Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 10, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » काव्यधारा » कविता » Archive through August 10, 2006 « Previous Next »

Ludabuda
Wednesday, August 09, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! छान! चांगलं आहे!
मरा मग आता


Ameyadeshpande
Wednesday, August 09, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान वाटतं आहे वाचायला सगळंच.

मनिषा तुझ्या मुखवटे वरून माझी एक जुनी कविता आठवली. बर्‍याच मागे एकदा टाकली होती परत टाकतोय. आशय थोडा वेगळा आहे पण मिळता जुळता.
इथला मूड आणखीच उदास करण्याचा हेतू नाहिये... हे केवळ क्षणिक असतं आणि तेवढच असावं... इथेही.

आता मी नाही राहू शकत ह्या स्वप्नांच्या जगात
मला बोचू लागले आहेत असंख्य काटे
कृत्रिम हास्यांचे...
पैशात मोजलेल्या प्रेमाचे...
मृत जाणिवांच्या प्रेतांचे...
खोटेपणाचे...खोल गेलेल्या जखमांचे...
ह्या जगातल्या स्वार्थाचे...
निरागसतेवर चढवलेल्या मुखवट्यांचे...
आता उरलाय तो फ़क्त मुखवट्यांवर मुखवटे रक्तबंबाळ झालेला एक कोवळा चेहरा.......
ज्यानी एके काळी पाहिलेलं एक स्वप्न
स्वत:ला वेगळ्या रंगात रंगवण्याचं...
येणार्‍या प्रत्येक दिवसातून नविन रंग शोधण्याचं...
माणसातील कोवळेपणा जागं करण्याचं...
त्या कोवळेपणात अलगद शिरून आपला ठसा उमटवण्याचं...
सगळ्यांच्या चेहर्‍यावर हसू बघण्याचं...
माणसातली माणुसकी जपण्याचं...
ह्या रंगांनी एक वेगळं चित्र साकारण्याचं...
मुक्तपणे जगण्याचं...
कधी दु:ख पेलून कधी आनंद झेलून तर कधी सल ठेऊन.......
पण आता सूर्य मावळतीला गेलाय अन फ़ुलंही कोमेजून आली आहेत...
हाती उरलाय तो फ़क्त निवडूंग


Bairagee
Wednesday, August 09, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी,

असा भोवती सदा गराडा, सदा मैफिली जमलेल्या
कसा जुळेना सूर कुठेही.. किती साज, आवाज किती

सुंदर. कविता छान आहे. ¨सुखे जाहली बटीक¨ कसे वाटेल?


Asmaani
Wednesday, August 09, 2006 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लुडबुड, ज्यात आपल्याला काही गम्य नाही तेथे लुड्बुड करु नये. आणि लुडबुडायचेच असेल तर सभ्यतेच्या काही किमान मर्यादा पाळाव्यात.

Sarang23
Wednesday, August 09, 2006 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण नको त्या गोष्टींना महत्त्व देण्याचं टाळू शकतो का?

लुडबूड या शब्दाचा अर्थच नको तिथे, नको तेंव्हा, नको तसे, नको तितक्या वेळा, नको असलेलं आणि नको नको करणारं अस जे नाक आहे ते खुपसणं!!!

आणि असही कोणीतरी असावं, मग आपण अधिकाधिक चांगल्या कविता करू शकतो. उदा. वैभवची, श्रीयुत समिक्षक यांना प्रत्युत्तरादाखल आलेली कविता!

श्रीयुत लुडबुडे, जास्त बोललो असल्यास क्षमस्व. पण माणसाने शक्य तितका असभ्य शब्दांचा वापर टाळावा. आपल्या पहिल्या प्रतिक्रीयेबद्दल कोणीही (स्वतः कवयित्रीने देखिल!) आक्षेप घेतला नाही, पण ते... "मरा आता..." असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही एवढीच जाणिव करून द्यावीशी वाटली.

बाकी निनावी... बटिक चा अर्थ जरी दासी असा होत असला तरी आपण बटिक झाले किंवा दासी झाले असच म्हणावं लागेल... कारण त्यांचे हे अनेकवचन आहे आणि सूख हे नपुंसकलिंगी आहे!(ते सूख)
बाकी चूकत असल्यास जाणकारांनी खुलासा करावा.
आणि तस बटिक झाली हे ही चूक आहे अस नाही...
कवितेवर सविस्तर चर्चा मेलने होइलच.


Adya
Thursday, August 10, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पहिली कविता पोस्ट करतो आहे...

चाहुल...

इंद्रधनुच्या कडेकडेने अन किरणांच्या पडद्या आडुन
मन्द लालसर सायंकाळी वारा सुटला उन्हे हारपली
जशी पाऊले तुझी वाजली

पानांवर ओझरते पाणी हबकले जागीच थबकले
कुठे पडावे कुठे वहावे वाट दिसे पण अर्थ खुंटले
क्षणार्धात पानापानातुन नाजुक सळसळ झाली

वारा धावे सैरावैरा, भान नसे त्याला क्षितिजाचे
वीज डोकवी दाट ढगांतुन, आभाळाचे करुनी खाचे
थेंब निघे मग तुझ्या स्वागता जशी चाहुल तुझी लागली

फुले तयांची करती उधळण, भ्रमरही घिरट्या घाले
ओल्या हिरव्या रस्त्यांमधुनी मातीचाही गंध दरवळे
रंग गंध अन फुला फुलावर तुझीच जादु ज़ाली

दुर वळणावर भिजलेलि दिसलीस तू हसलीस तू
वादळ शमले अर्थ उमगले सरले सावट फुटले हासु
रंगंची लेऊनी झालर सांज मन्मनी हसली
फुटला मोहोर, कळी उमलली जशी पाऊले तुझी वाजली

आदित्य



Adya
Thursday, August 10, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार
चाहुल ही पहिलिच कविता इथे टाकली आहे.


Peshawa
Thursday, August 10, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


डोळ्यात रुतु पावसाचे
ढगाआड उन - हसु ओठांवरचे?

कळेना वळेना पंख निळ्या फ़ुलपाखराचे - जपण्यास दिलेस का?
पान पान उतरवूनी आलो स्पर्शाकाठी तुझ्या
मेंदी ओले हात वणवा जपतात म्हणतेस का?

एक लाट अर्धि अर्धि कशी वाटुन घ्यावी?
ही चोरपावलांची भाषा नकळत उमलून यावी...
स्वर बघ दारापाशी सुया घेउन आले
हे दोन पावली अंतर एकदम वयात आले!

डोळ्यात म्हणे रुतु पावसाचे
गहिवरातले चंद्र भेटित न्हाले!



Devdattag
Thursday, August 10, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


भविष्य..
फुटले हसु पुन्हा ते
किणकिणल्या काही काचा
वाजती नाणी काही
घेई विकत पायीच्या खाचा

ही ओंजळीतली वादळे
करी साफ कुणाचा चेहरा
कधी दगड पाठीखाली
एक रंग चढवितो गेहरा

कधी अर्धी भरेल खळगी
स्वप्ने रोज रातची भाषा
ठरवतात भविष्ये ऐसी
त्या आसुडावरच्या रेषा


Ludabuda
Thursday, August 10, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बी तुमच्यात येऊ द्या की रं
मला बी कविता करु द्या की रं

माझी लुडबुड खपवून घ्या ना
माझी मते समजुन घ्या ना
नेहमीच गोडगोड ऐकता तुम्ही
कधीतरी ख़रख़ुर ऐकुन घ्या रं
मला बी कविता करु द्या की रं

याच्या कवितेवर कवितेवर त्याची दाद
त्याच्या कवितेवर याची दाद
एकमेकांची स्तुती करता फ़ार
कळतं का त्याच्या कवीतेच सार

उर्वरित कवन तुमच्या उर्वरित टोमण्यांनंतरसाठी राख़ून ठेवतो आहे
आपल्या कवितेकडे त्रयस्थ्पणे एकदा पहा
त्यातील गुणदोष जाणा
आपल्यात सुधारणा करा

इथे दिवे घेऊ नका

आपला अप्रिय
लुडबुड


Limbutimbu
Thursday, August 10, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हंम! लुडबुड्या, बुडबुड्याप्रमाण फुटुन फुटुन पोस्टू नगस! काय समजले?
बीयरच्या फेसातल्या बुडबुड्यान्प्रमाणे लुडबुडूही नकोस! फुन्कुन फुन्कुन समदे बुडबुडे हवेत उडवीले जातील, काय समजले? DDD
बुडबुडा म्हणल की मला "विर्‍हाड निघालय लन्डनला" का आठवतय?


Ludabuda
Thursday, August 10, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे लिंब्या अरे टिंब्या येथे सभ्य लोक असतात[ असे त्यांचे स्वत: चेच मत आहे त्याला कोण काय करणार?]
त्यामुळे बियरची--[-लाळ गळू लागली माझी]
अर्थात अपेयपानाची भाषा करु नकोस बरे


Mrudgandha6
Thursday, August 10, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लुडबुडकर,
इथे स्तुती केली जाते ती काही उगाच नव्हे.. खरोखर भावतात कविता म्हणुनच केली जाते. एखद्याचे शब्द आवडतात एखद्याचा भाव.एखाद्याची कल्पना.. केवड्याच्यी पाने काटेरी असतात.. पण निसर्ग त्याचा सुन्गन्धच फ़क्त घेतो.. त्याच्या सुगन्धाकडे दुर्लक्ष करुन "केवळ" त्याच्या काट्यांकडे बघने हा शुद्ध मुर्खपणा आहे.. आयुष्य सुन्दर करा..
आणि तुम्हाला समिक्षा करायचीय ना.. तुमचे स्वागतच आहे.. पण "मरा आता " ही कुठल्या प्रकारची समिक्षा???
तुम्ही समर्थांच्या" टवाळा अवडे विनोद" त्या टवाळखोर पठडीतले आहत काय? कारण तुम्हाला इथे कवितेवर चर्चा करण्यापेक्षा एखद्याचा असभ्यपणे अपमान करण्यात जास्त स्वारस्य दिसतय..
"आपल्या कवितेकडे त्रयस्थ्पणे एकदा पहा
त्यातील गुणदोष जाणा
आपल्यात सुधारणा करा "" असे तुमचे म्हणने आहे ना..??
"मरा आता" म्हणन्याने कुठली सुधारणा होते कवितेत ते मला एकदा सांगितले तर बरे होइल.. नाही तुमच्याकडे सुधारण्याचा मक्ता दिलाय(?) म्हणून विचारतेय.
दुसरे असे की एका दिवसात किती कविता टाकव्यात याबबतित इथे काही लिखित नियम आहे का?? तसे टाकता येत नसेल असा नियम असेल तर तुमच्या बोलण्याला कही तथ्य उरेल.. तसा असल्यास सांगणे.. कारण मला कुठे निदर्शनास आलेला नाही..

"कोल्ह्याला द्राक्षे आंबट " असतात.. तुम्ही कोल्ह्यासरखे..उगाच द्राक्षांना आंबट म्हणाल तर ती काही समिक्षा होत नाही. त्यामगे काहीतरी तथ्य ठेवा म्हणजे झाले.




Limbutimbu
Thursday, August 10, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> याच्या कवितेवर कवितेवर त्याची दाद
लुडबुड्या, कवितेवर हा शब्द चुकुन दोन्दा आला हे, सुधार
>>> त्याच्या कवितेवर याची दाद
तुझ्या पोटात का दुखत? ताबडतोब ओवा खा किन्वा आयुर्वेदाच्या बीबीवर जाउन पन्चकर्मातील वमनक्रिया शिकुन घे.... (अरे अरे अरे इथ काय काढतोस घशात बोटे घालुन? जा तिकड मोरीत जा, अस्वच्छ गचाळ कुठचा!) DDD
>>> एकमेकांची स्तुती करता फ़ार
करणारच, निन्देचा आख्खाच्या आख्खा ठेका तू घेतला हेस ना!
>>> कळतं का त्याच्या कवीतेच सार
तुला कळ्ळ असेलच, मग ते सार भातावर घालुन गीळ DDD

Manishalimaye
Thursday, August 10, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय,
आता सुर्यही मावळतीला................


पण ' रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल '
आज फुलं कोमेजली तरी उद्या नवी ताजी टवटवीत येतीलच की
निवडुंगालाही छान छोटीशी फुल येतातच!



असो पणा छान आहे.


Limbutimbu
Thursday, August 10, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> माझी लुडबुड खपवून घ्या ना
मधी मधी मधी कडमडलास तर चुकुन पेकाटात बसेल, खायची तयारी ठेव नाऽऽ! DDD
>>> माझी मते समजुन घ्या ना
विलेक्शनला अजुन बक्कळ टेम हे
>>> नेहमीच गोडगोड ऐकता तुम्ही
तू ऐकू नको हां! नायतर तुलाच "डायबेटीस" होईल! ,की आधीच झाला हे? DDD
>>> कधीतरी ख़रख़ुर ऐकुन घ्या रं
च्यामारी, रेडीओची खरखर तुह्या नरड्यात कशीकाय घुसली? जाऽऽ आयुर्वेदाच्या बीबीवरुन खरखरीवरच औषध घे
>>> मला बी कविता करु द्या की रं
तू कविता करतोस? करणारेस? तुला "कविता" होणारे? (दचकून ओरडत ओरडत)
अरे पळा पळा, कुणीतरी जाऊन डॉक्टला बोलवा, आॅम्ब्युलन्स बोलवा!
अरे आत्ता या कर्माला काय म्हणाव? तो गुरान्चा डॉक्टर कशाला बोलीवलास? मॅटर्निटीवाल्याला बोलीव!
DDD


Mrudgandha6
Thursday, August 10, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक.. तुम्ही "लुडबुड" हे टोपण नाव घेण्या पेक्षा "सुधारक " असे काही तरी ठेवायचे ना..?? नाही एक सुचवतेय फ़क्त.. ते तुमच्या intention प्रमाणे होइल.. तुम्ही इथे सुधारणेच्या शुद्ध हेतुने आला अहात म्हणुन..

Mrudgandha6
Thursday, August 10, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!वा!! LT एकदम सही!!!

Moodi
Thursday, August 10, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या बास कर रे, हसून हसून डोळ्यात पाणी आले.

Manishalimaye
Thursday, August 10, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो लुडबुड तुम्ही मलाच म्हणताय ना?
पण कवितेचा शेवट पहा

तुमच्याशी अधिक बोलण्याची गरज वाटत नाही.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators