|
Psg
| |
| Thursday, August 17, 2006 - 12:53 am: |
| 
|
भ्रमर, छान लिहिले आहेस!
|
Meenu
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:11 am: |
| 
|
भ्रमा खरच सुंदर. आपण कमी पडतोय खरे ..
|
छान लिहीलेय रे भ्रमर. खरेच अशी माणसे मी पण पाहिलीयत. ख्रिश्चन लोक एकूणच धार्मिक, देवभीरू आणि सामाजिक भान असलेले असतात. वसई भागात तर खूप चांगल्या लोकांनी खूप कार्य केलेय. फादर फ़्रांसिस दिब्रिटो पूर्वी सकाळमधे ' प्रकाशाची पाउले ' नावाचे सुरेख सदर लिहायचे. त्या लेखांचे पुढे पुस्तक प्रसिद्ध झाले. फार सुरेख भाषेत आणि अतिशय जिव्हाळ्याच्या विषयांवर लिहितात ते.
|
भ्रमरा तुझ्या अंतोनला सलाम मला वाटत आजच्या तरूणाईने अंतोनचा आर्दश डोळ्यासमोर ठेवून Friendship Day आणि Valentine Day सारखेच स्वातंत्र दिन आणि गणतंत्र दिन साजरे करावेत...
|
मिलिंदा, खरेच मस्त लिहितोस तू. अजून लिही.. आपण नेमके कुठे चाललो आहोत? की, अंतोनसारख्या माणसांविषयी ऐकल्यावर ( नुसते वाचायला मिळाले तरीही? ) एवढे अप्रुफ वाटावे.. SM, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं लिखाण मीही वाचतो. खरेच चांगले लिहितात ते.
|
फादर फ्रान्सिस दिब्रिटो किवा मार्कुस डाबरे ह्या खरच महान व्यक्ती आहेत. दिब्रिटोनी तर येशुची शिकवण आणि तुकारामांचे अभंग यातील साम्यस्थळे दाखवणारे छान लेख लिहिले आहेत
|
Gs1
| |
| Friday, August 18, 2006 - 3:20 am: |
| 
|
भ्रमरा, उत्तम कथा. अंतोन मनापासून आवडला. अशा अंतोनचीच आज फार गरज आहे.
|
Gs1
| |
| Friday, August 18, 2006 - 3:47 am: |
| 
|
पण इथे जे दिब्रिटो, डाबरे यांच्याबद्दल लिहिले आहे ते अर्धसत्य आहे. माझ्या काही कामानिमित्त यांचे एकूण काम अभ्यासण्याशी माझा जवळून संबंध आला आहे. अगदी दिब्रिटोंच्या 'सुवार्ता' मासिकाचाही मी गेली चार वर्षे नियमित वाचक आहे. ( कुठली सुवार्ता ते सांगायला नकोच) वेळेअभावी आणि इतर सकारात्मक लेखनाच्या आणि कामाच्या प्रायॉरिटिज आहेत म्हणून, नाहीतर मी यांना एक्सपोज करणारा संदर्भासहित तपशीलवार लेख नक्की लिहिला असता. पण एवढेच सांगतो की जे वर वर दिसते तो देखावा आहे. शक्य झाल्यास तुम्हीच थोडे खोलात जाउन पहा वास्तव काय आहे ते, ही विनंती. सर्वसामान्य भोळे ख्रिश्चन आणि चर्चचे अधिकारी कर्मचारी यात फार मोठा फरक आहे. भाषा, संस्कृती बद्दल एक मुद्दा... (१)स्थानिक भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर व प्रसार, (२)स्थानिक संतांशी सोयीस्कर तेवढे साधर्म्य शोधणे (उदा दगडात देव नसतो सारखे वाक्य सर्व संदर्भ सोडुन उचलणे) (३) आणि प्रार्थनेच्या वेळचे स्थानिक रितीरिवाज यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यामागे कुणाचीही वैयक्तिक आवडनिवड नाही तर बरेच विचारमंथन होउन धर्मांतराचे काम प्रभावीपणे करण्यासाठी ठरलेली एक documented strategy आहे, जी भारतातल्या सर्व धर्मप्रांतांना (डायोसेस) राबवायला सांगितली आहे. हा माझा अभिप्राय आहे. चर्चेचा उद्देश नाही.
|
Sanurita
| |
| Monday, August 21, 2006 - 5:00 am: |
| 
|
भ्रमर,खूपच सही आहे तुझे लिखाण.
|
Pinaz
| |
| Monday, August 21, 2006 - 7:43 am: |
| 
|
भ्रमर छान लिहिलेस रे. GS1 गोरवळकर गुरुजी सोडून कुणीच चांगले नाही का हो जगात? दिवा घ्यालच.
|
Sorry रे मिलिंद, मी वाचायला इतका वेळ लावला आणि तू इथे लिहिलयस हे मला कळलच नाही. आणि मधे इथे पण V & C सुरु झाल्याने मी यायच सोडलं होत पण नशीब आजतरी आले . मस्तच लिहिलयस. खरच आपल्याला स्वातंत्र्याची काही किंमत राहिलेली नाही. आणि असे लोक भेटले की आपल्याला एकदम जाग येते. असो. हेही नसे थोडके !! लिहित रहा, पहिला प्रयत्न खासच! श्रुती / स्मिता
|
Chinnu
| |
| Tuesday, August 22, 2006 - 1:57 pm: |
| 
|
.... छान लिहीलस भ्रमरा!
|
|
|