं
....जेव्हा मन विचारात गढतं.

विद्या.


Niru_kul
Monday, August 28, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंधार.......

" चल, निघायचं का ? "
" का? बसू ना अजुन थोडा वेळ इथंच !"
" का गं? आज भलतीच मूड मध्ये दिसतेस "
" काही नाही रे! तुझ्या बरोबर असले ना की असंच होतं "
" का ? मझा सहवास एवढा आवडतो? "
" प्रत्येक गोष्ट बोलुनच दाखवली पाहीजे का ? "
" चल, निघुया आता, खुप अंधार पडला असेल एव्हाना !! "
" त्यात नविन काय? आपल्यासाठी सदासर्वकाळ फक्त अंधारच अंधारच आहे ना! "

एक आंधळं जोडपं संध्याकाळी समुद्रकिनार्‍यावर बसलं होतं........

Ankushsjoshi
Monday, August 28, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विघ्नहर्ता गजानना चे आगमन झाले.त्या निमीत्त एक कविता.
कुठे टाकु कळल नाही म्हनुन इथे टाकतोय.
चांगल शीर्षक सुचवा
pls visit
www.kaantasudha.blogspot.com


बाप्पाची चिंता

काय यंदा येणार ना ?
मी सहज प्रश्न्न विचारला बाप्पांना !

काय करु येउन यंदा ?
तुम्हा माणसांचा तोच नेहमीचा धंदा !

चो-या मारामारी,तुमची शिंची भांडणे !
खलबत्ता तोच आणि नविन,नविन कांडणे !

काय ते तुमचे झगडे,काय ते तुमचे गोंधळ !
वागताहेत सगळे जणु जसे आहात वांडर !

अरे ! दिली तुम्हा बुद्धी,दिली सुबत्ता !
पण नाही ! तुम्ही पसरवीली संपुर्ण अराजकतेची सत्ता !

वीट आलाय ह्या सगळ्याचा यंदा !
नाही येणार जा यंदा !

मी म्हणालो, बाप्पा यंदा आमच्या दु:खानाही सीमा नाही !
तुम्ही जर आता पाठ फ़िरवीली तर आमचे काही खरे नाही !

पुर,स्फोट ह्यातुन आम्ही सावरलो !
काही झालेच नाही असे वावरलो !

अश्रु आमचे ठेवले दडवुन डोळ्याच्या कोप-यात !
कारण तुम्ही लवकरच येणार होतात !

बाप्पा सगळे तुमची वाट पाहत आहेत !
आलेल्या दु:खांना म्हणुनच साहत आहेत !

बाप्पा आता नाही सहन होत ! तुम्ही यायलाच हव !
तुमच्या आगमनाने होउ द्या सुरु पर्व नवं !

बाप्पांच्या डोळ्यात अश्रु थरारले !
माझ्या मस्तकावर हात ठेवत म्हणाले,
" सदग्रुहस्था घाबरु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !
रागावलो असलो तरी तुमची चिंता माझ्या गाठीशी आहे !"

अंकुश जोशी

Paragkan
Monday, August 28, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रे वैभव

Good one Ankush!

Mrinmayee
Monday, August 28, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, नेहमीप्रमाणेच, कवीता अप्रतीम! मला माहीती आहे, पुस्तकाचं तर तु आधीच 'नाही' म्हणून झालंय. कमितकमी रंगीबेरंगीवर जागा घेऊन तिथे तरी हलव ह्या कवीता. सगळ्या एकत्र वाचता येतील, पुन्हा पुन्हा..!

Asmaani
Monday, August 28, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मृण्मयीला अनुमोदन. तुझ्या सगळ्या कविता खरंच एकत्र वाचायच्या आहेत.

Daad
Monday, August 28, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
तो गाव मुरब्बी होता, ती वेस कोरडी होती
मी दुःख कशाला असल्या वेशीवर टांगुन आलो
इतक्यात मळभ आले अन वर्षाव सुरू ठिणग्यांचा?
अद्याप कुठे मेघांना मी अश्रू देउन आलो?

किती सुन्दर गज़ल खरच छान! गज़लेच्या सोळा कळा घेऊन आलीये!

शलाका


Dhund_ravi
Tuesday, August 29, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव... वा:!

चल माझाही बुरख़ा फ़ाडतो आज...

अडगळीत सापडला फ़ुटका आरसा जुनासा
आठवेच ना काही केल्या हा चेहरा कुणाचा

कुणीतरी बिचारा त्या आरशातुन कण्हतो, मी आवाज ओळख़त नाही
विझल्या जख़मेतुन वाळल्या रक्ताचे, घाव ओघळत नाही

ही जख़म बहरण्याआधि, हे घाव बरसण्याआधि
प्रेतास चिकटवलेल्या बुरख़्यात फ़ाटलो मी
गोष्टी सांगु नको कुणाला माझ्या जिवंतपणाच्या,
जिवंत आहे म्हणताना केंव्हाच संपलो मी...

धुंद रवी


R_joshi
Tuesday, August 29, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही सर्वजणच फार सुंदर कविता करता. तुम्हांला एवढे अर्थपुर्ण शब्द कसे सुचतात याच मल आश्चर्य वाटत.

Meenu
Tuesday, August 29, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरंग ..

काही दिवस असेच जातात
फारसं काही घडत नाही
खरं म्हणजे त्यानं
तसं फारसं काही बिघडत नाही

भावनांचा कल्लोळ नाही
विचाराचं मोहोळ नाही
डोक्यात कसला म्हणजे
कसलाच घोळ नाही

ईतकी शांतता की मी
चाचपुन बघते
माझंच अस्तित्व पुन्हा पुन्हा ...
माझ्या जिवन्तपणाच्या
त्या जुन्या खुणा ..

मला जाणवते .....
शांत संथ प्रवाहावर
मंदपणे डोलणारी एक नाव ........
तोपर्यंतच ...
जोपर्यन्त उरातला तरंग, घेत नाही त्या ...
शान्त डोहाचा ठाव.

काही दिवस असेच जातात
फारसं काही घडत नाही
खरं म्हणजे त्यानं
तसं काहीच बिघडत नाही


Niru_kul
Tuesday, August 29, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुंतवण.....

का असा देव दगडात, शोधत राहीलो मी ?
का मनीच्या भावनांना, रोधत राहीलो मी ?

का नाही जमले, मला स्वार्थीपणे वागणे ?
का असा दुसार्‍यांसाठी, झगडत राहीलो मी ?

शब्दांनी सावरले नाही, व्यथेला आवरले नाही;
का असा माझ्याच श्वासात, घुसमटून राहीलो मी ?

केली मी प्रित, जीव ओवाळला....
तरीही का मनाने, अधुरा राहिलो मी ?

जळाली भावना, मेले माझे मन...
तरीही हास्याला ओठांवर, का फुलवत राहीलो मी ?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators