|
Giriraj
| |
| Saturday, August 05, 2006 - 8:11 am: |
| 
|
आये तुम याद मुझे... काल किशोर कुमारचा जन्मदिवस होता.भारतिय हृदयाचा एक कोपरा कायम व्यापणाऱ्या काही निवडक व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे किशोर कुमार!'किशोर' इतकंच त्याला म्हणता येतं.उगीच कोणत्याही प्रकारचे आदरार्थी विशेषणं त्याला लावायची गरज नाही इतका किशोर आपला वाटतो.विविध दूरचित्रवाणि वाहिन्यांनी काल विविध कार्यक्रम सादर केलेच पण केक कापून जणू किशोर आजही आपल्यातच आहे असा उत्सव साजरा केला.आणि ते काही खोटंही नाही.आयुष्याच्या कोणत्याही वळणावर किशोरचं एखादं गीत आपली साथ करतच असतं.मग प्रसंग आनंदाचा असो,दुःखाचा असो किंवा कोणत्याही भावनेने अलिप्त असा असो.. किशोरचं गीत आठवतंच आपल्याला!पण आज मला आठवतंय त्याचंच एक गीत,'मिली' चित्रपटात अमिताभसाठी गायलेलं.. आये तुम याद मुझे....... आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन खुशबू लायी पवन,महका चंदन काल सारखं हेच गीत का ओठी येत होतं कळेना.. अगदी जड आणि दर्दभऱ्या आवाजात किशोर गातो.. अमिताभ येरझऱ्या घालत गात असतांना दिसतो पडद्यावर. जिसपल नैनों मे सपना तेरा आये उसपल मौसम पर मेहन्दी रच जाये और तू बन जाये जैसे दुल्हन कवी योगेश यांची एक सुंदर कविता,साधी पण आशयगर्भ शब्दरचना आणि सचिनदेव बर्मन यांचे संगित; या सगळ्यांवर कळस म्हणजे किशोरचा आवाज़! जब मै रातों मे तारे गिनता हूं और तेरे कदमों की आहट सुनता हूं लगे मुझे हर तारा ,तेरा दर्पण सुरवातिला गोड आणि रोमॅन्टीक गाणीच किशोरच्या वाट्याला आली होति.पण पुढे जेव्हा अशी दर्दभरी गाणी त्याला मिळाली तेव्हा किशोर काय चीज़ आहे हे जगाला कळून चुकले.असंच एक 'मंज़िले अपनी जगह' किंवा 'मेरा जीवन कोरा कागज़' कायम गुणगुणायला लावणारं! हरपल मन मेरा मुझसे कहता है जिसकी धुन मे तू खोया रहता है भर दे फूलोंसे उसका दामन या गाण्यातल्या प्रत्येक कडव्याची सुरवात काहिश्या निराशेने होते.आणि मग तिसरी ओळ येते तेव्हा एका स्वप्नजगतात नेणारा आशावाद प्रतित होतो.'जब मै रातों मे..' म्हणतांनाचा किशोरचा आवाज आणि शेवटी 'लगे मुझे हर तारा,तेरा दर्पण' म्हणतांना प्रत्येक भावना जगणारा किशोरचा आवाज, जादूई आहे हेच पुन्हा प्रतित होते.गायनातले कोणत्याही प्रकारचे formal शिक्षण न घेतलेला किशोर हे जे करतो त्याला दैवी देणगीच म्हणावे लागेल.किशोरच्या आवाजातली जादू अनुभवायची असेल तर याराना चित्रपटातली दोन गाणी आवर्जून ऐकावीत.खरं तर दोन्ही गाणी पडद्यावर साकारली आहेत पुन्हा अमिताभनेच!पहिलं गीत आहे अतिशय हळूवार प्रेमगीत..."छूकर मेरे मनको"... यातला 'छूकर' कितीतरी हळूवारपणे स्पर्शून जातो.आणि हे गाणं संपत नाही तोच दुसरं गाणं सुरू होतं ते म्हणजे 'सारा ज़माना'! दोन्ही गाण्यांतला ज़मीन आसमानाचा फ़रक किशोरच्या आवाजातून किती अधोरेखित होतो!वाटतं,हळूवारपणे स्पर्शून जाणारा हाच का तो किशोर जो अगदी टपोरी ढंगात 'सारा ज़माना' म्हणतोय! किशोरचा स्पर्श झालेली कितीतरी गाणी नुसति ऐकत रहावसं वाटतं.सहज आठवायचं म्हटलं तरी कितीतरी गाणी मनातून सरळ ओठांवर येतात.जादूच म्हणावी लागेल ही किशोरची!आज किशोर नसला तरी तितक्याच उत्साहात त्याचा जन्मदिन साजरा होतोय.पुढेही होतच राहील.पण त्याची आठवण देणारं हेच गीत पुन्हा त्याच्यासाठीच अर्पण... आये तुम याद मुझे,गाने लगी हर धडकन खुशबू लायी पवन,महका चंदन! गिरीराज
|
Chinnu
| |
| Sunday, August 06, 2006 - 11:10 pm: |
| 
|
गिरी, काही लोकं चिरंजीवी असतात. किशोरजींचा आवाज आणि गाणी, अभिनय देखील चिरायुच, नाही का?
|
Aaftaab
| |
| Monday, August 07, 2006 - 1:22 am: |
| 
|
किशोरदाबद्दल लेख आहे म्हणून इथे काही लिहितोय किशोरदांनी वेगवेगळ्या हीरोसाठी मुद्दाम वेगवेगळे आवाज वापरले. तसेच वेगवेगळ्या मूड्स साठी सुद्धा वेगवेगळे आवाज वापरले. गाण्यात भावना कशी ओतायची हे त्यान्च्यासारखे फारच कमी लोकाना आले. उदाहरणार्थ १. देव आनंद साठी गायलेली गाणी ऐका - "नफ़रत करने वालो के सीने मे प्यार भर दू", किंवा "ये दुनियावाले पूछेन्गे .." किंवा "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" २. राजेश साठी वापरलेला आवाज डिस्टिन्क्ट्ली वेगळा वाटतो - "कोरा कागज था ये मन मेरा", "दिये जलते है.. फूल खिलते है", "ये शाम मस्तानी.." वगैरे. ३. अमिताभ साठी किशोरदानी एक वेगळा जाड आवाज मुद्दाम वापरला.. आणि त्या गाण्यामध्ये एक अटिट्यूड आहे.. उदा - "दिलबर मेरे कबतक मुझे", "कस्मे वादे निभायेन्गे हम", "बडी सूनी सूनी है", "सलामे इश्क़ मेरी जान..", "माय नेम इस अन्थोनी गोन्साल्विस", "देखा एक ख्वाब तो ये" वगैरे ४. जीतेन्द्र साठी एक वेगळा राठ असा आवाज वापरला.. उदा - "प्यार का तोहफ़ा तेरा", "नैनो मे सपना" वगैरे. कान देऊन ऐकल्यास हे फ़रक समजून येतील.. यावर प्रतिक्रिया किंवा अजुन काही मत वाचायला मला आवडेल.
|
Yog
| |
| Monday, August 07, 2006 - 11:51 am: |
| 
|
Giri, नेहेमीप्रमाणेच touching.. "गुरू" वर तर बखरच लिहावी लागेल. did u know that छू कर मेरे मन को हे गाण मूळ, रविन्द्र टागोरान्नी पहिल्या पावसावर लिहीलेली कविता आहे. "बदला ये मौसम...."
|
Giriraj
| |
| Tuesday, August 08, 2006 - 1:46 am: |
| 
|
मला माहीत नव्हते... धन्यवाद या माहितीबद्दल! तू लिही की मग बखर लिहायला सुरवात
|
Gs1
| |
| Wednesday, August 09, 2006 - 4:25 am: |
| 
|
खर रे ! किशोर सारखा कोणी नाही
|
गिरी मस्त, किशोरसारखा हरहुन्नरी कलाकार विरळाच
|
राजेश खन्नाला आवाज देऊन किशोर फ़ेमस झाला आणि किशोरच्या आवाजाने अमिताभ फ़ेमस झाला. अमितसाठी त्यानी गायलेली काही गाणी 'मीत ना मिला रे', 'रिमझिम गिरे सावन', 'बडी सुनी सुनी है जिंदगी', 'रोते हुवे आते है सब', ' ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना', 'इम्तीहां हो गयी इंतजार की' इतर भाषेतील त्याची गाणी पण मस्त आहेत e.g. बंगाली गाणी क्लासिकल बेसची (उत्तम कुमार साठी आवाज दिलेली). माझ अजुन एक फ़ेवरेट गाणं 'हम बेवफ़ा हरगीज ना थे' Anyway यादी खुपच मोठ्ठी होईल. त्याची दर्दभरी गाणी आणि उडती गाणी तेव्हढीच खुबीने गायलेली आहेत त्यामुळे दोन्ही मला प्रिय आहेत. म्हणुन त्याच्या वाढदिवशी मी पूर्णवेळ रेडिओ आणि TV चालू ठेवलेला. बराच वेळ बप्पीदा बोलत होते (बप्पी लहरी किशोर कुमारचा भाच्चा हे मला प्रथमच कळलं
|
Chandya
| |
| Friday, August 11, 2006 - 10:44 am: |
| 
|
किशोर कुमारचा अभिनय देखिल अतिशय नैसर्गिक होता. त्याचे 'चलती का..', 'पडोसन', 'मनमौजी', 'दिल्ली का ठग' इ. चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी दरवेळी तितकेच मनोरंजक वाटतात. मराठी सिनेमातील त्याचे 'अश्विनी ये ना...' हे एकच गाणे मला ठाऊक आहे. अजून काही गाणी आहेत का? किशोरची दर्दभरी गाणी पण काय एक सो एक आहेत कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा हम किसीके ना रहे, कोई हमारा ना रहा... शाम तनहाई की है, आयेगी मंझिल कैसे जो मुझे राह दिखाए, वही तारा ना रहा.. क्या बताऊ मै कहा, यू ही चला जाता हू जो मुझे फिरसे बुला ले, वोह इशारा ना रहा...
|
Jaaaswand
| |
| Friday, August 11, 2006 - 10:46 am: |
| 
|
तुम्ही सगळ्यांनी बहुतेक गाणी सांगितलीच आहेत.. अजून एक म्हणजे " जिंदगी आ रहा हूं " एकदम मस्त
|
Yog
| |
| Monday, August 14, 2006 - 2:43 am: |
| 
|
चन्द्या, तिसर कडव : ऐ नजारो न हसो, मिल ना सकून्गा तुमसे, वो मेरे हो ना सके मै भी तुम्हारा न रहा...
|
' माझा पती करोडपती ' मधे एक टिंपाट गाणं होतं , अगं हेमा , माझ्या प्रेमा ' ते गायलं होतं किशोरकुमार नी , अनुराधा पौडवाल बरोबर .
|
" अश्विनी ये ना" हे मराठी गाणेही किशोरकुमार यांनीच गायले आहे.
|
गिरीराज, छान आहे ललित. मला प्रश्न पडतो की, एवढ्या मोठ्या कलाकाराला गायनाचं फॉर्मल शिक्षण घ्यावं असं का वाटलं नाही. (अर्थात ते न घेतल्यानं फरक पडला नाही.) चंद्या आणि 'साधू और शैतान'!
|
Chandya
| |
| Monday, August 14, 2006 - 11:11 am: |
| 
|
योग. गाणे पुर्ण केल्याबद्दल धन्यवाद. मला वाटते, 'Legends' च्या संचात ह्या गाण्याच्या संदर्भात अशोक कुमार यांनी आठवण सांगितली आहे, '१२ मात्रा, आडा चौताल' वगैरे. किशोरदा जवाब नही. गिरि, अरे प्रतिक्रियेत मुख्य लिहायचे राहिले. तुझा हा ललित लेख छान जमलाय रे मला राजेश खन्ना पेक्षा किशोर ने अमिताभसाठी गायलेली गाणी अधिक आवडतात. कदाचित अमिताभची गाण्याशी समरस होऊन केलेली अदाकारी देखिल त्यास कारणीभूत असेल. GD , साधू और शैतान मी पाहिल्याचे आठवत नाही. पहायला हवा.
|
गिरि सही रे! आफताब सही निरिक्षण.. मान गये.. तुलना करायची नाहियं.. पण 'रिमझिम गिरे सावन' मला लतापेक्षा किशोरच्या आवाजात ऐकायला जास्त आवडते.. काय ना.. आधीच्या काळी Indian Idol , सारेगामा सारखे talent search shows नसुनही किशोर, रफी, आशा, लता सारखे एकसे एक हिरे चमकले होते.. आता मात्र हे असले एव्हढे पब्लिसीटी असलेले modern shows असुनही एकही धड एक गायक सापडत नाही..?? किशोर सारखे गायक संघर्ष करुन वर आले म्हणुन चमकले.. 'तुम्हारी आवाज मे कुछ खास बात नही' असं उमेदीच्या काळात किशोरला चित्रपट सृष्टीतील एका मोठ्या व्यक्तीने सांगीतले होते म्हणे.. त्यावेळी त्याला actor म्हणुन काम मिळत होते.. गायक म्हणुन नव्हे... दुसरा कोणी असता तर असे ऐकल्यावर फक्त acting वर लक्ष केंद्रीत केले असते.. पण acting पेक्षा गायनाचे किशोरला जबरदस्त passion .. एव्हढी निष्ठा म्हणुनच तो तावून सुलाखुन वर येऊ शकला.. नाहितर हल्ली आले किती आणि गेले किती.. आने वाला पल जाने वला है - गोलमाल आते जाते खुबसूरत आवरा सडको पे - अनुरोध चलते चलते मेरे येह गीत याद रखना - चलते चलते चेहरा है या चान्द खिला - सागर चिन्गारी कोई भडके तो सावन - अमर प्रेम छूकर मेरे मन को किया तुने क्या इशारा - याराना दीवना लेके आया है दिल का तरना - देखा एक ख्वाब तो येह सिलसिले (लतासोबत) - सिलसिला दिल ऐसा किसी ने मेरा तोडा - अमानुष दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार - ज्युली एक लडकी भीगी भागी सी - चलती का नाम गाडी गाता रहे मेरा दिल तु ही मेरी मन्ज़ील (लतासोबत) - गाईड गुम है किसीके प्यार मे दिल सुबह श्याम - रामपुर का लक्ष्मण हम बेवफ़ा हरगीज ना थे पर हुम वफ़ा - शालीमार हमे तुम से प्यार कितना - कुदरत जीवन के सफ़र मे राहि मिलते है - मुनीमजी कभि बेकसी ने मारा कभि बेबसी ने मारा - अलग अलग कबके बिछडे हुवे हुम आज कहा (लतासोबत) - लावारीस खिलते है गुल यहा खिलके बिखर - शर्मीली कहि दूर जब दिन ढल जाये - आनन्द कितने भी तु कर ले सितम हस हस - सनम तेरी कसम कोरा कागज़ था येह मन मेरा (लतासोबत) - आराधना कोयी लौटा दे मेरे बीते हुवे दिन - दूर गगन की छाओं मे माना जनाब ने पुकारा नही क्या - पेयींग गेस्ट मीत ना मिला रे मन का मीत ना - अभिमान मेर जीवन कोरा कागज़ कोरा ही रह गया - कोरा कागज़ मेरे दिल मे आज क्या है तु कहे तो - मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा - मेहबूब मेरे सामनेवली खिडकी मे एक चान्द सा - पडोसन मेरे सपनो की रानी कब आयेगी तु - आराधना मेरी भीगी भीगी सी पलको मे - अनामीका मुझे तुम याद करन और मुझको याद (लतासोबत) - मशाल मुसाफ़िर हू यारो न घर है - परीचय नीले नीले अम्बर पर चान्द - कलाकार ओह मेरे दिल के चैन चैन आये मेरे - मेरे जीवन साथी ओह साथी रे तेरे बिना भी क्या जीना - मुक़द्दर का सिकन्दर पल पल दिल के पास - ब्लॅकमेल प्यार दीवाना होता है मस्ताना होता है - कटी पतन्ग रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना - आराधना सलामे इश्क़ मेरी जान ज़रा (लतासोबत) - मुक़द्दर का सिकन्दर समा है सुहाना सुहाना नशे मे जहान - घर घर की कहानी तेरा साथ है कितना प्यारा (लतासोबत) - जांबाज़ तेरे बिन ज़िन्दगी से कोई शिकवा (लतासोबत) - आन्धी तेरे चेहरे से नज़र नही हटती - कभी कभी तेरे मेरे मिलन की येह रैना (लतासोबत) - अभिमान तुम बिन जाऊ कहा येह दुनिया मे - प्यार का मौसम वो शाम कुछ अजीब थी - खामोशी येह जीवन है इस जीवन का येही है - पिया का घर येह जो मोहब्बत है येह उनका है काम - कटी पतन्ग येह क्या हुआ कब हुआ कैसे हुआ - अमर प्रेम येह श्याम मस्तानी मदहोश किये जा - कटी पतन्ग येह रेश्मी ज़ुल्फ़े - दो रास्ते ज़िन्दगी का सफ़र है येह कैसा सफ़र - सफ़र ज़िन्दगी के सफ़र मे गुज़र जाते है जो मक़ाम - आप की कसम शेवटी किशोरबाबत म्हणावे लागेल... आते जाते खुबसुरत आवारा सडको पे.. कभी कभी इत्तफ़ाक से.. कितने अनजान लोग मिल जाते है.. उनमे से कुछ लोग भुल जाते है.. कुछ याद रह जाते है
|
किशोरच्या आवाजाच्या बाबतीतला हा एक किस्सा- अशोककुमारच्या 'जीवननैय्या' मध्ये बहुदा वाचल्याचं आठवतंय.. लहानपणी किशोरचा आवाज हा त्यांच्या अख्ख्या घरात एकदम भसाडा होता म्हणे. एकदा घरात खेळत असताना त्याचा पाय उघड्या असलेल्या विळीवर पडला आणि त्याच्या पायाचा अंगठा चांगलाच कापला. तेव्हा किशोरने असे जे भोकाड पसरले, की काही दिवस तो रडतच होता. त्यानंतर त्याचा आवाज एकदम मधुर झाला.
|
गजानन भाऊ.. खाली एक वैधनीक इशाराही द्या..
|
Chandya
| |
| Wednesday, August 16, 2006 - 10:21 am: |
| 
|
दिपस्तंभ, अगदी मस्त गाणी आहेत सर्व. ह्यातील २ गाणी किशोरने गायलेली नाहित. 'कही दूर जब दिन ढल जाए' हे गाणे मुकेश ने गायले आहे आणि 'यह रेशमी ज़ुल्फ़े' हे गाणे रफ़ीने गायले आहे. GD , हा किशोरच्या आवाजाचा किस्सा मी सुद्धा एका album मध्ये ऐकला आहे.
|
गिरी ... good one माझं आवडतं गाणं
|
|
|