Meenu
| |
| Friday, August 04, 2006 - 8:57 am: |
| 
|
तरीही रोज रात्री तीच पांघरते हट्टाने कधीकाळी तिने थंडी कशी पळवून लावली होती >>> princess अगं जर का पिशवी हा अर्थ असेल तर या ओळींचा अर्थ काय लावायचा ...?
|
Ninavi
| |
| Friday, August 04, 2006 - 9:08 am: |
| 
|
अरेच्च्या! बरीच चर्चा झालेली दिसते पासोडीची. माझ्या माहितीनुसार त्याचा अर्थ कांबळं किंवा वाकळ असा आहे. आणि तोच इथे अभिप्रेत आहे. म्हणजे पांघरूण म्हणूनच गं मीनू. बाकी फासळ्या / पिशवी हे प्रादेशिक अर्थ असतील या शब्दाचे तर मला ते माहीत नव्हते. प्रतिक्रियांसाठी सर्वांना धन्यवाद.
|
I am joining you people.......
|
nukatich lihaleli kavita....
|
>>>तरीही रोज रात्री तीच पांघरते हट्टाने कधीकाळी तिने थंडी कशी पळवून लावली होती >>> princess अगं जर का पिशवी हा अर्थ असेल तर या ओळींचा अर्थ काय लावायचा ...? sleeping bag म्हणायचं असेल
|
Asmaani
| |
| Friday, August 04, 2006 - 11:54 am: |
| 
|
सॉरी अमेय, जरा घाईत प्रतिक्रिया दिली. पोस्ट cancel कशी करायची?
|
Moodi
| |
| Friday, August 04, 2006 - 11:57 am: |
| 
|
अगं अस्मानी तुझ्या पोस्टच्या वरती उजव्या बाजूला फुली चिन्ह आहे ना त्यावर click कर.
|
किंवा मिलिंदाला रिक्वेस्ट करायचं
|
Asmaani
| |
| Friday, August 04, 2006 - 9:31 pm: |
| 
|
thanx मूडी. अमेय, ही.. ही.. ही.
|
सखा (संतुराजे), मला आवडली कविता. ८-१० वर्षांपुर्वी अशा विद्रोही (हा शब्द बरोबर आहे की नाही याची मला खात्री नाही, जानकार सांगतीलच) कविता भरपुर यायचा अगदी त्याची आठवन झाली.
|
Dranokar
| |
| Saturday, August 05, 2006 - 5:17 am: |
| 
|
नमस्कार मि या फ़ोरुम मध्ये नविन आलो क्रुपा करुन मला सामाउन घ्या. मि एक कविता लिहितोय ति वाचुन मला कळवा कशि वाटते. तुझ्या जिवनात अन्य कुनि असेल तरि पण शोधुन बघ, मिच तुझ्या ह्रुदयात दिसेल नाव नसेल माझे ओठावर तुझ्या श्वासात तुझ्या मि आणि मीच असेल प्रेयसी तु माझी नसशील तरी पण, होउन प्रियकर तुझ्या मनमंदीरी मिच बसेल शेवटी प्रिये, तुलाच जाणवेल मी नसल्यावर प्रेम इतके तुझ्यावर कुणी केले नसेल देशिल जेव्हा आवाज मजला कदाचित, मीच नसेल या विश्वात, तेव्हा शोधुन बघ ह्रुदयच्या गाभार्यात............... नयनांच्या चाकोरीत......... ओठातुन झीरपनार्या, प्रत्येक शब्दात......... शिवाय माझ्या, कुणीच नसेल्------- तुझ्या कनाकणात सामावलेला मिच असेल.
|
Jogiyaa
| |
| Saturday, August 05, 2006 - 8:35 am: |
| 
|
आजमावताना तुला मी सहज म्हणुन म्हनाले होते "असेच आहे तर मग आपले नाते थांबवू इथेच" एकक्षणभराच्या दीर्घ अवधीनन्तर तू म्हनाला होतास.. "तुला काहीच कळत नाही.." मी सहजच म्हणाले होते खोटे खोटेच.. पण एक दिवस ते त्याहीपेक्षा सहजतेने तू खरे करुन दाखवलेस मला आता एकच सांग तेव्हाचा तू खरा की आताचा?
|
हे दिवे घ्या काय आहे ते कोणी मला सांगाल का? कालपासुन विचारते आहे
|
Ninavi
| |
| Saturday, August 05, 2006 - 11:58 am: |
| 
|
मनिषा, दिवे घ्या हे take it lightly चं मराठी भाषांतर आहे.
|
तर? खूप भिती वाटते आजकाल ... काचेच्या जाड भिंतींआड, करकचून बांधून ठेवल्यागत असहाय्य वाटतं गुदमरल्यागत होतं ... उरले सुरले श्वास जपून वापरताना जीव थोडा थोडा होतो ... बाहेर कुणीतरी ओळखीची ... अगदी जवळीकीची व्यक्ती उभी आहे .... पाठमोरी ... तिला ऐकू जावं म्हणून जिवाच्या आकांताने टाहो फोडला मी. शेवटचा पर्याय म्हणून सगळ्या कविताही म्हणून झाल्या ... कविता तिला ऐकू न जाण्याचा अर्थ समजतोय मला ... सहज कधीतरी ती व्यक्ती माझ्याकडे वळेल तेव्हा मी माझी शेवटची कविता म्हणत असणार आहे ..... खूप भिती वाटते ... ती शेवटची कविता पण नाही ' पोचली ' तर? ओळख नाही पटली तर? आणि मुख्य म्हणजे ... वळता वळता अनोळखी होत गेलेला तो चेहरा .. माझाच असेल तर?
|
Ninavi
| |
| Saturday, August 05, 2006 - 11:02 pm: |
| 
|
वैभव, केवळ अ प्र ती म!!
|
वैभव नेहमीप्रमाणेच "वैभव"! तुम्हा सगळ्यंना आजच्या मैत्री दिनाच्या शुभेच्य [हा पुन्हा अड्ला] आज मैत्री विशेष कवितांचा दिवस. आज तुमच्या कडुन अशा कविता हव्यातच. वैभव प्रमाणेच निनावीच्याही कविता अप्रतिमच!
|
Jayavi
| |
| Sunday, August 06, 2006 - 2:02 am: |
| 
|
वैभवा, अ प्र ति म! दुसरं काहीच नाही. निनावी, अगदी आतून आलेली कविता.......! वर्षा, सुरेख! एकसे बढकर एक कविता.....वा! क्शिप्रा, गिरीला दिलेलं तुझं उत्तर अप्रतिम! जोगिया, खूप छान!
|
Jogiyaa
| |
| Sunday, August 06, 2006 - 3:36 am: |
| 
|
धन्यवाद जयावी. माझ्या id वर जोगिया नाव आहे कारण मला तो राग आवडतो. माझे नाव केतकी आहे.
|
Vaibhav सुरेख! चिंतनशील कविता!! -बापू.
|