अजयजी, अक्षर कसेही असुदेत तुमचे पण त्या अक्षरांमागील प्रतिभेचे सौन्दर्य केवळ वर्णनातित..
|
धम्माल आहे लेख अजय.
|
Chandya
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:00 pm: |
| 
|
अजय. मस्त जमलाय लेख.
|
Divya
| |
| Tuesday, July 18, 2006 - 4:40 pm: |
| 
|
छान लिहीलय अजय. कोट्या समर्पक आहेत. कॉलेजला असताना एक सर assignment तपासताना ज्याचे assignment असेल त्याचाच पेन घेउन ते तपासत. एकदा मी त्यांना त्या टॉपिक बद्दल प्रश्न विचारले तर त्याचे स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या सहीखाली लिहीले. नंतर एका वर्गमित्राने ते copy करायला मागितले तर त्यांच्या सहीसकट खालचा मजकुर जो सरांनी लिहिला होता तो पण याने copy केला. तेव्हा सरांनी सगळ्या वर्गात त्याचे assignment दाखवले होते. काय तर अक्षरातला फ़रक कळु नये, म्हणजे लिहीताना डोके जागेवर नसले तरी चालते फ़क्त डोळे आणि हात याचच फ़क्त काम.
|
Yog
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:29 pm: |
| 
|
"सही रे सही" लेख आहे... सुन्दर हस्ताक्षर स्पर्धा वगैरेच्या आठवणी जाग्या झाल्या 
|
अजय, एकनएक वाक्य मस्त आहे.. अगदी पोट दुखेपर्यंत खो खो हसलो दुसरी पर्यंत ते ४ रेघी वही असायची. अक्षरं वरच्या आणि खालच्या रेघेला जोडता जोडता नाकी नऊ यायचे पण ह्या लेखाबरोबर एखादं अस्सल अक्षरातलं पान ही टाका
|
Lalu
| |
| Tuesday, July 18, 2006 - 11:32 pm: |
| 
|
>>साम्यवाद साम्यवाद तो हाच! हे मला एकदम पटले. अन भांडवलशाही देशाने केलेली ही साम्यवादाकडे वाटचाल करणारी निर्मिती पाहून हेलावलो अजय, मस्तच आहे लेख.
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, July 19, 2006 - 12:32 am: |
| 
|
दी बेश्ट रे अजय... अगम्य अक्षर असणारे लोक बहुधा डॉक्टर होत असावेत कारण सगळ्याच डॉ. नी दिलेले prescription मी आजतागायत वाचू शकलेलो नाही... ते काम त्या मेडिकल वाल्याचे... तुझे लिखाण, हे मेडिकल वाले सहज नक्कीच वाचू शकतील... . आणि हो यापुढे स्वहस्ताक्षरात लिहिलेला पत्ता विचारायचा असेल तर या मेडिकल वाल्यांकडेच जा ते सांगू शकतील अर्थात पेठेतला मेडिकल वाला काय करेल याचा नेम नाही... कारण तो मेडिकल वाला असला तरी शेवटी पेठेतलाच आहे..
|
Athak
| |
| Wednesday, July 19, 2006 - 1:07 am: |
| 
|
अजय , छान सुंदर वळणदार अक्षरात लिहिलस , मला कुठेही अडचण आली नाही वाचतांना
|
Princess
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:11 am: |
| 
|
अजय, खुप छान लिहिलय. मला तर अगदी समदु:खी मिळाल्याचा आनंद झालाय. तुमच्यासारखच झाले होते माझे. माझे अक्षर म्हणजे अगदी खराब तर माझ्या भावाचे मोत्यासारखे. मी निबंध खुप छान लिहायची पण खराब अक्षरात. तो सरांना कळायचाच नाही बहुदा. पण माझा भाऊ छान अक्षरात खुप छान निबंध लिहायचा त्यामुळे मराठीत नेहमी पहिला. आणि विशेष म्हणजे तो सुंदर अक्षरात लिहिणारा डॉक्टर आहे आणि मी पण आता छान अक्षरात लिहिते म्हणजे कीबोर्ड वर बडवते. आता ते अक्षराचे दु:ख तेवढे राहिलेच नाही बघा. पण तुम्ही माझ्या जुन्या आठवणीं ना उजाळा दिल्याबद्दल धन्स
|
Iglesias
| |
| Wednesday, July 19, 2006 - 7:04 am: |
| 
|
अरे हे लिहिलयस कि कागदावर हगलायस, अस तर कुणी आपल्यास म्हंट्ल नाहि ना मस्त रे भो
|
Aparnas
| |
| Wednesday, July 19, 2006 - 7:34 am: |
| 
|
अजय, तुमचा लेख वाचून माझ्या चांगल्या अक्षराचा complex आला मला मस्त लिहिलय.
|
Maitreyee
| |
| Wednesday, July 19, 2006 - 8:53 am: |
| 
|
अजय मस्त लिहिलय माझी कथा जरा वेगळी आहे! माझे अक्षर मुळात अगदी छान. शाळेत, आंतरशालेय स्पर्धेत वगैरे बक्षिसे मिळलीयत! पण हळू हळू अक्षर इतकं बिघडत गेलं! engg ल ते १६ मार्काची रटाळ उत्तरे लिहिताना, नन्तर जॉब सुरू झाल्यावर meeting मधे नोट्स लिहिताना, client शी फ़ोन वर discuss करताना खरडलेले points असे करत इतकं खराब अक्षर झाले की वर तू लिहिलेले सगळे remarks 'कमावले' मी . नन्तर एकदा माझ्य कलिग्स ला मी सांगितले की मला हस्ताक्षरात बक्षिसे मिळालियेत तर माझ्या बॉस सकट सगळे जण हसून लोळले पार 
|
अजय, मस्त लिहीले आहेस.. एकदम खुसखुशीत ! अरे हे ललितमधे 'टाकले' आहेस हा मात्र खासा विनोद आहे (अजून नीट सावकाश वाचायचे आहे. एक दोन ठिकाणी अक्षर लागले नाही. साम्यवाद आणि encrypting मस्त) मैत्रेयी
|
Phdixit
| |
| Thursday, July 20, 2006 - 12:06 am: |
| 
|
अजय एकदम मनमोकळे लिहीले आहे, अक्षरांच्या बाबतीत म्हणशील्ल तर मी तुझाच भाउ, कुत्र्याचे पाय मांजराला अणी मांजराचे पाय कुत्र्याला
|
Aj_onnet
| |
| Thursday, July 20, 2006 - 9:20 am: |
| 
|
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद! मला बरेच समदुःखी अन काही गुरू मिळाले. (गुरु मंडळी सावध रहा! ) ह्यावरून अजून एक किस्सा आठवला. दहावीच्या सुट्टीत आमची एक कल चाचणी घेतली होती. त्यात अनेक प्रश्न होते अन त्यावरून माझा भावी शिक्षणाविषयकचा कल ते decide करणार होते. शेवटचे एक पान त्यांनी 'पुढे मी कोण होणार' ह्यावर काही लिहायला सांगीतले होते. मला अर्थात engg & tech मध्ये रस असल्याने त्या चाचणीचा अंदाज तसाच आला. पण माझे शेवटच्या पानावरचे अक्षर पाहून, 'तू MBBS वा Bpharm निश्चित करू शकतोस' असा 'ज्योक' त्यांनी मारला होता! दिनेशजी, तशी सवयच लागलेय! --ह्या बीबीचे नाव 'त्याचा हस्त आणि माझे अक्षर' असा तर नको होते बघा, मी म्हंटले होते ना, की मला लोक लगेच सूचना करयाला सुरूवात करतात! हे घ्या!
|
Chafa
| |
| Thursday, July 20, 2006 - 9:44 am: |
| 
|
अजय खूप मस्त लिहीलंयस रे! आम्हाला इंग्लिश शिकवणार्या पटवर्धन बाई आणि एक प्रसंग आठवला. लहानपणी जशी अक्षरं घोटून घेतात तसे वर्गात चालले होते. अक्षर होतं small F आणि त्या आम्हाला cursive शिकवायच्या. तर मी काढताना cursive 'f' चा खालचा लंबगोल टोकदार काढत होतो. पटवर्धन बाईंनी हे पाहीलं आणि त्या इतक्या चिडल्या की मला 'हातावर' पट्टी खावी लागली. त्यांच्या त्या इतक्या प्रामाणिक संतापामुळे का होईना आज(ही) माझे cursive writing चांगले आहे. (म्हणजे कुठल्याही ग्रीटींग कार्डवर किंवा गिफ्टवर मला लिहायला सांगतात म्हणजे तसे ते असावे). मराठी अक्षरही चांगले होते, पण आता लिहायची सवय सुटल्याने लिहीताना हाताला अडखळल्यागत होते.
|
Savani
| |
| Thursday, July 20, 2006 - 10:10 am: |
| 
|
अजय, मस्त लिहिले आहेस. हहपुवा..
|
Charu_ag
| |
| Thursday, July 20, 2006 - 10:17 am: |
| 
|
अजय, सुंदर लेख. कोट्या तर लाजवाब.
|
Gs1
| |
| Thursday, July 20, 2006 - 10:44 am: |
| 
|
वरील प्रतिसादांवरून लेख चांगला असावा असे वाटले होते, पण गिचमिड अक्षरामुळे काहीच वाचता आले नाही. 
|