|
Bairagee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 2:20 am: |
| 
|
धन्यवाद निनावी. ही कविता आधी दुसऱ्या एका संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. आणखी एक कविता सादर आहे. परिस्थिती "तुझ्याविना जगू शकेन मी?" असे म्हणून लोपली किती युगे अजून मी जिवंत राहिलो कसा! अजून हासतो खजील चंद्र पाहुनी अजून डोंगरात शाल्मली बघून दाहतो; अजून चैत्रपालवीतुनी हळूच लाजणे तुझे नव्हाळते, अजूनही तुझ्याच पल्लवापरी फुलांमध्ये पहाटकोवळी हवा सळाळते; अजून गर्द सावल्या मला खुणावती, "जरा निवांत बैस, मग निघून जा." तुझ्यापरी हरेक चीज येथली बघून वाटते मला अजूनही तरी तुझ्यापरी नसे कुणी इथे; सभोवताल आणि या मनामध्ये अजून स्पंदतेस सारखी, तुझ्याविना जगू शकेन मी अजून ना अशी परिस्थिती ........ बैरागी
|
वा वा वा ... बैरागी ... सुंदर कविताअ दोन्ही ... हार्दिक स्वागत !!! मी आनंद .... पहिला प्रयत्न होता ? खरं सांगा ... छान आहे कविता मीनू ... मस्त ...
|
इशारे ..... पुरेत हे बोलके इशारे नकोच बोलू उगाच जळतील लोक सारे नकोच बोलू नजर तुझीही बघेल काही म्हणावयाला नजरचुकीने नको कुणाला कळावयाला कितीक निरखून पाहणारे नकोच बोलू नजरांवरही इथे पहारे नकोच बोलू अधर विलगता टपोर मोती कलंडताना तुझे शब्द सूर्य होउनी तेज सांडताना नभात ढळतील चंद्रतारे नकोच बोलू चुगलखोर हे छचोर वारे नकोच बोलू चराचरालासुद्धा नसावा तुझा सुगावा असा हळूवार देह अलगद मिठीत यावा " अता तरी बोलशील का रे ? " नकोच बोलू अधीर स्पर्शांतले शहारे नकोच बोलू
|
Soultrip
| |
| Tuesday, August 01, 2006 - 5:46 am: |
| 
|
बैरागी.. सही! तुम्ही अगदी हाडाचे कवी दिसताय
|
Bairagee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 7:13 am: |
| 
|
नजर तुझीही बघेल काही म्हणावयाला नजरचुकीने नको कुणाला कळावयाला कितीक निरखून पाहणारे नकोच बोलू नजरांवरही इथे पहारे नकोच बोलू वैभव जोशी तुमची कविता फार आवडली. धन्यवाद सोल्ट्रिप. केवळ हाडाचा कवी म्हणण्यापेक्षा बोनमॅरोवाला कवी म्हणावे.
|
Ninavi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 9:15 am: |
| 
|
वैभव, बैरागी, सुंदर!! xxxx xxxx xxxx
|
Soultrip
| |
| Tuesday, August 01, 2006 - 9:29 am: |
| 
|
खरे तर हाडाचा फक्त डॉक्टरच असतो
|
Giriraj
| |
| Tuesday, August 01, 2006 - 9:54 am: |
| 
|
वरदान तुला म्हणून सांगतो मित्रा.. भोगतांना एक सुखक्षण अचानकच पुढचा दुःखाचा क्षण पुढ्यात येऊन ठेपला..आणि "आता माझी पाळी" म्हणाला. नाकारतांनाच त्याला केव्हा आपलसं केलं कळलंही नाही माझं मला. आणि त्यापुढचा सुखक्षण आला तर कुठे जाता आलं झटकन विळखा सोडून आधीच्या क्षणाचा! म्हणूनच वाटतं... शुद्ध आणि अशुद्ध रक्त वेगवेगळं ठेवणाऱ्या हृदयासारखंच मनालाही हवं होतं वरदान प्रत्येक क्षण सुटा करून भोगण्याचं.. नाहीच ते, मग हे तरी करंच... बळ दे दोघांना दुरून पाहण्याचं आणि दे वरदान.. क्षणन् क्षण जगण्याचं... गिरीराज
|
Meenu
| |
| Tuesday, August 01, 2006 - 11:44 am: |
| 
|
शिक्षा नीतीनियमांच्या पहारेकर्यांनी, आणलाय आरोपी डांबुन प्रत्यक्ष वायुलहरीलाच, आरोपीच्या कठड्यात घातलयं बांधुन उच्चारले आरोप,हिच ती बेधुंदपणे वहाते.. हिच ती सीमा उल्लंघु जाते.. हिच ती नाही जुमानत कोणाला.. हिच ती नाही घाबरत बाणाला.. मान झुकवुन उभी लहर बोलु म्हणली, आरोपांचा ओसरल्यावर बहर मनातुन मात्र, ती पुरती गोंधळली काय यात चुक माझी.. विचार करत राहीली न्यायाधीश महाराज आरोपीची शांतताच बोलते सार्या आरोपांची हिच कबुली सांगते ठोठावली शिक्षा, यापुढे असं मुळी नाही चालणार आता तुला, आम्ही, पंख्यालाच बांधुन घालणार पंखा फिरेल, तरच तु फिरायचं भिंतीच्या कुंपणातच, यापुढे रहायचं उल्लंघुन या मर्यादा, नाही मुळी चालायचं तेव्हापासुन लहर ती, एकाच खोलीत फिरते आहे खिडकीबाहेरच्या झाडाचे, इशारे नजरेआड करते आहे मनात एकच प्रश्न तिच्या "खरच का मी जिवंत आहे?"
|
Lalu
| |
| Tuesday, August 01, 2006 - 11:48 am: |
| 
|
गिर्या ss वा! बैरागी, 'विठ्या..' आवडली. वैभव, नेहमीप्रमाणे! मिनू, कल्पना आवडली.
|
Meenu
| |
| Tuesday, August 01, 2006 - 11:49 am: |
| 
|
नजर तुझीही बघेल काही म्हणावयाला नजरचुकीने नको कुणाला कळावयाला कितीक निरखून पाहणारे नकोच बोलू नजरांवरही इथे पहारे नकोच बोलू वैभव सुंदर म्हणणार होते पण इशारे सांगातायत की नकोच बोलु .. नाहीच ते, मग हे तरी करंच... बळ दे दोघांना दुरून पाहण्याचं आणि दे वरदान.. क्षणन् क्षण जगण्याचं... वाह गिरी सुंदरच ..
|
Vaibhav, तुझ्या पुनरागमनाची वाट पहात होतो. कुठे दडी मारली होतीस? -बपू
|
Giriraj, वरदान अगदी उठून दिसण्याजोगी. -बापू.
|
बैरागी, सहीच... वैभव,नेहमीप्रमाणे मस्त... गिर्या,बर्याच दिवसांनी?... छान वाटले कविता वाचुन तुझी मीनु,शिक्षा सुरेखच
|
Jayavi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 3:56 am: |
| 
|
गिरी, क्या बात है! खूप खूप आवडली. म्हणूनच वाटतं... शुद्ध आणि अशुद्ध रक्त वेगवेगळं ठेवणाऱ्या हृदयासारखंच मनालाही हवं होतं वरदान प्रत्येक क्षण सुटा करून भोगण्याचं.. वा वा!! लिखते रहो रे!
|
Bairagee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 5:41 am: |
| 
|
गिरी, म्हणूनच वाटतं... शुद्ध आणि अशुद्ध रक्त वेगवेगळं ठेवणाऱ्या हृदयासारखंच मनालाही हवं होतं वरदान प्रत्येक क्षण सुटा करून भोगण्याचं.. तुम्ही मागितलेले वरदान आवडले. वेगळे आहे.
|
गिर्या सही रे ........ मीनू ........ कोण म्हणतं शिक्षा वाईट असते ?
|
Ninavi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:05 am: |
| 
|
मीनू, छान आहे शिक्षा. पण काही झुळुका आपण होऊनही पंख्याला बांधून घेतात गं. आणि तसाच विचार करायचा तर पंखा तरी कुठे त्याला वाटेल तेव्हा फिरायला वा थांबायला मुखत्यार आहे? 
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:54 am: |
| 
|
बैरागी अतीशय सुंदर लिहीता अन फार अचूक शब्द वापरता तुम्ही. खरच निर्मळ मनाचे दिसता तुम्ही. असेच रहा. गिरी वरदान अप्रतीम!! 
|
... पण,... तसा बर्याच दिवसांनी लिहायला बसलोय. खरं सांगायचं तर आताशा काही लिहावसं वाटतच नाही पुर्वीसारखं गोड - गोड आठवणींच मधोळ फोडावसं वाटत नाही; किंवा भितीही नाही वाटत आता दंश करणार्या माश्यांची. आधी कितीना आपण हळुवारपणे लिहायचो प्रत्येक भावना अलवार जपायचो मग भेट असो की विरह प्रत्येक क्षणाचा उत्सव करायचो. ... पण,... जस-जसा वेळ जातो तस-तसा हळूहळू निबर आणि राठ होत चाललेल्या खोडासारखेच आपणही जून होत जातो. आणि असं मध्येच कधीतरी भेटतो आपल्याला वळचणीला कुडकुडत बसलेला आपलाच जुना पाऊस. पावसाला छत्रीत घेण्याचं सौजन्यही न दाखवता चालू लागतो आपण तिर्हाईतपणे. ऋतू काय येतचं असतात. नवीन तर्हा लेऊन सजतात आताशा त्यांना इतकं काही seriously घ्यायचं नाही, असं आपण पाठच करून ठेवतो. हळूहळू आपणही वाढत जातो तन,मन,धनाने, ..., ..., आणि कशाकशाने आणि पसरवून ठेवतो जिथे तिथे सर्वत्र आपल्या अस्तित्वाच्या खुणा. पण,... मग कधीतरी आपलं मन अंतर्मुख होतं. जुनं सारं आठवत आठवत, विचारतो आपण स्वतःलाच,"काय रे किती वाढलास?" मग इथल्या तिथल्या so called यशा-पयाशाच्या सुखदुखांच्या फाटलेल्या,जपलेल्या पावत्या दाखवून थोडा वेळासाठी पास होतो. पण,... नाही होत आता डोळे ओले कुणाच्या विरहाने किंवा नाहि होत एखदी सांज व्याकुळ रिकाम्या घरात एकटचं राहताना. कातरवेळीची defination तर विसरल्यातच जमा. पण,... मध्येच कधीतरी एखादं touching गाणं ऐकताना वाटतं, सारखे भरून यावेत डोळे आणि यावा खूप-खूप मोठा पाऊस, चिंब-चिंब पाऊस, ओला-ओला पाऊस वाहून जावं स्वतःसकट सारं काही जसं पूर्वी पण,... अगदी वाईटातला वाईट क्षण जाणून-बुजून आठवूनही नाहीच होत खळबळ किंवा पागोळ्यांची टपटपही नाहीच. पण,... मध्येच कधीतरी असंही वाटायला लागतं सरलेल्या आयुष्याला विदा करून उरलेलं आयुष्य आपण पुन्हा नव्याने जगायला लागलोय.
|
|
|