Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 27, 200620 07-27-06  8:40 am
Archive through August 04, 200620 08-04-06  3:34 pm

Manishalimaye
Friday, August 04, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण सांगितल तरच कळेल ना? आभारी आहे अमेय मात्र तेवधे मेल मधे कविता कशा घेउ ते सांगा. तुम्ही सगळे केव्हा भेटता इथे ते ही सांगा तुमच्यात आवडल मला. भारतातली वेळ काय?

Vaibhav_joshi
Saturday, August 05, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद ...
सॉलिड रे ....
मस्तच एकदम


Manishalimaye
Saturday, August 05, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वैभव तुज़्या[हा कसा लिहु आता ते ही तुच सांग ] कविता खरच सुंदर असतात. कस सुचत रे हे अस?

Manishalimaye
Saturday, August 05, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सगळे कुटे [आता हे कसं लिहु ते सांगाल का कोणी?] अचानक सगळे कसे गायब होता कुटे [पुन्हा हेच अक्श्र्र अड्तयं सांगा] जाता?
मी मनिषा लिमये


Gajanan1
Saturday, August 05, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या कवितान्ची link mail मध्ये देता येते.
प्रत्येक पोस्ट च्या वर नावाच्या समोर चार चिन्हे आहेत.
त्यातले शेवटचे चिन्ह blue color मधले आहे, ते link to this message साठी आहे. त्यावर pointer न्या. right click करा. त्यात शेवटी copy shortcut वर click करा. नन्तर आपल्याला हवे तिथे paste करा. त्या post ची hyperlink copy होइल.


Vaibhav_joshi
Saturday, August 05, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मनिषा ...
आपल्या मदतीसाठी आपलेच वाक्य टाईप करून दाखवत आहे ...
are he sagaLe kuThe, achaanak sagaLe kuThe jaataa? gaayaba hotaa?


Nivant
Monday, August 07, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yatil kahi bhaag jar word madhye copy paste karayacha asel tar kuthala font lagel (marathi)?

Chandrakor
Monday, August 07, 2006 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा, आपण इथे जेव्हा देवनागरीत लिहितो ना तेव्हा वरती उजव्या कोपर्यात "देवनागरीत लिहिण्यासाठी मदत" असे लिहिलेले असते. तिथे क्लिक करावे.

Gajanan1
Tuesday, August 15, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Where are all poets?

Vaibhav_joshi
Thursday, August 17, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिली ...
सारं सारं नकोसं वाटतं जेव्हा आपल्या सिली मनाला ...
नक्की काय हवंसं वाटतं तेव्हा आपल्या सिली मनाला ?

गोंधळ नकोच,गर्दी नकोच कोंडुन घ्याव खोलीत सालं
ब्रेकफास्ट, कॉफी,जेवण बिवण सगळंच तेल लावत गेलं
टिव्ही बंद,एफेम बंद,म्युझिक सिस्टीम देखील बंद
बेचैन हातामध्ये मोबाईल चालू .. बंद ... चालू .. बंद
मेसेज कुठलाच नको वाटतो जेव्हा आपल्या सिली मनाला
नक्की कुठला हवा वाटतो तेव्हा आपल्या सिली मनाला ?

त्या व्यक्तीने निग्लेक्ट करता उगाच आपण डिप्रेस व्हायचं
बासंच आता असल्या माजखोर वागण्यानेही इंप्रेस व्हायचं
घरात घुसमट म्हणुन जरासं चक्कर बिक्कर मारुन यावं
मुद्दाम नाही तरी जरासा पर्फ्युम बिर्फ्युम मारुन जावं
वाटेत कुणीच नसावं वाटतं जेव्हा आपल्या सिली मनाला
नक्की कोण दिसावं वाटतं तेव्हा आपल्या सिली मनाला ?

आफ्टरनून अन इव्हिनिंग होते क्षणाक्षणाला लोन्ली लोन्ली
क्षणोक्षणी पण छळे जिवाला दॅट पर्सन ... दि वन ऍन्ड ओन्ली
सगळ्या होप्स सरता सरता जेव्हा वाजतो एकदम फोन
सगळं विसरायला का लावतो जिया धडक धडक चा टोन ?
आय हेट यु म्हणावं वाटतं जेव्हा आपल्या सिली मनाला
आय लव्ह यु का आठवत असतं तेव्हा आपल्या सिली मनाला ?

वैभव जोशी


Manishalimaye
Thursday, August 17, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्हेरी गुड सिली. पुष्कळ दिवसांनी वैभव
कवितेच्या प्रांतात वैभवाचे दिवस परत आले की काय!


Psg
Thursday, August 17, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय गोड कविता आहे वैभव, अचूक निरिक्षण :-)

Kmayuresh2002
Friday, August 18, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,सहीच रे... एक्दम सिली आहे:-)

जेव्हा काही नकोसे वाटेल माझ्या सिली मनाला
आठवेल तेव्हा ही कविता माझ्या सिली मनाला:-)


Devdattag
Friday, August 18, 2006 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. छानच आहे रे..
मस्त गाणे होउ शकेल चाल लावून..


Vaibhav_joshi
Friday, August 18, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मनिषा,पूनम,मयुरेश, देवा ...
देवा ... चालीसकटच आलीय ... ऐकवेन कधीतरी ... एकदोन ठिकाणी लय विस्कळित होतेय असं वाटतंय .. विचार चालू आहे ...


Dhund_ravi
Friday, August 18, 2006 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद रवीचा नमस्कार...
तुमच्या बेधुंद जगात एका छोट्याश्या कवितेने पदार्पण करतोय...


माझ्यावरती रागावली की ती प्रेमाने मला डुक्कर म्हणते.

परवा दिवशी ती इतक्या लाडानी मला डुक्कर म्हणाली की पलिकडच्या चिख़लातलं एक डुक्कर लाजलं.
... आणि एका बाईकडे बघुन लाजला म्हणुन त्याच्या बायकोशी त्याचं वाजलं.

त्याची बायको त्याला म्हणाली
अरे लाज वाटते का तुला, काल तर म्हणालास की माझ्यासोबत खुष आहेस..
पण तु काही सुधारणार नाहीस,
डुक्कर कसला पुरुष आहेस..

तिनी त्याला पुरुष म्हणु दे नाहीतर हिनी माला डुक्कर
ही तर प्रेमाचि हाक आहे...
पण माणुस व्हा नाहीतर डुक्कर
शेवटी बायको म्हणजे धाक आहे...

धुंद रवी


Manishalimaye
Friday, August 18, 2006 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद रवी,
सही आहे रे एकदम.


Gajanan1
Friday, August 18, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ड्रॉ ड्रॉ... [ म्हणजे डुकरान्च्या भाषेत छान छान]

Abhiyadav
Monday, August 21, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फरक एवढाच आहे कि तुमची ती तुम्हाला लाडाने डुक्कर म्हणाली आणि डुकराची बायको त्याला रागाने पुरुष म्हणाली. हे हे. :-)

छान आहे कविता.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators