Meenu
| |
| Saturday, August 12, 2006 - 6:58 am: |
| 
|
अंधार घातला (गळी) फुलांचा तीने जो हार होता उमटला वळ तेव्हा कळले की प्रहार होता (जाळले जेव्हा तयाने कळले की अंगार होता) फुटु न दिला हुंदका झाला जरी अत्याचार होता तोच तेवढा तिच्यापरीने केलेला प्रतिकार होता उजाड भाळालाही तिच्या काळ्या मण्याचाच आधार होता .. माणसांच्या जगात एवढा का बरे अंधार होता ..? (माणसांच्या जगात भरला (उरला) केवळ अंधकार होता .. ) .... काही पर्यायी ओळी, शब्द सुचले होते ते हिरव्या रंगात लिहीले आहेत.
|
Meenu
| |
| Saturday, August 12, 2006 - 7:16 am: |
| 
|
प्रतिक्षा पिंपळ पारावरचा कधीपासुन वाट पाहतोय.. कुणाची? कितीतरी वर्ष गेली होऊन अजुनही नाही थकला तीथे उभा राहुन किती पिढ्या कावळ्यांच्या गेल्या त्याला साथ देऊन किती ऋतुचक्र गेली निघुन या पारावरुन अजुन नाही वाकलाय तरी आता वाटलं.... थकलाय..... संपली सारी पानं साथीला कावळाही न उरलाय मगाशीच वठलेल्या पिंपळाला पालवी पाहीली फुटलेली अन कळलं मला त्याची प्रतिक्षा नाही अजुन संपलेली..... नाही अजुन संपलेली.....
|
मिनू ख़ूप छान आहे ग.
|
Chinnu
| |
| Saturday, August 12, 2006 - 12:15 pm: |
| 
|
MG मस्त. मीनु छान ग. ते पर्यायी शब्द काढुन तुला जे आवडले तसे राहु देत.
|
Bee
| |
| Monday, August 14, 2006 - 1:04 am: |
| 
|
तारूण्य... हे विशालकायी वृद्ध वृक्षराज! तुझी पाळमुळं कुठल्याकुठे पोचली आहेत, भूगर्भात रुजली आहेत इतक्या खोलवर माझी दृष्टीही लागतं नाही... मात्र उघड्या डोळ्यांना खुपत आहे तुझ्या फ़ांदीफ़ांदींचा सापळा दिवसेंदिवस खपल्याखपल्यांनी वेढत चाललेली तुझी दीनवान काया... गेल्या बारीच्या वसंतऋतुत तू पुन्हा एकदा तसाच फ़ुललास अंगोपांगी साराच बहरलास पण.. यंदा नाहीतर पुढल्याबारीत तू असशील की नाही? असलास तर फ़ुलशील की नाही? एक नाही, अनेक शंका मनात भितीची पाल चुकचुकवतात.. तू मात्र निश्चल उभा स्थितप्रज्ञ जणू भासतो आहेस.. आजकाल माझी तरूण पावले वेळीअवेळी डळमळतात अशा निराधार समयी तुझ्याचसारखं... नव्हे तुझ्या आतलं तारूण्य मलाही लाभू दे कसे फ़ुलतात कधीतरी अनुभवू दे!!!
|
bee , सुरेखच. भावणारी आहे एकदम.
|
Jayavi
| |
| Monday, August 14, 2006 - 1:36 am: |
| 
|
मीनु, मस्तच आहेत दोन्ही कविता!
|
बी, शेवटच कडवं मनाला अधिक भावलं.
|
सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
|
Bee
| |
| Tuesday, August 15, 2006 - 11:37 pm: |
| 
|
प्रेम... ह्या लोभस अन् ह्या मर्त्य जगात कुणाकुणावर माझं निर्भेळ प्रेम आहे, किती जिवापाड? हे सांगता येत नाही... कारण हेही तितकचं खरयं माझ्यासकट ह्यातल कुणीच 'प्रत्यक्षात' शंभर टक्के कधीच उतरत नाही..
|
Aandee
| |
| Thursday, August 17, 2006 - 12:20 am: |
| 
|
सखा....... पिपळ तुझ्याच कुशीत कितीदा सुखाचे कवडसे टिपलेत अश्रुचा ओलावा घेऊन चान्दणे पाघरुन झोपलोय माझ्या आठवणीचे किती बन्ध तुझ्याशी जोडलेत... ह्याच पारावर बसुन माझ्या आयुष्याचा सारीपाट माडलाय आज मी उध्वस्त होऊन तुझ्या आधारासाठी आलोय आणि.... आणि वेडया सारखा पहातच राहीलो पारावर वाळक्या काडया अन शुष्क पानान मधे तुला अन माझ्या स्वप्नाना शोधु लागलो माझा आवेग ओसरल्यावर पाहिल सगळच कस स्तब्ध स्तब्ध... कुणा साठीतरी थाबलेल... पिपळ,पार,आणि.....मी
|
पिंपळपार छान Aandee bee , तुमचा वृक्ष छानच आणि प्रेम तर अप्रतिम!
|
आज निवांत बसून वाचल्या कविता मीनू ... प्रतिक्षा मस्तच आहे. बी ... तारुण्य आवडली andee ... पिंपळपार खास
|
पर्व ... मनासारखे वागण्या बोलण्याचे मनापासूनी मोकळे हासण्याचे ऋतू लुप्त झाले कुठे सर्व माझे ? कधी संपले पर्व ते जीवनाचे ? ........................................ अनिर्बंध उन्मेष, दुर्दम्य आशा क्षितीजे नवी गाठण्याचीच भाषा सदा बेत आकाश जिंकावयाचे धरा सोडुनी धावणे पावलांचे जणू वारियाशीच स्पर्धा मनाची कशाला करावीच पर्वा कुणाची कसा जोश होता कसा वेग होता उरी वादळाचाच आवेग होता कळाले कधी ना मला एवढेही ललाटापुढे हारली वादळेही असे वाटले आत्मविश्वास होता परंतू खरेतर अहंकार होता कुणाहून मी श्रेष्ठ आहे म्हणूनी पुढे एकटा मीच गेलो निघूनी कसे भान नव्हते मला संकटांचे किती जीवघेणे जिणे एकट्याचे नवी वेस ना सापडे पावलांना जुनी वेस ना आवडे पावलांना त्रिशंकूपरी हे जिणे होत नाही धरेला, नभाला दया येत नाही मनासारखे हासण्या बोलण्याचे अता सोबतीला ऋतू आठवांचे अता पूर्ण अस्तित्व भासांत आहे म्हणावे उगी श्वास श्वासात आहे म्हणावे उगी .... श्वास श्वासात आहे
|
Abhiyadav
| |
| Thursday, August 17, 2006 - 5:07 am: |
| 
|
जुन्या काही जखमा अजूनही तशाच भळभळाव्या अन लादलेल्या चुकांनी मन अजुनही जाळावं काळजावर दगड ठेवून एखाद्याला हाक द्यावी अन आपल्याच तत्त्वांना आपणच मुरड घालावी मानापमान बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करावी आणि आपल्याच विवेकबुद्धीचा आपणास संशय यावा समंजसपणा म्हणावा की माघार म्हणावी? नाहीतर आपल्याच पुढाकाराचं हकनाक हसं व्हावं अस्तंगत होताना शेवटचा म्हणून दिवा मोठा व्हावा अन त्या मोठेपणाचा अर्थ त्यालाच न कळावा. -अभिजित...
|
अभिजीत, अतिशय अप्रतिम "अस्तंगत होताना शेवटचा म्हणून दिवा मोठा व्हावा अन त्या मोठेपणाचा अर्थ त्यालाच न कळावा. सुंदर
|
वैभव, तुझ्या आतापर्यन्त मी बर्याच चांगल्या कविता वाचल्या.. पण, ही कविता मला किती हृदयस्पर्शी वाटली हे मी शब्दांत सांगू शकत नाही. "त्रिशंकूपरी हे जिणे होत नाही " "मनासारखे हासण्या बोलण्याचे अता सोबतीला ऋतू आठवांचे अता पूर्ण अस्तित्व भासांत आहे म्हणावे उगी श्वास श्वासात आहे म्हणावे उगी .... श्वास श्वासात आहे " खरंच भावस्पर्शी..
|
माणूस आता इथं कुणालाही कुणाचीही कदर नाही माणूस नाव आहे पण माणुसकीचा आदर नाही सुंदर बुरख्यांखाली आता बोकाळल्यात वासना स्वत सावरत इतरांनाही सावरणारा पदर नाही तिजोर्या आहेत भरून पण समाधानाची उणीव आहे अंगाभोवती पुरणारी याच्या कुणाचीही चादर नाही इतरांसाठी झिजणार्यांचा जमाना गेला आता इतरांसाठी झिजेल एव्हढी वेदना इथली सुंदर नाही आता इथं कुणालाही कुणाचीही कदर नाही माणूस नाव अहे पण माणुसकीचा आदर नाही.. -सुप्रिया
|
Paragkan
| |
| Thursday, August 17, 2006 - 6:49 pm: |
| 
|
Good one VJ!
|
Swara
| |
| Thursday, August 17, 2006 - 7:26 pm: |
| 
|
खूप दिवसांनी आले इथे. मजा आली सगळ्या कविता वाचून. मस्तच... वैभव तुमच्या कविता इतक्या सुंदर असतात की काय सांगू.
|