|
Raina
| |
| Tuesday, August 01, 2006 - 8:48 am: |
| 
|
अरे वा ! खुलासा ऐकून जीव भांड्यात पडला. हे खरंच आहे असं वाटणं म्हणजे लेखनाला दाद आहे ही.
|
Lalu
| |
| Tuesday, August 01, 2006 - 11:59 am: |
| 
|
शोनू, सुंदर लिहिते आहेस...
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 01, 2006 - 1:50 pm: |
| 
|
शोनू, पुर्ण झाल्याशिवाय प्रतिक्रिया देणार नव्हतो, पण माझीही प्रतिक्रिया, रैना प्रमाणेच.
|
Chinnu
| |
| Tuesday, August 01, 2006 - 3:38 pm: |
| 
|
शोनू मस्त लिहिलय. खुप आवडलं.
|
Bee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 9:34 pm: |
| 
|
हुश्श.. शोनू माझा जीव अगदी भांड्यात पडला. खरे तर तुझा स्वभाव ह्या कादंबरीत प्रतित होतो आहे आणि थोडेफ़ार संदर्भ जुळल्या सारखे वाटले म्हणून मला वाटले ही तुझीच कथा आहे.. पण असे नाही.. आनंद झाला वाचून. तुम जीवो हजारो साल..
|
Seema_
| |
| Wednesday, August 02, 2006 - 1:20 am: |
| 
|
अतिशय सुरेख लेखन . पहिल्या paragraph नंतरच खुप आवडलेल , पण link तुटायला नको म्हणुण प्रतिक्रिया लिहिली नाही . लिहित रहा . फ़ार छान लिहिता तुम्ही . ते farmer's market च्या फ़ेरीबद्दल लिहिलय ना , ते सुद्धा चांगल लिहिलय अगदी .
|
बीच्य प्रतिक्रियेनंतर मलाही तेच वाटले. सॉरी शोनु पण खरच फ़ार रिअलिस्टीक होत वर्णन...
|
Prajaktad
| |
| Wednesday, August 02, 2006 - 11:24 am: |
| 
|
हुश्श!बर झाल शोनू खुलासा केलास ते!ह्या बी ला भलतिच घाई प्रतिक्रिया द्यायची! मस्त लिहलय,पुढचा भाग येवु दे लवकर...
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 11:41 am: |
| 
|
बी ला घाई कधी नसते ते विचार प्राजक्ता. तो कायम धसक्यात असतो अन दुसर्याला पण धस्स्स्स्स्स्स्स्स्स करुन सोडतो. बी..  
|
Shonoo
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:57 pm: |
| 
|
शेवटी दुपारच्या जेवणानंतर कसाबसा धीर एकवटून सासू बाईंना आणि पापांना सर्व काही सांगितलं. पापांनी त्यांच्या प्राध्यापकी स्वभावानुसार बरेच प्रश्न विचारले. काय रिसर्च केला, कोणाकोणाशी बोललो, इतर शहरातल्या मित्रमैत्रिणींची मते विचारली का इत्यादी सर्व तपशीलवार उलटतपासणीच केली. हे सर्व बोलणं होत असताना बेनजीर एकदम गप्प. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून, त्यावर हनुवटी टेकून शांतपणे ऐकत होत्या. शेवटी ऑपरेशन ची वेळ, डॉक्टर कोण इत्यादी विचारलं आणि मग म्हणाल्या"मुलांना कसं आणि कधी सांगणार आहात?" "ऑपरेशन बुधवारी ठरवलंय. मुलांना उद्या दुपारी सांगायचा विचार होता. म्हणजे सोमवारी त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना आणि कार पूल मधल्या इतर पालकांना ही सांगता येईल. मी सोमवारी जावून कामाची वाटणी करून येईन. आम्ही दोघांनी मंगळवार पासून सुटी टाकली आहे." "मुलं घरीच राहतील, काका काकूंकडे जायला दोघां ही एका पायावर तयार होतील पण शाळेला जाणं येणं इथूनच सोपं पडेल. शिवाय इथे असतील तर जरा जेवणा खाण्या वर आणि अभ्यासावर तुमची नजर राहील. " "बरं, मी जरा पडते" म्हणाल्या आणि आपल्या खोलीत गेल्या. जरा वेळाने पापा म्हणाले "कडक कॉफ़ी करा सूनबाई". मला एकदम हसू आवरेना. पापांना मी केलेल्या कॉफ़ीचे कोण कौतुक. आणि खरं तेवढा एकच प्रकार काय तो मला हमखास जमणारा. नाहीतर माझ्या स्वैपाकाची मजल from Borunvita to Boiled Eggs . अगदी Maggi Noodles सुद्धा मी बिघडवलेल्या आहेत. कॉफ़ी घेणार का म्हणून विचारायला त्यांच्या खोलीत अगदी हळूच डोकावून पाहिलं तर आमच्या लग्नाचे, त्याच्याही आधीचे फोटो, मुलं लहान असतानाचे फोटो सगळे ढीग मांडून बसल्या होत्या. माझी चाहूल लागताच डोळे पुसले. "पण नाकाचा शेन्डा लाल झालय तो कसा पुसणार?" असं मी विचारल्यावर मला म्हणाल्या "कुठल्याही वेळी विनोदच का?". कॉफ़ी पिता पिता म्हणाल्या "आज सांध्याकाळी सर्वांनी फ़ॅमिली फोटो काढायला जायचं. मला माहिती आहे की तुला अजिबात आवडत नाही. पण आता तुझे इतके आल्बम पाहिले मी. एकही तुम्हा चौघांचा व्यवस्थित फोटो नाही. आज मी अजिबात ऐकणार नाही." नवर्याने केलेली नेत्रपल्लवी चक्क मला कळली आणि मी फार वाद घालायच्या भरीस पडले नाही.
|
Shonoo
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:21 pm: |
| 
|
एके काळी या विषयावर मी केवढा वाद घातला असता. यापूर्वीही अनेक वेळा वाद घातला होताच की? दर वर्षी Christmas ला, आमच्या, मुलांच्या वाढदिवसाला असे फोटो काढावेत असा सासूबाईंचा नेहेमी लकडा असे.दीर आणि जाऊ मुकाट्याने काढून येत असत आणि मग रीतसर christmas ग्रीटिंग, I love you Grandma वगैरे छापलेले फोटोफ़्रेम, फ़्रीझ ला लावायचे मॅग्नेट असल्या गोष्टी आजीआजोबांना, इतर नातेवाईकांना पाठवण्यात येत. मी फोटो काढले नाहीत असं नाही. पण मुद्दाम नटून थटून, ठेवणीतले कपडे घालून फोटो काढणे म्हणजे 'दाखवण्याकरता' काढलेल्या फोटोंसारखे वाटतात मला. इतके दिवस आपल्या मतांबद्दल ठाम राहून प्रसंगी वाईटपणा ही घेतलाय मी. मग आजच का मला माघार घ्यावीशी वाटली याचा विचार करेपर्यंत निघायाची वेळ होत आली. मी पटा पट मुलांना तयार केलं. त्यांना आश्चर्य वाटलं पण त्यांनी जास्त चौकशा केल्या नाहीत. Can we all eat out today?" ला होकार मिळाल्याबरोबर तयार. मी साडी नेसलेय हे बघितल्या बरोबर सासूबाईंचा आणि पापांचा चेहरा एकदम उजळला. जाऊन एकदाचे त्या म्हणतील तितके फोटो काढून घेतले आणि जेवायला गेलो. परत येताना water ice खायचं म्हणाली मुलं. मग तिथे थाम्बलो. नदीच्या बाजूला छोटंस green house आहे. उन्हाळयात एका बाजूला छोट्या शेड मधे water ice विकतात. आसपास राहणार्या टीन एजर्स ची गर्दी असते. मला फार आवडते ही जागा. पापा आणि बेनझीर पण उतरून आले आणि मुलांनी सांगितलेल्या फ़्लेवर चे water ice घेऊ म्हणाले. मग सर्व जण ते खात खात फिरत होतो तर नेमकी मी कशाला तरी अडखळले आणि सर्व water ice साडीवर! सासुबाई हसल्या खळखळून आणि म्हणाल्या 'तुला तुझा जीन्स टी शर्ट युनिफ़ॉर्मच बरा बाई'.
|
Shonoo
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:22 pm: |
| 
|
अजूनही क्रमश: च बरं का.
|
येवुदे अजुन! आमी वाचतोत!
|
Bee
| |
| Thursday, August 03, 2006 - 2:31 am: |
| 
|
चला बेनझीर एकदाच्या सुनबाईवर हसल्यात शोनू खूप छान लिहितेस आणि मग मध्येच हळव करून टाकतेस.. अजून येऊ दे.. रोज लिहित जा.. असा एक दिवस खाडा गेला की वैतागायला होत मला :-)
|
Chinnu
| |
| Thursday, August 03, 2006 - 10:10 am: |
| 
|
शोनू अगदी न चुकता वाचतेय! बेनझीर झक्कास ग.
|
Ninavi
| |
| Thursday, August 03, 2006 - 10:21 am: |
| 
|
छान लिहीत्येस गं शोनू. लवकर लिही पुढे.
|
Shonoo
| |
| Friday, August 04, 2006 - 1:09 pm: |
| 
|
सगळ्यांच्या प्रतिकिया वाचून खूप हुरूप वाटतो. धन्यवाद. वेळात वेळ काढून लिहितेय. ( म्हणजे रात्रीची जागरणं करून!) या वीकेन्ड ला उरलेलं सर्व टाईप करून टाकावं म्हणतेय.
|
Dineshvs
| |
| Friday, August 04, 2006 - 9:58 pm: |
| 
|
जागरण करुन लिहिलं, तर बेनझीर काय म्हणेल ?
|
Mrinmayee
| |
| Friday, August 04, 2006 - 10:08 pm: |
| 
|
शोनु, इतकं छान लिहिते आहेस, वाट नको बघायला लावूस! आम्हाला पण उत्सुकता वाटतेय, बेनझीर काय काय म्हणतेय ते ऐकायची
|
Shonoo
| |
| Saturday, August 05, 2006 - 3:44 pm: |
| 
|
रविवारी सकाळी दोघा मुलांना एकत्रच बसवून सर्जरी बद्दल आणि पुढच्या प्लॅन बद्दल सांगितलं. दहा आणि बारा वर्षे म्हणजे या सर्व गोष्टी कितपत समजतील याची शंकाच होती. पण डॉक्टरांची मुलं! कळत नकळत कानावर पडलेल्या गोष्टी कुठेतरी आत झिरपत असणार. दोघांनी सर्जरी बद्दल चिकार प्रश्न विचारले. लेकीने जरा जास्तच. भावापेक्षा दोन वर्षांनी मोठी म्हणजे समज ही जरा जास्तच. scar किती राहतील? chemo किती दिवस चालेल? हॉस्पिटल मधे किती दिवस रहावे लागेल मुलांच्या शाळेचं काय? क्लासेस ना आणि मित्रमैत्रिणींकडे ने आण कोण करेल? माझ्या कामाचं काय? माझ्या पेशंटना कोण बरं करेल? मी शिकवते त्या वर्गांचं काय इथ पर्यन्त प्रश्न विचारले. शेवटी आजी आजोबा बरेच दिवस आपल्या कडे राहतील. काका काकूंकडे जाणार नाहीत म्हटल्यावर जरा खुश झाली दोघं. दिवसभर मग तयारीत गेला. हॉस्पिटलच्या कामाची, शिकवते त्यावर्गाची व्यवस्था करायची होती. मुलांच्या कार पूल चे वेळापत्रक बदलायला लागणार होतं. बॅंकेची कागदपत्रं, घराचे, हॉस्पिटलचे, इंशुरंसचे पेपर्स इत्यादी सर्व नीट तपासून नवर्याला, सासू, सासर्यांन्या दाखवून ठेवले. तेवढ्यात जाऊ आणि बेनझीर जाऊन कमीतकमी दोन महिने पुरेल एवढी ग्रोसरी घेऊन आल्या. गाडी चालवणारं कोणी सापडलं नाही तर अडचण व्हायला नको. आल्या आल्या जाऊ म्हणाली 'उद्या गर्ल्स नाइट' .बेनझीर ने चमकून तिच्याकडे पाहिलं पण काही बोलल्या नाहीत. माझ्या रेसिडेन्सी च्या वेळच्या मैत्रिणींबरोबर सुरू केलेल्या ह्या गर्ल्स नाइट्स. सुरुवातीला हॉस्पिटलजवळच्या पिझ्झा पार्लर मधे जमत असू. बीयर प्यायची पिझ्झा हादडायचा आणि नवरा किंवा बॉयफ़्रेन्ड बद्दल कुरबुर करायची. क्वचित कामाबद्दल कोणी बोललं तर तिला सगळ्यांकरता एक राउंड बीयर मागवावी लागे.
|
|
|