नांदतो मी तेथे सुखाने जीव माझा रमवतो भंगलेला डाव आणि पुन्हा नव्याने जमवतो...
|
काय मी सांगू सखे मज आज अंतरी वाटले तुला पाहिले 'त्या'सवे अन् आकाश सारे फाटले बोलली नाहीस काही नुसतेच तू पाहिले मन्मंदिरातील देवतेला मी तुळशीपत्र वाहिले...
|
पाहतो तैसा पुन्हा मी भंगलेला डाव वळूनी जातो विझवण्यास पुन्हा जे गेले रे आधीच जळूनी
|
शब्द मांडण्याचा प्रयत्न केला असे मी स्वहस्ते आणि माझे भाग्य ऐसे साह्य केले "देवदत्ते"...
|
तुझ्या प्रीतीत दुःखही मज सुखासारखे वाटे तुझ्या सुगन्धित सहवासी फ़ूलासम भासती काटे -मृद्गंधा
|
मृदगंधा, प्रिती, आनंदयात्री छानच माझिया शब्दफुलांची तीच आहे जन्मदात्री पुजारी मी शारदेचा सोबतीस आनंदयात्री
|
देवदत्त,आनंदयात्री,प्रिति, सगळेच अप्रतिम!!लिहीत रहा...
|
व्वा!! देवदत्ता, नचिकेत सुंदर शब्दांची गुंफ़ण. म्रुदगंधा नेहमीप्रमाणेच छान..
|
R_joshi
| |
| Friday, July 14, 2006 - 2:25 am: |
| 
|
वा आनंदयात्री, मृदुगंधा छानच!!! देवदत नेहमीप्रमाणेच अप्रतिम!!!!! आनंदयात्रेत लाभला सहवास देवदतासारीखा मृदुगंधाचा अर्थ आला आज माझ्या गीताला प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, July 14, 2006 - 2:30 am: |
| 
|
डाव मी मांडते नव्याने जुनिच साथ घेऊनी राखेतुन जन्म नवा घेते जुनीच हि पक्षिणि प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, July 14, 2006 - 2:32 am: |
| 
|
malaa koNi pashriNi madhlaa 'shr' kasaa lihaayachaa te saa.ngela kaa?
|
तुला क्ष पाहिजे का?
|
प्रिति, सुन्दर आणि क्ष लिहायचा असेल तर just type x thats enough.
|
R_joshi
| |
| Friday, July 14, 2006 - 2:47 am: |
| 
|
धन्यवाद मृदुगंधा जमल मल. आणि तशि सुधारणा हि केली वरिल चारोळित
|
use kSha or xa क्ष
|
एकमेकांच्या सहवासाला सहवासाचं कोंदण काहुरल्या संध्याकाळी नक्षत्रांचं आंदण गप्पांच्या सारीपाटाला विस्कटण्याची भीती आणि पटावरच्या सोंगटीला चौकटीचं बंधन...
|
आनंदयात्री रुबाईच्या जवळपास आहे
|
R_joshi
| |
| Friday, July 14, 2006 - 3:04 am: |
| 
|
देवदत जमल मला क्ष लिहायला. तुझी सोबत जन्मांतरीची साथ आपुली सहजीवनाची भीती कशाला मग विसकटण्याची भेट होइलच जिवलगांचि प्रिति
|
Arun
| |
| Friday, July 14, 2006 - 3:51 am: |
| 
|
साथ सहवास अन् सहजीवन शब्द नव्हेत हे केवळ घडविण्या जीवन अधिक सुकर यांचेच मिळते कणखर पाठबळ
|
प्रीति, अग माझे नाव मृद्गंधा आहे..मृदुगन्धा नाही..पण काही असो तु मझ्या नावाला आणखीच छान केलेस.. अगदी हळूवार मृदु झाल्यासारखे वाटतेय.. सोबतीस घेवून आनंदयात्री चाललि प्रीतिगन्धाची नक्षत्रयात्रा कृपाच जणूही देवदत्तांची पुलकित करुन गेली गात्रा -मृदगंधा
|