|
Shonoo
| |
| Saturday, July 29, 2006 - 11:29 pm: |
| 
|
किती वर्षे झाली लग्नाला? त्याच्याही आधी ३-४ वर्षांपासून ओळखतात मला. पण अजूनही त्यान्च्या मनात माझ्या बद्दल नक्की काय आहे हे मला कळत नाही. थोडा आकस, थोडी नाराजी नक्कीच असणार. हुशार, देखण्या, लाडक्या लेकाला त्यांच्या मनाजोगती सून शोधायची संधी हुकली याबद्दल त्या कायम खंतावलेल्या असतात अशी माझी ठाम समजूत आहे. नवरोबाला ते काही ते पटत नाही. शोधून शोधून तुझ्यापेक्षा वेगळी तिने कोण शोधली असती? असं त्याचं म्हणणं. तसं खरच असावं. पण मला नेहेमी वाटतं की मी त्यान्ची नावडती सून आहे. म्हणजे माझी जाऊ आवडती सून आहे असंही काही नाही. उलट ती तर त्यान्च्या नात्यातली आहे. अगदी पत्रिका वगैरे बघून, रीतसर कांदेपोहे, मानपानाच्या याद्या सर्व काही जावेच्या भाषेत 'टीपिकSल'. पण तिच्यावरही काही खास मर्जी नाही. त्यान्चे त्यान्च्या लग्नातले फोटो बघून जाऊ म्हणाली होती 'बेनजीर च्या आई शोभतात. एखादी मुलगी झाली असती तर कित्ती सुन्दर झाली असती. हे दोघे भाऊ म्हणजे 'अशीच अमुची आई असती' या शिवरायांच्या ओळींना अपवाSद' त्यानन्तर आमच्या दोघींमधे त्यान्चा उल्लेख बेनजीर नावानेच होऊ लागला. कधी तरी ते दोघा भावांच्या कानावर गेलं. तिथून पापांच्या. त्यांना कळल्यावर मग सासूबाइंच्या कानावर जायला किती वेळ? सासयांना आम्ही दोघीजणी पापा म्हणतो पण सासूबाईंना मात्र 'सासूबाई'च म्हणत असू. पापांना त्याचा पण अभिमान. आपल्या मुलांपेक्षा सुनांचच जास्त कौतुक करतात म्हणून सुना पापा पापा करतात असं सासुबाईंच मत. ह्या बेनजीर प्रकरणानंतर मात्र त्या थोड्या बदलल्या. क्वचित स्वत:चा उल्लेख स्वत:च बेनजीर करू लागल्या. पापा तर म्हणायचे की त्यांनी ( सासुबाईंनी) साड्या नेसणे ही कमी करून बरेच नवे सलवार कुर्ते घेतले. प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी 'बेनजीर काय म्हणेल' असा विचार करण्याची आम्हा दोघींना सवयच लागली. किचन रीनोव्हेट करायचंय बेनजीर काय म्हणेल? या वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत दोघीजणी मुलांना घेऊन युरोपला जाऊया- बेनजीर काय म्हणेल?कधी कुठली गोष्ट त्यांना पटणार नाही आणि त्याचे पडसाद कुठे आणि कसे येतील हे कोणाला कळत नसे.
|
Shonoo
| |
| Saturday, July 29, 2006 - 11:59 pm: |
| 
|
त्यांचे वडील हैदराबादच्या नबाबाकडे राजघराण्यातल्या मुलाबाळांना इन्ग्रजी शिकवत होते. विलायतेहून शिकून आलेले. नागपूरला विद्यापीठात शिकवत होते. तिथे कोण नबाबघरचा मुलगा शिकत असे. त्याने शिफ़ारस केली म्हणून नबाबाने त्यांना नोकरी दिली होती. नबाबाच्या घरच्या मुली बाळी यांच्या मैत्रिणी. घरात दिमतीला नोकर चाकर. नबाबी थाटाचे बाळकडूच मिळालेलं. प्रत्येक गोष्ट 'बाकायदा' व्हायला हवी. स्वत: करतील तेही व्यवस्थित. इतरांकडूनही तीच अपेक्षा. केस नेहेमी नीटनेटके. रंगवायला लागल्या त्यानंतर एकदाही चांदी दिसली नाही. कपडे सतत कडक इस्त्रीचे. घरात कमालीची शिस्त आणि स्वच्छता. स्वैपाक केला तर तोही नेटका. पोळ्या, लाडू, पुर्या, करंज्या मोदक सर्व अगदी साच्यातून केल्या सारखे. शिवण, विणकाम, बागकाम सर्वात उत्तम गती. कॉलेजमधे असताना, नवर्याच्या प्रेमात पडताना माझ्या कडे आठ पांढरे सलवार कुर्ते होते. त्याच्यावर आठ रन्गांच्या ओढण्या. आता आठ दहा निळ्या जीन्स, तितक्याच खाकी पॅन्ट्स आणि दहा बारा टी शर्ट असतील. लग्नातल्या साड्या आणि त्या नंतर डोहाळ्जेवणात किन्वा असेच काही काही कारणाने मिळालेले २-४ सलवार कमीज़. शिवण टिपण म्हणजे एखादे तुटलेले बटण परत लावण्यापुरते. स्वैपाक घरात ही तीच तर्हा. जयवंत दळवींच्या पुस्तकात कोणीतरी गावाकरता स्वैपाक करतो आनी एक मुलगा 'कुत्रा तरी खातो का पाहू' म्हणतो तशी माझ्या स्वैपाकाची गत. अमेरिकेत आल्या आल्या केस कापणे परवडत नसे. तेंव्हा मी नवर्याचे आणि त्याने माझे केस कापून द्यायला सुरुवात केली. सर्जरीचं कौशल्य केसांवर कात्री चालवताना किती निरुपयोगी आहे ते आम्हा दोघांकडे बघून सहज कळत असे. आता पैशाची अडचण नाही पण फोन करून appointment घेऊन salon मधे जाणे हे दोघांच्या ही वेळापत्रकात बसत नाही. त्यामुळे अजूनही 'सर्जन है की हजाम' चालूच.
|
Shonoo
| |
| Sunday, July 30, 2006 - 4:46 pm: |
| 
|
क्रमश: लिहायचं राहिलं की
|
मस्त लिहितेयस शोनू बेनझीर nickname एकदम सही आहे
|
Madhura
| |
| Sunday, July 30, 2006 - 8:37 pm: |
| 
|
छान. मस्त आहे. जमले तर सगळे भाग एकदम टाका.
|
Meenu
| |
| Monday, July 31, 2006 - 12:07 am: |
| 
|
शोनू मस्तच गं .. सासुबाईंना पण आवडलेलं दिसतय की नाव बेनझीर ..
|
Bee
| |
| Monday, July 31, 2006 - 12:20 am: |
| 
|
शोनू, वेगळ काहीतरी लिहिते आहेस.. आणखी लिही..
|
Raina
| |
| Monday, July 31, 2006 - 3:59 am: |
| 
|
Shonooमस्त. सुरवात खासच जमली आहे. आता लवकर पुर्ण व्हायची वाट पहाते आहे.
|
Shonoo
| |
| Monday, July 31, 2006 - 9:50 pm: |
| 
|
पापा खरे खुरे absent minded professor . जेवणा खाण्याचे नखरे तर दूरच, पण आवडीचे पदार्थ सुद्धा चवीने, कौतुकाने खातील याची खात्री नाही. कपड्यांच्या बाबतीत ही तीच तर्हा. सुरुवातीला सासूबाई कुरकुर करत. पुढे पुढे त्या स्वत: जातीने रोजचे कपडे कुठले घालावे ते काढून देऊ लागल्या. त्यानंतर पापांनी कधी कापडाच्या दुकानात पाय टाकला नाही. शिम्पी सुद्धा सासूबाई बोलावतील तेंव्हा घरी येतो आणि कापड घेऊन जातो. बरोबर एक आठवड्यात कपडे हजर. खरं तर आता त्याचं दुकान फार नावाजलेलं आहे. त्याला असे घरी जाऊन मापं घ्यायची गरज नाही. पण बेनझीर चा दरारा! पापांची जितकी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत त्या सगळ्यांची हस्तलिखितं सासूबाईंनी तपासली आहेत.परिसंवाद किंवा इतर कुठे भाषण द्यायचे असले तर तेही सासूबाईंच्या कानावर पडलेच पाहिजे. हातातले काम न सोडता त्या ही लाम्बलचक भाषणे ऐकतात आणि मग मुद्दे मागे पुढे करावेत किंवा काही समर्पक पर्यायी शब्द सुचवतात. पापान्चे विद्यार्थी सुद्धा प्रबन्ध लिहून होत आला की ' सर एक दिवशी मॅडम ना पण जरा नजरे खालून घालायला सांगा' असा लकडा लावत असत. पण याचा उल्लेख कधी त्यांनी स्वत्: केला नाही. कधी इतरांच्या बोलण्यातून कळेल तेवढेच. स्वैपाकपाणी, मुलान्च्या शाळा, पाहुण्यांचे यथाशक्ति आदरातिथ्य, अडल्या नडल्या नातेवाईकांना मदत या सर्व जबाबदार्या समर्थ पणे पेलल्या. सन्स्थानी घरात लहानाच्या मोठ्या झालेल्या- पण सरकारी कॉलेजात प्राध्यापकी करणार्या नवर्याच्या पगारात घर चालवताना कधीही कुरबूर केली नाही. दोन्ही मुले डॉक्टर झाली, मोठ्याच्या मागोमाग धाकटा देखील अमेरिकेत स्थायिक झाला. पापांना कोण कौतूक. पण सासूबाईंचे पाय कायम जमिनीवर. पापांनी जर फारच ' माय सन्स ' 'माय सन्स' सुरू केले की त्या हळूच सांगतात "अहो त्या AAPI ची सभासद संख्या पण सांगा जरा. शिवाय सभासद नसलेले किती असतील तेही सांगा. अमेरिकेत इतर डॉक्टर किती मिलियन असतील. तुमचेच दोघे चिरंजीव डॉक्टर असल्यागत बोलू नका" . माझ्या दिराने जेंव्हा प्रायव्हेट प्रॅक्टीस करायचे ठरवले तेंव्हा पापांना फार काळजी वाटत होती. किती नाही म्हटले तरी धंदाच तो. आपण मध्यमवर्गीय. जमलं नाही तर काय घ्या? परत नोकरी मिळेल का? सीनियॉरिटी जाईल त्याचे काय?. सासूबाईंनी मात्र पूर्ण पाठिम्बा दिला होता. 'हळू हळू बसेल जम धंद्यात देखील. आणि तोपर्यंत सूनबाईची नोकरी आहेच ना. मग कसंही करून साम्भाळून घेतील. तुम्ही त्याला घाबरवू नका'. त्या येवढ्या बोलण्याने दोघांना किती धीर आला होता.
|
Shonoo
| |
| Monday, July 31, 2006 - 10:11 pm: |
| 
|
असंच एकदा कुठल्या तरी marathon करता sponsorship मागायला एक दोन रेसिडेन्टस आले होते. बोलता बोलता Any body can do it वरून सहज सुरू झालेली गाडी कधी आणि कशी You both can do it, we'll help you get started पर्यंत आली ते कळलंच नाही. शनिवारी सकाळी दोधेजण आमच्या घरी आले तोपर्यंत माघार घ्यायची वेळ टळून गेली होती. मुकाट्याने ट्रॅक सूट आणि शूज चढवून गेलो त्यांच्याबरोबर. पुढचे कित्येक महिने आम्ही 'मॅरॅथॉन मय' होऊन गेलो होतो. आमची चिकाटी दांडगी म्हणावी की आमच्या रेसिडेन्टस चा उत्साह दांडगा! शेवटी एकदाची ती मॅरॅथॉन दोघांनी पूर्ण केली. घरच्या सर्वांनी, चाळिशीची चाहूल लागलेली असताना देखील जिद्दीने मॅरॅथॉन पूर्ण केल्या बद्दल जोरदार कौतुक केलं. मुलं सुद्धा मित्रमैत्रिणींमधे कौतुकाने सांगत होती. पापांनी तर जणू आम्ही पहिले-दुसरे आलो इतकं कौतुक केलं. बेनझीर कडून इतकं कौतूक काही अपेक्षित नव्हतंच. साधी शाबासकी सुद्धा पुरली असती. पण छे. त्यांनी अशी कान उघाडणी केली की बस. मतितार्थ असा की या वयात हे नसते उद्योग कशाला. व्यायामच करायचा तर रोजच्या रोज काय दोन्-चार मैल पळायचे असेल ते पळावे. बाकी वेळात आपापले उद्योग साम्भाळावे. जेवढा वेळ मॅरॅथॉन ट्रेनिंग साठी घातला तेवढ्या तासांची कमाई त्या चॅरिटीला द्यावी पाहिजे तर.
|
Shonoo
| |
| Monday, July 31, 2006 - 10:23 pm: |
| 
|
मागच्याच महिन्यात एकोणचाळीस सम्पून चाळीसावं लागलं मला. नवर्याने नेहेमी प्रमाणे माझ्या पेक्षा लहान असण्याचा फायदा घेऊन जंगी Over the Hill पार्टी केली. हॉस्पिटल स्टाफ़ ने पण complimentary plastic surgery चे गिफ़्ट सर्टिफ़िकेट वगैरे दिले. घरच्यांनी, मित्र मैत्रिणींनी आपापल्या परीने सल्ले दिले. बेनझीर ने काय सांगावं? म्हणाल्या ' तुम्ही पूर्वी फ़ॉर्च्यून कूकी मधल्या फ़ॉर्च्यून ला काय वाक्य जोडायचात? that applies to Life begins at 40 also . आम्ही दोघी एकाच वेळी गोरेमोरे आणि लाजून लाल.
|
Shonoo
| |
| Monday, July 31, 2006 - 10:56 pm: |
| 
|
असं काही घडलं की वाटतं की त्या खरोख मल्टि डायमेन्शनल आहेत. आपल्यालाच त्यांची पूर्ण ओळख झाली नाही. पण लगेच पुढच्या क्षणाला त्या परत समिक्षक असतात. त्यान्च्या समिक्षेतून कोणी सुटत नाही. आज काल जरा समिक्षेची धार पूर्वी इतकी तीव्र राहिली नाही. कधी वाटते की दोन्ही नाती त्यान्च्या वळणावर आहेत त्याचा परिणाम असावा. माझी लेक आणि पुतणी दोघींना आजी म्हणजे जीव की प्राण. पण आजीच्या समीक्षेतून त्या सुटत नाहीत आणि त्यान्च्या समीक्षेतून आजी. मागच्या शनिवारी माझी लेक आणि पुतणी एकमेकींना नेल पॉलिश लावून देत होत्या. निळे नेल पॉलिश त्यात पुन्हा स्पार्कल वाले हवे म्हणून हौसेने घेऊन आल्या होत्या दोघी. आजींच्या कपाळावरची आठी दोघींना लगेच कळली. आजी 'स्पार्कल' वाल्या साड्या नेसते, स्पार्कल असलेले सलवार कमीझ घालते मग आम्ही स्पार्कल नेल पॉलिश लावले तर ते तिला का नाही आवडत? निरुत्तर झाल्या या प्रश्नावर. आणि मग दोघींना म्हणाल्या मोठ्या माणसांनी सांगितलेलं ऐकावं कधी कधी. आता आमचे किती दिवस उरले तुम्हाला काही सांगायचे. मी तिथेच होते. आदल्याच दिवशी माझ्या दुसर्या मॅमोग्रॅम चा रिपोर्ट आला होता, इतरही टेस्टमधून पहिल्या मॅमोग्रॅम च्या रिझल्टलाच दुजोरा मिळाला होता. एक आठवड्यात सर्जरी आणि मग पाठोपाठ chemo . एकदम aggressive treament plan होता. मी आणि नवर्याने बराच रीसर्च केला. अनेक मित्र मैत्रिणींशी बोललो. हॉस्पिटलमधल्या Counsellor शी तर अनेक वेळेला बोललो. सर्वांनी treatment, options, what to expect या बद्दल चिकार माहिती दिली. पण घरच्यांना कसं आणि केंव्हा सांगावं हे काही सुचत नव्हतं. त्याच्यात बेनझीर चे हे शब्द! आता त्यांना कसं सांगू की कदाचित माझ्याकडे त्यांच्यापेक्षाही कमी दिवस उरलेत. माझ्या मुलांचा, माझ्या नवर्याचा भार आता म्हातारपणात परत त्यांच्याच खान्द्या वर असेल. माझ्याही नकळत माझे डोळे भरून आले. मान फिरवून मी बाथरूम मधे घुसले. पण त्यांच्या लक्षात आलेच की काहीतरी बिनसलयं
|
Bee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 1:59 am: |
| 
|
Dear Shonoo, belated happy birthday! हसता हसता शेवटचा उतारा वाचताना एकदम धस्स झाले हृदयात. असे नकोस म्हणूस गं... ह्या सगळ्यातून लवकर बरी होशील तू. आम्हा सगळ्या मायबोलिकरांच्या शुभेच्छा देव नक्की ऐकेल.
|
शोनू, सुंदर लिहिलेस... !!! all the best and get well soon .... आम्च्या शुभेच्छा आहेतच!!!
|
शोनु छान लिहिले आहेस गं. काळजी घे स्वताची, सर्व मायबोलीकरांच्या शुभेच्छा आहेत तुझ्य पाठीशी.. एवढं मात्र लक्षात ठेव... लहरोंसे डारकर नौका पार नही होती कोशिश करनेवालों की कभी हार नही होती... Get well sooon...
|
Psg
| |
| Tuesday, August 01, 2006 - 5:46 am: |
| 
|
असं काय करताय लोक्स? कादंबरी आहे ही, काल्पनिक आहे हे! हो ना शोनू? शोनू सही लिहिलं आहेस, लगी रहो
|
poonam, malaahii vaatale kada.nbarii aahe mhanun..paN bee chyaa pratikriyenanatr.. malaa vaatale kharach aahe..!!!lavakar ulagaDaa kara g. bai.. shonoo..!!!
|
Shonoo
| |
| Tuesday, August 01, 2006 - 8:03 am: |
| 
|
कादम्बरी / दीर्घ कथा आहे. माझ्या स्वत:बद्दल नाही. माझ्या सासूबाईंबद्दल ही नाही. माझी चाळिशी केंव्हाच उलटली :-) त्यामुळे मॅमोग्रॅम वगैरेंचा आता तितकासा धाक ही वाटत नाही! शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
|
Maitreyee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 8:13 am: |
| 
|
छानच लिहितेयस शोनू! style आवडली लिखाणाची. बरं गोष्टीतली 'मी' म्हणजे तू नाहीस तर मग तू बेनझीरच नाहीस ना ~D~D
|
Moodi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 8:19 am: |
| 
|
खूपच वेगळा विषय, पण एकदम सहजतेने लिहीतीयस तू. 
|
|
|