|
गुरुपौर्णिमा ||गुरु ब्रम्हा गुरु: विष्णु गुरुरदेवो महेश्वरा|| ||गुरु साक्षात परब्रम्ह तस्म्यै श्री गुरवे नम:|| उद्याचा शुभ दिवस गुरुपौर्णिमेचा. या दिवसाचे औचित्य साधुन मला माझ्या गुरुंची महती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तसे तर आजपर्यंतच्या आयुष्यात मला अनेक गुरु भेटले. त्यांच्याकडुन छान मार्गदर्शन मिळले; पण ज्या गुरुची माहिती मी आज देणार आहे. ते गुरु माझ्या जीवनाच्या प्रत्येक चढ-उतारात, अडीअडचणीत, संकटात, माझ्य यशापयशात, सुखदु:ख़ात सामील होता. त्यांनी माझ रडण, हसण, आनंद, राग, प्रयत्न, हार-जीत सगळ स्वत: अनुभवल आहे. आज मी जे काही आहे त्यात सर्वात मोठा वाटा त्याच "गुरुंचा" अहे आनि ते गुरु म्हणजे "माझी आई आणि पप्पा". लहानपणापासुनच माझ्यासाठी, माझ्या भावासाठी झुरणारी, कष्ट उपसणरी, वेळ प्रसंगी वडीलांचा ओरड, बोलणी खाणारी, आमचे सगळे हट्ट पुरवणारी, सगळ्या खोड्या माफ़ करणारी, वेळ पडेल तेव्ह आमचे कान पिळणारी ती माझी आई… मी लहान असताना (३-२ रीत होते तेव्हा) मी जेवत नव्हते म्हणुन माझ्य पायावर कालथ्याचा चटका दिला होता. मी पप्पा ऑफ़िसमधुन आल्यावर लगेच त्याची तक्रार केली होती आणि आईने बराच ओरड खाल्ला होत त्यासाठी... दहावी पास झाल्यावर आनंदाने वाटलेले पेढे, १२वीला कमी मार्क पडले म्हणुन मला दिलेली उभारी, मग पंधरावीला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मिळलेली नोकरी आणी रिझल्टचे केलेले एकत्र सेलिब्रशन… सगळ काही लक्षात आहे. मझ्या परिक्षेच्यावेळी रात्री ४ ला उठुन मला करुन दिलेला चहा. अस बोलतात, "आईचे मन समजायला स्वत्: आई व्हायला लागत…" अजुनही रोज हातात मिळणारा चहा, नाश्ता, जेवणाचा डबा, प्रत्येक भाउबीजेला,सणाला तिचे कासावीस मन, माहेरच्यांची आठवण हे सगळे मला दिसते. यामुळे नेहमी मला यामुळे सावरकरांचे गीत आठवते. आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी पण याच्या अर्थ असा नाही की माझ्या पप्पांनी कधीही माझे कौतुक केले नाही. ते तर दर वेळेला माझ्याबरोबर असतातच. त्यांचे तर एक वाक्या ठरलेला आहे "हीच पुढे माझे नाव काढणार, जी गोष्ट हातात घेते ती आजपर्यंत पुर्ण करुन दाखविली आहे." टिपरे बघताना शलाकाचे लग्नाचे भाग बघत असताना कित्येक वेळा मी त्यांच्या डोळ्यात पाणी बघितले आहे. वरुन त्यातीला एक संवाद तर ते मला पदोपदी ऐकवत असतात." बापाला मुलीच्या सासरी जाण्याचे दु:ख़ हिमालय पर्वताहुनही मोठ असतं..." मग मी रडायला लागल्यावर माझी घातलेली समजुत," नवर्याच्या घरुन रोज मला दोन वेळा फोन करायचा, एकदा दुपारी जेवल्यावर आणी रात्री जेवुन झाल्यावर..." त्यांनी शिकविलेल एक मागण," कधीही देवाला सांगावे की आपल्या शत्रुला चांगली बुद्धी दे जेणेकरुन तो आपल काहीच वाईट करु शकणार नाही आणी जर का केलेच तर त्याचा नंतर त्याल पश्चाताप होईल." मी कुठे नातेवाईकंकडे रहायला गेल्यावर मला केलेला फोन पण स्वत कधीही बोलणार नाहित, नेहमी दुसर्यांन बोलायला लावतील. बारावीला माझ्याबरोबर रोज पहाटे मला सोडायला म्हणुन ४.३०ला घरातुन निघणे आणी मग ५.१८ पर्यंत प्लॅटफ़ॉर्मवर एकटेच बसुन रहाणे. या जागरणामुळे त्यांना वर्षभर झालेला पित्ताच त्रास. मला नोकरीत प्रत्येकवेळी मिळालेल प्रमोशन, पगारवाढ वैगरे प्रत्येकवेळी त्यांनी माझं केलेला कौतुक, देवापुढे ठेवलेली साखर किंवा देवाला दिलेला नारळ अशा सगळ्या प्रसंगातुन ते माझ्या बरोबर आहेत आणि माझ्या आठवणीतही रहातील. पण या सगळ्या गोष्टींच्या ऋणाईतुन मात्र कधीही माझी उतराई होउ शकत नाही... या सर्व गोष्टी मिळण्यासाठी भाग्य असाव लागतं किंवा माझी गेल्या जन्मीची एक पुण्याईच आहे. आत्ता देवाकडे एकच मागणं प्रत्येक जन्मी हेच गुरु मला मिळू देत... रुप...
|
Moodi
| |
| Monday, July 10, 2006 - 7:56 am: |
| 
|
रुपाली अतिशय सुंदर अन समयोचीत लिहीलस गं. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ देत ह्याच उद्याच्या गुरु पौर्णिमेनिमीत्त सदिच्छा. खरयं आई वडिलांसारखे गुरु लाभणे हेच आपले महदभाग्य. 
|
रुपाली, खरंच आई-वडलांसारखे गुरू मिळणे सुद्धा भाग्याचे लक्षण आहे. कित्येक जण आई-वडलांचे महत्व कळण्या आधीच आई-वडलांना पारखे होतात... समाज त्यांना पोरके म्हणतो... त्यांच्या कडे पाहिलं की आपण खरंच खूप नशीबवान आहोत हे लगेच लक्षात येते अन् अशावेळी देवाचे आभार मानतो.. तू अतिशय छान लिहिलं आहेस.. अजूनही असंच काही तुज्याकडून अपेक्षित आहे..
|
रुपल्या.. छान लिहिलस.. ग, आई वडीलानी आपल्यासाठी किति कष्ट काढले असतात, आणि आपण.. ते फ़ेडुही शकत नाही, नुसती जाणीव ठेवली तरी त्याना खुप बरे वाटते..इअतके त्यांचे मन मोठे असते!!"
|
Neelu_n
| |
| Monday, July 10, 2006 - 8:42 am: |
| 
|
रुपाली छान लिहलयस ग. गुरुपौर्णीमेच्या दिवशी आईवडीलांसाठी ही सुंदर भेट आहे.
|
Shreeya
| |
| Monday, July 10, 2006 - 12:07 pm: |
| 
|
रुपाली,मस्तच ग! आई-वडीलांच्या ऋणातुन कधीच उतराई होऊ शकत नाही ग! मन खूप हळव झाले हे वाचुन! आई-वडील खरेच कायम गुरुच असतात पण त्या शिकवण्याला जी मायेची झालर असते ना ती काही औरच!
|
Dineshvs
| |
| Monday, July 10, 2006 - 1:03 pm: |
| 
|
रुपाली, पप्पांचे शत्रुबद्दल विचार खासच. मनापासुन दाद द्यावीशी वाटली.
|
Yog
| |
| Monday, July 10, 2006 - 1:19 pm: |
| 
|
वाह! अगदी योग्य गुरुदक्षिणा..
|
रुपाली सुंदरच मलाही आठवत परिक्षेच्य दिवासात माझे पप्पा company देत रात्रिचे आणी आई चक्क भरवत असे दोन घास कारण tension ने जेवत नाही म्हटल्यावर आई आग्राहाने भरवायची ते सुद्धा graduation च्या दिवसात पप्पा तर चक्क exam center आत class मधे येवुन सोडत सगळ्या friends ना wish करत आई आणी पप्पा ह्यांचे प्रेम हे एकदम unconditional असते दुःख हेच की आपण त्या प्रमाणात काहीच करत नाही
|
>>>>> ," कधीही देवाला सांगावे की आपल्या शत्रुला चांगली बुद्धी दे जेणेकरुन तो आपल काहीच वाईट करु शकणार नाही आणी जर का केलेच तर त्याचा नंतर त्याल पश्चाताप होईल." दिनेश, अनुमोदन! मी फक्त त्याहुन अधिक एक मागणे देवाकडे मागतो! ते असे की "हे देवा, अणि तुला जर यातिल काहिच करणे शक्य नसेल तर किमान माझ्या शत्रुला कन्फ्युज कर! किन्वा त्याला कन्फ्युज करायची शक्ती मला दे!" एनिवे, बीबी गुरुपुजना बद्दल हे! सकाळीच श्रीदत्त पादुकान्ची पुजा करुन आलो आयुष्यात भेटलेल्या, ज्यान्च्या ज्यान्च्या कडुन काहीना काही शिकायला मिळाले त्या सर्व आठवणीत असलेल्या व नसलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जनान्ना मनोमन प्रणाम केला! रुपाली, छान लिहिल हेस! 
|
रुप्स, छान. ह्याच एक print out काढून आई-पप्पाना पण दाखव. आपल्या मुलांच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम आहे हे त्यांना ठाऊक असतच. पण आपली लेक किती छान लिहिते ते त्यांना कळायला हव नाही का?
|
Aashu29
| |
| Tuesday, July 11, 2006 - 12:50 am: |
| 
|
फ़ारच touchy आहे ग तुझ लिखाण खरच!! हेच सर्व मुलं मोठि झाल्यावर विसरतात!!त्यामुळे मात्र या गुरुतुल्य आइवडिलान्ना फ़ार वाइट वाटत असेल पण मि मात्र अजुनहि जिथे असेल तिथुन माझ्या आइबाबांना contact करते!! आणि हो सासु सासर्च्यानाहि!! तेहि आइ वडिलच ना!!
|
Shivam
| |
| Tuesday, July 11, 2006 - 1:51 am: |
| 
|
रुप, खरच मनाला भिडेल असं लिहिलं आहेस. आई-वडिलांकडून आपण जितकं शिकू तितकं कमीच असतं. आयुष्यातील सुख-दुखा:च्या प्रत्येक वळणावर तुला त्यांचं मार्गदर्शन मिळत राहो ही सदिच्छा! गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
|
Sadda
| |
| Tuesday, July 11, 2006 - 2:48 am: |
| 
|
रुप अगदि छान.. आई बाबा खरच आपल्यासाठी खुप काहि करतात..तु हि उत्तम दक्षिणा दिली आहेस..
|
मुडीताई, महेशा, लोपा, नीलुताई, श्रीया, दिनेशजि, योग, मनुस्विनी, लिंबुभाउ, भ्रमर, आशु, शिवम, सदा सगळ्यांचे मन:पुर्वक धनवाद... पण हा लेख लिहिण माझ्यासाठी एक खुप मोठ आव्हान होत ते सगळे प्रसंग मी पुन्हा एकदा जगले आणि कित्येक वेळा तर डोळे भरुन येत होते. भ्रमर, काल घरी गेल्यावर आईने आठवण करुन दिली की उद्या गुरुपौर्णिमा आहे तेव्हा आपल्या गुरुला काहीतरी भेट घेउन जा मी फ़क्त हसले. आज सकाळिचे ते प्रिन्ट एक पाकिटात घालुन ठेवले माझ्या टेबलावर पण तिल हातात द्यायचे धैर्य झाले नाही. कदाचित माझा संयम सुटला असता; म्हणुन आत्ता घरी फोन केला तेव्हा टांगळ मंगळ करत बोलत होते. मग आईच म्हणली," छान हं मी वाचला." तेव्हा कसेबसे हसत फोन ठेवला पण अश्रु तर आलेच. माझ्या मनातले कित्ति पटकन ओळखले तिने...
|
जर यातिल काहिच करणे शक्य नसेल तर किमान माझ्या शत्रुला कन्फ्युज कर! किन्वा त्याला कन्फ्युज करायची शक्ती मला दे!">>>>>>>> मग मी त्यासाठी म्हणेन माझ्या शत्रुची फ़क्त लिंबुशी भेट घालुन दे...
|
Bee
| |
| Tuesday, July 11, 2006 - 4:52 am: |
| 
|
आज संध्याकाळी आमच्या योगामधील गुरुजींकडे गुरु पौर्णिमा साजरी होणार आहे आणि मी जाणार आहे. माझा हा पहिलाच अनुभव असणार आहे गुरु पौर्णिमा साजरी करण्याचा. रुपे.. मस्त लिहिलस! इथे सगळ्यांना आपापल्या आयापप्पांची तू आठवण करुन दिलीस.
|
Maudee
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:49 am: |
| 
|
ख़ूपच सुंदर रुप.... अप्रतीम
|
Megha16
| |
| Tuesday, July 11, 2006 - 11:39 am: |
| 
|
रुपाली छान लिहल आहेस. तुझ्या आई-वडीलांना तुझ हे गिफ्ट नक्किच आवडल असेल.
|
Chinnu
| |
| Tuesday, July 11, 2006 - 2:28 pm: |
| 
|
रूप छान लिहिलस ग.
|
|
|