|
Shonoo
| |
| Monday, July 31, 2006 - 11:22 pm: |
| 
|
चातुर्मासात किंवा निदान श्रावणात करायची अशी काही खास व्रते असंत पांढरे बुधवार, अळणी बुधवार इत्यादी. हितगुजकरांसाठी काही खास नवीन व्रते. मिल्या- बुधवार सोडून इतर दिवशी फक्त ओरिजिनल कविता लिहाव्यात. बुधवारी हितगुजचा विचार देखील मनात आणू नये लिम्बूटिम्बू- फक्त आहार शास्त्र BB बर लिहावे. दिनेश फक्त रेसिपी विचाराव्या. बुधवारी फक्त शंका विचारता येतील्- चण्याची आणि मुगाची डाळ ओळखावी कशी? रिकोटा चीझ आणि चक्का यात फरक काय इ. मेन्यु कॉम्बिनेशन वरच्या सुग्रुहिणी-प्रत्येकीने महिनाभर पुरतील इतके one dish meal चे मेनु लिहावेत दर आठवड्याला गडांवर मोहीम करणारे बहाद्दर्- रोज travel channel पाहून त्या कार्यक्रमांचे परिक्षण लिहावे. travel channel नसल्यास national geographic पण चालेल. बी- रोज १० तरी प्रश्नांना उत्तर द्यावे. उत्तर अमेरिकेतील सर्वसाधारण शाळकरी मुलांसारखे प्रतिप्रश्न म्हणजे उत्तर असे समजू नये. v&c वरचे नेहेमीचे यशस्वी- नेहेमी जी बाजू मांडतात त्याच्या विरुद्ध बाजुने महिना भर हिरिरिने मते मांडावीत. शक्यतो Duplicate ID न घेता मांडावीत. where in .... कोथरुड, एस जी रोड इ इथले नागरिक- आपापल्या शहरा पासून शम्भर कि.मी पेक्षा दूरच्या BB वर महिना भर रहायला जावे सर्वांनी-भरपूर दिवे घ्यावेत
|
Milindaa
| |
| Tuesday, August 01, 2006 - 6:17 am: |
| 
|
.. .. .. ..
|
>>>>> लिम्बूटिम्बू- फक्त आहार शास्त्र BB बर लिहावे. अचूक! मी फक्त तिथे कधिच फिरकत नाही! अजुन येवुद्यात! मिलिन्दाने रोज किमान वीस बीबीन्वर न चुकता हजेरी लावुन सुचनारहीत किमान चार चार ओळिन्ची पोस्ट टाकावी हे add करायचे का? DDD
|
Maitreyee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 8:02 am: |
| 
|
शोनू मस्त! अजून लिही की, इतक्यात थांबलीस का
|
Moodi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 8:22 am: |
| 
|
शोनू इतके छोटे का गं? मागे कुजबूज मध्ये हहने जाम हसवून आमची वाट लावली, आता तू पण का? 
|
sarvaani dive ghetalet tu lihit rahaa... ...!!!
|
शोनू, निरीक्षण छान आहे. लिंब्या, सही जवाब. ( मिलिंदा, दिवा.. मोठ्ठा. )
|
Chinnu
| |
| Tuesday, August 01, 2006 - 9:20 am: |
| 
|
शोनू अगदी झक्कास लिव्हलस!
|
Kashi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 10:38 am: |
| 
|
 shonoo masta aajun lihi..
|
Ninavi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 10:57 am: |
| 
|
सही, शोनू! xxxx xxxx xxxx
|
शोनु,सहीच गं.. मजा आ गया
|
शोनु अगदी ह. ह पु.वा... 
|
Shonoo
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:58 pm: |
| 
|
बरं, सगळ्यांनी दिवे घेतलेलेच आहेत तर अजून काही व्रते हवा हवाई: महिनाभर हवा हवाई म्हणजेच बेटी, हवा हवाई म्हणजेच RAR , Rangy , ललिता असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. पुरावा म्हणून काळाच्या ओघात वाहून गेलेल्या जुन्या पोस्टचा खुशाल उल्लेख करता येईल. झक्कि: रोज एक याप्रमाणे chiken soup for the Punekar soul अशा गोष्टी लिहाव्यात.( कोण रे तिकडे "पुणेकरांच्या सौजन्याचे आणि सहिष्णुतेचे दाखले म्हणजे fiction " म्हणतंय?) रॉबिनहूड्: झक्किंच्या प्रत्येक पोस्ट नंतर 'वा! वा!' अशा अर्थाची पोस्ट करावी Admin: दिवसाकाठी V&C वर किंवा help वर एक तरी १०० ओळींची पोस्ट करावी. यात मुद्दे नसावेत. ( गुद्दे असले तर उत्तम व्रताचे जास्त पुण्य मिळेल. ) शुद्ध लेखनाच्या व व्याकरणाच्या चुका निदान एका ओळीत एक. punctuation अजिबात नसावे- असल्यास चुकीचे असावे.
|
Kandapohe
| |
| Thursday, August 03, 2006 - 5:22 am: |
| 
|
सहीच!! चला व्रतस्थ व्हावे म्हणतो. कुठल्या गावाला जावे याबाबत कुणि सल्ला देईल काय? 
|
Moodi
| |
| Thursday, August 03, 2006 - 5:38 am: |
| 
|
वेड पांघरुन पेडगावला जाता येतय का ते बघ. ~DDD . शोनू सही!! 
|
Maitreyee
| |
| Thursday, August 03, 2006 - 9:04 am: |
| 
|
रॉबिनहुडाच्या व्रतात एक ऍड कर गं शोनू, रोजच्या रोज ' सिन्दूर तेरे नाम का ' या सिरियल चे अपडेट PP वर द्यावे
|
Savani
| |
| Thursday, August 03, 2006 - 10:10 am: |
| 
|
मैत्रेयी LOL शोनू मस्तच गं अजून लिही. हहपुवा अगदी.
|
मस्त ग शोनु मिलिंदा साठी एक व्रत ऍड कर ना कवितांच्या bb वर महिनाभर रेसीपीज विचाराव्यात आणि रेसीपीच्या bb वर महिनाभर V&C चे मुद्दे मांडावेत
|
Meggi_
| |
| Thursday, August 03, 2006 - 3:55 pm: |
| 
|
मस्तच ग, शोनू !! तुझी परवानगी गृहित धरुन मि पण काही व्रते टाकतेय. सर्वजण दिवे घेतिलच लिंबिटिम्बु (नेहमि पहिला नंबर याचाच असतो) - प्रत्येक पोस्टला २ ओळींची मर्यादा ठेवावी. ही मर्यादा अति-महत्त्वाच्या पोस्टसाठी ५ ओळिंपर्यन्त असेल (सारांश धरुन) श्र - दर सोमवारी आणि गुरुवारी एक thriller/suspense कथा लिहावी. शेवटच्या एपिसोड मध्ये भूत, आत्मा, (मी न पाहीलेली) हडळ यांना प्रवेश निषिद्ध असावा. निनावी - लाडू करुन प्रत्येक मायबोलीकरला मिळतील अशी व्यवस्था करावी. विवाहोच्छुंनी ज्या दिवशी लाडू मिळतिल त्यादिवशी स्वतच्या लग्नाच्या तारखा declare कराव्यात. दीपंजली - My Crushes वर इतरांना जॉन अब्राहमचे नाव लिहिण्यास या महिन्या पुरती परवानगी द्यावी. संजुबाबा - V&C BB वर गहन चर्चा करावी. मूडी - आठवड्यातुन एक दिवस लोकसत्ता, पुढारी, सकाळच्या लिन्क देण्यापासुन स्वत:ला परावृत्त ठेवावं. अश्विनी - स्वत:चा ID बदलुन ' हरी बहन ' किंवा ' हिरव्या ताई ' या ID ने लोकांच्या प्रशांना उत्तर द्यावी. माणुस - पाककृतीचे फोटो साबुदाना वडे, रताळ्याचा किस, दाण्याची आमटी इतके सिमित ठवावेत. या पाककृती व्यतिरिक्त फोटो टाकलेस तर तसे disclaimer द्यावे. (फोटो बघुन उपवास मोडल्यास मायबोली प्रशासन जबाब्दार नाही) मेग्गी - सत्यकथा वगैरे लिहिण्यच्या भानगडित पडु नये. विनोदी साहित्यातली घुसखोरी बंद करावी आणि लोकांचा छळवाद तात्काळ थांबवावा. last but not least हितगुज admin २ मेल पाठवुनही activate न झालेलं माझ Meggi ID activate करावा. ( नाहितर श्रावण महिन्यात Duplicate ID चं पाप माझ्या माथी यायचं )
|
Chinnu
| |
| Thursday, August 03, 2006 - 5:59 pm: |
| 
|
मेग्गि, शोनू सहीच चाललयं
|
|
|