|
सुमतीताई, खूप धन्यवाद.. चिनु, तुलाही धन्यवाद बर्याच दिवसांनी post केल्या.. तुम्हा सर्वांचही छान चललय..खुप सुन्दर कविता लिहिताहेत सगळे..
|
Shyamli
| |
| Tuesday, August 08, 2006 - 10:44 am: |
| 
|
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मंडळी.... नीराशावादि वगैरे नाही.... खर तर शेवटच कडव नव्हतच.... श्या उगाच टाकल.... 
|
श्यामली, उगाच काही नाही.. ..त्या ओळींमुळे त्याला गहिरा अर्थ प्राप्त झालाय. असुदेत आहे तसेच..
|
Chinnu
| |
| Tuesday, August 08, 2006 - 1:30 pm: |
| 
|
श्यामली छान आहे ग कविता!
|
Shyamli
| |
| Tuesday, August 08, 2006 - 1:51 pm: |
| 
|
मृ नाहि ग बदलत राहु देत्ये... चिनु धन्यवाद ही घ्या जराशि गम्मत.....मीनुच्या चरोळिवरुन पुढे... विसरतोय असं वाटता वाटता रस्त्यामधे दिसावं >>> अचानक तुझ ते रस्त्यात दिसणं अनावधानानी(च) ओळखीच हसणं... आणि मग लक्षात येताच गोंधळुन जाणं जाणिव पुर्वक चेहरा कोरा करायचा प्रयत्न करण... जमत नाहिये हे समजुन कावरं बावरं होण माझं मानशिच खुदकन हसण... कशि मज्जा आलि म्हणुन जरास सुखावणं मज्जाच आहे बाहेर पाउस रंग बदलतोय ............................ पण तुला नाही रे जमत अजुनहि पटापटा चेहर्यावरचे भाव बदलणं अजुन जरा प्रॅक्टिस हविये... जमेल तुलाही........... ............... हळु हळु श्यामली!!!
|
Ninavi
| |
| Tuesday, August 08, 2006 - 4:26 pm: |
| 
|
अरे वा. छान लिहीतायत सगळेच. 
|
Ninavi
| |
| Tuesday, August 08, 2006 - 4:26 pm: |
| 
|
एकटा तसा नसे मी इथे एकटा किती सखे सोयरे किती तरी कोणती उरी पोकळी खोल खोल घालते भिती असा भोवती सदा गराडा, सदा मैफिली जमलेल्या कसा जुळेना सूर कुठेही.. किती साज, आवाज किती रोज आसवे पिऊन देखिल नशा कशी ना चढे मला किती झोकती, किती झिंगती, तरी त्यात रंगती किती उरी झेलतो घाव, घडवितो नवीन शब्दांची शिल्पे आणि आंधळे चोर तयांना बघून माना डोलविती सूख जाहले बटिक तयांची, जखमा माझ्या पतिव्रता सगळ्या माझ्या कवनांमध्ये दरवळते त्यांची प्रीती..
|
Meenu
| |
| Wednesday, August 09, 2006 - 12:26 am: |
| 
|
वा निनावी .. श्यामली छान
|
श्यामली कशाला जमवायल हवे हळु हळु? .. असुदेत ना तसाच.. त्यातच तर तुला मजा येतेय ना?
|
आशा निराशा,सुख दुःख यांनी माणसाला आज घेरलय खरं.. .. पण त्याला कारण तोच आहे. जरा वेगळे जगुन पाहिले तर.. जगणं खुप सुन्दर आहे तसे एकदा जगुन तर पहा... इन्द्रधनुचे रंग गहिरे त्यात एकदा रंगुन तर पहा.. केव्हाचे उत्सुक आहे आकाश घेण्यास आपणा कवेत त्याच्या अवकाश केवळ हात उंचावण्याचा हात एकदा उंचावून तर पहा.. कधीचा आत हृदयाच्या तळी वाहतोय झरा आनंदाचा उत्साही आपण घालतो बांध त्याला एकदा बांध,फ़ोडुन तर पहा.. कितीदा असे फ़सवायचे दुसर्या कितीदा आपण स्वतःस फ़सवावे... सारुन एकदा बुरखा बाजुस, खरे खरे जगुन तर पहा.. सगळेच असते सरळ आपणच करतो त्याला अवघड.. जगणं खुप खुप सोप्प असतं एकदा साधं सोप्पं जगुन तर पहा..
|
Ninavi सुरेख कविता. If U don't mind (hope U won't) थोडी पर्यायी शब्द रचना सुचवू का? कविता आवडली म्हणून. दुरुस्ती नव्हे. अश्रु किती रिचवतो नशा कशी ती चढेना मला किती झोकती, कसे झिंगती, डाव त्यांचा रंगला जखमा माझ्या पतिव्रता, सुख ते बटिक त्यांची दरवळते प्रीती त्यांची, नक्षी माज्या कवनांची. -बापू.
|
Jayavi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 7:20 am: |
| 
|
WOW! काय सुरेख कविता आहेत...... एकसे बढकर एक..... आज का तो दिन बन गया श्यामली, फ़ार फ़ार आवडली तुझी कविता. मनिषा, घडी सुरेखच! मृ..... मान गये यार तुमको! आपण तर TOTAL FIDA!
|
Sarang23
| |
| Wednesday, August 09, 2006 - 8:23 am: |
| 
|
सूख जाहले बटिक तयांची, जखमा माझ्या पतिव्रता ... तयांची की तयांचे? आणि जर तयांची असं हवं असेल तर... सुखे जाहली बटिक तयांची... असं बरोबर आहे असं मला वाटत. बाकी एकंदर अर्थ धुसर आहे मला सांगशील का? मेल केली तरी चालेल...
|
Ludabuda
| |
| Wednesday, August 09, 2006 - 8:30 am: |
| 
|
अहो म्रुद्गंधाताइ किती पकवता? किती कविता पाडता हो तुम्ही दिवसाला? अरे या ताईंना कुणी तरी आवरा रे
|
Dnyanaba
| |
| Wednesday, August 09, 2006 - 8:34 am: |
| 
|
अहो लुडबुडे साहेब.. ते समिक्षक तुम्हीच का हो?
|
Mrinmayee
| |
| Wednesday, August 09, 2006 - 8:37 am: |
| 
|
जया, मन:पूर्वक धन्यवाद तुझ्या प्रतिक्रियेबद्दल! निनावे, खूप आवडली तुझी कवीता! तुझ्यातल्या sense of humor इतकीच ही प्रतीभा देखील सुंदर आहे मृदगंधा, फार छान लिहिलंय!
|
Moodi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 9:12 am: |
| 
|
ए लुडबुड तू कशाला रे आक्षेप घेतोयस? आम्हाला सगळ्यांच्या कविता आवडतात, आम्ही त्या वाचतो, प्रसंगी दाद नाही दिली तरी आम्हाला त्या कविता वाचुन आनंदच होतो, मग तू का रागवतोस रे? मृद्गंधा लक्ष नको देऊस. लुडबुड त्यापेक्षा तूच काही नाही एखादी कविता, कथा, चारोळी लिहीत? प्रयत्न करुन बघ. आम्ही जरूर वाचु. मग सांगु आमचे मत तुला. 
|
Ninavi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 9:47 am: |
| 
|
>>>> If U don't mind (hope U won't)... Of course not, बापू. पर्यायी रचना छानच आहे, पण त्या ' लयीत' बसत नाहीये हो. सारंग, ' बटीक' स्त्रीलिंगी म्हणून क्रियापद तसं आलं. म्हणजे गद्यात ते ' सुख त्यांची बटीक झालं' असं वाचता येईल असं मला वाटतंय. चुभूद्याघ्या. अर्थाबाबत मेल करते सविस्तर. बाकी, आपण लिहीणारे आणि वाचणारे सगळ्यांनी मिळून लुडबूड करणार्यांना अनुल्लेखाने मारूया दोस्त्स. मृद्गंधा, जगणं खरंच सुंदर आहे. लिहीत रहा गं. अभिप्रायासाठी सर्वांचे आभार.
|
धन्यवाद जयावी,मूडी,मृण्मयी,निनावी आणि सगळ्यांना, खरेच तुम्ही खुप छान आहात..तुमच्या सगळ्यांच्या कवितांसारखेच.. आणि मी काट्यांकडे लक्ष देत नाही.. करुदेत त्यांना लुडबुड.
|
मुख़वटे आपण असतो त्याहीपेक्षा नसतो हे अधिक छान असतं. मग निदान तोंडदेख़लं का होईना चांगलच बोलतात सारे. अचानकच आपल्याला साक्षात्कार होतो, अरेच्या! आपल्या जाण्याने, पोकळी वगैरे निर्माण झाल्ये की! आपल्याला जिवंतपणी शांती मिळू न देणारे आज आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी चक्क अश्रु वगैरे गाळतायत. आपल्या चांगुलपणाचे गोडवे गातायत. आज आपल्यासाठी, किती बिरुद किती विशेषणं कही ख़री बाकी सगळीच ख़ोटी. आपल्यासाठी थोडे पैसे ख़र्च करतात फुलांचा हार आणतात हार घालयला जवळ आल्यावर कळतं अरेच्या हे तर नुसते मुख़वटे!
|
|
|