|
Peshawa
| |
| Friday, August 11, 2006 - 1:37 am: |
| 
|
अस एक गाण वेळी अवेळी जाग होत आणि मग जोजवता जोजवता चांदण्यांच्या कवेत अलगद कस सोडुन जात... चांदण्यात हरवण्याच एक बर असत ठेच, खड्डा, दगड, सगळच चण्देरि असत! वाट फ़ुटेल तिकड स्वप्नांचच गाव लागत! पाणी गोजिरवाण वैगेरे भुंगे भ्रमर वैगेरे बटा मुजोर वैगेरे शब्दांचही चांगलच फावत.... अस एक गाणा वेळी अवेळी जाग होत... आणि जोजवता जोजवता चमचमत्या मुंग्यात फ़ेकून देत...
|
अस्मानी छान! गोविंदाग्रजांची आठवण झाली. " क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा! निनावी सुरेख़च! तुझं तुझ्याच कवितेच आस्वादक रसग्रहण-ख़ूप छान! आणि वर एक सुरेख़शा कवितेचा बोनसही! माझे तर शब्दच संपले. केवळ अ!!!!!!!!प्र!!!!!!!!ति!!!!!!!!म! ला!!!!!ज!!!!!!!!वा!!!!!!!!!ब! निनावी "तोहरा तो जवाब नही " पेशवा पारु छान चाललंय.
|
Puru
| |
| Friday, August 11, 2006 - 1:54 am: |
| 
|
पेशवा पारु छान चाललंय. >>> अरे, अरे! ते पारु नाही, पुरु आहे हो
|
Peshawa
| |
| Friday, August 11, 2006 - 1:56 am: |
| 
|
' चिमार ' ही गाठ शब्दाला आलेली (अस एक मत) व्यकत करण्याकरता तिलाच पुढे धरा व्याकरणत ती बसत नाही... कुठेतरी बसावा असेही नाही एखादे चिंब भारले पण एखाद फ़ळासारख दुक्ख ह्यांच्या तळव्यावर ठेवण्यास उत्सुक आहे बिया कोया पाने फ़ुटणारी मुळे झारी धरणारे हात गंजलेले पण सर्वव्यापी ह्यांचया कुळातिल. ..कदाचित - पण माहीत नाही! ' चिमार ' ही परंपरा आहे आत्मसात करून स्वत्: रंग होउन ओतुन घेण्यास आसुसण्याची.... कदाचीत पण तेही मला नक्की माहीत नाही...
|
सॉरी मला माझ्या वाचण्यात चूक झाली पुरु ची पारु झाली. उ च्या ऐवजी आ झाला तर असा गोंधळ होतो. सॉरी. मनिषा
|
peshava tU du:Ka ase lihee
|
Jayavi
| |
| Friday, August 11, 2006 - 2:11 am: |
| 
|
वा.... इथल्या कविता सुरेख फ़ुलताहेत निनावी, तुस्सी ग्रेट यार! अप्रतिम कविता! पेशवा, बर्याच दिवसांनी! सगळेच सही लिहिताहेत.
|
पेशवा, चिमार नाही झेपली आता.. छानच आहे.. गाणंही मस्त.. निनावी कुणास ठावूक सुरेख आहे अस्मानी, पुरू उत्तम कविता
|
जय+अवि आपण बोलुया आत्ता याहूवर
|
निनावी केवळ अप्रऽऽऽऽऽऽतिऽऽऽ.ऽम!!! सगळिच कडवी सुन्दर!! पेशवा,पुरु, अस्मानी अतिशय छान!!!
|
निनावी ..... पॉझिटिव टू निगेटिव्ह किंवा vice versa बर्याच कविता वाचनात येतात पण ही तुझी कविता तिथून पुढे जाते आणि पुन्हा पॉझिटिव्ह होते ... एक क्षितिज अलिकडे न थांबता पलिकडे गेली आहेस तू ... and whats more? the BEST is yet to come. WAITING !!! पेशवा ... एक गाणं आवडली
|
Peshawa, Too Good! Bapu
|
Bairagee
| |
| Friday, August 11, 2006 - 6:49 am: |
| 
|
ही कविता नाही हे शोभिवंत शब्दांचे गुच्छच सारे झेंडू, चाफा, लिली, डॅफडिल आणि अबोली दुरून सारे टवटवीत पण भिडस्त, कृत्रिम पुष्पवृंद हे ही कविता नाही हे शोभिवंत शब्दांचे गुच्छच सारे सुगंध आहे यांचा मोहक पॉलिप्रॉपलिन मुदित, प्रफुल्लित यांची काया खतपाण्याविन मलूल यांना कधी पाहिले नाही कोणी पण फुलताना कधी पाहिले आहे कोणी? ही कविता नाही हे शोभिवंत शब्दांचे गुच्छच सारे दुरून सारे टवटवीत पण भिडस्त, कृत्रिम पुष्पवृंद हे ........ बैरागी
|
बैरागी, अगदी अगदी.. पण, खरी फ़ुलेही उमलतातच.. तुमचे हे फ़ुल सुरेख!!!!
|
Chinnu
| |
| Friday, August 11, 2006 - 9:01 am: |
| 
|
>>चांदण्यात हरवण्याच एक बर असत ठेच, खड्डा, दगड, सगळच चण्देरि असत! वाट फ़ुटेल तिकड स्वप्नांचच गाव लागत! सुरेख लिहीलत पेशवा! चिमार डोक्यावरुन गेली तरीही शेवटल्या ओळी आवडल्या. पुरु तुमचा हुंदक्यांचा पाउस मस्त. शेवट छान. अस्मानी, बैरागी छान.
|
Ninavi
| |
| Friday, August 11, 2006 - 11:14 am: |
| 
|
पेशवा, गाणं छान आहे. बैरागी, असं वाटतं खरं कधी कधी. प्रतिक्रियेसाठी सर्वांना धन्यवाद, दोस्त्स. वैभव, अबब! एवढी मोठ्ठी compliment !! तुझ्याकडून!! माझे पाय जमिनीला लागायला आता किती दिवस लागतील.. ' कुणास ठाऊक'. भेटूच. 
|
Saurabh
| |
| Friday, August 11, 2006 - 12:41 pm: |
| 
|
कुणास ठाऊक - बहोत खूब निनावी! जियो!
|
Dineshvs
| |
| Friday, August 11, 2006 - 1:19 pm: |
| 
|
हल्ली बर्याच दिवसानी निनावि कडुन कविता आलीय. आणि आता म्हणे दोन आठवड्याने भेटु. ईथे काय कॉम्प्युटर्स नाहीत कि नेट नाही. सहज कीबोर्डावर बसलं तरी छान लिहु शकणार्या माणसाने, अश्या सबबी सांगाव्या का ?
|
कवितांच्या या राज्यात अशी अचानक शांतता का आली बरे?
|
ओंजळ माझ्या ओंजळीत तुझी ओन्जळ तुझ्या ओंजळीत माझी.. माझ्या ओंजळी दान तुझे अन तुझ्या ओंजळी माझे.. मी तुला द्यावे पुन्हा घेण्यासाठी तुही ते घ्यावे मला देण्यासठी घेणे देणे.. सगळेच निमित्त एकमेकांचे असण्याचे.. ठेवते निरन्तर वहावत नाते आपले प्रेमाचे माझ्या ओंजळी, तुझा एक हात, एक माझा तुझ्या ओंजळी, माझा एक हात, एक तुझा.. आपण असेच एकमेका देत घेत रहावे.. अन वेचत वेचत प्रेमफ़ुले ही मन तुझे माझे ओंजळ ओन्जळ व्हावे.
|
|
|