|
धन्यवाद मृद्गंधा, pk , स्वरा ... मृद्गंधा .... बुरखा,पदर,तिजोरी आणि चादर ह्या द्विपंक्तीतल्या कन्सेप्ट्स मधला paradox hard hitting आहे . पुढील लेखनास अनेकानेक शुभेच्छा
|
वैभव, शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
|

|
करार एकाकीपणाशी करार जाहला तेन्ह्वा सान्गत देउन, आठवणी घेतल्या होत्या. काही द्यायचे, काही घ्यायचे, कराराच्या सगळ्या अटी पाळल्या होत्या आठवणीत माझ्या कय नव्ह्ते? माझी सखी, आई बाबा, सगळी नतीगोती, मित्र, मैत्रीणी, जणु सगळे जग सामावले होते. आठवणी जगता येतात, जणिवा जाणता येतत खन्त बाळगता येते, सुख, दुख भोगता येते.. पण या एककी पणाचे काय करु?.. कदाचित एककि पण पाळता येते, उपवास पाळतो तसे... काही नियम, मागुन घेतलेले, लादुन घेतलेले.. निमुट पणे पाळत वाट पहायची.. चन्द्र कधी उगवेल, चातुर्मास कधी सम्पेल... मला मझी प्रिया कधी भेटेल?.. मी तिला भेटेन तेन्ह्वा असे करिन तसे करिन... हळुवार जशी तिला मिठीत घेइन.. आठवणी स्वप्नात बदलत होत्या... तरीही कराराच्या सगळ्या अटी पाळल्या होत्या...... मन्दार
|
Aandee
| |
| Friday, August 18, 2006 - 10:59 pm: |
| 
|
वैभव,मूद्गंधा धन्यवाद. बी,वैभव मूद्गंधा,अभिजित,मंदर तुमच्या सगळ्याच्या कविता आवडल्या.
|
aandee माझे नाव असे लिहि mRudga.ndhaa . धन्यवाद.
|
Abhiyadav
| |
| Saturday, August 19, 2006 - 6:20 am: |
| 
|
स्वातंत्र्य के नाम पाऊस ओसरला की घोषणांचा महापूर पुलांवरून पाणी आणि रस्त्यांवर खड्डे खड्डयांमध्ये पडलिये जनता आम घ्या एक जाम स्वातंत्र्य के नाम तिजोरीतला खडखडाट संपलाय कधी ? अनुशेषाचा प्रश्न सुटलाय कधी ? 'माहितीचा अधिकार' म्हटलं की फ़ुटतोय घाम एक जाम स्वातंत्र्य के नाम संसदेत गोंधळ की गोंधळात संसद ? कामात घोटाळे की घोटाळयात काम ? विकासाच्या घोडयाला भ्रष्टाचाराचा लगाम होऊन जाऊद्या एक जाम स्वातंत्र्य के नाम दोन दोन सेना दोन दोन कॉंग्रेस कशासाठी करता ? 'धर्मनिरपेक्ष' शब्द उरला निव्वळ युती करण्यापुरता 'कॉमन मॅन 'च्या जगण्यात नाही राहीला राम घ्या एक जाम स्वातंत्र्य के नाम आपलीच मते आणि आपलेच नेते कोणाच्या नावाने मारताय बोंब ? विश्वास नावाच्या शब्दाला नाही उरला दाम सर्वात मोठ्या लोकशाहीला माझाही सलाम. अभिजित...
|
अभिजित छान! मराठ्यांचा विश्वास तर पानपतात गेला म्हणतात ना?
|
Kiru
| |
| Saturday, August 19, 2006 - 7:00 am: |
| 
|
आज बर्याच दिवसांनी इथे डोकावलो. वाचत वाचत पार मार्च पर्यंत पोहोचलो... खूप बरं वाटलं. पुरु, अस्मानी, मृद्गंधा, मनिषा, अभिजित, Andee , मृण्मयी, झाड, मीनू, बैरागी, सारंग... तुम्ही सर्वच फार छान लिहिताय.. खरतर काहीच लिहिण्याचं मनांत नव्हतं पण वाचत गेलो आणि रहावलं नाही. लोपामुद्रा.. 'नक्षत्राचा वेल विझवत, प्राचीकडे झेपावत..' खासच.. 'रात्र', 'आता नाही' खरच उच्च. आणि 'नदी' तेव्हढीच देखणी.. वैभव.. काय लिहू? एकेक कवितेबद्दल स्वतंत्र प्रतिक्रिया द्यावी लागेल. आणि तेवढं शब्द'वैभव' माझ्यापाशी नाही. तुझ्या काव्यप्रतिभेला आपला 'कडक' सलाम.. गिर्या.. 'वरदान'..! क्या बात है!! अफलातून.. ती वाचूनच तुला लगेच फोन केला.. पण एक सांगू.. सुख आणि दु:ख, दोन्हीही क्षण तेव्हढेच समरसून जगता यायला हवेत. दोन्हीकडे दुरुन तटस्थपणे पहाण्याचं वरदान मिळालं की तुम्ही 'योगी' झालात. नाही का? निनावी, तुझ्या सगळ्याच कविता मनापासून दाद देण्याजोग्या.. वाचता वाचता केंव्हा तोंडातून अलगद 'व्वा' निघून जाईल सांगता येत नाही. कुठेतरी, कधीतरी अनुभवलेलं धूसर अस काही पुन्हा अनुभवायला मिळतं तुझ्या कवितेतून. वैभवची 'अल्लख निरंजन' जेवढी आवडली तेवढच तू दिलेलं स्पष्टीकरण भावलं. आणि 'कुठे गेलं कुणास ठाऊक ...' मनाला भिडून गेलं. विशेषत: 'तुझी तहान वेगळी होती.. माझा पाऊस वेगळा होता..' तर फारच.. शब्दांची योग्य (अर्थयोग्य) आणि नादमय पखरण करण्याचं कसब तुम्हा सगळ्यांना बरोब्बर जमलय.. अस्मादिकाना हा शब्दांचा सुंदर खेळ जरी जमला नाही तरी शब्दांची मांडणी आणि त्यातला गोडवा छान समजतो. आणि म्हणुनच 'कविता करता येत नाही' ही खंत कधी वाटत नाही, वाटली नाही. करण कविता करता आली नाही तरी कविता 'चाखता' निश्चित येते. तुम्ही लिहीत रहा.. आम्ही आस्वाद घेत राहू. फुलं आहेतच, तेंव्हा फुलपाखरंही हवीत नाही का? 
|
Abhiyadav
| |
| Saturday, August 19, 2006 - 7:35 am: |
| 
|
मनिषा बरोबर आहे तुझं !! किरु तुझ्या सविस्तर आणि प्रेरणादायी प्रतिक्रियेबद्दल खुप धन्यवाद.
|
Asmaani
| |
| Saturday, August 19, 2006 - 8:06 pm: |
| 
|
वैभव तुझ्या कविता खरोखर मनात घर करुन रहाणार्या असतात. मायबोलीवर मेम्बर नव्हते तेव्हापासून वाचतेय तुझ्या कविता. आणि इतर अनेकांनी पुर्वीच लिहिल्याप्र्माणे सध्या तुझ्या कविता कसल्यातरी दु:खाने भारलेल्या असतात. असं काही दु:खी करणारं तुझ्या आयुष्यात घडलेलं नसावं ही देवाजवळ प्रार्थना! आणि दुर्दैवानं घडलंच असेल तर त्यातून तू लवकर बाहेर पडावंस ही सदिच्छा!
|
Bee
| |
| Monday, August 21, 2006 - 6:50 am: |
| 
|
वाताहात.. कधी कधी धोपटमार्गावर सरळ वळणानी चालता चालता पाहिलेल्या स्वपांची देखील वास्तव्यात कशी वाताहात होते.. तेंव्हा, वाट माहिती नसलेल्या स्वप्नरम्य दुनियेत हळूच मन प्रवेश करतं आणि जाऊन पोचतं आकाशातल्या अभ्ररम्य चंद्रकोरीजवळ.. वास्तव्यात अशा स्वप्नांची कधी वाताहात होतं नाही, दिवसाच्या उजेडात ती कोरही अखेरीस विलीनच होऊन जाते कुठेतरी..
|
किरु, तुझी प्रतिक्रिया देखिल एखाद्या कवितेसारखीच आहे! येत जा रे!
|
Asmaani
| |
| Monday, August 21, 2006 - 11:50 am: |
| 
|
बी, खूप छान कविता. keep it up!
|
Jayavi
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:03 am: |
| 
|
बी, सुरेख आहे रे कविता! लिहीत रहा! छान भरात आहेस
|
Bee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:34 am: |
| 
|
जयवी, दिवाळी अंकात तू एक आजीवरचा लेख लिहिला त्यानंतर तुझ्याकडून काहीच नाही आले. इतरांना इतक्या गोड प्रेरणा आणि प्रतिक्रिया देतेस तेंव्हा स्वतःलाही लिहिते कर.
|
वैभव, लोपामुद्रा,पुरु, अस्मानी, मृद्गंधा, मनिषा, अभिजित, मृण्मयी, झाड, मीनू, बैरागी, सारंग आणि सगळेच मित्र... मी माझ्या मुलीच्या जन्माआधि केलिली कविता... तुमचा आभिप्राय आपेक्षित आहे... बहावा का रुसला स्वत:वर... निशिगंध का निशब्द आहे अस्वस्थ श्वास मोग-याचा.. का परिजात हदरुन आहे स्वच्छंद फ़ुलोरा गुलमोहरचा मिटुनी का काळोख़ झाला कोणतिही मोहमाया चांदणे पसरुन आहे रातराणीच्या कळ्यांचा माजही उतरुन जावा कोणत्याह्या गंधलाटा रात्रीसही हलवुन आहे? विख़ुरलेला पाश आपला का सायलीने आवळावा कोणत्याह्या चिंबधारा आसमंत भिजवुन आहे कोण बरसले कोण बहरले कळ्याकळ्यातुन कोण पसरले उत्सुकता फ़ुलाफ़ुलात आहे… त्या कळ्यांना मी म्हणालो लेक माझी येत आहे स्पर्शत कुणीतरी ह्या सुरवंटाला फ़ुलपाखरु करते आहे... चाहुल कुणाची… पाऊल कुणाचे उरी आधिरता भरते आहे… कुणीतरी बिलगले अलगद रिमझिम अन पाऊस कुशीतला ओला झाला... प्राजक्त मनाच कुणीतरी हलवला सडा चिमुकला गोळा झाला... श्वासावर पसरुन मखमली हिरवळ कुणीतरी गारवा फ़ुंकरलेला गर्भात फ़ुलोरा फ़ुललेला अन मनी पारवा गहिवरलेला हे कोण गुंतले हे कोण गुंफ़ले कोणी लपले माझ्या उरत आहे… मी म्हणालो माझ्या मनाला… लेक माझी येत आहे धुंद रवी
|
Bee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 7:11 am: |
| 
|
छान आहे रवि लेकीबद्दलची कविता.. पुरुषही इतके गोड स्वप्न बघतो लेक बायकोच्या गर्भात असताना असे कधी वाटले नव्हते मला पूर्वी..
|
Maitreyee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 8:45 am: |
| 
|
बी, 'वास्तव' आणि 'वास्तव्य' यात घोटाळा झालाय का? अर्थात बराच फ़रक पडतो म्हणून विचारतेय
|
Asmaani
| |
| Tuesday, August 22, 2006 - 11:51 am: |
| 
|
रवी, खरेच सुंदर आहे कविता. लेकीच्या स्वागताला आतुरलेलं मन जसंच्या तसं उतरलंय कवितेत.
|
|
|