R_joshi
| |
| Thursday, August 10, 2006 - 6:11 am: |
| 
|
तु दुर असुनी मज जवळ आहे मनाच्या गाभा-यात तु बंदिस्त आहेस हिच तर आपल्या प्रेमाची खरी जाण आहे तु माझा आणि मी तुझी आहे प्रिति
|
इथं सगळंच छान आहे सप्तरंगी भवनांना मान आहे तरी सुध्दा प्रत्येकाच वेगळ पान आहे ही कविता नव्हे ख़रंच इथे हुंदडताना [ते सर्फिगचे मराठी रुप आहे] ख़ूपख़ूप छान वाटतं.
|
Meenu
| |
| Thursday, August 10, 2006 - 6:53 am: |
| 
|
आत आत घुसमट वाटतं रडाव धाय मोकलुन नेमके अशा वेळीच हे वैरी अश्रु कुठे जातात पळुन ...? उरते फक्त कोरड, जळजळणारी जशी असावी जखम भळभळणारी
|
Meenu
| |
| Thursday, August 10, 2006 - 6:58 am: |
| 
|
बघ आज परत झाली तीच चुक माझ्या हातुन पुन्हा पुन्हा मी येते त्याच त्या वाटेवर परतुन .. आत खोलवर बसला आहे एक काटा रुतुन हसताना बोचतो अन जाणवते वेदना त्यातुन
|
Ludabuda
| |
| Thursday, August 10, 2006 - 7:16 am: |
| 
|
या कवड्यांनी छळले मजला दाद कुठे मागू मी दाद कुठे मागू?
|
आधीच्या सुत्राला धरुन.... या कवड्यान्नी छदाम मोजले पिझ्झा कुठे मागू मी, पिझ्झा कुठे मागू!... DDD किन्वा असही... या कडव्यान्चे अक्षर मोजले कुठे कसे भागू मी, कुठे कसे भागू! DDD
|
असह्य वेदनेला अश्रुंची खपली सप्तरंगी भावनेआडील बोच तुला न दिसली??? रुप...
|
आळवताना मल्हार खिडकीत डोलली एक नादावलेली पालवी
|
R_joshi
| |
| Friday, August 11, 2006 - 6:42 am: |
| 
|
पालव्यांचा अर्थ नविन जीवन आहे हाच तर खरा आशेचा किरण आहे प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, August 11, 2006 - 6:46 am: |
| 
|
तुला पाहण्याचा नवा छंद मज जडे तरी ही तुझ्या साथीसाठी माझे पाऊल पुढे ना पडे हा दुरावा मनाचा कि आपल्या मधल्या प्रेमाचा सोबत तुझी इतकी जुनी तरीही मला अजुन ते न आकळे प्रिति
|
कुठे गेले इथले सारे मंद जाहले काव्यवारे या रे या रे सारे यारे मिळुनी अपुले गाणे गा रे. ही कविता नाही हे गद्यच आहे तसेच वाचावे. पण इथले सगळे काल पासून कुठे गेले.
|
अर्चना प्रिती छान,रुपालीइ मनिषा.. अर्चना हायकू छान आहे "खिडकित डोलली पालवी नादवलेली " जास्त चपखल बसेल का??
|
हे माझे काही हायकू.. शिशिरातही वसंत पाहिला भारवून कोकिळ मनसोक्त गायला.. २. दारावर पावले तुझी वाजली क्षितीजावर पाहून चंद्र चांदणी किन्चित लाजली..
|
हा वर्षाॠतू .. अवेळी टाकतेय ही चारोळी..चालेल ना? रोज रोज मरुन सुद्धा जीवन हसत जगावं ग्रीष्माच्या ॠतूत सुद्धा गुलमोहरासारखं फ़ुलावं
|
R_joshi
| |
| Monday, August 14, 2006 - 5:38 am: |
| 
|
मृदुगंधा शब्दांना वेळेच बंधन नसते. बाकि लिहिलस छान ) अवेळी बरसतात त्या सरी नव्हे ते शब्द असतात. ऋतुत नुसती फुलेच नाहित तर शब्दही फुलतात प्रिति
|
प्रिती,धन्यवाद. बरोबर आहे भावनांअ आणि शब्दांना वेळेचे बन्धन नसते. तू ही छान लिहिले आहेस. सगळ्यांना स्वातन्त्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
|
Ludabuda
| |
| Wednesday, August 16, 2006 - 1:43 pm: |
| 
|
सावधान. मी परतलोय.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! सावधान. जागे रहा जास्त हायकु पाडू नका[म्हणजे आपोआपच सगळे जागे राहतील] मी परत येतोय!!!!!!!!!!!!
|
धुंदल्या दिशा दाही जमले भ्रमर सारे सरला गंध फ़ुलाचा रमले एकटे बिचारे पाहुनी नव्या कळीला ते हासले मनातुनी धुंदल्या दिशा दाही अन् गेले ते मिटुनी...
|
आनंदयात्री, "धुंदल्या दिशा दाही"खरंच अप्रतिम आहे.
|
R_joshi
| |
| Thursday, August 17, 2006 - 7:27 am: |
| 
|
आनंदयात्री फारच छान. चाहुल त्याने दिली हळुच आपल्या निघण्याची पालावलेल्या पालव्यांना हिरमुसले करुन जाण्याची नव्या ऊमीदिने परतण्याची ही त्याची जुनी खोड म्हणुनच मला नेहमी वाटते श्रावणाची ओढ प्रिति
|