|
Badbadi
| |
| Tuesday, August 08, 2006 - 4:24 am: |
| 
|
रविवार ची सकाळ.. आरामात पॅटिस खात पेपर वाचत होते. इतक्यात फोन ची रिंग वाजली... "हॅलो" "स्नेहल, निरंजन बोलतोय.. आज संध्याकाळी काय करत आहेस? मी तुझ्या area मध्ये एक बंगला बघायला येतोय. काहि करत नसशील तर तू हि ये. इतक्या वर्षांनी मला त्या भागात फ़िरायला तुझी मदत लागेल च" "अजून तरी कहि ठरलं नाहीये माझं. ये संध्याकाळी.. जाऊ आपण" " gr8 , चल.. मग भेटू ५.३० ला" " ok , नक्कि " निरंजन हा माझा कॉलेज मधला मित्र.. माझ्यापेक्षा २ वर्षाने मोठा.. पण कॉलेज चा कट्टा आणि gathering यामुले एका वर्गात असल्यासारखी मैत्री आमची. इथे १ वर्ष job करून US ला गेला... ते आता एकदम ८ वर्षांनी आला.... दरम्यान येत होता देशात.. पण त्याचे आई बाबा दोघेही नाशिक ला.. त्यामुळे पुण्यात आलाच नाही... आता "स्वेच्छेने स्वदेश" म्हणल्यावर पुण्यात आला. आणि आता मनासारखं घर शोधतोय.. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निर्या आला... सोबत निधी (त्याची बायको) आणि प्रणव (दिड वर्षाचा मुलगा). त्याच्या आवडिची मिसळ तुडूंब खाउन आम्ही तो बंगला बघायला निघालो. "तुला या जागेबद्दल कळलं कसं रे?" "अग एका estate agent कडून" "मग तो नाही आला?" "म्हणाला कि तुम्ही बघून या आधी.. त्या मालकांच्या बर्याच अटी आहेत.. ते सगळं मान्य असेल तर पुढच्या वेळी मी येईन.." " oic .. को. ब्रा. आहे वाटत मालक" मी निर्याला टोमणा मारला. तो "साने" आहे. "मालक पुणेरी आहे म्हटल्यावर त्याची जात गौण आहे स्नेहल." निर्याचे प्रत्युत्तर.. एक दोन डावी उजवी वळणे घेत अम्ही plot no. 502 च्या बंगल्याजवळ पोचलो. बंगला देखणा, टुमदार.. पण बरेच दिवस कोणी रहात नसल्यासारखा दिसत होता. आम्हाला बघून एक सधारण सत्तरीचे ग्रुहस्थ पुढे आले. "साने का?" "हो. गनलांकडून आलोय" (गनला हा estate agent ) "या.. त्यांचा फोन आल होता" बंगल्यात सुंदर बाग, थोडी हिरवळ होती... निधी चे डोळे तिला जागा आवडल्याच सांगते होते. मालकांनी प्रणव ला उचलून कडेवर घेतलं आणि आम्हाला आत नेलं. प्रशस्त हॉल, स्वयंपाकघर, देवघरासाठी थोडी वेगळी जागा आणि १ study , १ बेडरूम अशी खालची रचना होती. तर वर दोन हल्लीच्या मानाने बर्याच मोठ्या बेडरूम्स, ३०० sq. feet चं टेरेस होतं. निर्या आणि निधी ला पाहताक्षणी बंगला अवडला. कोणालाहि आवडण्यासारखीच जागा होती. देव्हार्यात एक गणपतीचा फोटो, study मध्ये १ छोटं शोकेस होतं.. वर एका बेडरूम मध्ये छान लाकडी double bed होता. "घरी सामान म्हणल तर इतकेच. बाकि सगळे आम्ही जुन्या घरी नेलं" आम्ही सगले फ़क्त स्मित हसलो. काकांनी खाली बसायला चटई घातली... आणि थर्मास मधला चहा ते plastic च्या पेल्यात ओतू लागले. "अहो हे सगळं कशाला" "मला आवडतं म्हणून. थोडा जास्त च गोड असतो चहा आमचा.. चालेल ना?" " no problem काका" इति निर्या. "जागा छान आहे तुमची" निधी ने सुरूवात केली. "आणि area पण छान आहे." "ह्म्म.. " मालकांचा फ़क्त हुंकार. "आम्हाला आवडली आहे जागा.. पण गनला म्हणत होते कि तुमच्या काही अटी आहेत. त्या कळल्या तर बरं होईल" निर्या. "अटी म्हणण्यापेक्षा आपण त्याला इच्छा म्हणूया. आणि जो माणूस त्या पूर्ण करेल.. त्यालाच मी ही जागा विकेन" "...." आम्ही सगळे blank . "असं आहे साने, हा बंगला मि १९९८ साली बांधला... त्यावेळची किंमत आणि आताची बघाल तर जमीन आसमानाचा फरक आहे" "हो ते आहेच.. किंमतीच्या बाबतीत तुमच्या काय अपेक्षा?" "तर.. अस फ़रक असूनहि मि हि जागा मूळ किंमतीच्या 30% जास्त घेऊन विकणार आहे.. पण"... "पण... काहि गोष्टी माझ्या ईछेनुसार होणार असतील तर" "बोला.." निर्या काहिसा वैतागून म्हणाला "आपण बागेपासून सुरूवात करू. या बागेतली हिरवळ तशीच राहिली पहिजे. बागेत तुळस हवीच. study मधले शोकस आणि वरचा बेड हे वापरलं नाही तरी मोडीत जणार नाही. तुम्ही इथे कायम तुमच्या आई-वडिलांसोबत रहाल. परदेशी स्थायिक होणार नाही. आणि या बंगल्याचं नाव वचन ठेवाल." काकांनी एक दमात सगळ्या अटी (इच्छा) सांगितल्या. "बाग आणि आई बाबांबद्दल ठीक आहे... पण हे नाव आणि परदेशा बद्दल ची अट..." निधी चा प्रश्न. "सांगतो... मी हि जागा १९७८ साली घेतली. माझा मुलगा, अजित,पाचवीत होता. त्याच्या दहावी नंतर इकडे घर बांधून ययचा विचार होता. पण मला तेंव्हा पैशाची अडचण होती म्हणून जमले नाही. मग तो IIT साठी बाहेर पडला... नंतर MS केलं.. तिकडेच job ही मिळाला.... त्याची बौद्धिक प्रगती होत होती. आणि आम्ही त्यात सुखी होतो. मी आणि माझी बायको दोघेही निवृत्त झालो. हतात एक रकमी बराच पैसा आला. म्हणून मग हा बंगला बांधला. याच बंगल्यात योग्य वेळी त्याचे त्यच्या मनातल्या मुलीशी लग्न करून दिले. घरात लक्ष्मी आली. (लक्ष्मी सून) आमची कर्तव्य आता पार पडली होती. लग्न झल्यावर 3-4 वर्षानी अजित इकडे येणार म्हणला होता. आम्ही त्याच आनंदात होतो. वर्षाआड तो येत होता.. दोनदा आम्ही तिकडे जाउन आलो. पण आता मन थकत चललं होतं. अजित ने आपल्यबरोबर असावं अस वाटायचं. त्याच्याकडे विषय कढला कि नेहमीच टाळाटाळ.. त्याला मुलगी झाली.. म्हनल आता तरी ये. तुमच्या मनाप्रमाणे झाली ना ती US citizen .. मग आता अम्हाला खेळू दे तिच्या बरोबर... परत काहिबाहि उत्तर दिली. नाही म्हणायला.. नातीच्या दुसर्या वाढदिवसाला अजित इथे महिनाभर राहून गेला. तेंव्हा त्याच्यासाठी खास तो वरचा बेड करून घेतला. वाटल.म कि आता एक महिना येतोय तर इथे कयमचा येण्याचा विचर असेल अजित चा." काकांच्या डोळ्यात पाणी... "पण अजित इथे येउन २ आठवडे झाले आणि एक दिवस त्याने सांगितलं..." "आई, बाबा मी इथे परत याव असं तुम्हाला वाटतंय मल माहित आहे. पण.. पण मला इथे फरसा scope नाही. शिवाय रुची (अजित ची मुलगी) ला तिथे जितक्या सुविधा मिळतील त्या इथे मिळणार नाहीत. म्हणून आम्ही असा विचार केलाय कि US मध्येच settle व्हायचं. आणि वर्षातून एकदा येऊ च कि. शिवाय फोन, e-mails आहेतच." "किती सहज परस्पर ठरवून मोकळा झाला अजित. या सगळ्यात आमचा विचार कुठेच नव्हता. आयुष्याच्या संध्याकाळी फोन वर बोलून का मन रमणार आहे आमचं? आणि हा म्हणतो याला इथे स्कोप नाही? आम्ही अस विचार केला असता तर? याच्या दहवीच्या वेली मला promotion वर आगरतळ्याला बदली मिळत होती. चांगला गलेलठ्ठ पगार मिळणार होता... स्विकरली असती बदली तर हा बंगला तेव्हाच बांधता आला असता. पण याच्या शिक्षणाचा विचार केला आणि बदली नाकारली. याच्या IIT 3rd year laa मला पहिला attack आला.. पण त्याच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून हिने एकटीने सगळे सहन केलं. आम्हला त्याला खूप शिकवायचं होतं..खूप मोठं झालेल.म बघायचं होतं. पण शिकता शिकता तो स्वार्थी कधी झाला कळलंच नाही." काकांच्या डोळ्यातून दोन मोती ओघळले. "तुम्ही मुलं खूप शिकता पण शिकल्यावर कसं विसरता रे आई बापाला? त्यांच्या कष्टाचे चीज तुम्ही मिळवलेल्या पैशात नसून उतारवयात त्यांना दिलेल्या आनंदात जास्त असते. आता मझ्यापेक्षा आमचा गवळी नशीबवान वाटतो मला... त्याचा मुलगा सधा M.Com आहे.. पण इथे चांगल्या bank मध्ये नोकरिला आहे... छान लग्न करून आई बाबांसोबत राहतो आहे. पिकल्या पानाला याहून वेगळं सुख काय हवं असतं? आणि आम्ही फार मागतोय का रे? तुमच्या आयुष्याची पहिली १० वर्ष तुमचे हट्ट पुरवले, पुढची १२-१३ वर्षे तुम्हाला मनासारखे शिकू दिले... नंतर नोकरी, लग्न सगळं तुमच्या मनासारख करू दिलं... ३४-३५ वर्ष आयुष्य गेल्यावर जर आई बापाने तुमच्याकडून ४-५ वर्ष सोबत मागितली तर ते चुकलं?? इतकं नाही करू शकत तुम्ही?? कधी कधी वाटतं मुलाला इतकं शिकवलं हेच चुकलं." "म्हणून मझी अट आहे पोरी आहे परदेशी स्थायिक न होण्याची. आणि तुम्ही मला दिलेलं हे वचन असेल याची आठवण सतत रहावी म्हणून बंगल्याचं नाव ही वचन ठेवायचं आहे." "पण मग काका तुम्ही का नाही रहत इथे?" मी "नाही रहावत इथे. हे घर बांधताना अजित बरोबर राहिल अशी स्वप्न बघितली होती. ते काही आता शक्य नाही. दोघांना इतकी मोठी जागा करायची काय? इतके दिवस विकायचं पण मन होत नव्हतं पण मग विचार केला कि आम्ही गेल्यावर तर काय उपयोग या वास्तूचा? म्हणून मग बंगला विकून ते पैसे इथल्या अंधशाळेला द्यायचे ठरवले आहेत. म्हातरपणी काय करू ५० लाख घेऊन?" चहाची रिकामे पेले टाकायला काका उठले. आम्ही तिघेही एकदम शांत. निर्या परत आला आहे पण परत जायचं च नाही असं त्याने काही ठरवलं नसावं. काकांच्या बोलण्याने तो अंतर्मुख झाला असावा. काका परत आले. "साने, नीट विचार करा. या जागेचा नाही, मी काय म्हणतोय त्याचा. " "काका, मी २ दिवसात काय ते कळवतो तुम्हाला" निर्या म्हणला... आणि आम्ही निघालो.
|
Jaaaswand
| |
| Tuesday, August 08, 2006 - 4:54 am: |
| 
|
सुपर्ब... no words !!!!!
|
Moodi
| |
| Tuesday, August 08, 2006 - 4:56 am: |
| 
|
बडी कथा जर संपली नसेल तर क्रमश लिही गं. अन जर संपली असेल इथेच तर असेच म्हणेन की फार व्याकुळ करुन सोडलस तू. ३ महिने तू भारताबाहेर होतीस त्यात तुला काय वाटले असेल? काय जाणवले?
|
Meenu
| |
| Tuesday, August 08, 2006 - 5:11 am: |
| 
|
बडे सुंदरच ... सत्यकथा असेल तर काय झालं मग पुढे ..
|
Devdattag
| |
| Tuesday, August 08, 2006 - 5:22 am: |
| 
|
बडी.. सहिच आहे.. ही कथा माझ्या ओळखीतल्या अनेकांशी मिळती जुळती आहे.. रादर इथल्या बर्याच जणांच्या ओळखीतल्या लोकांशीही असेल असं मला वाटतं..
|
Badbadi
| |
| Tuesday, August 08, 2006 - 5:22 am: |
| 
|
इतक्या लगेच प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद!!! मूडी, कथा संपलिये इथेच.. मला तीन महिन्यात काय जणवलं विचारशील तर एका post मध्ये नाही सांगता येणार.. मीनू, सत्यकथा नाही म्हणता येणार... बरेच दिवस ह विषय डोक्यात घोळत होता... तसा थोडा सत्याचा अधार आहे. देवा, कोण कविता?? बुधवार उद्या आहे रे.. सांभाळ स्वत्:ला
|
Moodi
| |
| Tuesday, August 08, 2006 - 5:41 am: |
| 
|
ठीक आहे मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिथल्या अनुभवांविषयी जरुर लिही.
|
Devdattag
| |
| Tuesday, August 08, 2006 - 5:45 am: |
| 
|
>>देवा, कोण कविता?? बडे, काय बोलते आहेस?..;)
|
Abhi_
| |
| Tuesday, August 08, 2006 - 5:46 am: |
| 
|
बडे, सुरेख!!! छान लिहिलं आहेस
|
बडबडी छान कथा, अगदी एकदम सत्यकथा असल्यासारखीच वाटली...
|
Bee
| |
| Tuesday, August 08, 2006 - 6:06 am: |
| 
|
ही कथा सत्यकथा नाही आणि ती वरच संपली आहे हे सांगून बरे केलेस बडबडी.. उगाच नाहीतर surprises कथा एकदम छान लिहिली आहेस..
|
बडे,कथा छान मांडली आहेस
|
Chinnu
| |
| Tuesday, August 08, 2006 - 8:41 am: |
| 
|
अंतर्मुख करायला लावणरं लिहीलसं बडी! मस्त!!
|
Shonoo
| |
| Tuesday, August 08, 2006 - 9:34 am: |
| 
|
बडबडी छान लिहिलं आहेस. माझ्या ओळखीच्या अनेकांचा चेहरा दिसला या गोष्टीमधे.
|
Avikumar
| |
| Tuesday, August 08, 2006 - 12:49 pm: |
| 
|
बडि, खुपच हेलावुन टाकणारं लिहीलं आहेस. मला वाटायचं की इकडे परदेशात आल्यावर लोकांचे विचार बदलत असतिल..पण इथे न राहाण्याचा माझा विचार तर इकडे आल्यापासुन एकदम पक्का झालाय. आणि तुझ्या कथेने तो अधोरेखितच केलाय. असो. हा ज्याच्या त्याच्या Priorities चा प्रश्न आहे. काहीजण करिअरला, काहीजण पैशाला तर काहीजण नात्यांना सर्वात जास्त महत्व देतात. माझ्या लेखी माझी नाती सगळ्यात जास्त महत्वाची आहेत माझ्यासाठी. मला याचीही जाणिव आहे की कदाचीत मला युएस मधे भारतापेक्शा जास्त चांगल्या संधी मिळतील, पण करीअर नंतर काय? मृगजळाच्या मागे किति धावणार आपण. एकच आयुष्य आहे आपलं. समाधानानं जगण्यातच शहाणपण आहे. बाकी हे माझे वैयक्तिक मत आहे बरं का...!
|
Upas
| |
| Tuesday, August 08, 2006 - 8:30 pm: |
| 
|
बडी कथा आवडली.. मागच्या पिढीसाठी त्यांची सोबत करायलाच हवी... पण एक जाणवतय की केव्हातरी आपली पिढी ही " मागची पिढी " होईल तेव्हा पुढच्या पिढीवरच्या अपेक्षांचे ओझे मुळातच थोडे कमीच ठेवेल.. :-)
|
Kandapohe
| |
| Tuesday, August 08, 2006 - 9:59 pm: |
| 
|
बडे छान लिहीले आहेस. 
|
Himscool
| |
| Wednesday, August 09, 2006 - 1:34 am: |
| 
|
बडे कथा फरच सही आणि सुटसुटीत लिहिली आहेस.. मला आमच्या कॉलेजचे एक नाटक आठवले.. ह्याच theme वर बेतलेले होते.. समीर कुलकर्णींनी लिहिले होते.. "उदाहरणार्थ एक".. त्याच्या सगळ्या अठवणी जाग्या झाल्या
|
Milya
| |
| Wednesday, August 09, 2006 - 4:08 am: |
| 
|
बडे कथा छानच आहे.. पण ही नाण्याची एक बाजु झाली.. त्या अजितची पण काही बाजु असेलच ना!!! infact ह्यावर छान v&C होउ शकेल किंवा तो झालाही असेल (तसाही मायबोलीवर v&C ला तोटा नाहीच)... पण त्या काकांची प्रतिक्रिया थोडी extreme आहे असे वाटते... मुलाला इतके शिकुन काय मिळवले?... आई-वडीलांच्या मुलांकडुन अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही पण मुलांच्या सुखात सुख मानणारे आई-वडील जास्ती असतात असे वाटते. निदान उपास म्हणतो तसे आपल्या पिढीच्या आई-वडीलांनी तरी तो दृष्टीकोन ठेवावा... ह्यात काका चुक किंवा अजित चुक असेही नाही.. दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत... that's life
|
Badbadi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 4:41 am: |
| 
|
मिल्या, अगदि बरोबर!!! ही नाण्याची एक बाजू आहे. प्रत्येक च बाबतीत असंच असतं. या सगळ्यावर आता निर्या काय react होतो.. काय प्रयत्न करतो हे हि मांडेन थोड्या दिवसात... काकांची प्रतिक्रिया थोडी extreme आहे असे वाटते>> काका म्हणतात कि त्यांना "कधी कधी" च तसं वाटतं. आणि हे असे विचार मनात येऊ शकतात कधी कधी. दर वेळी सारासार आणि बरोबर विचार करता येतोच असं नाही. कदाचित तू हि हे अनुभवलं असशील. उपास, या अपेक्षांची "ओझे" वाटत असेल तर I think u should rethink . मिल्या, आपल्या पिढीला जमेल तसा दृष्टिकोन ठेवणे... कारण आपली पिढी जास्त practical आणि adoptive आहे. पण आपल्या आई बाबा तितके adoptive नसतात. गेल्या १५-२० वर्षात जग खूप बदललं, नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या पण त्यांचा मूळचा पिंड नाही बदलला... communication क्रांती झाली. आणि शेवटी नातं म्हणलं कि अपेक्षा आणि जबादार्या आल्याच. नकळत घडतं ते. म्हणून तर प्रियकर-प्रेयसी आणि नवरा-बायको यात खूप फरक असतो आई बाबांची पिढी ना धड जुने ना धड नवीन नाहीत. आणि असं मधे असणार्याला नेहमीच जास्त त्रास होतो. काकांना इतकंच म्हणायचं आहे career aspirations म्हणजेच सगळं का? तुमच्या सुखात ते सुख शोढत आले इतके वर्ष मग आता त्यांच्या एकटेपणाचा विचार का नाही करता येत तुम्हाला? असो. आणि कृपया इथे V & C नको.
|
|
|