Jayavi
| |
| Sunday, August 06, 2006 - 6:33 am: |
| 
|
केतकी.. हे पण नाव सुरेख आहे गं,तुझ्या कवितेसारखंच जोगिया तुझा आवडता राग म्हणजे तू गातेस का गं?
|
Jogiyaa
| |
| Sunday, August 06, 2006 - 11:59 am: |
| 
|
हो गं जयावी मी सुगम सन्गित शिकतेय. तुझे नावही वेगळे आणि छान आहे अर्थ काय त्याचा?
|
Dineshvs
| |
| Sunday, August 06, 2006 - 12:39 pm: |
| 
|
वैभव, मी प्रतिक्रिया देत नसलो तरी तुझ्या कविता बहुतेक वाचतोच. हल्ली एवढा निराश का व्हायला लागला आहेस ?
|
Dineshvs
| |
| Sunday, August 06, 2006 - 12:45 pm: |
| 
|
पिशवी या अर्थाचा शब्द तो पडशी. एका आयताकृती कापडाला दोन्ही बाजुने खण असत आणि तो खांद्यावर घेतला जात असे. पासोडीबद्दल, नातिचरामि मधे उल्लेख आहे तो असा अरे माझ्या देवा, मांजरीच्या XX पति माझे म्हणति, पासोडी धुवा
|
दिनेश मी तुला निराश वाटलो ? म्हणजे कविता ' पोचली ' तर ! प्रतिक्रिया देणे न देणे हातात नसते , ती अशी निघून जाते ....
पण काळजी करतोस हे बघून खूप बरं वाटलं मनाला .. निनावी,मनिषा, जयावी धन्यवाद .. बापू ... अलिकडे जरा गडबडीत होतो म्हणून गाठ पडली नाही ... आता भेटत राहू ... प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
|
Shyamli
| |
| Sunday, August 06, 2006 - 1:49 pm: |
| 
|
वादळ वादळाला का कधी कुणी मर्यादा घालतं? येतय येऊ द्यावं जातय जाऊ द्यावं आपण मात्र त्याच्याकडे तटस्थपणे बघावं..... अडकु नये जराही वाहु द्यावं नीवांत नेतो वाहवुन म्हणल तर थोडस बरोबर वहाव वेग जरा मंदावल्यावर हळुच बोट सोडावं बरोबर वहावलो तरीही नुकसान तसं फारस नाही उरेल मागे फक्त.......... खाली बसलेला धुराळा..... आणि कोसळलेली ईमारत..... ....................................................... दुखावलेल्या मनाची श्यामली!!!
|
वैभव, शामली अरे असे निराशावादी का होताय? आयुष्य सगळच कस सारखं असेल निराशेतुनही आशावाद उसळुन वर यायलाच हवा. थोडी[फारच] मोठी आहे पण माज़्ही ही कविता वाचा हसते हसते सततच हसते हास्य पळाले कुठे नकळते चैतन्यमयी चैतन्यमुर्त तु होसी आज का उदसिन तु नैराश्येचे कोडे पडले असे अचानक कसे घडले? सुटेल का हे कोडे मजला की गिळुन टाकील त्यातच मजला? कुटे शोधिशी आज स्वत: ला कुटे पहशी आज स्वत:ला कसे बजावु आज मनाला कसे दटावु आज मनाला संपेल का हे सारे अपरिचित आनंद येइल का तो परिचित कसे पोळले मन हे अवचित मिळेल उत्तर असेच अवचित
|
दु:ख न दिसते दु:ख न कळ्ते पुन्हा पुन्हा मन तिथेच वळते अश्रुंसह रक्तही साकळ्ते परी न वळते कळते काही हिरवे हिरवे गार डोंगर उजड ज़ाले सारे अंबर हिरवा का हा आज काळपट काळवंडला हा जीवनपट होते हिरवे गार गालिचे ज़ाले वैराण वावटळीचे उजाड ज़ली राने सारी उदासिन हे मन जडभारी धडधडए आज वैशाख वणवा शांतीची ज़ालीच वानवा सरला बहर सरला वसंत आनंदाचा कस हा अंत आणि आता हे मात्र महत्वाचे पुधच्या पोस्टमधे ते
|
उजाडेल सुर्य क्शितिजावर हिरवळ होइल त्या वर्षए वर संपवतील तगमग त्या धारा तोच सखा आश्वासक तारा बोट धरुन सखयाचे माज़्या भरीन गंधाने उर हा ताज्या तडफड धगधग सरेल सारी सखया तुज़्या न माज़्या घरी घर दोघांचे असेल सुंदर उतरुनी खाली यावे अंबर उचंबळुनी तो यावा सागर सुखाचेच ते असेल आगर ए मी काही तुमच्या सरखी कवयित्रि नाही. पण चंगली रसिक मात्र नक्कीच आहे माज़ा हा काव्यप्रयत्न कसा आहे. आगदी मोटा आणि कंटाळवाणा आसला तरी सांगा मात्र नक्की ह.
|
Jayavi
| |
| Monday, August 07, 2006 - 12:44 am: |
| 
|
श्यामली, तिकडूनही वेळ काढून कविता लिहिलीस...... वा! पण असा निराशेचा सूर का गं? हसणारी, बागडणारी तू...... cheer up sweety! केतकी, अगं माझं नाव जयश्री आणि सोबत आहे तो माझा अवी, अवीनाश मनिषा, खूप आवडली तुझी कविता. positive लिहीतेस तू. लिहित रहा. तुझ्या पुढच्या लिखाणाला खूप खूप शुभेच्छा!
|
धन्यवाद जयवी. मला वाटलं होतं की कुणीतरी लगेच म्हणेल फार बोअर केलस,आता पुन्हा तू या "कविता" वगैरेच्या वाट्याला जाऊ नकोस. तुज़ हे जय + अवि जयवी वा! फारच छान! कविता वगळता काय करतेस एरव्ही तू? मनिषा
|
Jogiyaa
| |
| Monday, August 07, 2006 - 3:54 am: |
| 
|
जयश्री अतिशय सुन्दर आहे तुमचे अद्वैत. मनिषा अतिशय सुन्दर. श्यामली, अगं खुप छान लिहले आहेस. पण "काळ्या ढगाला रुपेरी किनार असतेच.."
|
good one! Bairagee chaan lihali aahe.
|
जोगीया तू गातेसही हे वाचून छान वाटले आता तुज़्यासाठी.......... गाणारं प्रत्येक ज़ाड आनंदानी भारलेलं असतं, येणार्या प्रत्येकालाच ते धुंद करत असतं प्रसंगी सुरांनी दु:खही पेलत असतं. [इथे ज़ाड हा शब्द ज़ा[ज़बले ज़ुळुक यातला ज़] वाचा] म्हणूनच कारुण्यातला जोगीया आवडतो आणि व्याकुळ करणारा मारवाही. बैरागी छान!वास्तव वगैरे!
|
मनिषा अतिशय सुंदर लिहितेस तू.. छान. आणि आतची "गाणारे झाड" अतिशय अप्रतिम!! लिहीत रहा..
|
Me_anand
| |
| Monday, August 07, 2006 - 6:29 am: |
| 
|
निनावी, वैभव, धन्यवाद..!!! बाकी वैभव .. तू बरोबर पकडलस मला... मी लिहीतो अधून मधून पण पहिल्यन्दा इथे टाकली... काल सिव्हगडावर गेलो होतो.. तेव्हा सुचलेली एक कविता........ बघा जमली आहे का ते.... वाट वाकडी वळणे अवघड खड्या चढाचा उभार वक्शी बुलन्द पहाडी गडी रान्गडा कोट छातीचा गडास रक्शी रूप तयाचे कणखर राकट काळा कातळ हिरवी माती दुरुनी तयाचे दर्शन घडता फुलून येते निधडी छाती सिव्ह् मराठी इथे झुन्जले रक्त सान्डूनी अजिन्क्य झाले घोरपडीला दोर बान्धूनी स्वर्गावरती चालून गेले आवळ मुठित त्या मर्दान्च्या उन्च फडफडे भगवा झेन्डा जरब तयाची अभाळाला त्रिवार झुकुनी करीते मुजरा
|
मी.... देवदासी रे आभाळाचे दान सांग कसे मी मागेन आता जन्मभरासाठी दिले तेच जोपासेन दिले तेच जोपासेन व्हाया तुझी ऋणाईत जरी जडभार सारे तरी पाळायची रीत तरी पाळायची रीत अन गायचा जोगवा पण ऊरी दाटू येता कोण धाडील सांगावा कोण धाडील सांगावा कोण येईल दाराशी सारे विखुरले तारे मीच घेईन उशाशी
|
Shyamli
| |
| Monday, August 07, 2006 - 8:32 am: |
| 
|
dhanyawaad... jayaa,maneeshaa,jogiyaa... baakiche nusatech Dabbe disataayat malaa

|
Moodi
| |
| Monday, August 07, 2006 - 8:32 am: |
| 
|
हृदयस्पर्शी!! सुमती तू कविता लिहीतेस असे नाही वाटले कधी, तर प्रत्येक कविता तुझ्या हृदयाचे स्पंदन आहे असेच वाटले मला.
|
Ninavi
| |
| Monday, August 07, 2006 - 9:31 am: |
| 
|
वा, आनंद. छान लिहीलंय तुम्ही. क्ष kSha असा लिहायचा.
|