सगळेच प्राणी लग्न करतात... माकडं असोत वा गाढवं असोत सगळेच प्राणी लग्न करतात माणसं असोत वा सिंह असोत बहुतेक नवरे लाथाच खातात! गाढवीण आपल्या गाढवाला 'ऑफिशियली' लाथा मारते माकडीण आपल्या माकडाला हवं तसं 'टांगून' ठेवते सिंहीण आपल्या सिंहराजाची पाहिजे तेंव्हा आयाळ खेचते अन बाई माणूस, बुवा माणसाचा फक्त बोलून खीमा करते! मार्ग त्यांचे काहीही असोत उद्दिष्टं त्यांची एकच असतात म्हणून माणसं असोत वा सिंह असोत बहुतेक नवरे लाथाच खातात! गाढव नवर्याला गाढविणीवरती गुरकताना पाहिलंय कधी? सिंहिणीला ताटाखालचं मांजर झालेलं पाहिलंय कधी? आपण पहातो माकडला माकडचेष्टा करताना अन बुवा माणसाला, बाईमाणसाच्या मुठीत निमूट जगताना जात त्यांची काहीही असो अनुभव नवर्यांचे सारखेच असतात कारण माणसं असोत वा सिंह असोत बहुतेक नवरे लाथाच खातात! गाढवासारखं 'हो' 'हो' म्हणत नवरे आपले जगत रहातात माकडासारखं आशांवरती नवरे नेहमी लटकत रहातात सिंह बनून जगण्यासाठी हिंमत त्यांच्यात उरत नाही माणूस म्हणून जगण्यासाठी किंमत त्यांना उरत नाही आलेला दिवस, आलेले क्षण पुढे पुढे ढकलत रहातात कारण माणसं असोत वा सिंह असोत बहुतेक नवरे लाथाच खातात! - प्रसाद शिरगांवकर (कॉपी पेस्ट व्यावसायिकांना नेहमीचीच विनंती!)
|
Moodi
| |
| Wednesday, July 26, 2006 - 1:32 pm: |
| 
|
आईगं प्रसाद अहो काय हे. आम्हा सगळ्या स्त्रीजातीचा रोष ओढवुन घेताय काय? फारच सुंदर!!  
|
Nalini
| |
| Wednesday, July 26, 2006 - 1:42 pm: |
| 
|
भन्नाट!
|
Arch
| |
| Wednesday, July 26, 2006 - 2:24 pm: |
| 
|
प्रसाद, किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला? 
|
बर्याच दिवसांनी तुमचे लिखाण वाचलं खूप छान आहे कविता शेवटी अनुभव महत्त्वाचा नाही का ? त्याला पाहिजे जातीचे नवरे बॅचलरांचे काय काम ? 
|
Chinnu
| |
| Wednesday, July 26, 2006 - 5:06 pm: |
| 
|
प्रसाद अगदी भन्नाट रे!
|
Megha16
| |
| Wednesday, July 26, 2006 - 9:47 pm: |
| 
|
हाय प्रसाद, अगदीच भन्नाट आहे कविता. आर्च च्या प्रश्नाच उत्तर काय?
|
Princess
| |
| Thursday, July 27, 2006 - 1:01 am: |
| 
|
प्रसाद, छानच रे. विशेष म्हणजे नवर्याला खुपच आवडली. सगळ्या नवर्यांचे दु:ख मांडलय म्हणे तू. पण लग्न झालय का तुझे???(ए.भा.प्र... )
|
प्रसाद, जबरी रे!! ... 
|
प्रसाद, मनाची व्यथा भळाभळा वाहु लागली! thankfully माझी बायको मायबोलीची मेंबर नाहीये!
|
प्रसाद gud one .... थोडे आमच्याकडुन उत्तर बर.. (गमतीत घे.. जसे आम्ही बायकांनी घेतले.. घेतले तसे ...) माकडे असोत वा गाढवे असोत.. सगळेच लग्नाची हौस करतात, माणसं असो वा सिंह असोत बहुतेक नवरे बाताच मारतात.. गाढव आपल्या गाढविणीला सगळ्यासमोर officialy " गधडे तुला काही कळतच नाही " म्हणतो..... माकड आपल्या माकडिणीचा नेहमीच जीव टांगणीला लावतो.. सिह नेहमीच सिहिणिला गुरकावतो.. आयाळ फ़क्त पुरुषाला म्हणुन सारखी बाईमाणासाची सिमा दाखवतो.. मार्ग त्यान्चे काहीही असोत.. उद्दिष्ट त्यान्चे एकच असते.. माणसं असो वा सिंह असोत.. बहुतेक नवरे फ़क्त " .पुरुष " असतात.. गाढव नवरा गुरकत नाही पण लाथा घालतो.. सिंहिण असुन तीने ताटाखालच मांजर व्हाव अस सिंहाला सारख वाटत.. आपण पाहतो माकडाला माकडचेष्टा करतांना अन तरीही त्या माकडला " तु बुवा great " अस बाइमाणसाला निमुट्पणे म्हणतांना.... जात त्यांची काहीही असो.. अनुभव नवर्याचे सारखेच असतात.. कारण माणसं असोत वा सिंह सगळे नवरे नवरेपण गाजवत असतात.... " गाढव " नवर्यालाही फ़क्त " हो.. " हो म्हणते बायको आपली जगत राहते.. फ़ांदीवरती आशेच्या.. घर नोकरी कसरत करत राहते. सिहिंणीचा रुबाब तीच्यात उरत नाही.. आणि गुलाम म्हणुन तीला जगता येत नाही.. आलेला दिवस आलेले क्षण पुढे पुढे ढकलत राहते कारण मुला..बाळांचे आजारी जिर्ण खोडांचे फ़क्त तीच करते..!!! लोपमुद्रा..!!!
|
अरे वा! सवाल जवाब पण चालू झाले की इथे! चालूदे. सुरुवातीला ऐकाऽऽऽऽ असे पण टाक मजा येइल. 
|
Princess
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:01 am: |
| 
|
लोपा.... खुप सुरेख. आता छान वाटले बघ. नाहीतर आपली व्यथा मनातच राहिली असती की. छान उत्तर दिलेस.
|
Himscool
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:21 am: |
| 
|
दोन्ही कविता मस्तच आहेत... लोपमुद्रा एक सांगावेसे वाटते.. तूही प्रसादप्रमाणे स्वत:चे नाव खाली लिही आणि त्याच्या सारखेच एक निवेदन पण लिही.. इकडे वाङमयचौर्य कधीही होऊ शकते त्यामुळे आधीच काळजी घेणे कधीही उत्तम...
|
प्रसाद, लोपा छानच.. तसा म्हणे त्यांचा इरादा अगदीच नेक होता आणि आमच्या डाएटवर त्यांचा रोजचा चेक होता तसंअ आमचं वजनही बोलण्याएवढं फार नाही आमच्यासोबत कुणी आत जाईल असं एकही दार नाही कालच तुटलेला सोफा अगदी टेलराइज्ड मेक होता आणि आमच्या डाएटवर त्यांचा रोजचा चेक होता ह्याच्या आधी आमचं जेवण होतं अगदी मस्त वीस पंचवीस पोळ्या कशा एकदम व्हायच्या फस्त सकाळी आणि संध्याकाळी असाच आमचा इन्टेक होता आणि आमच्या डाएटवर त्यांचा रोजचा चेक होता रोजच्या आमच्या जेवणात आता कार्ल्याच आहे सूप एक पोळी ताटात नि बाजूला हुंगायला ठेवलय तूप आंबा सोडा नशिबात आता पाण्याचाच शेक होता आणि आमच्या डाएटवर त्यांचा रोजचा चेक होता म्हंटलं अश्या वागण्याचा करायचा नाही बाउ होउन शूरवीर वाट्टेल ते हळूच लपूनछपून खाऊ नेमका आमच्या पाळतिवरति आमचाच हो लेक होता असा आमच्या डाएटवर त्यांचा रोजचा चेक होता -देवदत्त
|
Psg
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:55 am: |
| 
|
प्रसाद, सही लोपा, आवडलं, छान लिहिल आहेस
|
Princess
| |
| Thursday, July 27, 2006 - 6:06 am: |
| 
|
खुप छान बरे का देवा...
|
नेमका आमच्या पाळतिवरति आमचाच हो लेक होता >>>>आंबा सोडा नशिबात आता पाण्याचाच शेक होता >>>. kharay re... devaa mast!!!
|
सर्व कविवर्यांना मानाचा मुजरा, एक से एक भारी आहे, मजा आली
|
लोक्स धन्यवाद! Arch / Princess लग्नाला ३ वर्ष झालीत... Moodi फोटो धमाल आहे! Lopamudra तुझं उत्तरही छानच आहे! देवा सहीच!
|