Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 31, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » काव्यधारा » कविता » Archive through July 31, 2006 « Previous Next »

Ninavi
Wednesday, July 26, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, अप्रतिम कविता.

प्रसाद, मीनू, देवा, छान रे.


Vaibhav_joshi
Wednesday, July 26, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड आणि मीनू ... अतिशय अप्रतिम कविता ...
देवा ... मस्त रे ...


Vaibhav_joshi
Wednesday, July 26, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेंटी ....

डॉक्टर .. माझ्या डोळ्यांना काहीतरी झालंय हो ...
म्हणजे ना ... जवळचं सगळं धूसर दिसतं ...
आणखी जवळ जाऊन बघावं तर
लांब लांब गेल्यागत भासतं ...
आणि ना ...
आजूबाजूचे रंग बदलतात ..
म्हणजे सहजच बदलत असतील म्हणा ..
पण मला सगळ्या ,
काळ्याच रंगांच्या शेडस दिसतात ...
परवा एका चेहर्‍याशी कितीतरी वेळ बोलत बसलो
तर तो मुखवटाच होता म्हणे ...
आणि अलीकडे
डोळ्यांतून सारखं पाणी पण येतं हो ..
मी विचारलं इतरांना
" असं होता कामा नये " म्हणाले
सेंटी, सेंटी म्हणून कीव करत होते
डॉक्टर हे सेंटी की काय ते खूप गंभीर असतं का ?
जीवावर बेततं का ?
मला इतरांसारख नॉर्मल जगायचंय हो
मी बरा होईन ना डॉक्टर ?
मी बरा होईन ना ?


Chinnu
Wednesday, July 26, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव बरा आहेस न बाबा? काळजी घे रे स्वत:ची. एवढे सेन्टी असणे बरे नाही! :-)
छान कविता.

झाडा,

पुढे कधी आटलोच तर
तुझ्याकडून मागून घेईन...

बहोत अच्छे!


Devdattag
Thursday, July 27, 2006 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु, मीनु, वैभव, निनावि धन्यवाद
वैभव मस्तच रे..
मीनु सहिये गं..


Jayavi
Thursday, July 27, 2006 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, You are too good!

मीनु, खूप खूप आवडली!

वैभव, अरे कसा अगदी काळजाला हात घालतोस रे!


Kandapohe
Thursday, July 27, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, क्या बात है. मस्तच.

देवा तुझी पण आवडली.

वैभाव फारच सेंटी झालास रे? कुणाचा चेहरा... आपले मुखवटा बघीतलास?
:-)

Zaad
Thursday, July 27, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, खूपच सुंदर.
मीनू, भिडली कविता.
देवा,निनावी,वैभव,चिन्नु...धन्यवाद!

वैभवा, मलाही असं होत कधी कधी...तुला काही औषध सापडलं तर नक्की सांग मला... :-)


Princess
Thursday, July 27, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु खुपच सुरेख ग. देव आणि वैभव, नेहमीप्रमाणेच...

Bhramar_vihar
Thursday, July 27, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा, चष्म्याचा नंबर बदलला का रे?

Marathi_mitra
Thursday, July 27, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनु खुपच छान. खरच स्वाभिमानापुढे सर्व गोष्टी नगण्य आहेत.
वैभव अरे का रे इतका सेंटी होतोस, लक्षण काही बरे नाही हो. :-)

अमोल


Me_anand
Thursday, July 27, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा एक प्रयत्न

शब्द सुचावा आतून आतून
अलगद यावा स्वर कन्ठातून
जीवन व्हावे सुरेल गाणे
गात घुमावे दहा दिशातून

विज शिरावी आत खोलवर
उजळीत उधळीत अवघे जीवन
सगूणातून हळूच व्हावे
निर्मळ निर्मम आणि निरन्तर

Me_anand
Thursday, July 27, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वात्रटीका

दूरवर आभाळात कोणितरी दडून बसलाय
कळसूत्री दोर्या आपल्या हाती धरून बसलाय
मन मानेल तस सगळ्यान्ना तो नाचवतोय
'माझ माझ' म्हणून इथ आपण आपली खाजवतोय


Bairagee
Friday, July 28, 2006 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मायबोलीकर मित्रहो,

मायबोलीवर माझी पहिली कविता टाकतो आहे. स्वीकार करावा.

विठ्या तुला ठाउक आहे का?

विठ्या तुला ठाउक आहे का?
तुक्या आंबिले हा कुणब्याचा
आणि ज्ञानबा कुलकर्ण्याचा
महार चोख्या
नाम्या शिंपी
तर सावत्या माळ्याचा
अन् नरहर सोनाराचा...

चिडून जाऊ नकोस इतका
जात काढली त्यांची म्हणुनी,
हात काढ त्या कमरेवरुनी
आणि मला तू सांग विठोबा,
खरेच तुज ठाउक होती का,
जात तुझ्या संतांची?

......

बैरागी


Meenu
Friday, July 28, 2006 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सय

गड्या तुझी सय येई, मन सैरभैर होई
क्षण एकही रे पुढे, मग सरकत नाई

सरसर सर येता, आणी तगमग होई
पायातल्या बेडीचा रे, भार मणमण होई

मनी कल्लोळ कल्लोळ, पाणावली माझी दिठि
सुटता ना सुटे तुझ्या, आठवांची मगरमिठी

एक थेंब पानाआड, एक पापणीच्याआड
कोसळण्या आतुरले, माझ्या मनीचे आभाळ

दिशा झाकोळ झाकोळ, हवा ढगाळ ढगाळ
गड्या पावसा रे, आता तु तरी कोसळ
तु तरी कोसळ....


Poojas
Sunday, July 30, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू सहीच गं.........!!!

काय दोस्त लोग सगळे कसे आहात..?
आज मला थोडासा वेळ मिळाला.. म्हणून आले..
CARRY ON...:-)


Pkarandikar50
Sunday, July 30, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bairaagee
सलामीच धडाक्यात केलीत की राव?

Meenu

कवितेच्या शेवटच्या ओळीमुळे कविता खूप interesting होते.मजा आला.

-बापू.


Moodi
Sunday, July 30, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी अतीशय सुरेखच हो. प्रा. यु. म. पठाणांनी हेच विचारले होते.

Bairagee
Monday, July 31, 2006 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू आणि मूडी,
धन्यवाद.
मीनू, कविता आवडली.
एक थेंब पानाआड, एक पापणीच्याआड
कोसळण्या आतुरले, माझ्या मनीचे आभाळ


Ninavi
Monday, July 31, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आनंद, तुमचा 'एक प्रयत्न' आवडला.
बैरागी, मस्त. ही आधी कुठे प्रकाशित झाली होती का? मला वाचल्यासारखी वाटत्ये.
मीनू, छान गं.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators