Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 28, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » काव्यधारा » कविता » Archive through August 28, 2006 « Previous Next »

Mandarsahas
Friday, August 25, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा दुसरा प्रयत्न. चुकले माकले उदार मनाने पोटात घ्या.

विश्वास

रन्गील्या दुनियेत, रात्री अश्या रन्गतात,
आपले सगळे म कार इथे उल्टे होउन डब्लू बनतात,
अर्थ काहीच बदलत नही.
तोच कैफ़, तिच झीन्ग, तिच बेहोशी

बेहोश मन, बेहोश तन, बेहोश जाणिव
डिस्क चे मिक्स, कानी कपाळी किन्चाळत असतात,
हाच तो स्वर्ग, हेच ते नन्दनवन,
एका अप्सरेची लगट.. घुसमटलेला श्वास..तिचे निश्वास..
वाह क्या लाइफ़ है.. येही है राइट चोइस बेबी

खाड्कन मुस्कटात लाइफ़.. चोइस..
चार दिन की जिन्दगी.. मजा करले
अजुन एक थोबडीत ज़िन्दगी.. मजा..

सगळे शब्द विरुन जातायत..
धुराच्या वलयातून, एक तेजाचा झोत
किलकिले माझे डोळे.. तो प्रकाश किरण..
लाइट इज मेड अप ओफ़ वेव्ह्ज एन्ड कार्पुस्कल्स नक्की काय..

सान्गतो ना शरीर कणाचे, तरन्ग मनाचे..
कण कण बान्धून ठेवनारे तरन्ग रेश्माचे बन्ध

विसरलास तु तिला तु कोणच नव्ह्तास तेन्व्हा..
तिच होती ना रे तुझ्या बरोबर.. धीर देणारी,
हातपाय गाळलेस तेन्व्हा हिम्मत देणारी

हो आठवतेय.. शी लव्ह्स मी

जिचा श्वास तू आहे, जिचा प्राण तू आहे..
जिचे जगणे, मरणे केवळ तु आहेस..
जी तुज़्या स्पर्शाने फ़ुलते, तुझ्यात विसावते..
जिथे तुझा कण अन कण बान्धला जातो तो रेशिम बन्ध
..तुला या अप्सरेत मिळणार आहे?..
तुज़्या साठी केवळ, आयुष्याची ओन्जळ अर्घ्य म्हणुन रीती होणार आहे

चार दिडक्या हजार अप्सरा मिळतील..
पण तिला मिळवायला फ़क्त तुच हवा..
विचार कर.. तु अजुन्ही तिचा आहेस..
राहीला नाहीस तर ती राहणार नाही.. मग तुझे काय

कणाचा का तरन्गाचा चोइस तु ठरव
अप्सरा का ती तु ठरव..
मी विचारले पन तू कोण आहेस...

तो उत्तरला तिचा विश्वास.

मन्दार


Asmaani
Friday, August 25, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार, altimate, superb, fantastic . आणखीन शब्द सुचले की लिहीन.

Asmaani
Friday, August 25, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, निरु, धुंद रवी, सर्वांनीच श्रावणाला अगदी भावपूर्ण निरोप दिलाय. आता भाद्रपदही जोरदार असूदे.
धुंद रवी, कवितेच्या रुपात नसलेल्या तुमच्या अप्रतिम काव्याला दादही तशीच द्यायला हवी. पण माझी तेवढी प्रतिभा नाही.


Seemadhav
Friday, August 25, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mandar chan aahe kavita asech lihit jaa

Manishalimaye
Saturday, August 26, 2006 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मंदार खरच छान आहे.

Devdattag
Saturday, August 26, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार छानच रे..

वाटणी..
अताशा नकोस झालय खरंतर
त्या कोमट नजरा
ते ओढलेले श्वास
तो कोमेजलेला गजरा
ते भरकटलेले भास
ते विचार करणं
कधी दिवसातून उद्भवलेल्या रात्रीचा
तर कधी रात्रीतून निसटलेल्या दिवसाचा
काट्यांची वाटणी करत
कधी फुलांसकट
कधी फुलांशिवाय
-देवदत्त




Mrudgandha6
Saturday, August 26, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार,देवदत्तजी, छनच आहेत तुमच्या कविता..

Mrudgandha6
Saturday, August 26, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार,देवदत्तजी, छानच आहेत तुमच्या कविता..

Mrudgandha6
Saturday, August 26, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तू माझ्याकडे कधीच,
काहीच मागितले नाहीस..
जितक्या आनंदाने
माझे प्रेम स्विकारलस
तितक्याच सहजतेने
माझा रागही..
मी अपेक्षांच्या गुन्त्यात..
अन तू मात्र..
निरपेक्षपणे देत राहिलास,
जे मी मागितले होते तेही,
जे मी मागितले नव्हते तेही..


Niru_kul
Saturday, August 26, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गीत सांत्वनाचे.....


मी गाईन गीत, माझे आसवांचे;
रुजवीन सूर त्यात, माझ्या वेदनांचे.....

तू जग तुझे जीवन, तुझ्या मनासारखे;
मी आवरेन वादळ, माझ्या ह्रदयीच्या भावनांचे.....

तुझी साथ लाभण्याचे, भाग्यच नाही माझे;
काटे माझे सोबती, तुझे रस्ते फुलांचे.....

समजेन असे की, मी नव्हतोच तुझ्या लायकीचा;
माझं ह्रदय एक फुटकळ मोती, तुझे नशीब तारकांचे.....

मरेन मी आता, तुझ्या आठवणींमध्ये झुरत;
संपवू शकतील न ज्वाळा, माझे गीत सांत्वनाचे.....

निरज कुलकर्णी.


Asmaani
Saturday, August 26, 2006 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा, देवदत्त, निरु, nice poems. keep it up!

Mrudgandha6
Sunday, August 27, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझ्याच एका इंग्रजी कवितेचा मीच केलेला हा अनुवाद..बघा अवडतोय का..

आह!किती एकटी आहे मी
माझ्या आत्म्याशिवाय..
ऊरी एक विश्वास बाळगुन
या रस्त्याकडे पहात बसलेय..
परत माझ्याकडे तू येशील म्हणून....
आणि मझ्या या निरर्थक जगण्याला
एक नवा अर्थ देशील म्हणुन..

फ़ेसाळणार्‍या समुद्राच्या किनारी
या खडकावर बसलेय मी..
हा सुर्याचा प्रवास बघत..
जेव्हा तो या
मेघांच्या पडद्याआडून
उगवतो तेव्हा
आणि जेव्हा तो
या रंगबिरंगी आकाशाच्या गालिच्यावर विसावतो तेव्हाही
मी त्याला पहाते..

कुणास ठाऊक किती वर्षे उलटून गेली..
वर्षे की युगे?

मी प्रयत्न करतेय..
स्वतःला पहायचा
पण,मला मी कुठेच दिसत नाहिय..
आता फ़क्त
काही कणच उरलेत
हवेचे आणि वाळुचे..

मला आता खुप भिती वाटु लागलिय..
तू पुन्हा मला शोधत
या रस्त्यावर आलास तर..
मला ओलखशील का?

माझा श्वास जाणवेल का तुला
या फ़ुलांच्या सुगंधात
माझा स्पर्श जणावेल का तुला
या दवबिंदुंच्या स्पर्शात
या अलगद झुळूकेत मझ्या मिठीचा
भास तुला होइल का?
या झर्‍याचे पाणी पिताना
मझ्या ओठांच्या ऊबेची
तुला आठवण तरी होइल का?

होइल ना?
हे असे असंख्य प्रश्न
माझ्या मनात काहुर माजवताहेत
आणि या हुरहुरीबरोबरच
मी इथे तुझी वाट पहातेय..
मी अजूनही तुझी वाट पहातेय..









Vaibhav_joshi
Sunday, August 27, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह !!!

मंदार ... सुंदर ... एक सल्ला देऊ ? never feel gulity about your creation त्यात चुकलेलं वगैरे काही नसतं .. जास्तीत जास्त समोरच्याला तुझा दृष्टिकोण पटणार नाही इतकंच पण आपली कविता अभिमानाने सर्वांसमोर ठेवण्यास कधीच कचरू नकोस .. असा विचार केला तरच माणूस स्वतःसाठी लिहू शकतो .. चू.भू.दे.घे.

देवा .. कधी फुलांसकट . कधी फुलांशिवाय ... मस्त रे !!

नीरज .. तुझ्यामधली गझल बाहेर येण्यास धडपड करते आहे ... काही मदत लागली तर मेल कर .. मला शक्य आहे तेवढं सांगेन

मृद्गंधा ... पहिली जास्त आवडली ... जे मी मागितले होते ते ही ... अन जे मागितले नव्हते ते ही ... क्या बात है !!! दुसरी पण छान आहे . माझ्यामते पहिलं कडवंच सगळं काही सांगून जातं . मी ती कविता तिथपर्यंतच खूप वेळा वाचली ... मज़ा आ गया .. oh ! how alone i am ...without my soul ... ह्म्म !!!


Daad
Sunday, August 27, 2006 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदार,
'सान्गतो ना शरीर कणाचे, तरन्ग मनाचे.. कण कण बान्धून ठेवनारे तरन्ग रेश्माचे बन्ध'! किती छान कल्पना आहे. लक्षात ठेवा, ही कल्पना फक्त तुमचीच. लिहीत रहा, खूप लिहा!
देवदता, 'काट्यांची वाटणी करत, कधी फुलांसकट कधी फुलांशिवाय' - सुन्दर!
मृद्गन्धा, निरज खरच छान. आत्म्याशिवायचं एकटेपण? ग्रेट!

अरे, हो! गणपतीबप्पा मोरया!!


Daad
Sunday, August 27, 2006 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या कविता अजुन "गीतांत" अडकल्या आहेत. असो...
ही अजुन एक बरीच जुनी!

आले हळदीचे ऊन, ओल्या ओल्या दवांतून
गेला चांदवा थकून, वाट पाहून पाहून

असे सांजावले होते, सख्या तुझ्या-माझ्यासाठी
ओली सांज सुनी गेली, ओल्या ओल्या डोळ्यांतुन

ओलेतीशी चाफ्यापाशी, होते उभी ओठंगुन
झाला हिरवा काळोख, ओल्या ओल्या पानांतुन

सख्या तुझ्या आठवांचा, असा कसा रे आषाढ
रात गेली करपून, ओल्या ओल्या श्वासातुन

प्रश्ण (हा शब्दं कसा लिहायचा? - पण प्रश्ण तो नाहीये!) - "कॉपी राईट्स" वगैरेचं काय करता तुम्ही?


Smi_dod
Monday, August 28, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हवी आहेस तु

जेव्हा उदास काळोख्या छाया
गडद होतात,सगळे मार्ग संपतात
तेव्हा हलकेच तिरिप येते
"हवी आहेस तु" म्हणत


तु नसतोस जवळ तेव्हा
मनाचा कोळी काळजीचे जाळे विणतो
त्या कोषात हळुच साद येते
"हवी आहेस तु मला"

उनपावसाचा खेळ चालु असतो
धुवांधार पावसात
सगळे उध्वस्त झालेय असे वाटताना
इन्द्रधनु उमटते"हवी आहेस तु"म्हणत

पाठमोरी असता मी
हळुच विळखा पडतो
रेशमी लडी कानाशी
उलगडतात"हवी आहेस तु मला" म्हणत

सगळ्या वेदना,संशयाचे जाळे
विरघळते तुझ्या"हवी आहेस तु "मधे
आणि मन मग सतत सादवते
"हवा आहेस तु मला म्हणत

स्मि


Niru_kul
Monday, August 28, 2006 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो... तू.... आणि मी...

तो असाच अवेळी यायचा...
तुला उगाच भिजवून जायचा...
मी शहारायचो जेव्हा तो तुला स्पर्शायचा...
रक्ताचा कण-कण अगदी पेटून उठायचा...
पण मीही अगदी असहाय्य असायचो....
कारण... कारण तो तुला आवडायचा...
तुला आवडायचा म्हणून मला नावडायचा...
एक मात्र खरं, तो खूप दिलदार होता...
तुझ्यावर माझ्याइतकंच, मनापासुन प्रेम करायचा...
तो आला की तू, त्याच्याशी अखंड गप्पा मारायचीस...
स्वतःला विसरून, त्याची होऊन जायचीस...
आणि मी.... मी मात्र त्याच्या जायची वाट बघत राहायचो...
तो लवकर जावा म्हणून, प्रार्थना करायचो...
पण तोही पठ्ठ्या तुझाच प्रेमी...
तुला भेटायला त्याला वेळेचे बंधन नाही...
तुला पुर्ण आपलीशी केल्याशिवाय, तो काही जायचा नाही...
तुही त्याची झाल्याशिवाय, भानावर यायची नाहीस...
मग हळूहळू तो, माझ्या डोळ्यात दाटू लागायचा...
तुझ्या कानात हळूवारपणे, माझ्या मनाचं गुपित सांगायचा...
मग तुला अलगद, माझी आठवण व्हायची...
तू माझ्याजवळ येऊन, मला मग बिलगायचीस...
तुला माझ्या जवळ बघुन, तो हिरमुसला व्हायचा...
त्याच्या जाण्याची, मग तयारी करु लागायचा...
तरीही जाण्यापुर्वी, तो माझ्याकडे बघुन हसायचा...
शत्रू असुनही माझा, पाऊस माझ्याशी मित्रासारखा वागायचा...


Niru_kul
Monday, August 28, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव......

मी काही कोणी ग्रेट नाहीये..... आणि त्याची मला जाणीव आहे....
माझी कविता हे माझ्या भावनेचे एक रुपांतर आहे....
कदाचित माझे शब्द प्रभावी नसतील... पण माझ्यालेखी भावनेला जास्त महत्व आहे....

गजल साठी आवश्यक ज्ञान माझ्याजवळ नाहीये ही गोष्ट मला माहीत आहे.... जर काही सुधारणा असतील तर नक्कीच सुचवा....
आपला आभारी राहीन.... सहकार्याबद्द्ल धन्यवाद....


Mrudgandha6
Monday, August 28, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


निरज, वाह!वाह!वाह!
"शत्रू असुनही माझा, पाऊस माझ्याशी मित्रासारखा वागायचा..."
.. अप्रऽऽऽऽऽतिऽऽऽऽऽममममममममम!!!

दाद,..दाद देण्यासरखीच आहे तुमची कविता.

स्मिता,.ऽतिशय सुंदर

वैभव,..किती बरोबर ओळखले आहेस तू..मलाही असच वाटले की माझ्या पहिल्या कडव्यातच सगळ आलय.. नंतर उगाच लाम्बल्यासरखी वाटतेय ना?..
"oh! how lonesome i m..without my soul.."


Sanyojak
Monday, August 28, 2006 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

`अहो संयोजक, कुठे चालला एवढ्या घाइत? झाली का तयारी गणेशोत्सवाची? काय स्पर्धा आहेत हो?` घाई घाइत चाललेल्या संयोजकाला बघताच एक मायबोलीकराने त्याला हटकलेच.

संयोजक (मनातल्या मानात) `वैताग, या आयडीने अगदी उच्छाद मांडला आहे. एक संधी सोडत नाही टोचून बोलायची` (प्रत्यक्षात) `काय सांगू तुम्हाला. मंडपाची व्यवस्था, सजावट, स्पर्धा ही सगळीच कामे आहेत. ऐनवेळी कलाकार तर सोडच बाकीचे संयोजक पण सापडत नाहीत हो. `
उच्छाद देणारा आयडी : `पण स्पर्धा काय आहेत? त्या कुठे आहेत? मला फार उत्सुकता आहे.`
तावडीत सापडलेला संयोजक : `ते जावूदे हो. हा नं. १ संयोजक कुठे गेला काय माहीत`
उ. दे. आ. : `अरे वा! नंबरी संयोजक आहेत तर.`
ता. सा. सं. : `काय चेष्टा करता राव. ते सुद्धा खर्‍या आयडीने. पण तुम्हाला म्हणून सांगतो. या बारीला फार काही वेगळे नाहीये. स्पर्धा जर वेगळ्या आहेत एवढेच.`
उ. दे. आ. : `म्हणजे नक्की काय आहे.`
ता. सा. सं. : `मला कळले ना की मी नक्की कळविन तुम्हाला. तुम्ही आहात ना इथेच?`
उ. दे. आ. : `स्पर्धेचे जावुदे यावेळी काही नाविन्य आहे की नाही?`
ता. सा. सं. : `हो आहे ना. या वर्षी मंडपासाठी खड्डे खणायचे पैसे वाचल्याने आम्ही त्या पैशात `रस्ता दाखवा, ईनाम मिळवा` अशी अभिनव स्पर्धा घेत आहोत.
उ. दे. आ. : `हो का अरे वा वा.` (मनात) खड्ड्यात जाणार बहूतेक मंडळ.
ता.सा. सं : (मोबाईलवर) `काय सांगतेस? स्पर्धांची घोषणा झाली सुद्धा?` (मनात)इथे आम्हाला त्याचा पत्ता सुद्धा नाही.` उ.दे.आ. कडे वळून. `अहो शुक शुक. झाल्या स्पर्धा चालू. इकडे जा म्हणजे तुम्हालाही भाग घेता येईल.
गणेशोत्सव स्पर्धा कुणी विचारले मी कुठे आहे तर काही बोलू नका हं.`





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators