|
Mrdmahesh
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:53 am: |
| 
|
किशोर ची आणखी २ गाणी ओ माझी रे अपना किनारा - किनारा सुरमा मेरा निराला, आंखो मे जिसने डाला, जीवन हुआ उजाला है कोई नजरवाला -(चित्रपटाचे नाव माहित नाही. कुणी सांगेल का?) या दोन्ही गाण्यातले भाव एकदम वेगळे आहेत एकात दर्द आहे तर दुसर्यात विनोद. दोह्नी टोकेच. पण दोन्ही गाणी इतकी समरसून गायली आहेत की बस. एवढ्या वेगवेगळ्या भावातली गाणी तितक्याच ताकदीने गाणारा हा एकमेव. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. हा नुसताच गायक नाही तर एक अष्टपैलू कलंदर कलाकार होता. चित्रपट सृष्टीतले दोन कलाकार गेल्यावर मी देवाला विचारले होते "यांनी तुझे काय घोडे मारले होते?" त्यातला एक म्हणजे किशोर आणि दुसरा संजीवकुमार.
|
अजुन एक कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे
|
'साधु और शैतान' मधे किशोर कुमारचा रोल मी कधीच विसरणार नाही, सिनेमा तेव्हढा खास नाही पण केवळ किशोर कुमारसाठी मी तो पाहिला. तसेच 'हाफ़ टिकट', 'पडोसन' हे कधीही, कितीही वेळा बघण्यासारखे मुव्हीज! 'आके सिधी लगी दिल पे जैसे बिजुरिया, ओ सावरिया तेरी तिरछी नजरिया हाय, ले गयी मेरा दिल तेरी...' हे गाणं तर सर्वाना आठवतच असेल. त्या गाण्यात किशोरनी जो काय गोंधळ घातलाय, बाई आणि पुरुषाचा आवाज त्यानेच काढलाय आणि चक्क घागरा घालून नाचलाय!
|
परवा एका कार्यक्रमात सचिनला (पिळगावकर) 'अश्विनी ये ना' म्हणताना ऐकलं... तेव्हा त्याने सांगितलेली हकीकत... किशोरकुमार मराठी गाणी म्हणत नसे.. त्याला कारण मराठीत येणारा 'ळ' आणि 'च' (चमचा मधला)... अश्विनी लिहिताना, ही दोन्ही अक्षरं किशोरदांसाठी टाळली होती..,,
|
Moodi
| |
| Monday, August 21, 2006 - 6:23 am: |
| 
|
लिहीलयस छानच गिरी. यात अजून २ गाणी माझी. आदमी जो कहेता है मजबूरचे आणि किसी बात पर मै किसीसे खफा हूं हे पण( चित्रपट लक्षात नाही). किशोर अमिताभसाठीच होता. 
|
Farend
| |
| Monday, August 21, 2006 - 10:23 pm: |
| 
|
Moodi ते बेमिसाल मधले आहे. Deepastambh मी उलटे वाचले होते...की किशोरला सुरुवातीला acting मधे जास्त रस होता म्हणून त्याने जास्त गाणी म्हंटली नाहीत, देव आनंद वगैरे वगळता. नंतर १९६९ पासून मग गाण्यावर जास्त लक्ष दिले. पण हे मी वाचलेले आहे, कितपत खरे माहीत नाही.
|
Pendhya
| |
| Tuesday, August 22, 2006 - 11:57 pm: |
| 
|
गिरी, लेख आवडला. एक गायक, comedian , संगीतकार, दिग्दर्शक, producer , अशा ह्या versatile कलाकाराचे, त्याच्या जन्मदिवशी केलेले स्मरण योग्यच.
|
|
|