Raina
| |
| Wednesday, August 09, 2006 - 5:07 am: |
| 
|
badbadi सुरेख लेखन आहे. कथा आणि स्पष्टीकरण दोन्ही पटले.
|
बडबडे, चान्गल लिहिल हेस! अपेक्षान्चा पाया पक्का मजबुत असेल, थोडक्यात अपेक्षा धरायची "लायकी" असेल तर अपेक्षेला "एक्स्ट्रीम" वगैरे कसल्याही टोकाचे मोजमाप लावता येत नाही! हे आपले माझे मत! बाकी तुमच चालुद्या! 
|
Upas
| |
| Wednesday, August 09, 2006 - 7:13 am: |
| 
|
lol.. शब्दात शिरण्याची गरज नाही पण दोन पिढ्यांमधलं अंतर असतं त्यात आचार विचार लादले जातात बरेचदा आणि मग पुढच्या पिढीला त्याचे ओझे वाटले तर काय नवल.. आणि आपण अपेक्षा म्हणतो म्हणून ओझे हा शब्द ओघाने येतो.. इच्छा म्हटल्यावर तसा येत नाही.. फार पूर्वी क्षिप्राने छन लेख लिहिला होता अपेक्षा आणि इच्छा ह्यावर.. असो, मलाही तेच सांगायचेय की नाण्याची दुसरी बाजू आहेच.. आणि दोन्ही गोष्टी कश्या सांभाळायच्या हे ज्याचे त्यांनी ठरवयाचे.. आणि ह्या globalised जगात तर ते खूप महत्वाचे ठरणार आहे! तसच मी आधी म्हटलय तसं आपण आपल्या आधीच्या पिढीची काळजी घेऊच पण पुढच्या पिढीला जास्त मोकळीक देऊच हे ही खरं.. शेवटी जगात सामाजिक, सांस्कृतिक बदल हे होतच रहाणारच आणि जो ते स्वीकारयला तयार नसेल त्याला त्रास होणारच.. तो सुसह्य कसा करायच हे मात्र आपण ठरवायचे! :-)
|
बडी तु छान लिहिल आहेस. पण मिल्यासारखेच मला देखिल वाटते. आणि कदाचित वय झाल की आपणही इतके Adaptive राहू की नाही माहित नाही. वय झाल की हळवेपणा येतोच. तरुणपणी बेधडक दुरदेशी जाऊन आपण स्थायीक होतो पण आई वडिलांच्या वयाला ते जमण आपल्याला पण शक्य होईल अस वाटत नाही. ही नाण्याची एक बाजू झाली. आणि दुसर्या पिढीकडून अपेक्षाभंग हे पुर्वापार चालत आलेच आहे की. आपले गाव सोडून मुंबईला येणारी मागची पिढी काय अपवाद होती? असो v&c छान होईल ह्यावर.
|
Ninavi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 11:18 am: |
| 
|
बड्स, मस्त लिहीलंयस. ( सगळंच पटलं नाही तरी.) मला जी. ए. कुलकर्णींच्या गोष्टीची आठवण झाली. ( नाव आत्ता आठवत नाहीये.) त्यात असाच तो माणूस गावात घर बांधायचं म्हणून सगळा जन्म हलाखीत राहून आणि कुटुंबालाही लहान सहान सुद्धा सुखांपासून वंचित ठेऊन पै पै जोडतो. आणि शेवटी त्यात रहायला कोणीच तयार होत नाही. मिल्या, उपास आणि रचनाला अनुमोदन.
|
Saurabh
| |
| Wednesday, August 09, 2006 - 1:31 pm: |
| 
|
himscool तुला समीर इनामदार म्हणायचे असावे. तु VIT चा / ची वाटतं.
|
बडे गोष्ट एकदम सही आहे. छान रंगवलीयत पात्रे. अरे ते घरमालक हे कथेतलं एक पात्र आहे. बरेच लोक इतकं सिरीयसली का घेतायत? स्वतःच अजित असल्यासारखं?
|
Krishnag
| |
| Saturday, August 19, 2006 - 5:41 am: |
| 
|
बडी, सुंदर लिहलय!! सन्मी.. ..
|
Prajaktad
| |
| Saturday, August 19, 2006 - 7:10 am: |
| 
|
बडबडी! छान आहे कथा निर्याचीही प्रत्रिक्रिया मांड तुला जमेल तेव्हा..
|
छानच लिहिलय! मनापासून त्या आजोबांची बाजूही पटते. आपण कितीही सहमत असलो तरी काहीवेळा हे अपरिहार्य असतं मी स्वतः माझ्या आईसाठी (फ़क्त तिच्यासाठीच अस अजिबात नव्हे पण that was one of the major reasons! ) परत आले, म्हणजे जातानाच अमुक इतक्या वर्षात परत यायचं अस ठरवून गेलो होतो आणि देवाच्या कृपेने ते जमलं, असे माझे काही दोस्तही आहेत पण या बाबत निर्णय दोघांचा असायला लागतो आणि थोडीफ़ार adjustment करायची तयारीही असायलाच लागते. मलावाटत हळूहळू हे कमी होत चाललय! पण अगदी तसही म्हणता येणार नाही कारण percentage of people coming back to India हे वाढतय. तरीसुद्धा वर म्हंटल्याप्रमाणे ते मोठ्ठ्या शहरात राहणां पसंत करणार, त्यात त्यांचाही काही दोष म्हणता येणार नाही. पण हा problem सर्वत्र पहायला मिळतोय.
|
Badbadi
| |
| Thursday, August 24, 2006 - 11:14 pm: |
| 
|
धन्यवाद सगळ्यांना प्राजक्ता, निर्या बद्दल लिहू कि अजित बद्दल?? अजित बद्दल लिहिण्याचा नक्कि प्रयत्न करेन..
|