>>हल्ली माझ्या स्वप्नालाही केवळ तुझाच छंद असतो.. पहाटेच्या श्वासालाही मोगर्याचा गंध असतो! <<< अहा भ्रमर खल्लास एकदम... प्रिती तुझे प्रत्युत्तरही छानच...
|
Jo_s
| |
| Friday, July 07, 2006 - 6:59 am: |
| 
|
मित्रहो आंधळेपणा आणि स्वप्नांचा काय सुंदर उपयोग केलाय ग.दि. मां. नी किती भाग्य या घोर अंधेपणीही दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही....
|
काल राती चांदण्याला रातराणिचा बहर आला गीतातला गंधार तुझिया माझिया अधरांनी प्याला!
|
R_joshi
| |
| Saturday, July 08, 2006 - 12:29 am: |
| 
|
अधरावर तुझ्या प्याला मी गीतांचा ठेविते गीत तुझे माझ्या श्वासात गुंफिते प्रिति
|
R_joshi
| |
| Monday, July 10, 2006 - 12:14 am: |
| 
|
साथ तुझी माझ्यासाठी अनमोल असा ठेवा प्रेमाच्या या वाटेवर पाऊल जरा जपुन ठेवा प्रिति
|
फक्त तुझा हात हाती हवा येईल जगण्याला अर्थ नवा
|
हातात हात.. मंद चांद रात.. झुळुक गाणं गात आज अंग़णात.. रात राणीची साथ..!!!
|
रातराणी बहरली मोगरा तरारला तुझ्यासाथीने माझा जीवनवृक्ष बहरला रुप...
|
साथीस ही तुझ्या तसे मुकलो ना आम्ही कधी जागेपणी स्वप्न पहाणे ह्यासही ना चुकलो कधी आहेस तू साथीस अमुच्या हा अमुचा विश्वास होता ग्रीष्मातल्या रवीकरांत आम्हा चंदनाचा भास होता
|
Sania
| |
| Monday, July 10, 2006 - 8:24 am: |
| 
|
असताना तू सोबत हात तुझ्या हातात मिळून चालू हि वाट चैतन्य उसळले गात्रात
|
भासही असला नव्हे जो मयसभेमधी मांडला भास तो जो सत्य होऊन स्वप्नी उषेच्या सांडला --तेजस्विनी
|
R_joshi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:21 am: |
| 
|
भास तुझा मला स्वप्नि नेहमी जागवतो उषेच्या किरणांना परिसाचा स्पर्श देतो प्रिति
|
R_joshi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:39 am: |
| 
|
ती रात... काळ रात ठरली पायाखालची जणु धरणिच दुभंगली मानवतेच्या शत्रुने माणुसकिवर झडप घातली सर्वाच्या डोळ्यातील स्वप्ने त्यांच्या डोळ्यांसह मिटलि प्रिति
|
Meenu
| |
| Wednesday, July 12, 2006 - 12:42 pm: |
| 
|
पोचवुन मला कैलासाला मंडळी निघाली घरी जायला मी ही निघाले ... म्हणलं एकटं नको थांबायला
|
R_joshi
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:03 am: |
| 
|
मीनु छानच मी जागेपणी स्वप्न पाहते उगवणा-या सुर्याचे तेजाळ्लेल्या किरणांचे अन दिपणा-या धरतिचे प्रिति
|
खिन्न मी होऊ कशाला नेहमीचा खेळ सारा तेच सारे सखे-सोबती बदलला फक्त वारा मार्ग माझा एकला हा शोधितो माझा निवारा हाक देई साथ देई अंतरीचा ध्रुव तारा...
|
नचिकेत, तुझी कविता आणी ही चारोळी दोन्हिही मस्तच...
|
विसरूनी भेगा स्वत:च्या इतरांना सांधतो मी सांगतो गोष्टी सुखाच्या अन् दु:खे बांधतो मी...
|
घर तापल्या उन्हाचे उन्हात बांधतो मी धरल्या आपल्याच साठीच्या सावलीत नांदतो मी
|
खिन्न मी होऊ कशाला नेहमीचा खेळ सारा आसुसलेले कान जरी ऐकण्या तो शब्द खारा 'बाबा' येइल ती हाक, मनास देतो रोज उभारा माझिया रे जीवनाचा हाच आहे गोषवारा
|