|
प्रिती, अतिशय छान "नव्या ऊमीदिने परतण्याची ही त्याची जुनी खोड म्हणुनच मला नेहमी वाटते श्रावणाची ओढ "...सुंदर
|
Krishnag
| |
| Thursday, August 17, 2006 - 11:59 pm: |
| 
|
यंदाचा आषाढ जरा जास्तच लांबला विरह मेघांनी श्रावणही अभ्राच्छादित राहिला
|
Abhiyadav
| |
| Friday, August 18, 2006 - 12:46 am: |
| 
|
उन पावसाचा खेळ श्रावणात बहरतो आधी उन जिन्कायच आता पाऊस जिन्कतो.
|
Devdattag
| |
| Friday, August 18, 2006 - 12:56 am: |
| 
|
अभि.. अगदी अगदी.. ..
|
Krishnag
| |
| Friday, August 18, 2006 - 1:05 am: |
| 
|
उन पावसाचा खेळ ह्या श्रावणात नाही रंगला लग्ना वाचून कोल्हा बिचारा ब्रम्हचारीच राहिला 
|
येरे येरे पावसा तुला देतो stamp paper stamp paper होते खोटे पूर आले मोठे.
|
अभि,छान लिहिलय krish छान
|
>>krish विरहाने भलताच त्रासिक झालाय :-) मृदगंधा तुला त्रस्त म्हणायचय का?..
|
Sweety85
| |
| Friday, August 18, 2006 - 5:29 am: |
| 
|
प्रिती तू कशी आहेस? छान चारोळी आहे.
|
देवदत्तजी, चुकून त्रासिक लिहिले..गडबडीत होते.त्यात २-३ वेळा edit केले त्यामुळे असे झाले असावे. actually मला त्रासला आहेस असे म्हणायचे होते. krish ,sorry
|
१. बरसला पाऊस काल रात्रभर चिखल मनभर २. चिमटीतून फ़ुलपाखरू निसटले रंग मात्र उरले -सुप्रिया
|
R_joshi
| |
| Saturday, August 19, 2006 - 2:49 am: |
| 
|
स्विटी, मी बरी आहे. तु ब-याच दिवसांनी. बाकि झुळुक थोडी फार येतेय रंगात
|
R_joshi
| |
| Saturday, August 19, 2006 - 2:51 am: |
| 
|
नवा रंग हा ऊमेदिचा नवा रंग हा ऊमलण्याचा रंग आहे हा चाफ्याचा प्रिति
|
ऊर्मी ही बहरण्याची सप्तरंगात फुलण्याची शब्दगंधात मोहण्याची अभिजित
|
Smi_dod
| |
| Monday, August 21, 2006 - 11:27 pm: |
| 
|
कितीही जपले तरी ठेच लागतेच वेदनेची लहर शरीर भर लहरते मग ओलेत्याने डोळ्याबाहेर पडते
|
Sweety85
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:13 am: |
| 
|
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही. मी संध्याकाळी घरात येतो, तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, शेल्फमधील भाड्याचा आवाज बाहेर येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातुन बाटली काढतो, आजोबा फोटोतून बघत असतात, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही... १ पेग वापरात नसलेल्या मोरितल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो, अर्थात बाटलीही काल्या कपाटात ठेवतो, आजोबा मंद हसत असतात, स्वेपाकघरात डोकवून बघतो, बायको कणिकच मळत असते, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही... २ पेग मी: जाधवाच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं? ती: छे! दानात असेल तर मिळेल न चागलं स्थळ! मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो, बाटली मात्र मी हळूच काढतो, वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरुन ग्लास काढतो, पटकन पेगचा आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरित ठेवतो, काळा ग्लास पण कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ३ पेग मी: अर्थात जाधवाच्या मुलीचं अजून काही लग्नाचं पक्क झालं नाही? ती: नाही काSSय! अठ्ठवीस वर्षाची घोडी झालिय म्हणे... मी: (आठवूम जीभ चावतो) अच्छा अच्छा... मी पुन्हा कळ्या कपाटातून कणिक काढतो, मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते, फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो, आजोबा मोठ्ठ्याने हसतात, फळी कणकेवर ठेवून आजोबान्चा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो, बायको गॅसवर मोरीच ठेवत असते. या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही. कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ४ पेग मी: (चिडून) जाधवाना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जिभंच कापून टाकेन तुझी...! ती: उगीच कटकट करू नका... बाहेर जाऊन गप पडा... मी कणकेमधून बाटली काढतो, कळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो, मोरी धुवून फळीवर ठेवतो, बायको मझ्याकडे बघत हसत असते, आजोबाचा स्वेपाक चालूच असतो, पन या जाधवाचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही. कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ५ पेग मी परत स्वेपाकघरात जतो, हळूच फळीवर जाऊन बसतो, गॅसही फळीवरच होता... बाहेरच्या खोलीतून बाटल्याचा आवाज येतो, मी डोकवून बघतो... बायको मोरीत दरुचा आस्वाद घेत असते, या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही, अर्थात आजोबा कधीच रिस्क घेत नाहीत... जाधवाचा स्वेपाक होईपर्यंत... मी फोटोतून बायकोकडे बघत हसत असतो, कारण मी कधीच रिस्क घेत नाही... ५ पेग
|
Devdattag
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:16 am: |
| 
|
इथे फक्त स्वत: लिहिलेल्या कविता पोस्ट कराव्यात
|
Sweety85
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:33 am: |
| 
|
देवदत्त, तूला तुझ मत विचारल नाही. कदाचित तू दारु पिल्यावर तसच वागत असशील म्हणूनच...................
|
Kandapohe
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:42 am: |
| 
|
स्वीटी हे देवाचे मत नाहीये. इथे जा. हा मायबोलीवरचा नियम आहे. तू दारु पिल्यावर तसच वागत >> कृपया गोड नाव ठेवून कडू बोलु नये.
|
Devdattag
| |
| Tuesday, August 22, 2006 - 5:00 am: |
| 
|
स्वीटि.. मी फक्त तुम्हाला मायबोलीवरचा नियम सांगितला हो.. आणि एक सांगु इच्छितो जर कुणाबद्दल आपल्याला माहिती नसेल तर कृपया त्याबद्दल बोलु नये निदान ज्या भाषेत तुम्ही बोलता आहात त्या भाषेत तरी.. हा माझा नम्र सल्ला समजा.. शेवटी पाळणं न पाळणं तुमच्या हातात आहे
|
|
|