|
१५ ऑगस्टची सकाळ. ऑफिसला सुट्टी! आरामात उठलो, सर्व आटपून बाजारात निघालो. श्रावणात चांगली अळंबी मिळतात. नैसर्गिक रुजणरी अळंबी फक्त याच दिवसात मिळतात आणि त्यांची चवही सुपरमार्कॅटमधे पॅकबंद पिशवित मिळणार्या मश्रुम पेक्षा वेगळीच असते. आमच्या बाजारात आरे कॉलनीतील आदीवासी बायका तसेच वसईच्या भाजीवाल्या सकाळिच घेउन येतात. म्हटल प्रयत्न करुन पाहू मिळतात का. सगळि दुकानं बंद, फार थोडी चालु होती. सुट्टीचा मूड असल्याने फारशी गिर्हाईकं दिसत नव्हती. रस्तेही बर्यापैकी ओस पडले होते. झेंडे विक्रेते मात्र दिसत होते जागोजागी. आमच्या बाजारात जाण्याच्या रस्त्यावरच एक चर्च आहे. रविवारी सकाळि मासळि आणायला जातो तेव्हा ही कॅथलीक मंडळि ठेवणितले कपडे घालून आपल्या मुलाबाळांसह चर्चला जाताना नेहमी दिसतात. आगदी तान्ह्या बाळापासून ते जख्खड म्हातार्या माणसापर्यंत अगदी सणासुदीला आपण नटतो तसे असतात. आज रविवार नव्हता पण तरीही चर्चकडुन बरीच कॅथलीक मंडळी रविवार असल्यासारखीच ठेवणितले कपडे वगैरे घालून येत होती. लहान मुले खिदळत, हातातले झेंडे फडकवत चालत होती. त्यांच्या बरोबर मोठी माणसं, काही गोवन कोकणित गप्पा मारत, काही मंगलोरी वळणाची, काही केरळकडील मंडळि! पण आज सगळ्यांच्या छातीवर डाविकडे लहानसा तिरंग्याचा बिल्ला होता. ह्या मंडळिना ओलांदून पुढे येतो तोच मला अंतोन दिसला. अंतोनची आणि माझी ओळख ८.२०च्या लोकलची. गोरेगाव लोकल प्लॅटफोर्म वर येता येता पहिली उडी मारणारे आम्ही कलाकार. पण ही धडपड सीट पकडण्यासाठी नसायची, तर साईड पकडण्यासाठी. कारण आम्ही दोघेही अंधेरीआ उतरणारे आणि जोगेश्वरीला चढणारा लोंढा चुकवण्यासाठी साईड मारणे ही आमची मजबुरी होती. अंतोन हे एक अदभुत रसायन होतं. पठ्ठा गाडी पकडताना हर हर महादेव अशी गर्जना करुन गाडीत उडि मारायचा. गाडी सुरु होताना छातीवर क्रॉस ची खूण करायला न विसरणारा गाडि सुरु होताना मात्र गणपती बाप्पा मोरयात आपला आवाज मिसळायचा. लोकल भजनी मंडळाने ईंद्रायणि काठी सुरु केलं की स्वत: गुणगुणायचा. एव्हढेच नव्हे तर मी पाहीली नसतील ईतकी मराठी नाटके त्याने पाहीली होती आणि मराठी रंगभूमी वरील कलाकारांबद्दल त्याला प्रचंड प्रेम होतं. यशवंत दत्त वारले तेव्हा "नटसम्राट गेला रे" अस म्हणणरी त्याची मुद्रा माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्याच्या ह्या मराठीप्रेमाविषयी त्याला छेडल असताना तो म्हणाला होता की त्याच्या आधीच्या पिढ्या वसईचे रहिवासी. धर्मांतर झाल्याने ते भले कॅथलीक झाले असले तरी मनाने, संस्कृतीने अजुन मराठीच होते. अंतोनच्या बाप्पानी त्याला मराठी शाळेतच घातले होते आणि म्हणुन तो अस्सल मराठीच राहीला होता. 'हाय अंतोन,गुड मॉर्निंग! किति दिवसानी भेटतोयस!' . मध्यंतरीच्या काळात मी नोकरी बदलली होती आणि माहीमला उतरत असल्याने ८.२० ची लोकलही सुटली होती! 'सुप्रभात मित्रा,स्वातंत्र्यदिनाच्या शुभेछा!' अंतोनने अभिवादन केल. 'बदलला नाही लेका तू' 'बस काय, हे काय कडेवर बदल घेऊन फिरतोय ना आयुष्यातला' कडेवरच्या त्याच्या गोंडस मुलाच्या गालाला मी हात लावत मी विचारलं 'नाव काय रे ह्याच?' 'सचिन' 'म्हणजे आणखी एक' माझा स्वर थोडासा खवचट. 'का नसावं रे? आपल्या मराठी माणसाची देशाची शान आहे तो!' 'हे, हे' काही सुचलं नाही की यापेक्षा दुसरं काय करणार? 'आज कसा काय चर्चला? नाही म्हणजे रविवारच्या मासला येता तशीच तुम्ही सगळीजण आलात म्हणुन विचारल' 'अरे आज १५ ऑगष्ट ना!' '... ...' 'आमचा आज विशेष मास असतो.'माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून तो पुढे म्हणाला! 'कसला रे?' 'देशासाठी, त्याच्या ऐक्यासाठी, देशातील लोकांच्या सुख सम्रुद्धी साठी प्रार्थना असते आज. ते बघ आम्ही झेंडावंदन पण केलय' चर्चच्या आवारात तिरंगा लहरत होता. 'हे दर १५ ऑगष्टला असत का रे?' 'हो, आणि २६ जानेवारीला देखिल. दोन दिवस देशासाठी प्रार्थना करतो रे, त्यात विशेष काय?' माझ्या डोळ्यासमोर १५ ऑगष्ट सोमवारी का आला नाही म्हणुन हळहळणारा मी, माझे मित्र आले आणि मलाच लाज वाटली 'अरे पण तू पलिकडे रहायचा ना? मग ईथे कसा कय' 'सचिनला आता शाळेत घालायच आहे ना?' 'पण पलिकडे छान आहेत की English medium च्या शाळा. माझा मुलगाही तिथेच येतो' 'अच्छा? पण चांगली मराठी शाळा नाहीये ना. ईथे कस शिक्षण मंडळाची शाळा आहे. तू पण तिथलाच ना?' 'अं.. हो हो. छान आहे की. पण हल्ली मराठी मिडियम.. ..' 'माझे बाप्पा म्हणायचे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण मुलाना लवकर समजतं. शिवाय आपली भाषा आपणच जिवंत ठेवायला हवी की नाही?' '... ...' सचिन आता चुळबुळ करु लागला होता. 'चल रे मी निघतो. भेटू आता नेहमीच.' 'आज सुट्टिचा काय खास बेत? चिकन की २६' 'आज उपास आहे रे' 'काय श्रावणी मंगळवार करतोस का रे?' माझा पीजॅ 'नाही रे, पण फादरनी सांगीतलय की आज एक वेळ उपास करा आणि त्यावेळच्या जेवणाचे पैसे ७ जुलई च्या बॉंबस्फोटात मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी द्या. मुंबईतल्या सर्व चर्च्मधे अस आवाहन केलय. अरे हो हो जाउया. टाटा कर काकाना!' अंतोन वळला आणि निघाला. मी देखिल सचिनला टाटा केला... आणि अंतोनला, त्याच्या बाप्पाना, त्या चर्च च्या फादरना, त्या सर्व बांधवाना मनोमन सलाम! चर्चच्या आवारात तिरंगा डौलाने फडकत होता!
|
Neelu_n
| |
| Wednesday, August 16, 2006 - 5:57 am: |
| 
|
भ्रमा.. खासच!!! आवडला तुझा पहिला प्रयत्न. कथाबीज तर छान आहेच पण तुझी लेखनशैलीही छान आहे. असाच लिहत रहा.
|
Moodi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:03 am: |
| 
|
सुरेख अन विचार करण्यासारखे लिहीलेस. अंतोनचे पण खरच कौतुक वाटले. अशीच माणसे घडावीत. 
|
भ्रमा... एकदम अप्रतिम लेख रे... पहिल्याच प्रयत्नात सिक्सर... असे प्रयत्न पुढे चालुच ठेव... तुझ्या अंतोनला एक सलाम... 
|
Bgovekar
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:07 am: |
| 
|
मिलिंदा वा! सुंदर व्यक्तीचित्रण! अंतोन डोळ्यांसमोर उभा राहीला. बघ नं आपली काळाबरोबर चालण्याची धडपड पण काही आपल्या मतांशी ठाम राहणारी लोकं...
|
भ्रमा.. कथेतुन बरेच काही स्पष्ट होतेय रे.. छान 
|
Maudee
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:22 am: |
| 
|
मस्तच रे भ्रमर.... छान लिहिलं आहेस
|
Shivam
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:30 am: |
| 
|
कॅथलीक असुनही इंग्लिशची कास न धरता आपला मराठी बाणा जपणार्या अंतोनकडुन आपल्याला खुप काही घेता येईल. भ्रमा, पहिलाच प्रयत्न? वाटत नाही. कथा अन लिखाण अगदी फक्कड जमलंय. Keep it up!!
|
छान लिहिला आहे...... छान लिहिला आहे...... [ ][ ]
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:38 am: |
| 
|
भ्रमा, तुजा पयलाच प्रयत्न नाय वाटत रे... फक्कड लिवलंस.. आजून काय वाटतां तां लिवत रव हय.. त्या आंतोन कडसून शिकण्यासारको बराच काय दिसतव... तेका माजो सलाम..
|
मंडळी धन्यवाद. मला आताच कळलं की बिबि चुकला आहे. ऍडमिन, मॉड, तुम्ही हे येथुन हलवुन योग्य त्या स्थानी नेउ शकाल का? (कोण म्हणतोय की recycle bin मधे टाका?)
|
Bee
| |
| Wednesday, August 16, 2006 - 7:20 am: |
| 
|
अशी उदा. खूप कमी असतात. त्यांना भेटून एकीकडे अभिमान वाटतो आणि थोडासा complex ही निर्माण होतो. भ्रमर छान..
|
Sonchafa
| |
| Wednesday, August 16, 2006 - 7:36 am: |
| 
|
छान लिहीले आहेस रे भ्रमर.
|
Ldhule
| |
| Wednesday, August 16, 2006 - 9:38 am: |
| 
|
मिलिंद, छान रे... आता थांबु नको. दिर्घ कथा येवुदेत लवकर.
|
Neel_ved
| |
| Wednesday, August 16, 2006 - 9:48 am: |
| 
|
भ्रमरा, सुंदर लिहिलं आहेस.... आवडलं...
|
Chandya
| |
| Wednesday, August 16, 2006 - 10:42 am: |
| 
|
भ्रमर, कथा(?) चांगली जमलीयं. अंतोन च्या बोलण्यात तो काही विशेष करतो आहे असा अभिनिवेश नाही. अशी आरस्पानी विचाराची आणि आचाराची माणसे विरळाच. एरवी hypocrite लोकांचीच मांदियाळी सभोवती दिसते.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 16, 2006 - 2:12 pm: |
| 
|
भ्रमर, पुर्वी माझे वसईला खुप वेळा जाणे व्हायचे. या लोकांच्या घरी पण जात असे मी. खरीच साधीभोळी आणि मराठमोळी माणसे आहेत ती. कुठल्यातरी अपघाताने त्यांचे धर्मांतर झाले.
|
Asmaani
| |
| Wednesday, August 16, 2006 - 3:44 pm: |
| 
|
भ्रमर, खरोखरच उत्तम लिखाण!
|
Kandapohe
| |
| Wednesday, August 16, 2006 - 10:52 pm: |
| 
|
भ्रमरा, खासच लिहीले आहेस. 
|
भ्रमा,खरोखर विचार करायला लावणारे लिखाण आहे.. आपण आपल्या मराठीपणाच्या आणि देशप्रेमाच्या उगा गमज्या मारत असतो पण अशी काही माणसे भेटली की आपण ओढलेले नकली मुखवटे गळुन पडतात आणि आपलीच आपल्याला लाज वाटते.. तुझ्या या अंतोनला आणि त्याच्या उच्च विचारसरणीला त्रिवार सलाम...
|
|
|