बर बर ग मूडी, बास तर बास! (मला तरी वेळ कुठ हे? पण हे जरा जास्तच झाल म्हणुन आलो!) मृदगन्धा, तुला थॅन्क्यू, पण ह्या पोस्ट्स उडणार बहुतेक!
|
Ludabuda
| |
| Thursday, August 10, 2006 - 7:05 am: |
| 
|
मनिषाबाई तुमची कविता दोन वेळा वाचली. अर्थ कळला आमची चूक झाली. आम्ही आपले वरवरच पहात होतो. आपली कविता कळली आमची चूक एकदम कबूल आम्ही आपली दोन्ही हात जोडुन माफी मागतो मात्र इथे आमची चूक कळल्याने माफी मागतोय.पण आम्ही आमचा टीका करण्याचा हक्क शाबुत ठेवला आहे. काय रे लिंब्या तू का भांडतोस माझ्याशी? तुझे माझ्याशी काही जुन वैर नाही ना? पुन्हा भेटु.
|
>>>>> काय रे लिंब्या तू का भांडतोस माझ्याशी? छ्याऽऽ छ्याऽऽऽ, भान्डतोस वगैरे अपशब्दान्ची भाषा करु नकोस बरे! याला आमच्यात "चर्चा" म्हणतात बरे! अन तुह्याशी वैर कसलेरे? वैर धरायला माझा तुह्याशी आधीचा घनिष्ठ सम्बन्धही नाही! नव्हता! तेव्हा सोडुन दे तो विचार मनातून! DDD
|
Bairagee
| |
| Thursday, August 10, 2006 - 7:18 am: |
| 
|
इंद्रधनुच्या कडेकडेने अन किरणांच्या पडद्या आडुन मन्द लालसर सायंकाळी वारा सुटला उन्हे हरपली जशी पाऊले तुझी वाजली छान. आदित्य.
|
Ludabuda
| |
| Thursday, August 10, 2006 - 7:33 am: |
| 
|
जेथे जातो तेथे लिंब्या पाठलाग करी
|
Chinnu
| |
| Thursday, August 10, 2006 - 9:18 am: |
| 
|
अमेय मस्त रे. अदित्य, देवा छान. पेशवा खुप छान. एक लाट अर्धी अर्धी वाटुन कशी घ्यावी- वाह!! सुरेख! निनावी अजुन वाचली नाहिये व्यवस्थीत. पण सारंग तुम्ही आणि बापु अशीच चर्चा घडु द्या. आम्हाला शिकावयास मिळते! बाकी लिंबुभाव चालु द्या तुमचं!
|
Ninavi तुझी सूचना- लुडबूड बद्दलची- अगदी योग्य आहे. असल्या वावदूकांकडे साफ दुर्लक्षच करणे चांगले. गल्लींतल्या निष्कारण भुंकणार्या कुत्र्यांकडे कुठे आपण लक्ष देतो? आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची त्यांची केविलवाणी धडपड चालूच असते. चालू द्या. कोणीतरी लक्ष देतय म्हटलं की आणखीनच चेकाळेल तो लुडबूड. -बापू.
|
Asmaani
| |
| Thursday, August 10, 2006 - 12:44 pm: |
| 
|
आदित्य, cute कविता. लिम्बू, झकास!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
Asmaani
| |
| Thursday, August 10, 2006 - 3:21 pm: |
| 
|
माझा हा अजून एक प्रयत्न----- प्रकाशाचा एक कवडसा पुरेसा असतो, युगायुगांचा अंधार निष्प्रभ करायला उन्हाची एक तिरिप पुरेशी असते, दाटलेलं मळभ दूर करायला. गाण्याची एक तान पुरेशी असते, आनंदाच्या लहरी जागवायला स्मिताची एक लकेर पुरेशी असते, मनामनांतलं अंतर मिटवायला तसाच अगदी तसाच, प्रेमाचा एक क्षण पुरेसा असतो, विरहाचे अनंत क्षण विसरायला.
|
Asmaani
| |
| Thursday, August 10, 2006 - 3:46 pm: |
| 
|
निनावी, "एकटा" चा अर्थ मलाही जरा detail सांगशील का? कविता कळली आहे असे वाटतेय आणि नाहीही. जरा confusion आहे. मेल ऐवजी इथे या ठिकाणीच सांगितलेस तर सगळ्यांनाच समजेल. thanx
|
Ninavi
| |
| Thursday, August 10, 2006 - 4:43 pm: |
| 
|
दोस्त्स, एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी. मला स्वतःला दुर्बोध कविता वाचायला आवडत नाहीत. आणि लिहायलाही. जर माझी कविता सहज कळत / भिडत नसेल तर ते तिचं आणि पर्यायाने माझं अपयश समजते मी. असो. ' एकटा' चा मला अभिप्रेत असलेला अर्थ : गर्दीत असूनही एकटा (एकाकी) असणार्या माणसाची ही कैफ़ियत आहे. मला वाटत पहिल्या दोन द्विपदी तर straightforward आहेत. तेव्हा त्याबद्दल बोलत नाही. 'रोज आसवे....... रंगती किती' : आयुष्यातले बरे वाईट अनुभव घेण्यात रमून गेलेली माणसं अवतीभोवती खूप दिसतात. आसवं - सुखाची वा दुःखाची - झोकून झिंगणारे आणि त्यात रंगून गेलेले हे लोक. निवेदक मात्र हे सगळे अनुभव घेतो, पण त्यात रमत नाही. त्या आसवांची नशा त्याला चढत नाही. कसलीतरी पोकळी आहे.. कसली ते समजत नाही. कश्याने भरेल ते ही कळत नाही. 'उरी झेलतो.........माना डोलविती' जगताना जे घाव सोसतो त्यातून शब्दांची शिल्प घडवतो. - याची अलिप्तता एखाद्या पाषाणासारखी.. काव्य रचता यायला त्या अनुभवाकडे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आपल्याच मनोव्यापारांकडे काहीश्या त्रयस्थपणे पाहता येण आवश्यक असतं ना? आणि मजा म्हणजे एकदा ही शब्दांची शिल्प घडवून झाली की आंधळे (जे ती अभिव्यक्ती खर्या अर्थी appreciate करू शकत नाहीत) चोर (मुळात घाव घालणार्यात हे ही आहेतच बहुतेक.. आणि तयार झालेल्या शिल्पावरही त्यांचा डोळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही) त्याला ' वा वा' म्हणतात. (अर्थाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून ??) 'सूख जाहले......त्यांची प्रीती' ( हे सारंग आणि बैरागी यांच्या सूचनेप्रमाणे ' सुखे जाहली बटीक त्यांची' असं वाचावं.) त्यांचं सूखही हे अस मोली विकत घेतलेलं. आणि त्याचा त्यांना तुच्छतापूर्ण दर्पही असावा. आज आहेत.. कदाचित उद्या नाहीत अश्या प्रकारचे हे भोग. त्या उलट ह्याची वेदना पतिव्रतेसारखी.. याला कोणत्याही काळी सोडून जात नाही. म्हणून याने रचलेल्या सगळ्याच कवनांमध्ये तिचं रूप दिसत रहातं. हुश्श!!!
|
Ninavi
| |
| Thursday, August 10, 2006 - 5:16 pm: |
| 
|
आता आपली भेट दोन आठवड्यांनी. तोवर.. कुणास ठाऊक.. मला अजून आठवतंय.. अगदी परवा परवापर्यंत ओठांच्या कोपर्यात एक गोड गाणं लपलं होतं.. कुठे गेलं कुणास ठाऊक.. आणखीदेखील बरंच काही जिवापाड जपलं होतं.. शोभिवंत नसेलही.. नसेना का.. ' आपलं' होतं.. कुठे गेलं कुणास ठाऊक.. खळखळतं हसू होतं.. वाटूनसुद्धा उरणारं एक वेडं मन होतं तुझ्यासाठी झुरणारं आनंदाची फुलपाखरं अलगद हाती उतरायची पुन्हा दूर गेली तरी रंग तिथेच विसरायची.. हार काय.. जीत काय.. सारं कसं निखळ होतं डोळ्यांमधे दाटणारं पाणीसुद्धा नितळ होतं.. ते मन.. ते हसू.. ते रंग.. ते आसू.. मोरपिसासोबत सारं पुस्तकात जपलं होतं.. शोभिवंत नसेलही.. नसेना का.. ' आपलं' होतं.. कुठे गेलं कुणास ठाऊक.. शेवटचं आठवतंय तुझ्या हातात दिलेलं आणि हिशोबात कमी म्हणून तू परत केलेलं ' रंग बिंग बरे आहेत.. पण चित्र काही खास नाही याला अमुकची चव नाही.. त्याला तमुकचा वास नाही..' तुझी तहान वेगळी होती.. माझा पाऊस वेगळा होता तुझ्यासाठी कमी, तरी माझा तेवढाच सगळा होता.. म्हणूनच तू नाकारलंस तरी मी ते जपलं होतं शोभिवंत नसेलही.. नसेना का.. ' आपलं' होतं.. कुठे गेलं कुणास ठाऊक.. पण हल्ली.. हल्ली तसलंच गोड गाणं फुटतं एका गळ्यातून तसलंच वेडं हसू सांडतं गालावरच्या खळ्यांतून फुलपाखरू त्याच्या हाती अलगद येऊन बसतंय माझं हरवलेलं मोरपीस.. त्याला मिळालेलं दिसतंय....
|
Mrinmayee
| |
| Thursday, August 10, 2006 - 5:51 pm: |
| 
|
निनावे, निनावे!.. काय गं गोजीरवाणी कवीता केली आहेस. इतकी आवडली की मी पाठ करतेय पुन्हा पुन्हा वाचून!
|
Chinnu
| |
| Thursday, August 10, 2006 - 8:02 pm: |
| 
|
निनावी, तुला जे काय हवं ते बक्षिस ग! खुप सुंदर. तुझी सहज सुंदर कविता जर कुणाला कळत नसेल, तर ते वाचणार्याचे दुर्भाग्य! तुझे अपयश वगेरे काही नाही.
|
Asmaani
| |
| Thursday, August 10, 2006 - 9:34 pm: |
| 
|
निनावि, अपयश वगैरे काही नाही ग! उगीच नसते गैरसमज करुन नको घेउस. आणि "कुणास ठाऊक" बद्द्ल बोलायला शब्दच नाहीत. केवळ अप्रतिम!!!!!!!!!. वाचता वाचता डोळ्यांत पाणी कधी आलं कळलंच नाही.
|
Kandapohe
| |
| Thursday, August 10, 2006 - 11:04 pm: |
| 
|
निनावी, `कुणास ठाउक` उत्कृष्ठ!! 
|
Meenu
| |
| Friday, August 11, 2006 - 12:39 am: |
| 
|
निनावी सुंदरच गं कुणास ठाऊक
|
>>>तुझी तहान वेगळी होती.. माझा पाऊस वेगळा होता - अप्रतीम! निनावी, अगदीच वंडरफ़ूल आहे "कुणास ठाऊक". "ऑस्सम", "अमेझिंग" हे नक्की कधी म्हणावं नीट कळत नव्हतं आत्तापर्यंत पण हेच हेच ते नक्कीच... खरंच पुन्हा पुन्हा वाचली तरी अजून वाचावीशी वाटतेय. खूप खूप आवडली. पाडगावकरांच्या "बोलगाणी" मधल्या कवितांची आठवण झाली थोडीशी.
|
Seema_
| |
| Friday, August 11, 2006 - 1:07 am: |
| 
|
मस्त निनावी , परत परत वाचाविशी वाटती आहे कविता . छान जमुन गेली आहे .
|
Puru
| |
| Friday, August 11, 2006 - 1:13 am: |
| 
|
पाऊस कोसळतोय उन्मुक्त नाचणार्या अवखळ बालकासारखा तो थुई-थुई नाचतोय, विजेशी लपंडाव खेळत अलगद अवतरतोय! पाऊस कोसळतोय तृषार्त चातकाला संजीवनी देत दीठ लाऊन बसलेल्या बळीराजाच्या मनी आशेचे धुमारे फुलवित तप्त धरणीस न्हाऊ घालतोय पाऊस कोसळतोय चित्ताकर्षी कमलदली झेपावणार्या खट्याळ मधुकरासारखा आसुसलेल्या चारुदत्तासारखा वसुंधरेस चुंबतोय, पाऊस कोसळतोय तर कधी रात्रीच्या घन-तिमिरी एकलंपण अनावर होउन तप्त गाली विसावणार्या मूक हुंदक्यासारखा ठिबकतोय ... ... ... ... ... ... ... ... ... ... ... ..... पाऊस कोसळतोय! पाऊस कोसळतोय!!
|