Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 31, 200620 07-31-06  9:22 am
Archive through August 02, 200620 08-02-06  11:04 am
Archive through August 04, 200620 08-04-06  8:29 am
Archive through August 06, 200620 08-06-06  5:17 am
Archive through August 07, 200620 08-07-06  9:31 am
Archive through August 08, 200620 08-08-06  8:54 am
Archive through August 09, 200620 08-09-06  10:30 am
Archive through August 10, 200620 08-10-06  6:50 am
Archive through August 11, 200620 08-11-06  1:13 am
Archive through August 12, 200620 08-12-06  6:46 am
Archive through August 17, 200620 08-17-06  7:26 pm
Archive through August 22, 200620 08-22-06  11:51 am
Archive through August 24, 200620 08-24-06  7:55 am

Mrudgandha6
Thursday, August 24, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ravI,
chhaan aahe "atmasamarpaN"..shevaT hurhur lavaNaaraa

Manishalimaye
Thursday, August 24, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! धुंद रवी फारच छान
तो त्याच्या श्वासांशिवाय जगु शकतो कवितांशिवाय नाही.
वा वा अगदी अगदी...... हे फरच भावलं मनाला.
आणि शेवटही
तुमची लेक कविता होउन आली तर!!
सगळेच छान लिहितायत की!
मन प्रसन्न झाल.
काय बर बक्षिस देऊ?
ऊत्तम!!!
हाय मृद्ग़ंधा, बर्‍याच काळानी दिसत्येस.


Mrudgandha6
Thursday, August 24, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग मनिषा,
बर्‍याच दिवसांनी लिहिली कविता पण झुळुकेमध्ये लिहित होते ना.


Asmaani
Thursday, August 24, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळेच अतिशय सुंदर लिहिताएत. कुणाकुणाचं कौतुक करायचं हाच प्रश्न आहे. माझी एक छोटीशी addition .
काळोख दाटलेला
मन सैरभैर झाले
दाटे भिती ऊराशी
डोळे भिजून गेले
वार्यासवेची वाहे
चाहूल वादळाची
सांगू कशी कुणाला
हुरहूर काळजाची
आधार शोधतांना
रुतला हातात काटा
अडखळती पाऊलेही
वैरीण होती वाटा
मन सम्भ्रमित होई
जावे पुढे कि मागे
बंधन नवे जुळेना
विरले जुनेही धागे
हातातुनी निसटले
क्षण रेशमी सुनहरे
आता समोर आहे
एक प्रश्नचिन्ह गहिरे.


Ashwini
Thursday, August 24, 2006 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेलफोन

कधीकधी कामावरून घरी येताना
मी सेलफोन कानाला लावते
' निघालेय मी, तुला अजुन किती वेळ? '
असच काहीसं विचारत राहाते

' नुकताच पाउस पडून गेलाय
हवेत मातीचा गंध भिनतोय
जणु रूप्याने मढवलेला
रस्ता किती सुरेख दिसतोय '

पलीकडून उत्तर येत नाही
पण माझं बोलणही थांबत नाही
' मघाशी काय झालं माहीतेय..? '
माझं चालूच असतं काहीबाही

पलीकडून, अजुनही उत्तर नाही
असह्य होते आता स्तब्धताही
ते उत्तर कधी येणारच नाही
याची खात्री असली तरीही

खरं सांगायचं तर,
तो नंबर नसतो लावलेलाही
जो कधी अस्तित्वातच नसतो
आणि ज्याला लावायचा तोही..


Rachana_barve
Thursday, August 24, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmmmmmm .... .... .... ..

Daad
Thursday, August 24, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीही धीर करतेय! इथे पोस्ट करण्याचा पहिलाच प्रयत्न!

सखी पुळणीशी स्तब्ध
उभी ओठंगुन माडा?
चित्रं खरे? म्रुगजळ?
श्वास थांबे आंदोळणं

अधोमुख नको होऊ
कशी पौर्णिमा होईल?
माझ्या भरतीला नको
गंधावलेले कारण?

नको चाचपू गजरा
हात हाती राहू दे ना
फिरफिरुनिया मोडे
मनातलीच मांडणं

दोष माझा ना तुझा ही
सारा निसर्गाचा खेळ
मगा शांत होता ना हा?
आता आले का उधाणं?

नको सावरू ओढणी
हा वारा नाही गडे
माझ्या आतल्या माझ्याशी
धर्मयुद्धाचं भांडण

शब्द फुटत नाहीना?
नको करु ओठां बन्द
होऊदे ना दीठी-मीठी
ओठ, ओठांना कुंपण

घालू पौर्णिमा पाठीशी
आहे माडाचा आडोसा
दोन ज्वाळांना पुरेसा
करु सरसा विंझण

मग सामोरे होऊया
उभ्या जळ भरतीला
देऊ आजच्या रातीला
उभे आयुष्य आंदण


Dhund_ravi
Friday, August 25, 2006 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा, तुझ्या विनंतीवरुन पुन्हा पोस्ट करतोय...

आत्मसमर्पण

ज़्वलंत असलं
तरी क्षणाचंच आयुष्य घेऊन संपणार्‍या
कापुरनं
रात्रीच्या गर्भातल्या गर्द कळोख़ाला शह द्यायचा नसतो.

रतीच्या मादक्… खरं तर घातक सौंदर्यापुढे
चंद्रानं स्वत:ची मंत्रमुग्ध रेशिम किरणं
सुयानं सुवर्ण कुंडल…
आकाशानं हक्काच शाश्वत क्षितिज्…
निसर्गानं अक्षय सर्वस्व… आणि…
आसमंतनी मनोहर अस्तित्व
शुद्ध हरपुन गमावलय्…
हे ठावुक असुनही……………

त्यानी आपले आयुष्यच काय्…
पण आपले कल्पनभास
मोगरी वास्………
सगळे अम्रुतश्वासही पणाला लावले.

इतक विश्वास रातराणीलाही स्वत:च्या उन्न्मत्त गंधाच नसेल.

त्यानी आयुष्यच जुगारत लावलं होत आणि…
तो हरला होता.

राखेच्या उध्वस्त उदरात विखुरलेल्या निद्रिस्त पक्षाचं राख़ेतुन उठुन भरारी घेणं फ़क्त काल्पनिकंच असतं…
…हे त्याच्या अजाण जाणिवांना कधी जाणवलंच नसावं.

त्याला पुन्ह एकदा
काळोखाच्या अभेद्य साम्रज्याला जिंकुन
एक मोकळा श्वास घ्यायचा होता.

…तसही आता त्याच्याकडे हरण्यासारख़ं काही राहीलचं नव्हतं. त्याच्या ह्या आव्हनाला आवाहन समजत ती म्हणाली…

तुझं जग्… तुझा जीव्… तुझी प्रत्येक गोष्ट
माझी गुलाम असताना
कशाच्या जीवावर तुला माझ जीव जिंकायचाय

तो म्हणाला…
ह्या वेळेस्… मी माझ्या कविता जुगारावर लावेन.

आसुरी समाधनाने भरलेला तिचा नेहमीचा उग्र चेहरा
पहिल्यांदाच निस्तेज झाला. आणि… न लढतच तिनी हर मानली…
आत ती त्याची गुलाम झाली होती.
आज पुन्हा एकादा तो त्याच्या कवितांवर जगत होता.

आत्मसमर्पण करणार्‍या तिच्या पराभूत गर्वाला
तिच्या उद्विग्न डोळ्यातला काळोख़ म्हणाला…

जे जे काही आस्तित्वात आहे, त्यावर फ़क्त आपलंच आधिराज्य असताना हे आत्मसमर्पण का

ती म्हणाली…

तो त्याच्या श्वसांशिवाय जगु शकतो त्याच्या कवितांशिवाय नाही.
ह्यावेळेला जर तो हरला तर
त्याच्या आयुष्यासोबत ह्य जगातही जगण्यासारखं काहीच उरणार नाही.
ह्या म्रुतावह ब्रम्हंडावर राज्य करुन मरण्यापेक्षा
त्याच स्वामित्व स्विकारुन त्याच्या कवितेतुन जगणं जास्त सुख़ावह आहे.

आत तोच काय्…
………ती सुद्धा त्याच्या कवितांवर जगत होती.

धुंद रवी


Devdattag
Friday, August 25, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी सुरेख..
मृदगंधा, अस्मानी, अश्विनी छान लिहिताय..
दाद आपली कविता खरच दाद देण्याजोगी


Niru_kul
Friday, August 25, 2006 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षणभंगुर

माझ्या जीवनाचे सारे रस्ते, तुझ्याविना सुनसान होते;
तुझ्या वाट्याला स्वर्गाचे चांदणे, माझ्या नशीबात स्मशान होते....

वाटले, मिळावे चार क्षण मलाही आनंदाचे;
मनाच्या खोट्या उभारीला, आशेचे अवसान होते....

क्षणभंगुर जाहले, आयुष्यच माझे;
वेदनेला मनात माझ्या, मग अढळ स्थान होते....

जगत राहीलो मी, उगाच मग अर्थहीन;
मृत्युही वागला वैर्‍यासारखा, त्यालाही माझ्या परिस्थीतीचे भान होते....

Daad
Friday, August 25, 2006 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"ज़्वलंत असलं
तरी क्षणाचंच आयुष्य घेऊन संपणार्‍या
कापुरनं
रात्रीच्या गर्भातल्या गर्द कळोख़ाला शह द्यायचा नसतो. "
सुंदर! खरच अप्रतीम, धुन्द रवी!


Vaibhav_joshi
Friday, August 25, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा !!! मस्त कविता आहेत सगळ्या
धुंद रवी ... सुंदर रे ...
अस्मानी ... एक प्रश्नचिन्ह गहिरे .... आवडली
दाद ... माझ्या भरतीला नको गंधावलेले कारण ? वाह !!!
अश्विनी ... simply superb शेवटचा पंच सही आहे
मृद्गंधा ... अपूर्णता हुरहूर लावणारी ... आधी म्हटल्याप्रमाणे तुझ्याकडून गझल ची वाट बघतोय ...
सुमतीताई ... स्वप्नकळ्या उमलू लागतात ... पाकळी पाकळीने .. खूपच अलवार
आणि रवी तुझी प्रतिक्रियाही
नीरु ... गझल होवु शकेल छान

सर्वांनाच शुभेच्छा


Niru_kul
Friday, August 25, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृताचे थेंब....

बोलण्यासारखे खुप आहे, सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे, होण्यासारखे काहीच नाही.....

कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे, दुखण्यासारखे काहीच नाही.....

उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर, बघण्यासारखे काहीच नाही.....

तुला नेहमीच वाटत असेल, मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे, कळण्यास अवघड काहीच नाही.....

माझ्या नेत्रांतील आसवांची, तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत, नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत....

Dhund_ravi
Friday, August 25, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Mrudgandha6
Friday, August 25, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती सुंदर लिहलय सर्वांनीच.
अस्मानी,खरच गहिरे प्रश्नचिन्ह हुरहुर लवणारे

अश्विनी,सहज,तरल आणि तितकच भावस्पर्शी

दाद,खुप सुरेख..

निरूकुल,अप्रतिम..वैभव म्हणतो तसा त्या अप्रतिम गझल होवू शकतात.

धुंद रवी,कविता नसली तरी जे काही लिहले आहेस ते केवळ अप्रतिम आणि काव्ययच आहे.

वैभव,धन्यवाद.जरुर प्रयत्न करेन गझल देण्याचा.तूर्तास तुझ्या गझलेची चातकासारखी वाट बघतेय.लवकर लिही





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators