|
Bee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 9:49 pm: |
| 
|
मै.., वास्तव लिहायचे होते. मला हा घोटाळा माहिती नव्हता. बरे झाले तू लक्षात आणून दिलास आणि मनिषानी अर्थ सांगितला.. :-)
|
टक्कल, टक्कल म्हन्जे काय अस्त? पारदर्शक केसान्च, रान अस्त! टक्कलाचा खरच, उपयोग काय अस्तो? नसल्या अक्कलेचा, लोकान्ना धाक असतो शेट्टी सारखा वचक अस्तो न्हाव्याच्या पोटावर, पाय अस्तो! ह्ये काय खर नाही, ह्येची अशी कितीक मारुतीच्या शेपटावाणी लाम्बण लावता यील पर त्यासाठी आधी अनुभव अन अनुभुती हवी ना! अन नेमक्या या टॉपिकला माह्याकडे ती नाही!
|
वा क्या बात है लिंबुदादा. एकदम सही है. पट्या आपुनको आप किधरके है सभी जगह दिखाई पडते है.
|
Abhiyadav
| |
| Wednesday, August 23, 2006 - 1:07 am: |
| 
|
रवी, तु फ़ारच सुंदर कविता केली आहेस. सहसा अगम्य अशी अनामिक हुरहूर तू अचूक टिपली आहेस. त्यातही "प्राजक्त मनाच कुणीतरी हलवला सडा चिमुकला गोळा झाला... " ही ओळ अप्रतिम वाटते. पहिली दोन कडवी छान वातवरण निर्मिती करतात. निशब्द शांतता तू फुलांच्या तोंडून व्यक्त केली आहेस. असं वाटत आहे की जणू क्षण थांबले आहेत. आणि काहीतरी घडण्याची वाट बघत आहेत.
|
Kandapohe
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:02 am: |
| 
|
रवी छानच आहे कविता. नाव काय ठेवलेस लेकीचे?
|
स्वप्नकळ्या काळ्यासावळ्या गर्भरेशमी रात्री जेव्हा माझ्या स्वप्नकळ्या उमलायला लागतात तेव्हा हळूच माझ्या कमरेभोवती... पाठमोरी... विळखा घालते तुझी अलवार रेशीममिठी अन.... तुझे उष्ण श्वास रेंगाळ्त राहतात... माझ्या कानांच्या नितळ पाळ्यांवर तुझ्या उबदार ओठांचं आसुसलेपण जाणवत रहातं... माझ्या उघड्या मानेवर मग... तुझं अलगद वळवून घेणं मला स्वतःच्या अस्तित्वाकडे तेव्हाची ती थरथर... ती वेडावलेली नजर.... तुझ्या प्रणयोत्सुक फुलोर्याला आलेला बहर... मी कणाकणानं टिपून घेत राहते ते सारं... माझ्या अणूरेणूत अन दिवसभर सुगंधून धुंद होत राहते त्या मोरपिशी शब्दस्पर्श जाणिवेनं... पुन्हा येणार्या... गर्भरेशमी रात्रीची वाट बघत जेव्हा माझ्या स्वप्नकळ्या पाकळीपाकळीनं उमलायला लागतात.
|
Niru_kul
| |
| Wednesday, August 23, 2006 - 9:19 am: |
| 
|
तळमळ.... जाणीव तुजला आहे, माझ्या या मनाची; का अशी वागतेस तू, मग परक्या सारखी... भावनेला माझ्या प्रिये, नाही किनारा आता; का जागवतेस मग उरी, वेदना वणव्यासारखी... जागतो मी रात्र-रात्रभर, तुझ्या आठवांच्या साथीला; का करतेस माझी निद्रा, तुझ्या स्वप्नांना पारखी... जन्मभर जळुनी, विझू न शकलो मी; का जागवला अंगार असा, तू माझ्या अंतरी...
|
धुंद रवी,खुप सुंदर.. सुमतीताई,स्वप्नन्कळ्या छान. निरुकुल,अतिशय छान
|
Aandee
| |
| Wednesday, August 23, 2006 - 1:59 pm: |
| 
|
धन्यवाद मृद्गंधा आता मला जमले ना??? रवी कवित एकदम अप्रतिम सुमती कविता छान आहे नीरु_कुल कविता सुरेख लीम्बू कविता पटली
|
AEaU… KrM tr %yaa satt KLaLNaaáyaa paNyaakDUna maaJyaa KUp Apoxaa hao%yaa… pNa p`vaahabaraobar vaahNaaáyaalaa sava- inayama saaoDUna kQaI ]laTM jaata yao[-laÆ itqao maI eoklao to nausatoca fosaaLNaaro Aavaaja… Sabd AsKilat nasalao trI vaodnaa maa~ kDyaava$na kaosaLNaarI… Ana\ naohmaIp`maaNao %yaa vaodnaoBaaovatI DaoMbaaáyaacaa KoL baGaayalaa jamaavaM tsao jamalaolao maaNasaaMcao GaaoLko… pNa taosauwa… caakaorIt ADkUnadoKIla %yaaMcyaavar tuYaaraMcaa vaYaa-va krNaara… KrMca… kahIkahIMnaa Aaplao AEaU iktI Cana lapvata yaotat
|
Bee
| |
| Wednesday, August 23, 2006 - 9:35 pm: |
| 
|
शैलेश, 'अश्रू' अतिशय सुंदर वाटली.
|
Daad
| |
| Wednesday, August 23, 2006 - 11:30 pm: |
| 
|
माय गुडनेस! कसले गुरु लोक आहेत एकेक इथे. खूप खूप दिवसांनी छान वाचायला मिळालं. अगदी पार २००५ पर्यंतची अर्काइव्हज वाचुन काढली. किती छान लिहिता रे सगळे! मनाची एक एक तार अगदी तरफेच्या तारेसारखी झणझणली! आत्ता इथे अगदी "श्रावणात घननिळा बरसला आहे", आणि त्यात अशा कवितांची अवचित झिम्मड! चालू दे अशीच, महफ़िल!
|
सुमती तुझ्या स्वप्नकळ्या उमलल्यानंतर काय झालं ऐकायचय त्याच्या बेभान आवेगाच्या वर्षवातुन ओसांडणारा परमोच्च त्रुप्ततेचा एक स्वर्गीय स्पर्श तिच्या दमलेल्या श्वासातुन ओघळून तरंगत पापण्यांवर रेंगाळताना तिला बेचिराख़ करुन गेला. तिच्या कणाकणातुन झिरपणार्या कस्तूरीगंधानं आधिच निष्प्रभ झालेला तो तिच्या डोळ्यावर चढलेला बेपर्वा कैफ़ पाहून स्तिमितच झाला. तिच्या हरण्यामुळे… आज तो जिंकुनही हरला होता. त्याच्या जिंकण्यामुळे…… आज ती हरुनही जिंकली होती... धुंद रवी.
|
Kshipra
| |
| Thursday, August 24, 2006 - 4:35 am: |
| 
|
कुरियर बेल वाजली दारात चक्क पाउस उभा म्हणाला तुमच कुरियर आहे सही केल्यावर पसाभर टपोरे थेंब देऊन आला तसाच गेला धावत त्या पसाभर थेंबाच्या सोबतीने मीही भिजतीये तुझ्या आठवणीने
|
Jayavi
| |
| Thursday, August 24, 2006 - 5:22 am: |
| 
|
क्या बात है! धमाल सुरु आहे इथे तर! सुमती...... खूप सुरेख..... romantic ! धुंद रवी...... सुमतीच्या कवितेच्या पुढची तुझी कविता..... ultimate ! क्षिप्रा, किती गोड..... निरुकूल, शैलेश, खूप छान!
|
मस्त रवी छानच. शैलेश, खुप सुरेख. क्षिप्रा, short but, very very very sweet
|
किती दिवस असं अगतिक जगत रहायचं.. हृदयी असह्य कळ तरी उगाचच हसत रहायचं.. संवेदना गोठून गेल्यात अन मनही स्तब्ध झालय.. डोळ्यांतून कोसळणारे अव्यक्त कोरडे अश्रू किती वेळ पुसत रहायचं.. मला नाही जमत तुझ्यासरखं थोर व्हायला गोंधळलेलं बावरलेल लहानगं समजूनच घे ना मला तुझ्या वात्सल्यपुर्ण कुशीत अन ध्यानस्थ होवू दे मला तुझ्या दिव्य चरणी तुझ्या प्रेममयी खांद्यावर शांत निजून जावूदे मला किती वेळ हे असं अस्वस्थ जागत रहायचं..? तू दयाघनच आहेस तर बरस लवकर अता कुठवर मी असं तृषार्त रहायचं? सामावून जावूदे तुझ्यात मला कणमात्रही भेदाभेद नुरुदे तुझी परिपूर्णता समोर असतानाही मी कुठवर अस अपुर्ण रहायचं?
|
थोड वेळ जाईल... पण माझ्यासाठी हे वाचा आत्मसमर्पण ज़्वलंत असलं तरी क्षणाचंच आयुष्य घेऊन संपणार्या कापुरनं रात्रीच्या गर्भातल्या गर्द कळोख़ाला शह द्यायचा नसतो. रतीच्या मादक्… खरं तर घातक सौंदर्यापुढे चंद्रानं स्वत:ची मंत्रमुग्ध रेशिम किरणं सुयानं सुवर्ण कुंडल… आकाशानं हक्काच शाश्वत क्षितिज्… निसर्गानं अक्षय सर्वस्व… आणि… आसमंतनी मनोहर अस्तित्व शुद्ध हरपुन गमावलय्… हे ठावुक असुनही…………… त्यानी आपले आयुष्यच काय्… पण आपले कल्पनभास मोगरी वास्……… सगळे अम्रुतश्वासही पणाला लावले. इतक विश्वास रातराणीलाही स्वत:च्या उन्न्मत्त गंधाच नसेल. त्यानी आयुष्यच जुगारत लावलं होत आणि… तो हरला होता. राखेच्या उध्वस्त उदरात विखुरलेल्या निद्रिस्त पक्षाचं राख़ेतुन उठुन भरारी घेणं फ़क्त काल्पनिकंच असतं… …हे त्याच्या अजाण जाणिवांना कधी जाणवलंच नसावं. त्याला पुन्ह एकदा काळोखाच्या अभेद्य साम्रज्याला जिंकुन एक मोकळा श्वास घ्यायचा होता. …तसही आता त्याच्याकडे हरण्यासारख़ं काही राहीलचं नव्हतं. त्याच्या ह्या आव्हनाला आवाहन समजत ती म्हणाली… तुझं जग्… तुझा जीव्… तुझी प्रत्येक गोष्ट माझी गुलाम असताना कशाच्या जीवावर तुला माझ जीव जिंकायचाय तो म्हणाला… ह्या वेळेस्… मी माझ्या कविता जुगारावर लावेन. आसुरी समाधनाने भरलेला तिचा नेहमीचा उग्र चेहरा पहिल्यांदाच निस्तेज झाला. आणि… न लढतच तिनी हर मानली… आत ती त्याची गुलाम झाली होती. आज पुन्हा एकादा तो त्याच्या कवितांवर जगत होता. आत्मसमर्पण करणार्या तिच्या पराभूत गर्वाला तिच्या उद्विग्न डोळ्यातला काळोख़ म्हणाला… जे जे काही आस्तित्वात आहे, त्यावर फ़क्त आपलंच आधिराज्य असताना हे आत्मसमर्पण का ती म्हणाली… तो त्याच्या श्वसांशिवाय जगु शकतो त्याच्या कवितांशिवाय नाही. ह्यावेळेला जर तो हरला तर त्याच्या आयुष्यासोबत ह्य जगातही जगण्यासारखं काहीच उरणार नाही. ह्या म्रुतावह ब्रम्हंडावर राज्य करुन मरण्यापेक्षा त्याच स्वामित्व स्विकारुन त्याच्या कवितेतुन जगणं जास्त सुख़ावह आहे.” आत तोच काय्… ………ती सुद्धा त्याच्या कवितांवर जगत होती. धुंद रवी
|
वैभव, लोपामुद्रा,पुरु, अस्मानी, मृद्गंधा, मनिषा, अभिजित, मृण्मयी, झाड, मीनू, बैरागी, सारंग,बी विनायक, जयवी, आत्तच एक आर्टिकल पोस्ट केलय... वेळ मिळाला तर वाचा... नाहीतर वेळ काढुन वाचा
|
Jaaaswand
| |
| Thursday, August 24, 2006 - 7:55 am: |
| 
|
धुंद रवी... एकदम मस्त... अफ़लातून आहे आत्मसमर्पण कविता .....fantastic !!!!
|
|
|