Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 08, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » काव्यधारा » कविता » Archive through August 08, 2006 « Previous Next »

Bairagee
Monday, August 07, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवाची ही गोष्ट असावी
अनवाणी भरदुपार तुडवित
हासतखिदळत वेचत होती कबाड आईसोबत अपुल्या
भाची माझी
.....

तिन्हिसांजेला
वाटेवरच्या मंदिरातल्या तुळशी वृंदावनात दिसली
झुकलेल्या आकृत्यांमध्ये
आई थकलेली
.....

आजकाल या सभोवताली वावरणाऱ्या
अनोळख्यांच्या चेहऱ्यांवरी बघून हासू
मीही हसतो
मला ओळखुन
.....

खरे असावे
या शहराची धूळ अताशा
मला पोरके सोडत नाही
.....

बैरागी
.......


Jayavi
Monday, August 07, 2006 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमती, सुरेख!! बर्‍याच दिवसांनी....!

मनिषा, गाणारं झाड मस्तच. झाड असं लिही jhaaD .

आनंद, गडावरची कविता एकदम झकास!

बैरागी, वा! क्या बात है!


Mrinmayee
Monday, August 07, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या कवीता खूप सुंदर!
मनिषा, छान लिहितेस. अशीच लिहीत रहा!
श्यामले, कविता छानच. पण माहेरपणाला गेल्यावर इतकी उदास कवीता का गं?
वैभव, तुझ्या कवितांच्या fan club ची मी कधिचीच मेंबर आहे. दिनेशदा म्हणतात तसं असेल तर ती कवीता तुझा मूड रीफ्लेक्ट करत नसो!
तुझ्यासारख्या कवितांची प्रतीभा तर नाही, पण एक प्रयत्न...

हसंत रहावं, हसवत रहावं
हसण्याला का मोल लागतं?
काटे आणि सल हे तर
प्रत्येकाचच प्राक्तन असतं

हरेक फूल फुलून यावं
असा काही नियम नाही
कोमेजलेल्या बकुळिच्याही
सुगंधाचं वेड लागतं

अंधारलेल्या रात्री कधी
उदास आणि दु:खी करतात
ओंजळभर प्रकाशाच्या
आशेवरती झुलत रहावं

मोद मिळावा फुला पानात
स्थिरचरात हसु पहावं
अखेरचा श्वास देखील
पुनर्जन्माची वेणा असतं


Pkarandikar50
Monday, August 07, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bairagee,

खरे असावे, ह्या शहराची धूळ आताशा... सुन्दर!
-बापू.


Mi_varsha_rutu
Monday, August 07, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. :-)
दिन्या मामा : तुमच्याशी कट्टी घेतल्यापासून मी मोठी झाले.



पाऊस प्रवास

चल ना रे सख्या जाऊ पावसाच्या गावी
पावसाच्या वाटेवर गाऊ पावसाची गाणी.
पावसाच्या गावात बांधू एक घर पावसाचं
बहरेल जिथं आपलं चिंब पावसाचं नातं.

अंगणात आपुल्या लावू एक झाड पावसाचं
रंग चढेल ज्या हिरवा पाऊस पानांचा.
गंध चोखाया फुलांचा येतील अंगणी पावसाचे पक्षी
स्वागता काढ ना रे सख्या, जरा पावसाची नक्षी.

घरट्याच्या मागे आपुल्या वाहे पावसाची नदी
फिरू पाऊससाथीने दोघे नदीच्या किनारी.
तिरी उमटवून ठसा आपुल्या पाऊस्-पावलांचा
जपून ठेवू थेंब एकेक तुझ्या-माझ्या पाऊस आठवांचा.

खूप साठवून ठेवू सार्‍या पावसाच्या खुणा
पाऊसवेडे जीव करती पावसाचाही आनंद दुणा.
पावसात न्हाऊन करेन मी पाऊसशॢंगार
पाऊसमिठीत चिंब सखा जणू पाऊसबहार.

सख्या कर ना रे घाई निघून जाईल पाऊस
करायचा आहे ना सुरू आपुला पाऊसप्रवास!


Me_anand
Tuesday, August 08, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dhanvyawaad Jayavi, Ninavi

@Ninvai - 'kSha' baddal vishesh dhanyawaad :-)

Giriraj
Tuesday, August 08, 2006 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षे,भारीच अगदी... एकेक कल्पना लाखालाखाची आहे बघ यात!

अगदी 'म्यांव' कविता!:-)


Vaibhav_joshi
Tuesday, August 08, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली ... छान !!!
मनिषा ... कविता लहान मोठ्ठी बघायची नाही जे म्हणायचं आहे ते पूर्णपणे म्हणणं महत्त्वाचं
आनंद ... कविता आवडली
सुमतीताई ... तुमच्या कवितेवर मी काय लिहीणार .. पण अलिकडे येणं कमी केलंत तुम्ही
बैरागी ... मस्त कविता
मृण्मयी ... प्रयत्न असेल पण मला आवडली
वर्षा ... झकास ....


Jayavi
Tuesday, August 08, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षा, क्या बात है!!

Mrudgandha6
Tuesday, August 08, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षा
केवळ अप्रऽऽऽऽऽतिम!!!
निताऽऽऽऽऽऽत सुन्दर!!!


Mrudgandha6
Tuesday, August 08, 2006 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी अतिशय सुंदर!!!
शब्द सुंदर आहेतच,त्यातला भाव अधिक सुन्दर आहे.
अतिशय अतिशय छान.. लिहित रहा.

बैरागी चिंतन्शील आहे कविता तुमची अतिशय खोल अर्थ असलेली..


Mrudgandha6
Tuesday, August 08, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पाऊसवेळा..

तसा नेहमीच तो
अवचित उतरतो..
अन्तर्बाह्य चिम्बचिम्ब भिजवतो..

जीव कातरतो माझा
त्याच्या आवेगपुर्ण मिठीत..
तो मात्र भलताच असतो खुशीत..

जिथं तिथं दरवळतो
त्याचा मंद मंद सुवास
ऊर भरुन घेताना दुणावतो मग श्वास..

असा कित्येकदा तो माझ्यावर
मुसळधार कोसळतो...
अन हसता ह्सता मिठीत येवुन रडतो..









Devdattag
Tuesday, August 08, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, श्यामलि, मनिषा, मृण्मयी, आनंद, बैरागी, वर्षा, सुमतिजी, मृदगंधा सगळ्यांच्याच कविता छानच आहेत..
एकाच वाचनात वेगवेगळे भाव वाचायला मिळाले...


Mrudgandha6
Tuesday, August 08, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



त्या पक्ष्याने
कसेबसे चोचीने
तोडले
त्या पारध्याचे जाळे..
त्यानंतर बराच वेळ
हळहळत होते लोक
त्या पारध्याचा बघुन तोटा..
पण त्या पक्ष्याची
इतस्तत विखुरलेली पिसे मात्र
अनभिज्ञच राहिली
त्यांच्या जाणिवेला


Vasant_20
Tuesday, August 08, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'karan mala daru chadhat nahi'
hi kavita kunakade aahe ka?
nidan tyache lekhak sangitale tari chalel.
ekda loksatta madhe vachali hoti.

Manishalimaye
Tuesday, August 08, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसांनी काल मी,
माझं कपाट लावायला घेतलं.
व्यवस्थित काठ जुळवून
कपड्यांच्या घड्या केल्या.
भरभर जागच्या जागी
रचूनही ठेवल्या.
कपाट लावून झालं माझं...........
पण मग,
लावलेल्या त्या कपाटाकडे
बघतच राहीले,

आयुष्याच्या विस्कटलेल्या कपाटात
समस्यांच्याही अशाच
टोक जुळवून
घड्या करता येतील? ? ?
जागच्या जागी त्या
रचून ठेवता येतील

कारण--
सोपी असते
विस्कटलेल्या नऊवार पैठणीचीही घडी
पण
वेदनेच्या लहनशा रुमालाचीही???????/
, ,


Meenu
Tuesday, August 08, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा - पिसे मनिशा - घडी सुंदर .. नाव द्या की कायतरी छानस कवितेला

Mrudgandha6
Tuesday, August 08, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी तुझ्यावर प्रेम करत होते..
तेव्हा खूप खूप सुखी होते..

जरी तू मला भेटत नव्हतास तरी..
मला जवळ घेत नव्हतास तरीही..
मला अनेकदा तू रडवलेस तरीही..

तुझी नितळ निर्मळता
भावायची मला..
तुझी अमर्याद मांगल्यता
सुखवायची मला..

तुझे अनावर पवित्र प्रेम बघून..
दुरुनही मी जायचे भिजून..

पण,कालचे ते दोन क्षण मला
असह्य झाले होते...
जेव्हा तुझ्यावर प्रेम
न करता मी जगले होते..

मला दगड नकोस बनवू..
पाहिजे तर मार झोड
पण प्रेमाशिवाय नको जगवू..

तुझ्यावर प्रेम करण
म्हनजेच सुखी जीण
प्रेम अखंड राहुदेत
हेच तुजपाशी मागणं..





Sumati_wankhede
Tuesday, August 08, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा,
'पक्ष्या'वरची कविता... केवळ अप्रतिम.


Chinnu
Tuesday, August 08, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MG छान वाटलं तुझ्या कविता वाचुन. वर्षा मस्त झालाय पाउसप्रवास. बैरागी, सगळ्या कविता छान. मृण, मीनु मस्त. गिरी छान. क्षिप्रा झकास. मनिशा खुप सुंदर! सुमती मस्त.
वैभव, मनाला भिडुन गेली तुझी हाक!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators