Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
झुळुक

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » झुळुक « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 27, 200620 06-27-06  4:49 pm
Archive through June 29, 200620 06-29-06  1:19 am
Archive through July 01, 200620 07-01-06  12:09 am
Archive through July 01, 200620 07-01-06  5:24 am
Archive through July 05, 200620 07-05-06  2:26 am
Archive through July 07, 200620 07-07-06  6:28 am
Archive through July 13, 200620 07-13-06  8:40 am
Archive through July 14, 200620 07-14-06  8:54 am
Archive through July 20, 200620 07-20-06  7:43 am
Archive through July 24, 200620 07-24-06  10:52 pm

Jo_s
Tuesday, July 25, 2006 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋ जमलं
Himscool, कापो धन्यवाद


Smi_dod
Tuesday, July 25, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनची कवाडे सगळी बन्द केलीय
उगाच किलकिली केली
मुरली,सखा
सगले भास आहेत
मृगजळा मागे धावणे आहे
असे काही नसते
जगणे फ़ार वेगळे असते
तिथे मुखवटे असतात
खोटे हसु आणि खोटे रडु
शेवटी सगळेच खोटे
माझेच चुकले मृगजळ
उमगलेच नाही


Pkarandikar50
Tuesday, July 25, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटा तुडवत चाललो, थांबलोच नव्हतो.
धुके दाटले, मागच्या वाटा केंव्हाच बुडाल्या.
पुढेहि अंधार, चाचपडत, ठेचाळणारा.
ध्यानी आले, किती ओझी वागवतोय आपण?

-बापू.


Pkarandikar50
Tuesday, July 25, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे फासे उलटत गेले,
पट उधळून दाने भरकटली.
व्याजांनी मागीतली मुद्दले उसनी,
कर्जांनी आपलेच लिलाव पुकारले.

-बापू.


Smi_dod
Tuesday, July 25, 2006 - 11:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवेळीच्या पावसा सारखा
आलास माझ्याकडे
पुर्णपणे झोकुन देउन
एकरुप झाले तुझ्यामधे
पण तु मात्र कायम
एका कोषातल्या सारखा होतास
बंदिस्त.... अलिप्त... अबोध
माझ्या अणुरेणुंना जाणणारा तु
मला मात्र कायम दुरावलेला
हा दोष माझा की
तुझ्या भोवतालच्या कवचाचा
नाही भेदु शकले मी त्याला
अनोळखीच राहीला तु मला
तु मात्र मझा
सखा,सोबती,जीवलग झालास
माझ्या वेदनेवरची हळुवार फ़ुंकर झालास
माझ्यासठी माझे जग झालास
पण मी कोण तुझी?
हा प्रश्न कायम अनुत्तरित राहिला
हे प्रश्न.. हा गुंता
संपणार नाही
तुझ्या भोवतीचे कवच गळुन पडल्याखेरिज
मी तुझी कोण
हे मला कळणार नाही


Shyamli
Wednesday, July 26, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मर्यादांच्या राज्यात
वादळानी कसं राज्य करायच?
वादळी बाणा सोडुन
का झुळुकेसारखं वागायच?

श्यामली!!!


Devdattag
Wednesday, July 26, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह.. बहोत अच्छे.. ..

Meenu
Wednesday, July 26, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मर्यादेतल्या सुरक्षिततेला
विसरुन कसं चालेलं ...?
आपल्या बरोबर सर्वांनाच
दुखवुन कसं चालेल ...?
सुखाचा जीव दुःखात लोटुन
सांग काय मिळेल ...?

म्हणुन सांगते झुळुक हो
हवीहवीशी वाटणारी ....
नको होऊस वादळवारा
सारं काही मोडणारा ...

मीनाक्षी !!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators